Jan 27, 2022
प्रेम

Yes sir ? PART 18

Read Later
Yes sir ? PART 18

" खूप हट्टी आहेस तू, I do not like you..." असं तन्वी विराटला वैतागून बोलली,
" Thank you...तन्वी"
पुढे काही बोलायला नको म्हणून तन्वीने पटकन रेडिओ लावला, जुनी गाणी चालू होती, 2 3 गाणी झाली की 'अच्छा जी मै हारी, चलो मान जाओ ना...' असं गाणं लागलं, तन्वीने लगेच रेडिओ बंद केला.
" रेडिओ का बंद केलास तन्वी ?"
" मला नव्हतं ऐकायचं ते गाणं..."
" का त्यात काय वाईट आहे ? "
" असाच, माझी इच्छा"
विराट मग त्याच गाण्याच्या चालीत तन्वीला म्हणाला,
" अच्छा जी मै हारा, अब तो बात करलो ना...."
तन्वीने हळव्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं, त्याचे डोळे भरून आले होते, त्या नजरेतून तिला समजलं होतं, विराट खूप उपसेट होता ते. तिच्या डोक्यात येत होतं, बोलायचं का ह्यांच्याशी म्हणून, पण इतक्या सहज, सहज कसलं खूप त्रास पाहिले दिलेलाच होता ना... ती काही क्षण काहीच बोलली नाही, काही वेळाने,
" झूठ बोले, कव्वा कांटे...." हे गाणं म्हणाली,
त्यावर विराट पण ऐकणार नव्हता,
" मेरी भीगी भीगिसी पालकोंमे बेह गये, जैसे मेरे सपने बिखरके....."
तन्वीला पण त्याला उत्तर द्यायचं होतं, म्हणुन तिने आता तर त्याची विकेट घेतली,
" भोली सुरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन छोटे..."
आता मात्र विराट तिला जिंकू देणार नव्हता,
" कैसे कहे हम, प्यारने हमको क्या क्या खेल दिखाये..."
तन्वी खरच काही वेळ गप्प राहिली,
" काय मग तन्वी, संपली बहुतेक तुझी प्लेलिस्ट"
" असले काय खेळ दाखवलेत तुला रे....खच्ची"
विराटला मनापासून हसू आलं,
" खूप मुली भेटल्या, पाहिल्या माझ्या मागे पण लागल्या पण तुझ्यासारखी पहिल्यांदा भेटली....भेटली तर भेटली पण माझ्या आयुष्यात सगळा गोंधळ घालून ठेवला..."
हे ऐकून तन्वी आश्चर्याने बोलली,
" गोंधळ आणि मी घातले....वाह...क्या जमाना आया हैं..."
" जमाना इतना भी खराब नाही की आप कोसने लग जाओ असे....कभी हमारे नजरोसे तो देखो, शयाद जन्नत ही जन्नत दिखे"
" नही देखना साहाब, हमारी नजरे काफी है..."
" बरं बरं...आता तुझ्याच नजरेने खिडकीच्या बाहेर बघ"
" Wow...खूप सुंदर दृश्य आहे, कोकणातून मुंबईला जातानाचा सूर्यास्त...डोंगर , समुद्र आणि सूर्य एकत्र छान दिसतात..."
" सांगितलं होतं ना जन्नत दिसेल ते...सांगितलं होतं पण ऐकणार कोण ना "
" खूप काही तीर नाही मालास तू...खूप वेळा पाहिलंय मी हे दृश्य..."
" ठिके... तुला विचारू एक चिडणार नाहीस ना...हुह...चिडलेला माणूस अजून किती चिडणार, जाऊदे विचारतोच...तू लहान असल्यापासूनच येवढी हट्टी होतीस, का वक्त ने किया ये हसी सितम "
" तुला समजायचं ते समज...."
" मग असं मी समजेन की तुझ्या घरचे किती सहनशील आहेत"
असं बोलला आणि तो जोरात हसायला लागला, हे ऐकून तन्वीच्या पण ओठांवर हसू फुटलं. हे बघून विराटला खूप समाधान मिळालं. तिच्या हाताला स्पर्श करत म्हणाला ,
" हेच बघायला मी आतुरतेने वाट बघत होतो..."
" तू फसवलंस मला..."
" नाही ग राणी... असं का फसवेंन..."
" कारण तुझी पहिली प्रेयसी परत आली..."
" वेडी आहेस का ...मी तुला सांगितलं होतं ना... मी तिच्यावर कधीच प्रेम नाही केलं, फक्त तुझ्यावर केलं, हे तुला मी खुप वेळा सांगितलं आहे, तरी का नाही विश्वास ठेवलास माझ्यावर"
" तू मला कुणालातरी किस करतांना पाहिलं असतस तर...तू काय केलं असतस... खरं उत्तर दे"
विराट ने 1 क्षण विचार केला आणि बोलला,
" मी हे असं दृश्य इमॅजिन पण नाही करू शकत..."
" तू इमॅजिन नाही करु शकत आणि मी तर असं पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी...कधी विचार नाही केलास के झालं असेल माझं, राग नव्हता आला एवढा, वाईट वाटलं खूप मग जेव्हा तू घरी आलास रात्री तेव्हा खूप राग आला तुझा..."
" का...तू समजवायला तर आलो होतो ना..."
" पण तुला पाहून खुप राग आला मला, मी दुसऱ्या दिवशी रेसिग्नशन देणार होते, पण अपघात झाला माझा..."
" हो, तेव्हा खूप डिस्टर्ब झालो होतो...तेव्हा मला बघून पण तुला विश्वास नाही बसला "
" वाटलं होतं पण मला सारखं फसवलं गेल्याची भावना सतावत होती..."
" आता पण पूर्ण राग गेलाय असं नाही... जास्त उडू नकोस तू, त्या दिसवही प्रितीने सांगितलं मला म्हणून थोडी तरी दया आली होती तुझी..."
" मग काय झालं त्या दयेच..."
" तुझी आठवण येण्यापुरतं मर्यादित राहिलं"
" तुला माझी आठवण यायची?"
" हो, यायची ना..."
" मग माझ्या फोन अँड मेसेज ला रिप्लाय का नाही दिलास..."
" मूड नव्हता...."
" Are you serious...मूड नव्हता म्हणजे...मी अक्षरशः वेडा झालो होतो. तुला काही गांभीर्य आहे ह्या गोष्टीचं..."
" मला खरच नव्हतं काळात कसं वागायचं के करायचं, मला तर वाटायचं कधी कधी की तू आपलं नातं संपवायला पण फोन केला असू शकतोस...म्हणून मी हे ऐकायला नको म्हणून पण फोन घेणं टाळायचे..."
" तू खरच वेडी आहेस.... असं कसं होईल अगं... का संपवू आपलं नातं....तू अविभाज्य घटक झाली आहेस माझ्या आयुषतली..."
" तू पण..."
" काय मी पण..."
" तुला समजलंय ते माहितीये मला..."
" तू सांग ना, तुझ्याकडून ऐकायचं आहे मला..."
" चिटकली आहे मी तुला, इच्छा नसतांना पण"
" इच्छा का नाही? तुला मी आवडलो नाहीये का..."
" आता ऐक माझं, मी ओहिल्यांदा तुला पहिला तेव्हाच मला तू आवडला होतास पण मला हे ओण माहीत होतं की आपली बरोबरी होणार नाही म्हणून..."
" का...बरोबरीच हे काय नवीन..."
" तू hot, handsome and rich CEO , आणि मी एक साधी इम्प्लॉयी, कसं शक्य होतं...आपल्यात जे घडत होतं, ते मला स्वप्न वाटायचं रोज, भीती वाटायची, एक दिवस हे स्वप्न संपलं तर ? आणि तसच झालं...मी विचार केला, दुसऱ्या दिवशी रेस्ग्नशन द्यायचं आणि घरी वोरात यायचं आणि इथेच काहीतरी काम करायचं."
हे ऐकून विराट काहीच बोलला नाही, त्याने थोडा पुढे जागा सापडली तिथे गाडी बाजूला घेतली आणि थबवली...
" गाडी का थांबवली विराट..."
" तुला असं का वाटलं की इतक्या सहज मी तुला माझ्यापासून लांब जाऊन देईन...तुला एकदा पण माझ्या मनात काय चालू आहे ह्याचा विचार कारावास असं नाही का वाटलं...माझ्याशी बोलून गोष्टी सॉर्ट करता आल्या असत्या ना...आपलं तर लग्न झालय ना आता, तरी??? पूर्ण आयुष्य असंच वागणार का तू??? "
" तू त्या लग्नाला अजून मानतोस?"
" हो, तू नाही का मानत ?"
" अर्थातच मानते..."
" तुझ्या नवऱ्याशी नाही बोलावसं वाटलं का ?"
" वाटलेलं, पण मी म्हणलं ना मला सगळं संपल्यासारखं वाटत होतं... के करायचं काहीच समजत नव्हतं...करण स्वप्नातून बाहेर आले होते असे मला वाटलं होतं"
" अत्ता ह्या क्षणी, मला प्रॉमिस कर....असं परत काहीच वागणार नाहीस म्हणून, नाहीतर मी पुढे जाणारच नाही इथून"
" तू माझी पण दशा समजून घे ना प्लिज..."
" ठिके, पहिले मला प्रॉमिस कर ...मग पुढचं पुढे..."
" हट्टी आहेस खूप..."
" मी हट्टी तर मग तू कोण..."
" I promise you...मी नाही वागणार अशी परत..."
हे बोलायचं विराट ने स्वतःचा सीट बेल्ट काढला आणि तन्वीच्या गालावर किस केलं...
" चल , आता निघू आपण..."
" सर, खूप भूक लागलिये... येवढं बोलून अँड ऐकून दमले ...खाउ ना काहीतरी...."
" ठिके आपण बघू कुठलं हॉटेल मिळतंय का. मिळेलच नक्की कुठलतरी.."
" हो.."
"मग तुझा राग गेला असं समजू मी ?"
" उंम्म्म....नाही अजून"
" आता काय अजून राहिलं ???"
" ती मायरा आहे ना इथेच...आपल्या प्लॅन चं के त्या ? "
" तो प्लॅन उद्या पासून..."
" बेस्ट...."
तन्वीचा राग विराट ने शेवटी घालवला आणि तिला परत जिंकलं, दोघं जेवले आणि परत मुंबईचा प्रवास सुरु केला, रात्री उशीर झाला पोचायला.
" तन्वी ...एकटी कुठे राहतेस, चल ना आपल्या घरी जाऊ आपण..."
" नको नको... "
" का ग...."
" तुम्हीच या ना माझ्याघरी..."
" मी येईन...मला आवडेल तुझ्याबरोबर कुठेही राहायला..."
" दादा आला की जा मग तुझ्या घरी..."
" तू हकलशील तेव्हा मी जाईन..."


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

The Story Express ...

Student

Still exploring the world around, wherein stories is the way to get connected.