Yes sir ? PART 16

Dear readers, See the challenges created due to misunderstandings in love....See what wins at the end....Stay tuned for more of further parts and story.... ~The story express

ह्या भागापासून तृतीय पुरुष वक्त्यानुसार असतील, नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया खाली संगा. तुमच्या सगळ्या कंमेंट्स आणि लाईक्स साठी खूप खूप आभार , असच तुमचं प्रेम असो.

~the story express

विराट पूर्णपणे खचून गेला होता तन्वीची अशी अवस्था बघून आणि कुठेतरी स्वतःला जबाबदार मानत होता. त्याचा शर्ट पूर्णपणे रक्ताने माखला होता, त्याला फक्त तन्वीला बरं झालेला आणि पहिल्यासारखी अल्लड बघायचं होतं, कुणाच्याच ऐकण्याच्या प्रॉस्थितीत नव्हता तो. काही वेळ झाला आणि तो डॉक्टर कडे गेला,
" डॉक्टर, माझी तन्वी कशी आहे, ती बरी तर आहे ना, मला भेटायचंय तिला आता"
" हो तुम्ही धीर धरा जरा, रक्त खुप गेल्यामुळे अजून बेशुद्ध आहे पण ती ठीक आहे, तुम्ही जाऊन त्यांच्या रूम मध्ये बघू शकता त्यांना"
" बरं..."
ती धावत त्या रूम मध्ये गेला, जसं त्याने दार उघडलं तसं त्याच्या डोळ्यातलं पाणी वाहू लागलं, तो हुंके देत रडू लागला. तिच्या बेडच्या जवळच्या स्टूल वर बसला, आणि तिच्या कपावरून अलगद हात फिरवला, तिच्या मिटलेल्या डोळ्यांकडे बघून त्याला स्वतःला सावरत येत नव्हतं, तिकडे असलेल्या नर्स ने त्याला धीर दिला. तेवढ्या विराटचा फोन वाजला, अनु चा फोन होता. त्याने डोळे पुसत फोन उचलला आणि रडत रडत घडलेला सगळं प्रकार तिला सांगितला, अनुला पण खूप मोठा धक्का बसला, आई बाबा पॅनिक होतील म्हणून अनु म्हणाली की ती रोहिणीला पाठवेल मुंबईला, तन्वी बरोबर. तन्वी तशी एवढी सिरीयस नव्हती पण विराटला असं सतत वाटत होतं की त्याच्या वागण्यामुळे असं सगळं झालंय. अनुशी फोन झाल्यावर त्याने तन्वीच हात आपल्या हातात घेतला आणि तो जवळ घेऊन तन्वीच्या बेडच्या टोकावर झोपून गेला, तो पण खूप दमला होता , मानसिक अँड शारीरिक दोन्ही. संध्याकाळी तन्वीला हळू हळू शुध्द येत होती, तिने डोळे उघडताच पाहिलं की विराट तिच्या शेजारी होता, तिच्या पण डोळ्यातून पाणी आलं पण ती काहीच बोलली नाही आणि दुसऱ्या दिशेने आपला चेहरा वळवला. तेवढ्यात विराट चा डोळा उघडला आणि पहिलं तर तन्वी पण जागी होती, त्याचा आनंद आकाश मावत नव्हता, तो पटलं उठला आणि त्याने तन्वी ला कपाळावर किस केला. तानऊच्या डोळ्यातून पाणी आलं, विराट तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला,
" राणी, खूप घाबरवलं होतंस मला, लवकर बरी हो, मला तुला असं नाही बघता येते, खूप त्रास होत आहे मला ....खूप बोलायचंय तुझ्याशी..."
" सर, तुम्ही ऑफिस ला नाही गेलात का ? "
" नाही, माझ्यासाठी आता तू जास्त महत्वाची आहेस ...."
ह्यावर तन्वी काहीच म्हणाली नाही. विराट आनंदाने म्हणाला,
" थांब मी डॉक्टरला बोलावतो"
त्याने डॉक्टर ला बोलावलं आणि तपासल्यावर समजलं, की ती एकदम ठीक आहे, फक्त आता जखम भरण गरजेचं आहे आणि उद्या संध्याकाळ पर्यंत ती घरी पण जाऊ शकते...हे ऐकून विराट खूप खुश झाला. डॉक्टर गेले आणि तन्वी विराट हे दोघंच रूम मध्ये होते. एक भयाण शांतता होती, जी दोघांना पण नकोशी वाटत होती, तेवढ्यात रूम चा दार कुणीतरी जोरात उघडलं दोघांचाही लक्ष दाराकडे गेलं आणि पाहिलं तर रोहिणी अली होती. रोहिणीला बघून तन्वीला खूप आनंद झाला. तन्वी थकलेल्या आवाजात म्हणाली,
" रोहिणी तू आलीस ते बरं झालं"
रोहिणी तिच्या जवळ येत टिचहात पकडून म्हणाली,
" its okay... तू अराम कर "
रोहिणीचं लक्ष विराट कडे गेलं,
" विराट, हे काय अवस्था झालीये तुमची, तुम्ही प्लिज फ्रेश होऊन या, खुप थकलेला वाटत आहात, तुमचा शर्ट ओण खराब झालाय खूप"
" रोहिणी आग मी खूपच घाबरलो होतो, म्हणून माझा पाय हलला नाही इथून"
" आता मी आहे इथे तुम्ही फ्रेश होऊन या, डोन्ट वरी..."
" हम्म, ठिके, मी येईन थोडा वेळात"
विराटला निघतांना वाटत होतं, की तन्वी काहीतरी म्हणेल पण ती काहीच बोलली नाही, विराट अजून खचून गेला. तो जड मनाने तिथून निघाला, घरी पोचताच त्यांना घडलेलं सगळं डॅनियल आणि प्रीतीला सांगितलं. हे ऐकून त्या दोघांना पण धक्का बसला, मायरा चा झालेलं प्रकरण पण त्याने त्या दोघांना सांगितलं, हे ऐकून तर दोघंही थक्क झाले. प्रीती म्हणाली,
" तू काळजी नको करुस, आपण समजावू तन्वीला..."
" हो, पण माझं आवरून झालाय मी जातो आता हॉस्पिटल मध्ये"
" थांब आम्ही दोघं पण येतो..."
" चालेल...."
ते तिघंही हॉस्पिटल मध्ये गेले, तन्वी आणि रोहिणीच्या गप्पा चालू होत्या, तेव्हाच ते तिघे आले, प्रीती धावत तन्वीकडे गेली,
"Darling, are you okay..."
तन्वी हसत म्हणाली,
" हो, ठीक वाटत आहे, पण दुखतंय खुप"
रोहिणीकडे बोट दाखवत तन्वी म्हणाली,
" ही रोहिणी माझी चुलत बहीण...खुप जवळची आहे माझी...आणि रोहिणी ही प्रीती ताई, विराट ची मोठी बशीन आणि हे तिचे husband डॅनियल , with their cutest baby girl Kayu..."
" Hi Rohini , good to see you"
ह्या सगळ्यांच्या बऱ्याच चांगल्या गप्पा रंगल्या होत्या, विराट खूप प्रयत्न करत होता की तन्वीशी बोलत येईल पण ती काहीच बोलत नव्हती त्याच्याशी...सगळ्यांनी एकत्र जेवण पण केलं प्रीती आणि डॅनियल निघत होते तेवढ्यात तन्वी बोलली,
" प्रीती ताई, मी उद्या अलीबाग ला चाललीये , रोहिणी बरोबर, काही दिवस घरी राहून बरं वाटेल"
हे ऐकताच विराटला धक्का बसला , त्याला ओरडून सांगायचं होतं 'नको ना जाऊ प्लिज, मला नाही राहता येणार इथे, एवढी नको ना रागावू ना' पण हे शब्द त्याच्या डोळ्यातल्या एका असावातुन बाहेर पडले.
" तन्वी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय... एकटीला, तुम्ही सगळे बाहेर जाऊ शकता का प्लिज..."
प्रीतीची ही विनंती ऐकून सगळे बाहेर गेले, प्रीतिमे तांविचव हात पकडला आणि बोलली,
" तन्वी मी इथे विराटच्या बाजूने नाही बोलणारे, फक्त जे घडलंय ह्याची मला तुझी बाजू ऐकायची आहे"
तन्वी रडत रडत बोलू लागली,
" मी विराटवर खूप विश्वास ठेवला , अगदी स्वतः पेक्षा जास्त, तो माझ्यासाठी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा व्यक्ती झाला होता, आणि त्या दिवशी मी त्याला आणि मायराला किस करताना पाहिलं, असं वाटलं की माझ्या मनाचा खेळ झालाय , विराट ने खूप वेळ प्रयत्न केला की माझ्याशी बोलून समजावून सांगण्याचा पण मग त्याला तिथे परिस्थिती नाही का करता आली हँडल, आज हे झालाय, उद्या म्हणेल की चकून आम्ही जवळ आलो आणि अजून वेगळच झालं तेव्हा के मग... . जरी तिने फोर्स केलं असलं असं आपण समजू पण तरी .... माझ्या मनातून कर ना विचार, माझी फसवणूक झालीये असं वाटत आहे मला"
" तन्वी तू शांत हो, तो पूर्णपणे खचलाय, त्याला आता ह्या क्षणी तुझ्याशिवाय काहीच दिसत नाहीये, खूप रडलाय तो, त्याला त्रास झालाय... पण तू म्हणत आहेस ते खरंय, तुझा राग पण मान्य आहे मला...तू जा घरी पण त्याच्याशी बोलणं नको थांबवू... तो अजून तुटेल"
" मी चिडलीये अत्ता त्याच्यावर, मी नाही बोलणार त्याच्याशी..."
" बर ठीक आहे, पण मला प्रॉमिस कर तू लवकरात लवकर परत येशील इथे"
" बघू ते... "
" बरं , तू काळजी घे, उद्या भेटू आपण... बाय"
" बाय, थँक्स..."
जशी प्रीती बाहेर पडली, विराट आणि रोहिणी आत आले,
" विराट मी थांबते इथे झोपायला तुम्ही जा,उद्या या..."
" मला घरी झोप नाही लागणार अगं, मी थांबतो इथेच, दोघंही थांबू"
"सर, मला वाटतंय तुम्ही घरी गेलं पाहिजे, तुमची काही काम असतील ऑफिस ची आजची ती करा आणि उद्या या"
हे ऐकून विराटला थोडा धीर मिळाला, त्याने ते लगेच ऐकलं करण त्याला तन्वीला दुखवायचं नव्हतं.
" ठिके, भेटू आपण बाय..."
ह्याच वेळेस रोहिणी काहीतरी करण्यात दंग होती तेवधवत विराट तन्वी जवळ गेला आणि तिच्या ओठांवर किस करत म्हणाला,
" Take care sweetie, good night"
असं बोलला आणि तो निघून गेला. तन्वी पण झोपून गेली आता तिला खूप बरं वाटत होतं आणि तिला दुसऱ्या दिवशी घरी जायची परवानगी पण दिली होती डॉक्टरने. दुसरा दिवस खूप गडबडीत गेला , discharge ची प्रोसेस करायला वेळ गेला बराच ...हॉस्पिटलचा सगळा खर्च विराटने केला होता, हे तन्वीला फार्स आवडलं नव्हतं, तिने त्याच क्षणीं तिच्या मोबाईल ने पैसे त्याला पाठवले, रागात तो तन्वीला बोलला,
" माझ्या आणि माझ्या बायकोच्या मध्ये तू का हे असं करतीयेस... घेऊ दे ना काळजी मला तिची, तेवढा तरी हक्क आहे माझा..."
तन्वी काहीच बोलली नाही...ती आणि रोहिणी अलिबागला निघाले, विराटला तिला जवळ घ्यायचं होतं पन ते ही त्याला नाही करता आलं. तो खूप उपसेट होता, खूप कमी बोलत होता, नीट जेवत पण नव्हता...2- 3 दिवस झाले तो रोज तिला फोन आणि मेसेज करायचा पण तन्वी त्याला काहीच उत्तर द्यायची नाही... तो खूप सेल्फ- गिल्ट मध्ये तुटत होता. ऑफिस ला जात नव्हता, घरूनच काम करत होता, तिची खबर बात त्याला प्रीती आणि रोहिणकडून कळायची... तिची पण अवस्था अशीच होती, बोलात नव्हती खूप , शांत शांत असायची...ह्या सगळ्या मध्ये विराट ने एका दिवशी खूप ड्रिंक केलं, की त्याला सावरता येत नव्हतं स्वतःला, त्याने तन्वीला फोन केला, आज चक्क तिने फोन उचलला, त्याला खूप आनंद झाला, कसातरी बोलला,
" तन्वी मला तुझी खूप आठवण येतीये, ये ना लवकर... भेटायचय तुला, बोलायचय तुझ्याशी, खूप दिवस झाले आता चिडून , बास न आता..."
" हम्म"
" फक्त हम्म, बोल ना काहीतरी, भांडण कर माझ्याशी... "
असं बोलता बोलता तो झोपी गेला... रोज वाट बघायचा, आज येईल उद्या येईल, पण येताच नव्हती, आठवडा झाला होता तिला जाऊन आणि बऱ्यापैकी लवकर बरी होत होती ती...

🎭 Series Post

View all