Yes sir ? PART 15

Hey, See the twist ....How the story has taken a different turn... Do stay tuned for more of further parts...Hope you enjoy reading further parts and this parts as well.... ~the story express

नमस्कार माझ्या सगळ्या प्रिय वाचकांनो,
तुम्ही दिलेल्या कॉमेंट्स अँड लाईक्स हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, करण ते मला नेहमी स्फुर्ती देतात अजून लिहायला. हो मी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया वाचते पण रिप्लाय देत नाही करण आता तरी मला माझी ओळख गुपित अशी ठेवायची आहे , खूप काही मोठं कारण नव्हे पण सहजच. मी असं मानते की तुम्ही हे समजून घ्याल, खूप खूप आभारी, तुमचं प्रेम आणि सहयोग सदैव असच राहूदे.

हा भाग काही निजी कारणामुळे यायला उशीर झाला, त्यासाठी क्षमस्व, पुढचे भाग लवकरात लवकर पाठवायचा नक्की प्रयत्न करेन.

खूप प्रेम,
-द स्टोरी एक्सप्रेस....



"तन्वी चल आपण निघुयात, नाहीतर उशीर होईल..."
"हो ...आलेच..तू येतोस का वर? "
"नको मी थांबतो इथेच...तू ये पटकन"
मी खालीच थांबलो आणि ती वर गेली. माझ्या डोक्यात खूप चिंता होत्या, कामाच्या पण आणि ह्या मायराला निस्तारण्यासाठी पण लवकरात लवकर सगळं झालंच पाहिजे. 15 मिनिटात तन्वी आली,
" चलो..."
" हो"
तेवढ्यात माझा फोन वाजला,
" तन्वी बघ ग कोण आहे"
तन्वीने फोन उचलला आणि स्पीकर वर ठेवला, आम्ही काही बोलायचो ह्या पूर्वीच आवाज आला,
" विराट, I miss you mannn, त्या तन्वी सारख्या मुलींसाठी मला का सोडत आहेस..."
तन्वी ने चकाकून माझ्याकडे पाहिलं.
" मायरा गप्प रहा, तू मला सोडलं होतंस मी नाही,stop this non-sense "
"Please Virat do not do this,I really miss you...how shall I prove that to you..."
" Shut up..."
असं म्हणत मी फोन कट केला आणि तन्वीला म्हणालो,
"ही खूप मूर्ख आहे अगं, लक्ष नको देऊस..."
" हो ते कळतच आहे..."
पुढच्या ऑफिस पर्यंतच्या प्रवासात आम्ही खूप असं काहीच बोललो नाही, तन्वीच्या मनात काय चाललं होतं ते मला ऐकायचं होतं. विचारता विचारता राहून गेलं.
" तन्वी आपण प्लॅन नुसार आता डायरेक्ट संध्याकाळी भेटुयात तू जा आपल्या कामाला, आणि काळजी घे"
" हो...तू पण...बाय..."
आम्ही दोघे आमच्या आमच्या कामाला गेलो, तसा धावपलळीचाच होता दिवस. खूप काम आणि मिटिंगस. संध्याकाळ झाली आणि मी तन्वीची वाट बघत होतो, पण तिचा काहीच निरोप नाही. शेवटी मी तिला फोन करायचं ठरवलं आणि तेवढ्यात दार वाजलं,
"Yes...come in, काय झालं एवढा उशीर का झाला"
" विराट अरे, ट्रॅफिक होता"
मी पाहिलं तर मायरा होती, उगाच बोललो मी , बघायला पाहिजे होतं अगोदर कोण होतं ते,
" काय करतीयेस तू इथे..."
" तुला भेटायला आलीये..."
असं म्हणत मायरा माझ्या खुप जवळ येत होती...
" प्लिज माझ्या आयुष्यातून निघून जा...हे बघ मी दुसऱ्या मुलीवर खुप प्रेम करतो इथे थांबून कुठलाही गैरसमज घडवून आणू नकोस..."
" विराट... काही होणार नाही... ती तन्वी काशी आहे रे, तुला सूट होणारी वाटत नाही..."
असं म्हणत तिने माझा चेहरा पकडला आणि मला किस करत होती, तेवढ्यात मी तिला ढकललं, पण तिने परत किस केला अँड तिचे माझ्या गालावरचे हात काढायला हाथ पकडला तेवढ्यात तन्वी आत मध्ये अली, हे दृश्य पाहून तिला धक्का बसला एकदम... तिच्या डोळ्यात पाणी आले, करण तिने पहिला त्यात मी मायरा ला किस करतोय असे स्पष्ट वाटत होतं, ती येताच मायरा दूर झाली आणि म्हणाली,
" तन्वी..."
" You guys carry on...sorry I disturbed you"
जेव्हा ती असं म्हणाली, माझा अक्षरशः मन तुटलं, तिला समजावून सांगायचं होतं की असं काही नाही पण कसं समजावणार.
"ए राणी ऐक..."
असं मी बोलत होतो तेवढ्यात ती निघून गेली, मी तिच्या मागे गेलो. मी तिचा पाठलाग करत जात होतो तेवढ्यात,
" सर, तुमची सही पाहीजे... खूप महत्वाचं आहे..."
" अत्ता नको...मी खरच घाईत आहे.."
" सर एकच सेकंद प्लिज"
मी पटकन कशीतरी सही केली आणि पाहतो तर माझ्या नजरेआड कुठे गेली होती तन्वी ते समजलच नाही... माझे ठोके अजून वाढले...मी तिच्या डेस्क पाशी गेली,
" सिया तन्वी कुठे गेली ? "
" सर ती जस्ट निघाली, म्हणाली काहितरी महत्त्वच काम आठवला म्हणून"
" बरं, थँक्स"
मी धावत ऑफिस च्या बाहेर आलो आणि आजूबाजूला पाहिलं तर कुठेच दिसत नव्हती...माझी गाडी काढली अँड तिला शोधायला निघालो, खूप सारखे फोन केले पण लागत बंद आहे असं येत होतं, मी लगेच राहुलला फोन लावला,
" राहुल तन्वी घरी आली तर प्लिज मला कळव ती घाईत ऑफिस मधून गेली, तिचा फोन पण लागत नाहीये..."
" अरे विराट मी आणि अनु इथे दिल्ली ला आलोय, माझं ऑफिस चं काम होतं एंड अनुला पण इथे राहनाऱ्या मैत्रिणीला भेटायचं होतं, मी बघतो तिला फोन करून आणि सांगतो तिला तुझ्याशी बोलायला"
" हो , बाय"
कुठे गेली असावी ही मुलगी, तुच्या आवडत्या हॉटेल्स मध्ये, समुद्र चौपाटीवर, सगळीकडे पाहिलं कुठेच नव्हती. मला स्वतःचाच राग येत होता, मी हे काय करून ठेवलं म्हणून. मला माहित होतं की जर प्रीतीला सांगितलं घडलेला प्रकार तर ती खूपच उपसेट होईल ...डॅनियल ला फोन लावला,
" Daniel, listen did Tanvi call you, can you please try and contact her"
" No man, anything serious , I will try and connect with her and will let you know..."
" Yes okay, please can you do that as soon as possible "
" Okay, bye "
कुठे सापडेल ती मला, पूर्णपणे वेडा झालो होतो मी, माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं. तिच्या घरी जाऊन बघावं का? असा विचार आला माझ्या डोक्यात. म्हणून मी घाईने तुच्या घरी गेलो, धावत वर गेलो तर तिच्या दाराला पण कुलूप होतं. माझ्या मनातली हुरहूर अजूनच वाढली... आमच्या प्लॅन मध्ये भांडण करणे असं होतं अँड एकमेकांशी अबोल धरायचा हे पण होतं, पण असं नाही, आम्ही मेसेज ने एकमेकांच्या संपर्कात राहणार होतो...तिच्या डोक्यात पाहिलेल्या दृश्याचा राग असेल का वेगळाच प्लॅन असावा...मी तिच्या घरापाशीच खूप वेळ बसून राहिलो तिची वाट बघत, रात्रीचे साधारण 9.30 वाजले असतांना मला तन्वीचा आवाज आला, मी आनंदाने उगलो आणि तिला शोधायला लागलो, तेवढ्यात ती माझ्या डोळ्यासमोर एका तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस जसा पडतो तशी समोर आली, मी माझ्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तिच्याकडे गेलो,
"तन्वी कुठे होतीस? अशी का गेलीस किती फोन केले मी तुला"
काहीच घडलं नाही अशा पद्धतीने ती म्हणाली,
" Sorry sir,फोन मधली बॅटरी संपली होती...आत या ना "
तिचं असं बोलणं मला कळतच नव्हतं, दार उघडलं आणि आम्ही आत गेलो,
"Have a seat sir ..."
" बसायला नाही आलोय मी इथे, कुठे होतीस?"
" एक महत्त्वाचं काम होतं ते करायला गेले होते , सॉरी जर माझ्यामुळे त्रास झाला असेल तुम्हाला तर"
" त्रास? मी मारणार होतो... "
माझं वाक्य कापत ती म्हणाली,
" एका empolyee साठी मारणार ?" असं म्हणाली आणि जोरसत हसायला लागली, हसता हसता ती मागे वळाली. तिच्या हास्यातून मधून मला आता रडण्याचे हुंकारे ऐकू येत होते, ते ऐकून खुप त्रास झाला मला. मी तिचे खांदे पकडत म्हणालो,
" मला बोलायचंय तुझ्याशी... आपण बोलायचं का बसून ? "
" नको, खूप झोप आलीये मला, झोपते मी, काही काम नसेल तर...." मोठा श्वास घेतला तिने " तुम्ही जाऊ शकता... गूड नाईट"
मी तिचे डोळे पुसत म्हणालो,
" ऐक ना माझं .... "
" गूड नाईट सर..."
" मी इथेच थांबणारे, सोफ्यावर झोपतो आज, पण आपलं बोलणं होत नाही तो पर्यंत मी नाही जाणारे..."
" बरं, if you are comfortable you can stay..."
असं म्हणत ती तिच्या खोलीत गेली आणि दार लावून घेतलं.. माझ्या डोळ्यातलं पाणी पण थांबत नव्हतं आता, मी तसाच पडलो आणि कधी झोप लागली ते समजलंच नाही. सकाळी बेल च्या आवाजाने मी उठलो, दार उघडलं तर दूध आलं होतं, मी ते आत घेतलं आणि तन्वीची तिला आवडते तशो कॉफी केली, कॉफी होईसपर्यंत तन्वी आवरून बाहेर आली होती, तिचे डोळे पूर्ण लाल आणि सुजलेले, खूप वाईट वाटलं मला तिला असं बघून, माझ्यामुळेच हे सगळं झालं होतं, त्या मायराला आडवायची ताकद नव्हती का माझ्यात? कसं काय घडवू शकलो मी हे सगळं.
" तन्वी कॉफी..."
" नको सर, thank you "
" खूप प्रेमाने केलीये तुझ्यासाठी "
" नको, राहूदे, मला उशीर होत आहे ऑफिस ला जायला"
मी तिच्यावर ओरडून बोललो,
" तन्वी काय चालू आहे तुझं, काल पासून ताडफडतोय मी, तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून, तुला काहीच कसं वाटत नाहीये? "
मी हे बोलल्यावर डोळे घट्ट मिटले आणि मोठा सबवास घेतला , परत झालेली चूक माझ्या लक्षात आली, असं ओरडायचं नव्हतं मला. ती काहीच बोलली नाही,
" 5 मिनिट दे मला फक्त , आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करूयात "
" सर, गोष्टी आहेत क्लिअर, मी चिडले नाहीये, तुम्हाला वाटत असेल तर, आपण जे बोलायचं आहे ते ऑफिस मध्ये बोलू, मीटिंग पण आहे ना आता..."
" खड्यात गेली मीटिंग...ऑफिस मध्ये बोलण्यासारखे नाहीये हे... तू समज कुठे जायचं आपण , तिथे जाऊन बोलू"
" सर प्लिज, उशीर होत आहे, माझी ट्रेन पण सुटेल "
" बरं चल निघुयात "
मी तसाच तिच्यामागे निघालो, गाडी तिथरच ठेवली, रस्त्यावर ती माझ्याशी काहीच बोलत नव्हती, ओळख पण दाखवत नव्हती. मला खूप काळजी वाटत होती, मी जसा तिच्या मागे जात होतो तशी ती घाईने चालत पुढे जात होती, तेवढ्यात मी तिच्या जवळ जाईन म्हणून ती पळत रास्ता क्रॉस करायला गेली, सिग्नल चालू नव्हता आणि एक गाडी जोरात येत होती, तन्वी त्या गादीवर धडकली, माझ्या मनाचा ठोका चुकला मी तन्वी अशी हाक पण नाही मारू शकलो, माझ्या अंगातली सगळी शक्ती गेली, डोळ्यात पाणी आलं, तिच्या दिशेने मे जात होतो, भीती वाटत होती खूप... लोकं जमा झाले होते.
मी त्या गर्दीतून आत गेलो आणि तन्वीला रक्ताच्या साथोल्यात पाहिलं, मी खाली बसलो आणि तिला उचलून घट्ट मिठी मारली, काहीच बोलता येत नव्हतं मला... तिचे डोळे बंद होते, कपावरून रक्त येत होतं. काहीच करता येत नव्हतं मला.
" साहाब, इन्हे टॅक्सी में लेलो, hopsital लेजाना होगा..."
मी काहीच न बोलता, तिला उचलून घेतलं आणि टॉक्सिच्या मागच्या सीटवर तिला पकडून बसलो. माझ्या खिशातून रुमाल काढला आणि तिचा चेहरा पुसत असताना ती खोकली,
" राणी, काही नाही होणार... आपण चाललोय ना डॉक्टर कडे"
तेवढ्यात एका मोठ्या हॉस्पिटल पाशी गाडी थांबवली, स्ट्रेटचर वरून आत नेलं तिला , माझ्या नजरेआड जात होती ती, खूप त्रास होत होता, माझ्यामुळे झालेलं हे सगळं, मी आटत मधल्या एका बेंचवर बसलो, तेवढ्यात एक डॉक्टर आला,
" सर, will need your signatures here, खूप ब्लीडिंग झालंय, एक प्रोसिजर करावी लागेल"
" ok"
" What is your relation with the patient? "
" Husband ! "

🎭 Series Post

View all