मी संध्याकाळी माझ्या बायकोची वाट बघत होतो, एकटाच होतो करण प्रीती आणि डॅनी बाहेर गेले होते. मी खूप excited होतो, म्हणून मी बाल्कनी मध्ये डिनर साठी टेबल पण ठेवलं होतं. मी दुपारीच जेवण झाल्यावर माझ्या वकीलाकडून पेपर्स आणले होते म्हणजे कायद्याने आम्ही एकत्र येऊ शकतो. बराच वेळ झाला 9 वाजत आले पण तन्वी आलीच नाही, शेवटी तिला फोन केला तर तो पण उचलला नाही. माझ्या मनात एक हुरहूर लागली होती, असं का म्हणून...शेवटी बेल वाजली आणि मी धावत गेलो, तन्वीच आली होती.
"कुठे होतीस? किती वाट बघत होतो मी"
ती दार लावत म्हणाली,
"सगळं सांगते, खुप महत्वाचं आहे..."
"काही झालय का? "
"हो, आपण बसून बोलूयात..."
"हो ये बस"
मी तिच्या शेजारी बसलो, आणि तिच्या केसातून हात फिरवत म्हणालो,
" सगळं ठीक आहे ना ? "
" मी जे आता बोलतीये ते नीट ऐकून घे, मायरा ने खूप मोठा घोळ घातलाय !!"
" काय काय केलंय त्या मूर्ख मुलीने ? "
" खुपच निछ काम, कश्यप सर होते तेव्हा एकदा ती कधीतरी अली होती ऑफिस ला तेव्हा तिने आपल्या ऑफिस मधल्या काही लोकांना फिरवुन, तिच्या तावडीत घेतलं होतं. "
" हो पण करणार काय आहे हे असलं करून ? "
" काय करणार नाही, केलाय तिने ... जी ती 3 माणसं आहेत, त्यांना ती जास्तीचे पैसे देऊन आपली सगळी माहिती लीक करू आणि आपल्या बऱ्याच अशा contracts आणि deals वर फरक पडलाय "
" काय बोलतीयेस, मला नाही वाटत, हो ती जरा वेडी आहे पण असं का करेल ती...तुझ्याकडे काही पुरावा आहे का, ज्याने आपण सिद्ध करू की ती असं करते आणि कोण आहेत ती 3 माणसं ज्यांनी कच खाललीये?"
" त्याच तिघांना शोधला तर आपलं काम सोपं होईल...पण ते खूप नाजूक पद्धतीने केलं पाहिजे, नाहीतर घोळ होईल..."
" पण अजून काय केलय तिने"
" सगळ्या गोष्टी लीक झाल्यामुळे, आपल्याला बराच लॉस झालाय आणि हे सगळं का केलं असावं तर तुझा बदला घ्यायला"
" मी आमचं नातं तोडलं म्हणून ? काय वाईट केलंय मी तिचं...उलट माझ्याच पैसे उडवले तिने 10 वर्षे..."
" का ते माहीत नाही मला, पण आज मी हे सगळं तुझी प्रेयसी नाही म्हणून सांगते पण कश्यप सिरांची कंपनी ला लॉस नाही झाला पाहिजे, खूप मनापासून त्यांनी ही कंपनी जोपासली आहे "
" आपण काय करायचं? पोलीसांना बोलवून सगळं सोडवू...ते जास्त सोपं होईल ना"
" हो, पण ते उघड झालं तर आपल्या कंपनीचं नाव खराब होईल की काही लोकांनी धोका केला म्हणून, सो जर हे आपण जरा वेगळ्या पद्धतीने आपण हे सोडवलं तर आपल्याला पण काही अलीगशन्स शिवाय ह्यातून बाहेर निघता येईल..."
" तुझं म्हणणं पटतंय मला, पण मायरा ला शांत पणे कसे बाहेर काढणार ? खूप अवघड आहे ते "
" थोडा dramatic वाटेल, पण ऐक, आपल्या कंपनीचं नाव खराब नसेल करायचं तर हे गरजेचं आहे. आणि अजून मला वाटतं की जर त्या तिघांना खरच पैशाची गरज असेल म्हणून त्यांनी केलं असतील तर ? तसं असेल तर मग त्यांचं करिअर पण पूर्णपणे संपणार नाही ना..."
" पण ते जे लागलेत ते खूप चुकीचं आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे..."
" विराट , सगळं मान्य आहे मला, पण आपण पाहिले शोधून तरी काढू ना ..."
" कसं शोधणारेस ..."
" खुप सोपं आहे...लॅपटॉप आण तुझा"
मी जाऊन लॅपटॉप आणला, मला खरंतर कळत नव्हतं काय करणार होती ती,
" फेसबूक उघड बरं तुझ..."
" पासवर्ड आठवत नाहीये ग, मी तुला म्हणलो होतो ना..."
" काहीतरी अटेम्पट्स करून बघ, शोध..."
मी काहीतरी करून पाहिलं, पाहिले काही चुकीचे आले मग शेवटी झालं ते ओपन...
" झालं बघ...अत्ता??"
" मायरा ला शोध आणि तिच्या लिस्ट मध्ये जे लोक आपल्या ऑफिस मधले असतील त्यांची लिस्ट बनवू आपण "
आम्ही शोधलं तर 9 जणं तिच्याशी कनेक्टेड होते. सगळे वेगळ्या डिपार्टमेंट मधले होते...पहिला टप्पा पूर्ण झाला होता आमचा.
" विराट, आपण आता पुढे काय करायचं हे ठरवू, let's do it sir "
तिचे हे ऐकून मला खूप बरं वाटलं, ह्याचा आनंद झाला की ती आमच्या कंपनिशी केवढी attached आहे ते, आणि तिच्या बोलण्यात कुठेच पैसे असं नव्हतं, सगळं values बद्दल होतं. आम्ही पहाटे 4 वाजे पर्यंत बोलत होतो. आमचं झालं सगळं ठरवून, थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने आम्ही हे मॅटर हँडल करणार होतो.
" विराट आपण ऑफिस मध्ये भेटू आता"
" राणी ,अत्ता कुठे जाणारेस , झोप इथेच , सकाळी सोडतो मी तुला तू तयार हो आणि तसाच जाऊ आपण ऑफिस ला"
" इथेच झोपू...."
" हो माझ्याजवळ..."
" अत्ता नको ना..."
ती लाजत म्हणाली,
" बरं, तू झोप गेस्ट रूम मध्ये मी झोपतो माझ्या रूम मध्ये, भीती वाटली एकटीला तर बोलाव मला..."
" नक्की, थोडा वेळ राहिलाय तेवढ्यात झोपून घेऊयात..."
" yes madam..."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा