"Please Virat, मला खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचंय तुझ्याशी..."
" काय रहिलंय बोलायचं?? "
" मी खूप मिस केलं तुला, मला परत तुझ्याबरोबर राहायचंय ..."
" मी वेगळ्या मुलीवर खुप प्रेम करतो... आमचं लग्न ठरलंय..."
"आपलं पण तर ठरलं होतं ना ? "
" हो पण तुला भारतात येण्यात काहीच रस नव्हता... We are done....तुझं काय काम आहे ते सांग आणि तू जाऊ शकतेस मग..."
" अर्रे ऐकून तरी घे... "
" काय... "
" आपण बोलू ना आरामात... ती कोण आहे जिच्यासाठी तू मला नको म्हणतोस..."
" आहे कुणीतरी खूप चांगली... बाय मला जायचंय , कामं आहेत इतर "
असं म्हणत मी घाईत बाहेर पडलो, तन्वीला शोधत होतो, तिचे मित्र म्हणाले, की ती बाहेर गेलीये कुठेतरी...पण कुठे ते माहीत नव्हतं. मी माझी गाडी काढली आणि तिला शोधत बाहेर पडलो, तिचा फोन पण लागत नव्हता. काळजी वाटायला लागली होती मला, मनातून चिडचिड होत होती खुप करण insecured वाटत होतं, मायरा ने काही गोंधळ घातला तर सगळंच संपून जायचं. तेवढ्यात फोन वाजला आणि मी पाहिलं तर तन्वीचाच फोन होता...
" कुठे आहेस तू...वेडी आहेस का...न सांगता का गेलीस..."
"सर शांत व्हा...ऐकून घ्या प्लिज"
" काय ऐकू ... कुठे आहेस ते सांग..."
" हो हो चिल, पुढच्या अर्ध्या तासात मी जिथे सांगेन तिथे या ...खुप महत्वाचं काम आहे"
" सांग कुठे ते "
" Versova बीच वर या"
" अत्ता ? वेडी झालीयेस "
" थांब तिथेच मी येतो"
मनात हुरहूर होती की का बोलावलं असेल तिने ते सुद्धा आता तिथे... मी पोहोचलो तिथे आणि तन्वीला शोधत होतो, कुठेच दिसली नाही म्हणून अजून चिडचिड होत होती...तेवढ्यात
माझ्या मागून तन्वीने मला मिठी मारली, मी रागात तिचा हात सोडला आणि जोरात तिच्यावर रागावलो,
" न सांगता का गेलीस? "
" ऐक, मी आज एक ठिकाणी वाचलं की आज जर कुणाचं लग्न झालं तर ते कधीच तुटत नाही आणि आणि ते खूप strong होतं... असा कुठलातरी मुहूर्त किती तरी हजार वर्षांनी आलाय"
" मग आपण काय करायचं ? "
" लग्न"
असं ती म्हणताच माझा सगळा राग गेला, मी तिला तिचे हात पकडत म्हणालो,
" चालेल पण ते कसं , काहीच तयारी नाही झालीये "
" तयारी कशाला पाहिजे, आपलं अर्ध लग्न तर झालाय, आता अर्ध राहिलंय"
मी हसत म्हणालो,
" वेडी आहेस तू ...अर्ध वगरे असं काही नसतं"
" ऐका तरी... तू सकाळी अंगठी घातलीस मला, आता मी घालेन...लग्न म्हणजव के तर एकत्र राहायचं प्रॉमिस असतं ना...बाकी सगळ्या formalities ना"
तिचं हे बोलणं ऐकून मला असं वाटलं की मी जगातल्या बेस्ट मुलीच्या प्रेमात पडलोय.
" सर, जेव्हा सकाळी मी परत माझ्या डेस्क वर आले तेव्हा मी हे वाचलं, सो मी लगेच अंगठी आणायला बाहेर पडले"
मी लगेच माझा हात पुढे केला आणि म्हणालो,
" घालून ताक ना मग अंगठी...."
तिने लाजत अंगठी माझ्या बोटात घातली , आणि माझ्या जवळ आली,
" ए थांब, हे घे "
मी पटकन माझ्या गळ्यातली चांदीची chain जी मला खूप प्रिय होती, ती मी तिच्या गळ्यात घातली,
" हे घे...तुला माझ्याकडून"
हे पाहून तिच्या डोळ्यातून पाणी आलं, मी पण तिच्याकडे बघत राहिलो.
" सर झालं आपलं लग्न, आता ही chain माझ्या अंगावरून कधीच काढणार नाही..."
" बरं, आता पुढे काय...माझ्या घरी येणारेस का राहायला?"
" नाही नाही, खरंतर एक घोळ आहे "
" बोल काय झालं अता"
" माझ्या घरी कुणालाच माहीत नाहीये, त्यांना कळलं तर खूप रागावतील आणि त्यांना असं लग्न पण मान्य नसेल"
" मग अत्ता "
" आपलं जे सीक्रेट अफैर होतं आता त्याचं सीक्रेट लग्न ठेवू "
मला येवढं हसू आलं,
" माझी राणी, कशी आहेस तू ..."
माझं वाक्य तोडत ती म्हणाली,
" आता मी खरंच तुमची राणी झालीये "
मला अजून हसू आलं, हा खूप सुंदर क्षण होता, समुद्राच्या साक्षीने आमची कायमची गाठ बांधली गेली होती.
" बरं ऐक तन्वी मला खूप महत्त्वाचं बोलायचंय तुझ्याशी, आपण आपला सीक्रेट लग्न celebrate करायला एका मस्त हॉटेल मध्ये जाऊ , तिथेच बोलू आपण "
" Yes sir ..."
" अत्ता तरी सर म्हणणं सोड "
" नाही मला आवडतं तुला सर म्हणायला..."
" बरं चल"
आम्ही गाडीत बसलो आणि निघालो,
" काय बोलायचं होतं?"
" आज सकाळी मायरा आली होती , अजून ऑफिस मधेच आहे बहुतेक..."
" काय फरक पडतो पण आता, आपलं तर लग्न झालाय"
मी हे तिचं वाक्य ऐकलं आणि जोरदार हसायला लागलो,
" हो खरं आहे, पण तिच्यापासून जपून रहा, खूप विचित्र आहे ती..."
" Yes sir..."
" मी तुझ्याशी बोलणार नाही आता"
" बरं बघू..."
मला हे सगळं खूप छान वाटत होतं, ज्या मुलीवर प्रेम करतो, तिच्याशी लग्न झालं होतं आणि हे पण समजलं होतं की मायरा येऊन पण काही उपयोग नाही... ती काहीच करू शकणार नाही...
आमचं जेवण झाले आणि आम्ही परत ऑफिस मध्ये गेलो, असं मला मानातूनच लाजू येत होतं , आम्ही दोघे माझ्या केबिन मध्ये गेलो, मायरा तिथेच कॉफी पित बसली होती, आम्ही जाताच ती उठली आणि विचारलं,
" Is this that girl "
मी तन्वीच्या खंडायवर हात ठेवत म्हणालो,
" Yes this is my darling...."
हे बघून तिचा संताप झाला आणि ती रागात निघून गेली, पण मी जेवढी मायरा माहीत होती, ती इतक्या लवकर आमचं नातं स्वीकारणार नव्हती, मी केबिन चा दार बंद केलं आणि तन्वीला जाईल घेत म्हणालो,
" आपल्या honeymoon चं काय ? "
" ते जाऊ ना सगळ्यांसमोर लग्न झालं की, आता तर सीक्रेट चालू आहे ना "
मला तर हे सगळं पूर्ण फिल्मी वाटत होतं, आता मला वाटत होतं की लवकरात लवकर तन्वीने माझ्या घरी यावं, म्हणून मी संध्याकाकीच तिच्या बाबांना फोन करून सांगितलं की आपण भेटून पुढचं सगळं ठरवू... आनंद तर होता मनात पण मायराने काही गोंधळ घातला तर, ह्याची भीती होती मनात...पण ह्याचा पण विश्वास होता की तन्वी मला कधीच सोडणार नाही आणि जे काय होईल त्याला आम्ही दोघे एकत्र सामोरी जाऊ...
" विराट चल मी काम लवकर संपावते मग आपण रात्री तुझ्याघरीं एकत्र जेऊयात "
" आपल्या घरी ?"
" हो हो, तसच, बाय आता... भेटू संध्याकाळी Mr. Husband"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा