Yes sir ? PART 12

Hey.... Do read what all in coming in...How Tanvi and Virat are going ahead with some complications and yet facing them together .... ~The Story Express

" Mr. Daniel and Mr. Virat, आम्हाला राहुलने आणि तन्वीने सांगितलं होतं, तिच्या आणि विराट बद्दल , पण आम्हाला अजून असा प्रश्न पडतोय की तन्वी सारख्या साधी मुलगी तुमच्या सारख्या उद्योगपतीला कशी आवडली? आमचं राहणं आणि बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या सारख्या नाहीयेत, आणि जरी असं मानलं की तुमचं लग्न झालं तरी तिला खूप अवघड जाईल तुमच्या सगळ्यांबरोबर राहायलाय, आणि मुख्य तुमच्या पद्धतीने राहायला!"
असे तिचे वडील म्हणाले, मला राहून राहून असा प्रश्न पडला, की मी जो कोण  आहे, त्याला मनासारखं प्रेम पण करणं किती अवघड आहे. लोकांना किती चुकीच्या संकल्पना होत्या, हे पाहून खूप वाईट वाटलं, तेवढ्या डॅनियल म्हणाला,
"काका, पण प्रेम तर तुम्ही कोण आहेत हे बघून तर होत नाही ना"
मग मी त्याचं वाक्य पुढे घेत म्हणालो,
"काका, मी मान्य करती आमच्या बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतील पण तुम्हाला वाटत आहे तेवढा फरक नाहीये आपल्या दोघांमध्ये. मला तन्वीच साधेपण खूप आवडले, तिने मला आशा गिष्टी शिकवल्या ज्या मी कधी शिकलो नव्हतो. पैशात सगळं मोलता नाही येत, मी तुमच्या मुलीवर मानापासून प्रेम करतो आणि तिच्याशीच लग्न करायचं आहे मला "
हे बोलून मला असं हिरो वाला स्पीच दिल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात तिचे काका म्हणाले,
" प्रेम वगरे ते ठीक आहे, पण तन्वी खुश राहू शकेल तुमच्याबरोबर"
तेवढ्यात तन्वी पुढे येत म्हणाली,
"हो काका मी खूप खुश असेन त्यांच्या बरोबर, तुमहाला वाटतात तसे ते नाहीयेत, आपल्यासारखेच आहेत"
डॅनियल त्याच्या अकॅसेन्ट म्हणाला,
"विराटला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच पारंपरिक पद्धतीने लग्न करायचं, तन्वी ही आमच्या पण कुटुंबाचा भाग झालीये"
"हो बाबा, खरं आहे हे सगळं, ती खुप चांगली माणसं आहेत, आणि बाकीच्यापेक्षा ज्यांना लग्न करायचं आहे ते खुश असले की जालना सगळं"
पण राहुलच वाक्य कापत तिचे वडील म्हणले,
"मग आम्ही जो शब्द दिलाय लग्नाचा दुसऱ्या कुटुंबाला त्याचं काय? तन्वी आणि तो लहानअसल्या पासून चांगले मित्र आहेत, आम्हाला त्यांच्या मध्ये नेहमी प्रेम आहे असाच वाटायचं, पण हे तर तिसरच ऐकत आहोत आम्ही. "
"बाबा...मग तन्वीला न विचारता तुम्ही शब्द का दिला ? तिला विचारलं का? आणि त्यांना समजावून सांगा मग, आम्हाला माहीत नव्हतं ते. मी बोलतो त्याच्याशी"

तेवढ्यात तन्वीची आजी म्हणाली,
"तुम्ही जर एकमेकांवर खरच प्रेम करत असाल आणि लग्न करून पण व्यवस्थित राहणार असाल, तर माझी तरी काहीच हरकत नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा जोडलेला नातं तोडून टाकणं सोपं असतं पण ते जुळून ठेवणं खूप अवघड असतं, तुम्ही दोघांनी जर हे जमवलं तर काय हरकर आहे, तुमच्या मध्ये मतभेद होतील पण अशा सगळ्या गोष्टीतुन तुमचं नातं अजून घट्ट होईल. "
हे आजीचं ऐकून मला खूप धीर मिळाला, तन्वीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ती पण सुखावली होती. 
" बाबा, मला आजी जे म्हणत आहे ते पूर्णपणे पटतंय, विराट खूप चांगलाय...मला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे"
"तन्वी, तुम्ही दोघांनी तुमची बाजू मंडलीये ना, तर आता आम्हाला विचार करायला वेळ द्या,राहुल विराट आणि डॅनियल आपले पाहुणे आहेत, त्यांना तू आणि तन्वी आपला गाव दाखवायला न्या, आम्ही तुम्ही परत आलात की आमचा निर्णय सांगू ..."असं तन्वीची आई म्हणाली. पण ह्या बोलण्यावर माझं समाधान नव्हतं झालं,
"काका, काकू, आजी आणि तुम्ही सगळे, मी तुमच्याकडे फक्त तन्वीचा हात मागितला, मनापासून ...मी तुमच्या निर्णयाची वाट बघतोय..."
असं म्हणत आम्ही परत समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलो, 
"विराट, तू काळजी नको करुस, घरचे थोडी चर्चा करतील आणि नक्की परवानगी देतील तुमच्या लग्नाला. आणि नाही म्हणाले, तर मी समजावेन नाहीतर मी स्वतः तुमचं लग्न लावून देईन"
राहुल च हे वाक्य ऐकून मला भरून आलं, मी काहीच बोलू नाही शकलो,फक्त हसलो. तन्वी पण काहीच बोलत नव्हती, मला तिला जाऊन धीर द्यायचा होता, पण ज्या अर्थी तन्वीला आमच्या बरोबर पाठवलं आहे, त्या अर्थी, नक्कीच ते होळकर देतील. मी आणि तन्वी शांत चालत होतो, आणि डॅनियल आणि राहुल काहीतरी बोलत होते, तेवढ्यात तन्वीला घरून फोन आला आणि आम्हाला घरी बोलवुन घेतलं. मी त्यांच्याउत्तराची अजून वाट बघत होतो, 
"विराट डॅनिएल बसा... हे घ्या मोदक..."
"नको काकु, पाहिले परवानगी द्या..."असं मी हरवून गेल्यासारखं म्हणालो,
"Mr. Daniel, get your baby and wife next time for further wedding planning"
असं जेव्हा तन्वीची बाबा म्हणाले, तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला ,येवढा आनंद मला कधीच झाला नव्हता. 
"Thank you thank you...तुम्हाला माहीत नाही मला केवढा आनंद झालाय..."
"हो ते दिसत आहे तुमच्या चेहऱ्यावर...
पुढच्या वेळेस आम्ही आपण पुढचं प्लॅन करूयात, तेव्हा तुमच्या बहिणीची पण भेट होईल" असं तिचे काका म्हणाले.
आकाशात मावणार नाही असा आनंद झाला होता मला. पण कामाच्या घाई मुळे मला , डॅनियल ला आणि तन्वीला पण निघावा लागलं लवकर, आम्ही आलिबाग चा निरोप घेतला आणि निघालो. तन्वी अँड डॅनियल दोघंही झोपून गेले प्रवासात, पण तिला शांत झोपलेली बघून खूप समाधान  वाटलं. तन्वीला घरी सोडलं आणि आम्ही आमच्या घरी गेलो. 
परत ऑफिस मध्ये जाण्याची खुप घाई झाली होती कारण आता तन्वी आता खुश दिसणार होती रोज ऑफिस मध्ये. 
मी ऑफिस मध्ये पोचल्या क्षणी तिला माझ्या केबिन मध्ये बोलावलं, ती आली आणि मला घट्ट मिठी मारली, 
" मला खरच विश्वास नाही होत आहे...ह्या सगळ्याचा...खूप आनंद झालाय मला"
तेवढ्यात तिने मला हाताला जोरात चिमटा काढला, आणि म्हणाली,
"बसला आता विश्वास..."
मी हसत हो म्हणालो, तेवढ्यात माझा फोन वाजला आणि मला कुणीतरी भेटायला येणार होतं,
"तन्वी तशी मला तुला सोडायची इच्छा तर नाहीये, पण कुणीतरी येणारे , आपण लंच ला भेटू आणि keep sending me messages..."
"बरं... आता आपण एकत्रच असणार आहोत, आई काल म्हणत होती आपण लवकरात लवकर साखरपुडा करून घेऊ...चल बाय"
"तन्वी थांब..."
तेवढ्यात मी तिचा हात पकडला आणि तिला मी घेतली अंगठी घातली, हंस पाहून तिला आनंद पण झाला आणि लाजली पण,
"हे बघ तन्वी झाली engagement आपली..."
असं म्हणत मी तिच्या कपाळावर किस केलं,
"सर पण माझ्याकडे नाहीये आता अंगठी..."
"असुदे...नंतर दे मला, माझं मन तर तुझ्याकडेच आहे ना...मग अंगठी ही फक्त फॉर्मलिटी आहे" 
"हो का सर....फुल्ल फिल्मी"
ती घाईत निघाली, मला उत्सुखता होती की ती काय करेल आता, येवढी गोड मुलगी आता काय करेल...
तेवढ्यात माझं दार वाजलं,
"Come in"
"Do I still need your permission to come inside"
असं कोण बोलताय हे बघायला वळून पाहिलं तर ....मायरा अली होती, माझ्याकडे बघून हसत होती...मला इतका राग आला की तिला हाकलून द्यावं असं वाटलं... माझं सगळं नीट चालू असताना का अली ही...त्या क्षणीं मला तन्वीला बोलावून घ्यायचं होतं,जे बोलणं होईल ते तिच्या समोर म्हणजे उगाच गैरसमज नको...मी तन्वीला फोन लावला तर लागत नव्हता तिचा...
मी चिडून जोरात बोललो,
"What the hell are you doing here ?" 
"Darling, are you not happy to see me??"
" No not at all...I am wondering why the hell are you here....."

🎭 Series Post

View all