Jan 27, 2022
प्रेम

Yes sir ? PART 11

Read Later
Yes sir ? PART 11

मिटींग चालू होती, तेव्हा तन्वी चे सारखे फोन येत होते, तिला माहीत असून पण का फोन करत असेल ह्याच्यामुळे मला काळजी वाटत होती. मीटिंग संपल्याच्या दुसऱ्या क्षणी मी तिला फोन केला, "तन्वी..." " ऐक ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, माझ्या काकांनी माझं परस्पर लग्न ठरवलंय,आणि..." "रडू नकोस, पहिले शांत हो, त्यांना आपल्याबद्दल सांगितलंस का?" "हो हो सांगितलं, पण इथे सगळ्यांना वाटत आहे की मी आणि दादा लग्न करायचं नाही म्हणून असं म्हणत आहे,कारण त्या पैकी कुणालाच विश्वास बसत नाहीये की तुझ्यासारखा मोठा उद्योगपती माझ्यासारख्या मुलीशी का लग्न करेल. ते सगळे म्हणत आहेत की दादा आणि मी दोघंही खोटं बोलत आहोत" "उद्या पर्यंत थांब , नाही उद्या नाही आज मी निघतो लगेच , त्यांना स्वतः येऊन सांगतो . प्लिज राणी शांत हो, रोहित ला पण सांग don't worry, तो आहे का तिथे मी बोलतो" "हो हो आहे, " तन्वी ने रोहितला फोन दिला, " रोहित, मी येतोच आहे, डोन्ट वरी" "विराट कधी येणारेस, लवकारात लवकर बघ...कारण ज्या मुलाशी लग्न ठरलंय तो आमचं चांगल्या ओळखीतला आहे, म्हणजे अगदी चांगले स्नेही, त्यांच्या मुलाने उद्या तिला suprise म्हणून तिला सगळ्यांसमोर प्रोपोस करायचं ठरवलं आहे. उद्या सगळ्यांचं आमचं छोटस get together सारखं आहे. हे तिला माहीत नाहीये , अजून डिस्टरब होईल म्हणून मी सांगितलं नाहीये तिला. माझा विचार आहे तिला मी बाहेर घेऊन जाईन कुठेतरी, तू येई पर्यंत" "हा घोळ झालाय, मी निघतो आज लगेच, पोचेन मी 3 -4 तासात पोचेन , निघलो की. " "सवकाश ये, वाट बघू आम्ही" "हो, बाय" मी घाईने घरी गेलो, थोड फार सामान घेतला, जातांना माझ्या तन्वीसाठी Diamond ring घेतली. तो पर्यंत संध्याकाळ झाली होती. घरून निघतांना प्रीतीला म्हणालो की आता तिने येणं थोडं रिसकी आहे कायुसाठी. मी आणि डॅनियल निघलो आमच्या कार ने निघालो. खूप ट्रॅफिक होता. मला तन्वीची काळजी वाटत होती कारण, ती खूपच अस्वस्थ झाली होती, म्हणून मी पण अस्वस्थ झालो होतो, "Virat, don't worry brother. I am here with you in place of your father, we will do everything possible , just don't worry " "Yes...." आमच्या मध्ये खूप काही बोलणं होत नव्हतं, जायची घाई होती आणि खुप ट्राफिक होता. आम्ही कुठेच ब्रेक नाही घेतला, मी कपडे पण बदलले नव्हते, तसाच मीटिंग चा सूट घालून निघालो होतो आणि डॅनियल ने कुर्ता घातला होता त्याचं म्हणणं होतं की लग्नाचं बोलायला पारंपरिक कपडे घालावे. डॅनियल सुद्धा मला कधी एवढा हेल्पफुल असेल असं वाटलं नव्हतं. मी त्याला फारसा कधी पाहिले भेटलो नव्हतो, पण आता एकदम माझ्या मित्रासारखा वाटत होता. आम्ही जवळ पोचताच मी तन्वीला फोन केला, ती उचलतच नव्हती, शेवटी रोहितला फोन केला. "बोल विराट, कुठे आहात?" "आम्ही पोचतोय अर्ध्या तासात, लगेच घरी येतो तुमच्या, चालेल ना?, तन्वी का नाही उचलते फोन, मला आत्ता बोलायचंय तिच्याशी " " विराट, ती समुद्रकिनाऱ्यावर गेलीये..." "अत्ता रात्रीचे 10 वाजून गेलेत, येवढ्या रात्री?" "हो, ती अस्वस्थ असली की जाते तीथे. घरी अत्ता झोपले असतील इथे, पण तुम्ही इथेच या, मी सांगून ठेवलय माझा मित्र येणारे ते..." "ग्रेट, मी तन्वी ला भेटतो पाहिले,लोकेशन सांग ना प्लिज" "हो मी येतो जवळ चालत , आतलं तुम्हाला सापडणार नाही, आणि तुम्हालाच जॉईम होतो." "चालेल, आम्ही येताच" आम्ही लवकरात लवकर पोचलो, आम्हाला रोहित भेटला, "रोहित , हा माझा brother in law , Daniel, Daniel this is Rohit " "Namaskar Rohit ji" असं अमेरिकन अकॅसेन्ट मध्ये रोहित ला डॅनियल म्हणाला, "नमस्ते डॅनियल जी, विराट इथून उजविलादे घे आणि मग आपण बीचवर पोचू , तिथेच तुला तन्वी दिसेल कुठेतरी चालतांना" मी बीच दिसताच गाडी थांबवली आणि धावत बाहेर गेलो, नीट पार्क पण नाही केली, माझ्या मागेच ते दोघे पण आले. मी समुद्राच्या लाटांच्या आवाजात तन्वीला शोधत होती, तेवढ्यात एक मुलगी मला पाठमोरी दिसली,मी धावत तिच्या जवळ जाणार होती, तेवढ्यात त्या वाळू मध्ये पडलो, मागून आवाज आला, "विराट, careful" मी उठून लगेच पाळायला लागलो, थोडं जवळ गेल्यावर समजलं की ती तन्वीच होती,मी जोरात हाक मारली, "तन्वी........." टीने मागे वळून पाहिलं, ती दोन मिनिटं स्तब्ध उभी राहिली आणि ती पण जोरात धावत माझ्या दिशेने अली, मी माझे हात पसरले आणि तिने माझ्या मिठीत उडी मारली, आणि रडत होती. मी तिला अजून घट्ट मिठी मारत म्हणालो, " राणी शांत हो, मी आलोय ना, आता सगळं ठरवूनच जाणार, डॅनियल पण आलाय माझ्याबरोबर." "हो का...सगळं परस्पर ठरवून, " "शुश....Just don't worry" "Hi Tanvi... Guys, romance later...." "Yes Daniel, let's go home, दादा आपण घरी जाऊयात..." आम्ही सगळे घरी गेलो, खूप सुंदर कोकणातला वाडा होता, किनाऱ्या जवळ. त्यांच्या घरचे सगळेच झोपले होते, अनु ने आम्हाला जेवायला वाढल, तन्वी आणि रोहित आमच्या बरोबर बसले होते आणि डॅनियल उगीच तोडक्या मराठी मध्ये अनुशी बोलत होता आम्ही त्या दोघांचं बोलणं ऐकून खुपच हसत होतो,पण माझं लक्ष सारख तन्वीकडे जात होतं, तिच्या राडलेलं चेहऱ्यावर आता हसू फुटत होतं, तेच माझ्यासाठी खूप होतं. उशीर झाला होता, आमची राहायची सोय गेस्ट रम, मध्ये केली, तन्वी आणि रोहित पण दाखवायला म्हणून आले होते, तन्वीचा पाय हलत नव्हता हे कळत होतं मला, शेवटी मजेत रोहित म्हणाला, "अगं पुढे आयुष्यभर त्याच्या बरोबरच राहायचंय तुला" हे ऐकून जेवढी गोड तन्वी लाजली ना तेवढ जगात काहीच सुंदर नव्हतं. मी तिला flying kiss दिली, दमलो होतो म्हणुन पटकन झोप लागली. पहाटेच जाग आली मला, डॅनियल ला उठवलं आणि आम्ही दोघे किनाऱ्यावर चालायला जाणार होतो, तेवढ्यात एक मध्यम वयाच्या गृहस्थाने आम्हाला रोखलं, "आपण कोण?" प्रत्येक मुलाची हिते तशी माझी पण गत झाली होते ,ते बहुतेक तन्वीचे वडील होते. मी हसून म्हणालो, "मी विराट आणि हा माझा brother in law डॅनियल, आम्ही रोहित चे मित्र." "अच्छा, विराट काय? कश्यप?" "मोठा उद्यगपती का तू तो?" "हो...तन्वी माझ्याच ऑफिस मध्ये काम करते " हे ऐकून ते थक्क झाले, त्यांनी लगेच घरच्यांना सगळ्यांना बोलावलं, "एका हे ते मोठे उद्योगपती विराट कश्यप...हे अपल्यालाकडे आलेत रोहित चे मित्र बनून... ह्यांचा आणि डॅनियल आहेत त्यांचा खुप चांगला पाहुणचार केला पाहिजे, आपण ह्यांना नेहमी tv वर पाहिलं होतं आज प्रत्यक्षात" "काका मी पण तुमच्यासारखाच आहे, इथे मी कुणी उद्योगपती नाही तर मित्र म्हणून आलोय..." "नाही नाही पाहिले बसा तुम्ही" त्यांच्या घरातले 8-10 जी माणसं होती ते सगळे आम्हाला बघून थक्क झाले होते ज्या मुळे मला खुपच विचित्र वाटत होतं, तेवढ्यात रोहित आला म्हणून जरा बरं वाटलं. रोहित त्यांना म्हणाला "बाबा आपल्याला ह्यांच्याशी बोलायचंय खूप महत्त्वाचं. " "रोहित म्हणजे जे तू आणि तन्वी म्हणत होता ते खरंय का ?" "हो बाबा आम्ही तुमहाला किती समजवायचा प्रयत्न केला, तुम्ही ऐकलेच नाही, विराट अत्ता आहेत सगळे इथेच आपण बोलून घेऊ" "हो हो" येवढ्या सगळ्या लोकांमध्ये म्हणजे कुटुंबामध्ये कधीच बसलो नव्हतो, आणि त्यांच्या समोर तन्वी आणि माझ्याबद्दल बोलणं बरच अवघड होतं. तेवढ्यात तन्वी अली, आता काय काहीतरी होणार होतं ह्याच्यासाठी मी खूप excited होतो आणि घाबरलो पण होतो, तेवढयात डॅनियल माझ्या कानात म्हणाला, "Dont worry I have learned the marathi speech, I will start" बापरे, मी काहीच बोललो नाही,तेवढ्यात डॅनियल ने बोलणं सुरू केलं त्याच्या अमेरिकन अकॅसेन्ट मध्ये, " नमस्कार, मी इथे विराट च्या वाडिलांच्या जागी आलाय...." सगळे जणं त्याचं बोलणं कान देऊन ऐकत होते, मनात भीती, आनंद आशा दोन्ही भावनांचा गोंधळ झाला होता. आता तिचे घरचे काय म्हणतील, ते ऐकायचं होतं मला!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

The Story Express ...

Student

Still exploring the world around, wherein stories is the way to get connected.