एका तुक्याची गंगु गाथा
-----------------------------------------------------
मी एक तुका
शेतात पिकवतो मका
गंगु माझी बोलका खोका
बोलण्याचा साधते मोका
झोकात गंगु मिरवी
आळशाचा कित्ता गिरवी
फुकटचे घास भरवी
त्यातच तिची थोरवी
हाक मारी मला
ए....अरे तुका
सतत काढी ती
माझ्याच चूका
गंगु माझी लई भारी
दोन घासात जेवणं करी
एकदाच ताट मस्त भरी
थोडाडाडा भात अन् वीसभर पुरी
गंगु माझी लाडाची
आहे मोठ्या गुणाची
घाई तिला खाण्याची
डोळे भरुन झोपण्याची
इतके सारे असले तरी
गंगु राही माझ्या उरी
सुख शोधे देऊन दु:खाहाती तुरी
थकल्या जीवात माझ्या प्राण भरी
फार नाहीत तिच्या
अपेक्षा माझ्याकडून
वर्षाकाठी दहा साड्या
घेते भांड-भांडून
नवनव्या साड्यांची आहे
भारी हौस तिला
पिशव्या घेऊन तिच्यामागे
फिरवते ती मला
गंगु माझी थोडी आहे लठ्ठ
पण मुळीच नाही बरं मठ्ठ
कुठे झालं जरा काही खट्ट
तर लढायला पुढे असते घट्ट
अश्शी लाडाची माझी गंगु
काय तिचे गुण मी सांगू
आता नका जीव तुमचा टांगू
नांदू आनंदे आम्ही चंगू-मंगू
-----शुभा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा