ये पहाट  मंतरलेली

MY POEM

 ये पहाट  मंतरलेली
मी तिचा रक्तिमा झाले
मी लाजलाजरी झाले

लेवुनी  पहा किरणांना
मी फूलपाकळी झाले
मी प्रीतबावरी झाले

सागरास धरणी मिळते
ते क्षितिज कधी मी झाले
मी सांज हासरी झाले

सावळा हरी राधेचा
हे अंगण  गोकुळ झाले
मी धुंद बासरी झाले