ये जो देश है मेरा भाग १

ये जो देश है मेरा
भाग १

ये जो देश है मेरा ,स्वदेश है मेरा
ये जो बंधन है कभी तुट नही सकता
ये जो देश है मेरा, स्वदेश है मेरा
ये जो बंधन है कभी तुट नही सकता

अजय आज खूप आनंदी होता. परदेशात जाण्याचं त्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार होते. पासपोर्ट तर कधीचा आलेला होता , आज व्हिजाही त्याच्या हातात होता .

आईने दुपारी घरी आलेला व्हिजा अजयच्या हातात दिला. आईने लगेचच ओळखले आज स्वारी खुशीत राहणार.

अजय : आई ,आज मी खूप खूप खुश आहे .मी लवकरच नेदरलँडला जाणार आणि मामासारखा तिथेच राहणार. तुम्हालाही लवकरच तिकडे घेऊन जाईल आणि इथल्या सगळ्या कटकटींना सोडून आपण तिथेच स्थायिक होऊ.

आईच्या पाया पडताना अजय म्हणाला , " आई , आज आशीर्वाद दे मला ,खूप लवकर तिथे सेटल होऊ दे. त्यानंतर लवकरच तुम्हालाही तिथे नेता येईल. "

आई ती आईच असते. तिचे मन कोणी वाचू शकत नाही. आज अजय भारतातून दूर जाण्यासाठी आसुसलेला होता. कधी इथून जाऊ अस त्याला वाटत होत. आज तिला आनंद आणि दुःख दोन्ही होते.

परदेशात जाण्यासाठी अजयने खूप मेहनत घेतली होती. त्याच्या मेहनतीचे फळ आज त्याला मिळाले होते आणि लवकरच तो जाणार होता .

आईने आशीर्वाद दिला , " खूप खूप मोठा हो , तुझे स्वप्न पूर्ण होऊ दे . आमच्या संस्कारांना विसरू नको . आपल्या मातीला आणि आपल्या माणसांना कधीच अंतर देऊ नको . "

आज आनंदाच्या दिवशी वाद नको म्हणून अजय आज शांत बसला होता . आपली माणसे ,नातेवाईक हे सर्व अजय आवडत नव्हत .


अजयची सर्व तयारी झाली होती . तो निघाला होता , मायदेशातून दूरच्या प्रवासासाठी , पुन्हा मागे वळून न बघण्यासाठी..

एक मन आनंदी होत तर दुसऱ्या मनात सतत वाटत होत ,आपण खूप काही मागे सोडून जातो आहोत .

तो स्वतः ला समजावत होता ,ताई -दादा त्यांच्या संसारात आहेत ,आई - बाबांना आपण काही महिन्यांनी सोबत घेऊन जाऊ .

नेदरलँडला गेल्यावर काही महिन्यात अजय तिथ छान सेटल झाला . तिथल वातावरण आणि इतर गोष्टीशी जुळवून घेतांना त्याला बऱ्याचदा घरची आठवण येत होती पण अजयने मनापासून ठरवलं होतं की आपण आता इथच राहायच आहे .

आई - बाबा , ताई इतरांशी अधूनमधून बोलणे होत होते. एकदा आई अजय सोबत बोलत असताना त्याचा चांगला मूड आहे बघून आईने लग्नाचा विषय काढला . अजयने सांगितले , " ज्या मुलीला इथे राहण्यास आवडेल अशाच मुलीशी मी लग्न करेल . तुम्ही मुली बघून घ्या , तुम्हाला आवडल्यास मी ऑनलाइन बोलून घेईल . "

मुलींचा शोध आणि बघण्याचा कार्यक्रम सुरु झाला होता . काही मुली परदेशात जाण्यास तयार होत्या पण काही वर्षच , कायमसाठी नाही . म्हणता म्हणता बऱ्याच मुली बघून झाल्या . आई - बाबा ,ताई , दादा यांनी अजयला बरच समजवून सांगितले की " थोडे वर्ष ठिक आहे परदेशात. पण काही वर्षांनी पुन्हा भारतात ये . " पण अजय काही तयार नव्हता .

शेवटी अजयला पाहिजे तशीच परदेशात सेटल होण्यास तयार असलेल्या " राही " त्याला मिळाली . अजय आणि राही यांचे विचार बऱ्यापैकी जुळत होते . नातेवाईक किंवा इतर आपली माणसे ,देवधर्म हे दोघांनाही आवडत नव्हते .

अजय आणि राही यांच लग्न जमल होत . प्रत्यक्ष भेट होत नसली तरी दोघांच ऑनलाइन रोज बोलण होत होत .

पहिले साखरपुडा नंतर हळद आणि दुसऱ्या दिवशी लग्न असे लग्नाचे कार्यक्रम ठरवले होते .

अजय भारतात येताना सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आला होता .सगळी छोटी छोटी भाचे मंडळी खूप खुश होती . एकतर लग्नात मजा करायची होती . छान छान गिफ्ट्स आणि चॉकलेट मिळाले होते .

खूप दिवसांनी घर आणि घरातली त्याच्या लग्नाची तयारी बघून अजयच मन भरून आले होते. त्यालापण घर आणि सगळ्यांची आठवण येत होतीच .

🎭 Series Post

View all