ये दिल है मुश्किल भाग - 11

"हॅलोऽऽ .. हॅलोऽऽ .. दादू, कोणी बोलत नाहीये मग ठेऊ का फोन?" नमू तिच्या दादाला म्हणजेच नमनला आवाज देत म्हणाली."मी आहे राजीव." राजीव."माहिती आहे मला." नमू."तू ओळखलसं." राजीव." हूँ ." नमू .

ये दिल है मुश्किल

भाग - 11


"नम्या मला एकदा नमू सोबत बोलायचं आहे. दे ना तिच्याजवळ माझा हा संदेशा.." राजीव.

 
"हो हो .. मी काय तुला कबूतर वाटलो का तुझा संदेशा द्यायला."

"आज कबूतर झाला तर बिघडणार आहे का तुझं?"

"नाही पण त्या बद्दल्यात मला काय देणार?" नमन.

"आजची डिनर पार्टी! खुश !" राजीव.

"हो हो डबल खुश . थांब लगेच देतो. ." नमनने नमूला फोन देऊन त्याने बोलायला सांगितले.

"हॅलोऽऽ." ती मधाळ आवाजात म्हणाली. आणि तो तिच्या मधाळ आवाजात ऐकण्यात गुंग झाला.

"हॅलोऽऽ .. हॅलोऽऽ .. दादू, कोणी बोलत नाहीये मग ठेवू का फोन?" नमू तिच्या दादाला म्हणजेच नमनला आवाज देत म्हणाली.

"मी आहे राजीव." राजीव.

"माहिती आहे मला." नमू.

"तू ओळखलंस." राजीव.

" हूँ ." नमू .

"नमू मी उद्या अमेरिकाला जातोय दोन वर्षासाठी तोपर्यंत काळजी घे, मी आल्यावर बाबांशी आपल्याविषयी बोलणार आहे. माझी वाट पाहशील नं?" राजीव.

"हो .. मी वाट पाहिल तुमची शेवटच्या क्षणापर्यंत." नमू.

"नमू काही काय बोलतेस तू हे? असं बोललेलं मला अजिबात आवडणार नाही." तिच्या बोलण्यावर तो अगतिक झाला.
 
"तुम्ही आरामात जा आणि स्वतःची काळजी घ्या. जेवण वेळेवर करा आणि …" नमू बोलता बोलता थांबली.

"आणि .." राजीव.

"आणि .." नमू.

"आणिच्या पुढे बोल ना.." राजीव.

"आणि लवकर या .. मी वाट पाहतेय ." नमू थोडी लाजत हसत म्हणाली.

"हो .. लवकरच येतो. मला वाटलं तू दूसरचं स्पेशल काहीतरी बोलणार .."

"दुसरं काय?" नमू.

"थ्री मॅजिक वर्ड .." राजीव.

"म्हटले ना मी .. ते वर्ड .. मी वाट पाहतेय." ती हसू दाबत म्हणाली.

"मस्करी करतेस का माझी? माहितीये मला तू आता बोलणार नाहीस .. तिकडे गेल्यावर तू अशी फोनवर पण बोलणार नाही. पत्र लिहणं तर फारच लांब राहिलं.. म्हटलं जाण्याआधी एकदा तुझ्याशी बोलावं .. मी लवकर येईल हे सांगावं. राजीव म्हणाला आणि तिच्या डोळ्यांत पाणी तरळले.

"हम्मऽ." ती इतकचं म्हणाली. तिने गळ्यातल्या हुंदका आतच गिळला.

"अगं बोल ना काय झालं शांत का बसलीस?" राजीव.

"काही नाही …. ते." ती म्हणाली पण तिच्या आवाजावरून कळलं की ती रडतेय.

"तू अशा रडून शुभेच्छा देणार आहे का मला? ना तुझ्यासोबत बोलायला मिळणार आणि पाहायला ते ही दोन वर्ष मग मला रडत रडत बाय म्हणणार का?." राजीव.

"सॉरी .. सॉरी .. ऑल द बेस्ट अँन्ड हॅपी जर्नी. काळजी घ्याल ना स्वतःची?" नमू.

"हो आणि तुही घे मी लवकरच येईल." राजीव.

"हं .. ठेवू फोन. " नमू.

"का बोलत नाही. त्या दिवशी तर किती बोलत होतीस. माझी बोलतीच बंद केली." राजीव मिश्किलपणे हसत म्हणाला. त्या दिवशीची आठवण झाली .. तिचं सगळ्यासमोर प्रेम स्विकारण, पुढाकार घेऊन किस करण आठवून नमू चांगलीच गोरीमोरी झाली. 
"बाय " म्हणून तिने लगेच फोन कट केला. मग तो ही फोन छातीशी लावून त्या आठवणीत रमला. 

 रात्री या चौकडीने शानदार डिनर पार्टी केली. आरतीच रडारड सुरु झाली होती. रडतच ती राजीवचे बॅगमध्ये खाण्याच्या वस्तू भरत होती.

"आई नको रडू." त्याने आरतीला म्हटले .

"पहिल्यांदा जातोय न तू."

"हो, असं खूप काही आपल्याला पहिल्यांदा करावं लागतं पण तू अशी रडू नको." त्याने आरतीचे डोळे पुसले आणि तिला मिठीत घेतले.

"आई स्वतःची काळजी घे हल्ली तू अजिबात लक्ष देत नाही."

"टिनू, हे मी तुला म्हणायला हवं तर तूच मला म्हणतोय."

"हो कारण तू स्वतःकडे लक्ष देत नाही म्हणून." आरतीने त्याच्या डोक्यावरून हात फिरून कपाळावर ओठ टेकवले.

सकाळी आईबाबा सोबत शंतनू, नमन, अनिकेत त्याला सोडायला एयरपोर्टवर आले. जशी जाण्याची वेळ येत होती तशी आरतीच्या डोळ्यांत पाणी आले.

"आईऽऽ काय हे फक्त दोन वर्षासाठी जातोय ना मी तरीही अशी रडत राहिलीस तर इथून माझा पाय तरी निघेल का? सांग बरं? तिथे आत्या मामा विहान आहेच ना मग? " त्याने आरतीचे डोळे पुसले. त्यांच्या गालावर डोक्यावरून हात फिरवून कपाळावर ओठ टेकवून त्याला मिठी मारली. त्याचेही डोळे पाणावले होते.

"टिनू, हो रे तरीही काळजी घे, जेवण वेळवर कर आणि रोज फोन कर." आरती काळजीने म्हणाल्या.

"हो. बाबा आईची आणि तुमची काळजी घ्या." राजीव.

"हो.. तू पण." विश्वासराव. राजीवने आई बाबाच्या पाया पडल्या, त्यांना मिठी मारली नंतर त्याच्या मित्रांना एकत्र मिठी मारून नमनच्या कानात," हो मी सांगायला नको पण काळजी घे नमूची." 

"पोहचल्यावर फोन करतो. बाय." म्हणत तो आत गेला. जातांना तो मागे हात दाखवून बाय करत पुढे जात होता. आरतीने डोळ्याला पदर लावला आणि कसेबसे थांबवलेले अश्रूंच्या धारेला मोकळी वाट करून दिली. लगेच विश्वासरावांनी त्यांना सावरले. अन्या, नमन, शंतनू ही आरतीला समजवायला आले.

"तुम्हाला नाही कळणार, तुम्ही जेव्हा आईबाबा होणार तेव्हा कळेल तुम्हाला." आरती त्या तिघांना म्हणाली.

"खरयं जेव्हा तुम्हाला मुलं होतील तेव्हाच समजेल. आईबाबांचे माया प्रेम काय असते ते." विश्वासराव.

"हो. असेल तसं काहीसं पण आता चला घरी .. राजीवच प्लेन टेक ऑफ झालयं." अनिकेत वर पाहत म्हणाला.

"तुम्ही ही घरी चला रे बाळांनो !" आरती.

"नको काकू, आता नको नंतर येऊ आम्ही. काळजी घ्या काका काकू, काही वाटल्यास आमच्यातल्या कोणलाही फोन केला तरी चालेल आम्ही लगेच हजर राहू. राजीव इथे नसला म्हणून काय झालं आम्ही आहोत की, बिना संकोच बोलवा." नमन.
राजीवच्या आईवडिलांना गाडीत बसवून हे तिघही आपआपल्या घरी निघाले.आरतीला घरी आल्यावर घर सुनं सुनं वाटत होतं.

"घरात टिनू नाही तर घर कसं खायला होतयं." आरती विश्वास रावांना म्हणाल्या.

"सवय नाहीये आपल्याला ना या घराला, होईल हळहळू आणि तू सारखं रडू नकोस त्याच्या करियरसाठी गेलाय तो, विनया विक्रम आणि विहान आहे ना तिथे मग का काळजी करते त्याची, काहीतरी शिकण्यासाठी बनण्यासाठी गेलाय तो … त्याची इच्छा होती जाण्यासाठी.. लगेच दोन वर्षात परत येईल. आल्यावर तो मलाच रागवेल आईची काळजी घेतली नाही म्हणून." शेवटचं वाक्य ते हसत म्हणाले.
    
"हो …" आरती ही हसल्या.
     

 राजीव एयरपोर्टवर उतरला तर बाहेर त्याचा मित्र आतेभाऊ विहान त्याला घ्यायला आला होता. त्यांना एकमेकांना मिठ्या मारल्या आणि गाडीत बसून घरी निघाले.. आल्या आल्या त्याने 
आत्या मामांना नमस्कार केला. आत्याने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्याला मिठी मारली.

"आत्तू मामा कसे आहात?" राजीव.

"आम्ही एकदम मस्त." दोघही एकदम म्हणाले.

"स्वागत आहे राजीव." विक्रम राजीवचे मामा.

"धन्यवाद मामा." राजीव. त्याने विक्रमला मिठी मारली.

"चल फ्रेश होऊन ये मी नाश्ता लावते." विनया.

"हो .." विहान त्याला रुममध्ये घेऊन गेला.

"ओ माय गॉड विहान ! आतूने ही रूम जशीच्या तशी ठेवलीय." राजीव खुश होत म्हणाला.

"हो. आपली दोघांची रूम आहे. बाय द वे तुला दूसरी रूम हवीय का?" विहान.

"कशाला?" राजीव.

"अरे तुला तुझी प्रायव्हसी असेल ना?" विहान.

"बस का भावा, आपल्यात कसली आलीय प्रायव्हसी." राजीव.

"चल लवकर फ्रेश हो.." विहान

" हो .." राजीव अंघोळ करून बाहेर आला त्याने त्याचे आवरून आरतीला कॉल करून आईबाबा सोबत बोलून घेतले. नंतर त्याने कॉन्फरस कॉल करून तिघांना लाईनवर घेतले. त्यांच्यासोबत थोडं बोलून तो खाली नाश्त्यासाठी गेला.

"आतू हे घे गं .. आईने बघ काय काय दिलयं." राजीव . विनयाने बॅग उघडून डबे काढले. त्यात लाडू, करंज्या,चकल्या खूप प्रकारचे पदार्थ होते.

" बापरे ! वहिनीने किती पाठवलयं हे." विनया.

" माझ्यासाठी पाठवलंय हे सर्व .. मी म्हटलं होतं मामीला ." विहान तोंडात लाडू टाकत म्हणाला.

"आऽ हाऽऽ हाऽऽ अप्रितम बनवलेत लाडू मामीने.." विहान लाडू खात म्हणाला.

"हो तुझ्यासाठी पाठवलेत आईने ." राजीव म्हणाला सगळ्यांनी नाश्ता केला आणि राजीव विहान त्यांच्या कॉलेजला जाऊन प्रोसेसर पूर्ण करून घेतली आणि कॉलेजकरून तो विक्रम सोबत ऑफिसला ही जाऊ लागला. नवनवीन गोष्टी तो आत्मसात करत होता आणि त्याचे प्रॅक्टीकलही करत होता. .

राजीव तिथे छान रुळला होता. विनया विक्रम त्याला जपत होते. विहान तर त्याचा मित्रच होता. रोज रात्री आईशी बोलल्यानंतर त्याला झोप लागत होती. मध्ये मध्ये शंतनु नमन अनिकेत सोबतही बोलण होत होते. नमनने राजीवच्या मोबाईलवर एक क्लिप पाठवली . त्याने ती ओपन केली.

क्लिप मध्ये काय असेल? गेस करून सांगा बरं .

क्रमश ..
©® धनदिपा 

🎭 Series Post

View all