ये दिल है मुश्किल .. भाग 5

पार्टीला इंट्रोडक्शनने सुरवात झाली. एक एक करून सर्व ओळख परिचय देऊ लागले. प्रत्येकाला काहीतरी टास्क देत होते. नमूची वेळ आली. तिला पुढे काय करायचं हेही तिने सांगितले. तिलाही टास्क देण्यात आला. "नमामी तुला डान्स करावा लागेल." "पण मला नाही येत.""कसाही कर चालेल ही काही कॉम्पिटिशन नाही.""जमतच नाही मला.""मग एखादं गाणं म्हण.."" हम्म." .. ती थोडा विचार करू लागली. मोठा श्वास घेवुन तिने गाणे गायला सुरवात केली.

ये दिल है मुश्किल ..


भाग - 5


मागील भागाचा सारांश 

पार्टीची पूर्ण तयारी झाली होती प्रिन्सिपल सरांनी बोलून सर्वप्रकारची शहानिशा करून घेतली. घरी गेल्यावर आईची तब्बेत खराब असते. विश्वासराव आईवर चिडतात नंतर विश्वासराव आरतीला सॉरी बोलून मिठीत घेतात . राजीव आल्यावर चेष्टा मस्करी करत जेवण करतात . बाबांना घरूनच काम करण्याचे सांगतो.फ्रेशर्स पार्टीसाठी सर्व जमले होते राजीव काही कारणाने कॉलेजमध्ये वेळवर पोहचू शकला नाही म्हणून त्याने पार्टी ची सुरवात करायला सांगितली .


आता पुढे .

   

कॉलेजला आल्यावर नमनने त्याच्या बहिणीची ओळख करून दिली. आज तिघही सोबत आले होते

 "अनिकेत,शंतनु ही माझी बहिण किकु आणि तिची मैत्रिण 
विनी." नमन ओळख करून देत म्हणाला. 



 "किकु हे अनिकेत शंतनु माझे बेस्ट फ्रेंड्स, चार जणांचा ग्रुप आहे आमचा , आमच्यातला एक अजून आलेला नाहीय. नंतर भेट करून देईल त्याची." नमन

"दादा " … किकु वैतागत म्हणाली कारण बाहेर त्याच्या मित्रासमोर तो तिला किकु म्हणाला.


"अरे त्यात काय हे माझे जिगरी आहेत." … नमन


 "आजपासून तु आमची बहिण आहेस." .. अनिकेत

 "हो,मग आम्ही तुला किकुच म्हणणार चालेला का तुला?" शंतनु

तिने " हो "म्हटले .


बोलून ती आणि विनी त्यांच्या ग्रुपसोबत हॉलमध्ये गेल्या. एकदम छान बलूनने तो हॉल सजवला होता. गोल आकाराचे टेबल खुर्च्या रचलेल्या होत्या.




पार्टीला इंट्रोडक्शनने सुरवात झाली. एक एक करून सर्व ओळख परिचय देऊ लागले. प्रत्येकाला काहीतरी टास्क देत होते. नमूची वेळ आली. तिला पुढे काय करायचं हेही तिने सांगितले. तिलाही टास्क देण्यात आला. 

 "नमामी तुला डान्स करावा लागेल."

 "पण मला नाही येत."

"कसाही कर चालेल ही काही कॉम्पिटिशन नाही."

"जमतच नाही मला."


"मग एखादं गाणं म्हण.."


" हम्म." .. ती थोडा विचार करू लागली.
  
मोठा श्वास घेवुन तिने गाणे गायला सुरवात केली.


ये मोह मोह के धागे
तेरी उँगलियों से जा उलझे
कोई टोह-टोह ना लागे
किस तरह गिरह ये सुलझे
तू होगा ज़रा पागल, तूने मुझको है चुना
तू होगा ज़रा पागल, तूने मुझको है चुना
कैसे तूने अनकहा, तूने अनकहा, सब सुना
तू होगा ज़रा पागल, तूने मुझको है चुना



तू दिन सा है, मैं रात
आ..ना दोनों मिल जाएँ शामों की तरह
ये मोह मोह के धागे
तेरी उँगलियों से जा उलझे
कोई टोह-टोह ना लागे
किस तरह गिरह ये सुलझे
के तेरी झूठी बातें, मैं सारी मान लूँ
के तेरी झूठी बातें, मैं सारी मान लूँ
आँखों से तेरे सच सभी
सब कुछ अभी जान लूँ
तेज है धारा, बहते से हम, आवारा
आ थम के साँसे ले यहाँ
ये मोह मोह के धागे
तेरी उँगलियों से जा उलझे
कोई टोह-टोह ना लागे
किस तरह गिरह ये सुलझे 



तिच्या मधुर मंजुळ आवाजात सर्वच हरवले. गाणं संपलं तसे सगळ्यानी टाळ्या वाजवून दाद दिली.

आणि \"वन्स मोअर \" म्हणू लागले.



"तू बाहेर ये मग चांगलीच बघते.".. ती विनीजवळ येऊन हळू आवाजात पुटपुटली.

हो कारण अँकरला सांगायचं काम विनीनेच केले होते. 


कोल्ड्रिंक ,स्नॅक्स त्याचबरोबर गेम्स चालू होते. 

कार्यक्रमाची सांगता होत होती तेव्हा राजीव कॉलेजमध्ये आला.


 "राजीव अरे कुठे होता इतका वेळ ?किती कॉल केले तुला ?"

 "अरे येत होतो तेव्हा रस्त्याने एका बारा तेरा वर्षांच्या मुलाला अपघात झाला. मग त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, पोलिसांनी चौकशी करून अज्ञात व्यक्तीवर तक्रार नोंदवली.
 त्याचे आईवडिल हॉस्पिटलला आले. तो मुलगा शुद्धीत आल्यावर तिथून इकडे आलो बरं पार्टी कशी झाली?"


"कसा आहे तो मुलगा? पार्टी बरी झाली रे." शंतनु


"आता बरा आहे काळजी करण्यासारखं नाही म्हणाले डॉक्टर." 




मज्जा मस्ती जेवण करून सर्व विद्यार्थी निघाले .



नमामी विनीला चांगलेच फटके मारत होती.

घरी आल्यावर सर्वासोबत बोलून तो त्याच्या रुममध्ये गेला. फ्रेश होऊन बेड वर पडला.
\"मला वाटलं आज तरी कळेल मला नमू कोण आहे?\" मनात विचार करून पडल्या पडल्याच तो झोपला.




आईला आता बरे वाटत होतं त्यामुळे उठून ती तिचे काम करत होती .


"काय आई हे, तुला कुणी सांगितलयं उठायला? ही काम करायला. जा आराम कर."

"भरपूर झाला आराम ! मी एकदम ठणठणीत आहे. चल नाश्ता कर."

" तू इथे बस नाश्ता कर गोळ्या घे आणि आराम कर."

राजीव बळजबरीने त्याच्या आईला खूर्चीला बसवून त्याच्या पुढ्यात नाश्त्याची प्लेट ठेवून तो त्याच्या हाताने भरवू लागला.

आई खाऊन गोळ्या घेतल्या रुममध्ये आराम करायला मात्र बळजबरीनेच गेली. 

********




राजीव कॉलेजला जरा लवकरच आला . त्याचा ग्रुप अजून आलेला नव्हता. झांडाजवळ एकटाच बसला होता. त्याला शांत वाटत होते त्याला एक कविता सुचली. त्याने ते एका कागदावर लिहायला घेतली.


 
फोन आला म्हणून त्याने कविता लिहून खाली ठेवली त्यावर पेन ठेवला. तो फोनवर बोलण्यात व्यस्त झाला होता. वाऱ्याच्या झुळकेने तो कागद उडाला. तो कागद एका झुडपाजवळ जाऊन अडकला. फोन ठेवून तो कविता लिहलेला पेपर शोधू लागला, पण त्याला काही सापडला नाही. तेवढ्यात त्याचे मित्र येतांना दिसले तो तिथून निघून त्यांच्याकडे गेला. 

 एका मुलीने तो पेपर काढून पाहिला आणि ती कविता पाहून वाचू लागली.

नमू 

काय सांगू सखे तुला, आस लोचनी तुझी
न पाहताच सखे तुला, वेड लागले मनी

नाव तुझे घेता सखे, अधर होती ऋणी
सांग ना मला तू, भेटशील ग कधी?

तुला न पाहताच, तुझे भरले पिसे
माझ्या मनीचे भाव सखे, तुला कळणार कसे?

तुला पाहण्यासाठी, जीव कासावीस होतो
माझ्या नायनांना आता, तव मुखडा दाखव

विरह हा साहत नाही, तुला कळेना कसे?
तू ही येणा धावून, अभिसारिके परी

वाट पाहतो तुझीच, तुझा कृष्ण होऊनी
येशील केंव्हा सांग ना माझी राधिका होऊनी?
          
                              ( कवियत्री - स्वामिनी चौगुले मॅडम.)




तिने इकडे तिकडे पाहिले. एक मुलगा काहीतरी शोधत होता. तिने त्याचा चेहरा पाहिला. 

\"अरे हा तर तोच मुलगा आहे. रस्त्यावर एक्सीडेंट झाला होता. त्या आजोबांना रक्त देणारा \"... 

ती मुलगी दुसरी नसून नमूच होती

"एकटी काय बडबडतेय, वेडबिड लागले का तुला?".. विनी

नमूने तिला तो कागद दिला. तिने वाचला. 


 "अगं इथे तर नमू लिहलयं गं."


"हो .. असेल कुणी नमू ?"..


"तूच असणार ती. "..


 "कशावरून … कुण्या दुसऱ्या मुलीच नाव असू शकते."


 "मला वाटते की ती तूच आहे . पण हे कोणी लिहलयं ?"


"ते बघ त्या मुलांच्या घोळक्यांमध्ये क्रिम कलरचे जॅकेट घातलेला मुलगा त्याने लिहिली ती कविता …आणि जर ही नमु मी आहे तर तो मला का शोधतोय?"


"अगं हा तर तुझ्या दादाचा ग्रुप आहे. त्या दिवशी आपण यांना भेटलो होतो. त्याच दिवशी हा आला नव्हता."

"खूप चांगला मुलगा आहे गं तो . मी त्याला आज दुसऱ्यांदा पाहिले."नमू

"म्हणजे ?" विनी


"मागे मी तुला सांगितलं होतं की एक मोठा अपघात झाला 
होता . एक आजोबाच्या वयाचे तिथे जखमी झाले होते . दुपारची वेळ असल्यामुळे तिथे कुणी नव्हतं, त्यांच्या मदतीला कुणी धावून येत नव्हतं. मी पुढे जाऊन त्यांना रिक्षात नेण्याचा प्रयत्न करत होते. हा रस्त्याने जात होता. याला जेव्हा दिसले तो लगेच मदतीला पुढे आला तेव्हा लगेच आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. रक्त गेल्यामुळे त्या आजोबांना रक्ताची गरज भासत होती. तर याने त्या आजोबांना रक्तही दिले. वेळवर उपचार झाल्यामुळे त्या आजोबांचे प्राण वाचले.
थॅक्यू म्हटले आणि त्याला चहा बिस्कीटे आणून दिली त्याला मग आजोबांना भेटले. आईचे सारखे फोन येत होते म्हणून मी निघून आली. तेव्हा मी त्याला पाहिल होतं. मी स्कार्फ बांधला असल्यामुळे त्याने पाहिलं नाही. पण तेव्हाच तो मला आवडला होता. म्हणजे त्याचं हेल्पिंग नेचर गं "


" मग कधी भेटतेस त्याला? "..


"कधीच नाही."

 "का ?"..


"बाबांना आवडणार नाही … त्यांच्या विरोधात जाऊन प्रेम लग्न करणे हेही पटत नाही मला. प्रेमात पहिल्यांदा ही जात पात पाहतात ,विरोध करतील? प्रेम एकासोबत आणि लग्न दुसऱ्या सोबत करायचं नाही हितर चिटिंग होईल याच्यासोबत माझ्यासोबत आणि नवऱ्यासोबत .. म्हणून मला या भानगडीत पडायचचं नाही."

"अग अस पण होऊ शकते की बाबा तयार होतील. तू तयार कर त्यांना किवा तो तयार करू शकेल. प्रेमात जातपात कुठे मॅटर करते . पाहावं काय तर मुलगा कसा आहे ? संस्कार कसे 
आहेत? मुलींसोबत कसा बोलतो वागतो? किती कमवतो ? कर्तृत्वान आहे की नाही ?घरचे कसे आहेत? .. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतात.. आणि बाबा लोक हेच बघता आपली मुलगी त्यांच्यासोबत खूष आहे आनंदी आहे मग झालं त्यांचं समाधान."... विनी 


 "बघू मी अजून विचार नाही केला."

"बघ मग, आता माझचं बघ मी प्रेम केल पण ते कुणाला माहिती नाही.. आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करेल?"


"काय ऽऽ , गाढव,नालायक,तू मला सांगित नाहीस,कोण आहे 
तो ? "


 "नमू त्याला सुदधा माहित नाही गं."


"काय .. कुठला आहे नाव सांग लवकर " 


"तू ओळखतेस त्याला."


"मी ओळखते म्हणजे ?" .. ती विचार करू लागली.


 "माझा दाद्या! पण हे कधी झालं ? "…


"माहिती नाही."


विनीने लाजून मान हलवली.


"आई गं काय लाजतेस माझी वहिनी साहेब."

विनीने नमुला लाजून मिठी मारली .


 "त्याला माहिती आहे का?"..


"नाही म्हणजे थोडं थोडं दिसतं त्याच्या डोळ्यांत."



"मग काय पुढे?" .


 "जॉबवर लागल्यानंतर मग बोलेल त्यांच्यासोबत. तोपर्यंत तोही सेटल होईलच."


"पण त्या आधी तुमच्या मनातील भावना सांगून द्या एकमेकांना ? जसं तुला त्याच्याबद्दल वाटते तसेच त्याला ही वाटायला हव ना!"

 "नमु तु म्हणतेय ते बरोबर आहे. लवकरच बोलते 
त्याच्यासोबत."..

 "तू प्रपोज करशील दाद्याला?" ..

 "हो .. असं कुठे लिहलेलं आहे का की मुलीने मुलाला प्रपोज मारू नये. मग मी बोलेल त्यांच्यासोबत .. पण विषय कुणाचा होता आणि आला कुठे?"


"तो जर तुला आवडला आहे तर बोल न त्याच्याशी का शोधतोय तुला ? बोलूनच प्रश्न सुटणार आहेत गं."

 "बघू चल आता."… 

ते क्लासमध्ये गेले.


ती कधीच राजीवच्या समोर गेली नाही. ती त्याला कधीतरी दुरूनच पाहत होती. 



आरती आणि नमू नेहमी मंदिरात भेटत होत्या. छान गप्पा मारायच्या. त्यांना नमू आवडायला लागली होती. मंदिरात नमूला भेटलेली काकू म्हणजेच आरती होती.


राजीव नमन अनिकेत शंतनु यांच हे कॉलेजचे शेवटचे वर्ष होते. त्यामुळे त्यांची फेअरवेल पार्टी होणार होती.
  
बघूया फेअरवेल पार्टीत तरी नमुची आणि राजीवची ओळख होते का नाही ?

क्रमश ..

stay tunne happy reading.



🎭 Series Post

View all