ये दिल है मुश्किल .. भाग - 4

"बाबा आईला काय झालयं, काका काय झालयं आईला ?" बाबांना आणि डॉक्टर काकांना एकावर एक प्रश्न विचारतो . "काही नाही तिला ताप आला होता . आता ठिक आहे ती." राजीव तिच्या उशी जवळ जाऊन बसतो तिचा हात हाती घेऊन त्यावर ओठ ठेकवतो. "आई असं नाही पाहू शकत गं तुला,बरी हो लवकर !".. राजीव "इतके काही ही झालेल नाही टिनू ".. आरतीआईला नुकतीच जाग आली होती. ती चेहऱ्यावर हसू ठेवून हळू आवाजात म्हणाली ." शंकर ने फोन करून सांगितले तेव्हा कुठे माहिती झाल. नाहीतर तुझी आई काही सांगायची नाही." विश्वासराव थोडे नाराज होत म्हणाले . शंकर त्यांचा ड्रायव्हर "आई बाबा काय म्हणताय आणि मला कुणी फोन का केला नाही?" … रागीव रागातच म्हणाला ." आई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. "

ये दिल है मुश्किल ..

भाग - 4


मागील भागाचा सारांश


नमामी विनी देवळात जातात तिथे त्यांना काकू भेटतात त्यांना चक्कर येते . नमू त्यांना खाली पडण्यापासून सावरते . त्यांना पाणी देऊन थोडयावेळाने त्यांच्या गाडीपर्यंत सोडून विनी स्कूटी चालू करते .पण ती स्टार्ट होत नाही आणि त्यांना उशीर होतो . पापडांची डिलेव्हरी देऊन कॉलेजमध्ये पोहचल्यावर विनीला भूक लागते ती कॅन्टिकडे जाऊन नाश्ता करून त्यांच्या ग्रुपमध्ये गप्पा मारता तिथे विनी तिला गाणं म्हणायला लावते. गाणं ऐकून सर्व जणी टाळ्या वाजवून दाद देतात. बाहेर राजीव उभा असून त्याला गाण म्हणाणारीला पाहायची इच्छा होते पण तिथे त्या मुलींच्या घोळक्यामुळे काहित दिसत नव्हते. तेवढ्यात त्याचा क्लासमेट अमित त्याला बोलावयला आला .



आता पुढे


"राजीव तुला प्रिन्सिपल सरांनी बोलवलं आहे. ".. अमित राजीवचा क्लासमेट 


" अरे आत्ताच का? म्हणजे पाच मिनिट थांब ना ?".. राजीव .

 
"नाही रे चल लवकर काहीतरी काम आहेत चल 
पटकन "...म्हणत राजीवला तिथून ओढून घेऊन गेला ..


ही संधी हि हातातून निसटली . तसाच प्रिन्सिपल सरांच्या कॅबिन कडे गेला.


"मे आय कम इन सर " .. राजीव


"येस,राजीव सर्व रेडी आहे, पार्टीत कुठेही बेजबाबदार पणा होता कामा नये."



" सर सर्व रेडी आहे. खाण्यापिण्यापासून सर्व मी स्वतः चेक करणार आहे."


"ओके तू जाऊ शकतो आणि मस्त इंजॉय करा पार्टी ."



"थॅक्यू सर."

  
म्हणून तिथून तो त्या मुलींच्या क्लासच्या बाहेर आला पण तिथे कोणीच नव्हते. .

 
"शीट यार ! "… वैतागतच तो खाली गेला. सर्वांना भेटून आणि नाराज होऊनच घरी आला.. घरी आल्यावर डॉक्टर जोशी आलेले होते . जे राजीवच्या बाबाचे मित्र आणि फॅमिली डॉक्टर होते. ..ते आलेले आणि घरातील वातावरण ही शांत वाटत होते.



"काय हो ,मावशी आज एवढं शांत वातावरण का आहे ? आई कुठे आहे?"


" टिनू बाळा, आईला बरं नाहीये". त्यांच्या कामवाली मावशी 

 
" कायऽऽ"


 "हो ".. 

 
तो तसाच वर धावत गेला. आई बाबांच्या रुममध्ये आई झोपलेली होती. बाबा तिथेच तिच्याजवळ बसले होते. डॉक्टर काका ही बेडजवळ चेअर टाकून बसले होते.



"बाबा आईला काय झालयं, काका काय झालयं आईला ?" बाबांना आणि डॉक्टर काकांना एकावर एक प्रश्न विचारतो . 



"काही नाही तिला ताप आला होता . आता ठिक आहे ती."



 राजीव तिच्या उशी जवळ जाऊन बसतो तिचा हात हाती घेऊन त्यावर ओठ ठेकवतो. 


"आई असं नाही पाहू शकत गं तुला,बरी हो लवकर !".. राजीव 


"इतके काही ही झालेल नाही टिनू ".. आरती

आईला नुकतीच जाग आली होती. ती चेहऱ्यावर हसू ठेवून हळू आवाजात म्हणाली .


" शंकर ने फोन करून सांगितले तेव्हा कुठे माहिती झाल.
 नाहीतर तुझी आई काही सांगायची नाही." विश्वासराव थोडे नाराज होत म्हणाले . शंकर त्यांचा ड्रायव्हर 

"आई बाबा काय म्हणताय आणि मला कुणी फोन का केला नाही?" … रागीव रागातच म्हणाला .

" आई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. "

"मी ठिक आहे रे आता , ती सकाळी गोळी घेतली नव्हती आणि संकष्टीचा उपवास होता. आधीच अंगात कणकण वाटत होती."


बोलायच्या नादात बोलून तर गेली पण हे आता दोघेही बारिक डोळे करून पाहत होते .

"तुला कुणी सांगितलंय उपास तपास करायचा .. उपास करून देव प्रसन्न होऊन दर्शन देणार आहेस का? इतके उपास करायची काय गरज असते . रविवार ते शनिवार यामध्ये पाच सहा दिवस तर हीचे उपवास करण्यात जातात .. राहिल तर संकष्टी चतुर्थी एकादशी असते .. हिला नाही म्हणतो का मी पुजा वगैरे करू नको पण ही तर ऐकतच नाही. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असायला नको." .. विश्वासराव थोडं चिडतच म्हणाले.


"असं नका बोलू हो .. माझी श्रद्धा विश्वास आहे. "


" करं तुला पटेल ते कर !".. ते बोलून रागात बाहेर गेले.


 "बघा ना भावोजी, किती चिडलेत हे !"..


 "नका काळजी करू तुम्ही आपण काय आताच ओळखतोय का त्याला .. हे चिडणे काही नवीन नाही. बसला असेल स्टडीरूम मध्ये,डोकं थंड झाल्यावर येईल तो पण तुम्ही वेळेवर दिलेलं औषधे घ्या.आणि आराम करा . मी उद्या येऊन जाईल ."


असं म्हणत जोशी डॉक्टर निघून गेले.



"आई बाबा बोलले ते चुकीच नाही बोलले ग, तू आहे तर आम्ही आहोत. तू नाही तर आम्ही नाही .तू आहे म्हणून या घराला घरपण आहे. तू आहे म्हणून तर आमच्या चेहर्यावर आनंद आहे. अन् तू आमच्या चेहऱ्यावरचा आनंद घालवत आहे. तू स्वस्थ, आनंदी राहणं महत्त्वाचं आहे. तुझ्याशिवाय आम्हाला काहिच महत्त्वाचं नाही. ".. राजीव काकुळीतीने बोलत होता .

 हे ऐकून आईच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले.



"सॉरी टिनू ऽऽ, माफ कर तुझ्या आईला ."



"तू रडू नकोस, पण मला एक वचन दे तू तुझी काळजी घेशील . आणि जराही काही झालं तरी दुर्लक्ष करणार नाही."


ती " हो "म्हणते. 



"आणि एक मीही वचन देतो की,नेहमी तुझी काळजी घेईन ." 


त्याच्या हृदयावर हात ठेवून बोलतो .

 

"टिनू ऽ ऽ मी खूप भाग्यवान आहे मला तुम्ही दोघे मिळाले आहेत ."




"ती राजीवला मिठी मारते."


राजीव तिच्या डोक्यावरून हात फिरवतो.


 "तू आराम कर, मी आलोच फ्रेश होऊन मग आपण इथेच जेवण करू ."


मान हलवून " हो " सांगते. 


राजीव फ्रेश व्हायला त्यांच्या रुममध्ये गेला.


आता बाबांच डोकं ही थंड झालेल होत.ते ही येऊन फ्रेश होऊन आले.


आरती जवळ बसून तिचा हात हातात घेऊन आरतीला "सॉरी " म्हटले .

 
"मी जास्तच रागवलो तुझ्यावर , सॉरी !" ..विश्वास राव


 "नाही. " .. आरती.


 "मी सुद्धा सॉरी यापुढे मी माझी काळजी घेईल. "

बाबा तिच्या डोळ्यांतील आसवे पुसून तिला मिठी मारता . कधीच त्यांची भांडण झाली नव्हती. हलकी फूलकी नोक जोक व्हायची. विश्वासराव मोठ्याने रागवल्यामुळे आरतीच्या डोळ्यांत टचकन पाणी आले होते. ते सर्वांसमोर रागवले हे त्यांनाच त्यांच गिल्ट वाटत होत.


 "ऊ ऽहूँ ऽऽ ऊ ऽ हूँऽऽ ".. 
दारात राजीव खोकला लागल्याच नाटक करतो . विश्वास आणि आरती एकमेकांच्या मिठीतून वेगळे होतात .

 
"आत ये ."


 "मी काही नाही पाहिलं ! "... राजीव डोळ बंद करून म्हणतो.

 

"गाढवा , काय नाही पाहिल तू , जसं काय आम्ही काही चोर आहोत अस म्हणतोस तू .. माझी हक्काची बायको आहे तिला मिठीत घेऊच शकतो ना मी !". अस म्हणत ते आरतीला मिठीत घेतात.



"इश्शऽऽ ".. आरतीने दोन्ही हातांनी चेहरा लपवला .


 "हे इश्शऽऽ म्हटलं की हायऽऽ कलेजा खल्लाऽऽस होतो 
माझा !"… ते हदयावर हात ठेवत मिश्किल भाव करत म्हणाले.


"आहो काय चाललयं तुमचं , राजीव समोर आहे. बंद करा हे .. दोन दिवसांनी सुन येईल घरात." आरती त्यांना समजवत म्हणाली.


"मग काय तेव्हा बोलू असं , बरे ठिक आहे तेव्हाही बोलतो असं तिला तर कळेल की माझे सासरे किती रोमॅन्टिक आहे. तुला मी रोमॅन्टिक आहे तेच काही वाटतंच नाही."


आरती विश्वास रावांकडे डोळे मोठे करून बघत होती. आणि गालात हसत होती . त्यांना डोळ्यांनी सांगत होती बास आता तरी पण विश्वासराव काही ऐकत नव्हते.


"बाबा आई लाजली हो ! गाल गुलाबी झालेत आईचे.किती ब्लश करतेय, काय सुंदर दिसतेय आई !".. राजीव बाबांच्या री री ओढतो.


 "टिनू तू ही सुरु झालास."



"अरे ते माझ्या प्रेमाची लाली चढली तुझ्या आईच्या गालावर !!"
हे ऐकून तर आरतीच्या जीवाच पाणी पाणी होत होत .


"तुम्ही बसा मी जाते !" .. आरती उठू लागली.


"इथेच बस , मी नाही बोलत . जाऊ दे तुला ना कदरच नाही माझ्या प्रेमाची" .. विश्वासराव परत सुरू झाले .


"आहो बास नाऽ , टिनू काय विचार करेल ."



"मी काहीच विचार करत नाहिय आई . मला मज्जा येतेय ऐकायला ."


एक हलकी चापट राजीवला बसली. तो नाटकीपणाने कळवला


"आई गं लागला ना .".

 
"टिनू लागलं बाळा का? सॉरी बच्चा " …

आई जिथे खांद्यावर मारलं तिथे हलकं चोळत होती . 


"आई लगेच काय सिरयस होते. इतक काही झाल नाहिये "..

 "चला जेवण करू या खूप भूक लागली आहे." 

सर्वांनी जेवण केले. आईला गोळ्या दिल्या. गोळ्यामुळे आईला गुंगी आली अन् ती झोपली.


"बाबा मी जातो माझ्या रूम मध्ये. तुम्ही आता आराम करा . आता सद्ध्या घरूनच काम करा."

" हो ..तेच करतो ".

राजीव त्याच्या रुममध्ये आला .

'आईकडे लक्ष ठेवायला हवं '. मनातच बोलून अन् उद्याची तयारी करायला घेतली.

********


राजीव सकाळी लवकर उठून त्याच आवरून बाहेर आला. आई बाबांच्या रुममध्ये दारातून आत पाहतो तर आई बाबा झोपलेले होते.
 ' आज निवांत झोपली होती नाहितरी सर्वात आधी उठून ती सकाळपासून ते रात्रीपर्यंत आमच्या मागे हे दे ते दे चालूच
 असते. झोपू दे थोडावेळ .' तो दार लावून घेतो .

किचनमध्ये जाऊन तो नाश्ता बनवायला सुरुवात करतो. 

 "मी करते ना टिनू बाळा " .. मावशी 

 "नको मावशी आज मीच बनवतो . ते उठल्यावर त्यांना गरम करून द्याल . मला लवकर जायच आहे आज फ्रेशर्स पार्टी 
आहे ."

आईबाबांसाठी छान उपमा बनवतो . आवरून तो कॉलेजला निघतो .


शंतनू राजीवला फोन लावतो. 

 "कुठे आहेस ? अरे इथे ट्रॅफिक मध्ये अडकलोय . वेळ होतोय सर विचारताय .."


"सर्व व्यवस्थित आहे ना बघा आणि पार्टी सुरु करा .".


"अरे पण तु तर ये आधी नंतर सुरु करू ."


"नको नको उशीर होईल मला , अन्याला अँकरिंग करायला सांग .."

फोन ठेवून शंतनू फोनवर झालेलं संभाषण सर्वांना सांगतो.

 "ओके " म्हणत ते तयारीला लागले .

सर्व आपआपल्या परिने काम करत होते .

सर्व विद्यार्थी हॉलमध्ये जमा झाले होते. बसण्याची व्यवस्था आधीच केली होती तसेच जेवणाची सोय केलेली होती.



क्रमश ..

Stay Tune Happy Reading ..

🎭 Series Post

View all