ये दिल है मुश्किल ..

"थँक्यू काय म्हणताय काकू तुम्ही , आणि तुमच्या जागे मी असते आणि तुम्ही सावरल असतंच ना की तिथेच पडू दिल असत मला !…" नमामी "काकू चला आम्ही घरी सोडून देतो " नमू"आधी मला बाप्पाची पुजा करू देत ". …काकू त्यांनी पुजा केली . नमू त्यांच्या हाताला धरून उभी होती .पुजा झाली तरीही नमू ने त्यांचा हात सोडलेला नव्हता .. त्यांना कमाल वाटली एक अनोळखी मुलगी . तिने पडण्यापासून तर वाचवल पण आता मला ठिक वाटतयं तरी पण माझा हात काही सोडला नाही . . माझी मुलगी असती तर हिच्या एवढी मोठी असती असाच हात पकडून ठेवला असता . माझा टिनू ही तसाच आहे. असाच हात धरून ठेवतो. . . काकू विचार करत गालातच हसत होत्या .

ये दिल है मुश्किल ...


भाग - 3



नमामी विनी बाप्पाच्या देवळात निघाले. देवळात जाऊन त्यांनी  दर्शन घेतले. विनी जरा जास्तच बाप्पांना लाडीगोडी लावत होती . नमामीचे पूजा करून  दर्शन घेऊन झाले तशी मागे वळली तर एक बाई तिला   पडतांना दिसत होती .. ती पडणारच की नमू ने त्या बाईला सावरलं ..



" काकू काय होतंय तुम्हाला? इथे बसा ! .." नमू त्यांना पकडून बसवत म्हणाली .



"गरगरतयं …"   काकू



नमुने त्यांना एका बाकावर बसवले .



"हे घ्या पाणी प्या." नमूने त्यांना पाणी दिलं नंतर तिने चॉकलेट त्यांच्यासमोर धरली आणि खा म्हणून सांगितले ..ते खाऊन त्याना बरं  वाटलं  ...विनीचे दर्शन घेऊन तिही त्यांच्याजवळ बसली. चॉकलेट खाल्यामुळे त्यांना बरं वाटायला लागलं होतं. त्यांना तिथेच थोडावेळ बसवून ठेवले होते.



"काकू कसं वाटतयं आता?"

 

"मी ठिक आहे मुलींनो .…"



"थँक्यू बेटा , तू पकडलं मला .."




"थँक्यू काय म्हणताय काकू तुम्ही! आणि तुमच्या जागी मी असते आणि तुम्ही सावरलं असतंच ना की तिथेच पडू दिल असत मला !…" नमामी

 

"काकू चला आम्ही घरी सोडून देतो." नमू



"आधी मला बाप्पाची पुजा करू देत." …काकू 



त्यांनी पुजा केली . नमू त्यांच्या हाताला धरून उभी होती .
पुजा झाली तरीही नमूने त्यांचा हात सोडलेला नव्हता. त्यांना कमाल वाटली, 'एक अनोळखी मुलगी. तिने पडण्यापासून तर वाचवलं पण आता मला ठिक वाटतयं तरी पण माझा हात काही सोडला नाही. माझी मुलगी असती तर हिच्या एवढी मोठी असती असाच हात पकडून ठेवला असता. माझा टिनू ही तसाच आहे. असाच हात धरून ठेवतो. 'काकू  विचार करत गालातच हसत होत्या .




"काय नाव तुझं ?" काकू




"मी नमामी माने ."


 "आणि तुझं ?" .. काकूंनी  विनीकडे पाहत म्हटले .


 
"विनी राणे "... विनीने हसत उत्तर दिलं .




"काकू तुम्हाला आता बरं वाटतयं नं नाहीतर हॉस्पिटला जावूया !" नमू काळजीने म्हणाली .



"मी ठिक आहे घरी जाऊन आराम  करून गोळी घेईल  .मी माझी सकाळची गोळी घेतली नाही म्हणून मला चक्कर आली .."


"नक्की काकू बरं वाटतयं तुम्हाला.. पण तुम्ही एकट्या कसे काय आलात ?" .. नमू



 "नेहमी माझा मुलगा असतो माझ्यासोबत पण आज त्याला लवकर कॉलेजला जायचं होतं म्हणून तो गेला कॉलेजला आणि मी इकडे आले " …काकू 


"आम्ही घरी सोडतो तुम्हाला ... विनी तू स्कुटी घेऊन ये आमच्या रिक्षाच्या मागे …" नमू विनीला म्हणाली .



"नाही नाही बाळांनो ..  रिक्षा करायची काही गरज नाही. माझी गाडी आहे तिथे बघा. तुम्ही चला माझ्यासोबत माझ्या घरी , मस्त गप्पा मारुया, तशीही मी आता एकटीच आहे. "... काकू त्यांना गाडी कडे बोट करून दाखवले .  


" नाही काकू आम्हाला कॉलेजला जायचं आहे नंतर येऊ मस्त गप्पा मारुया, देवळात तर आपण भेटत जाऊ पण आता दोन तीन दिवस देवळात नाही आल्या तरी चालतील .. बाप्पा रागवणार नाही ! " नमूनेही हसतच सांगितले .



नमूने त्यांना त्यांच्या गाडीत बसवून दिले . ड्रायव्हरला सांगून घरी गेल्यावर चेकअप करायचा साहेबांना सांगा म्हणून सांगितले.



काकूंची गाडी गेली तसे घ्या दोघी त्याच्या स्कूटीकडे वळल्या ..
 


विनी स्कूटीचे स्टार्ट चे बटण दाबून चालू करत होती. पण चालू होत नव्हती .  
लवकर जायचं होतं आणि उशीर झाला आता तर गाडी चालूही होत नव्हती . 
विनीने स्कूटीला किक मारली. तरीही चालू झाली नाही. एक दोन मारून झाल्या तरीही काहीच नाही.


"चल धन्नो सुरु हो जा ! तेरे बसंती के  लिज्जत के पापड  का सवाल है।" 


अगं विनी ते डायलाँग तरी नीट बोलत जा , काही काय म्हणते  इज्जत असते ते . ... मध्येच लिज्जत पापड कुठून आणलेस? . नमू 



"नाही गं ते लिज्जत बरोबर आहे . . काय आहे न आई ने मला उमा मावशी कडे पापडांची डिलिव्हरी करायला सांगितली होती. आणि ते मी विसरले. आत्ताच माझ्या लक्षात आले म्हणून."
विनी डिक्कीतून पापडाची पिशवी दाखवत म्हणाली . .



" चालू होजा मेरी धन्नो राणी नहीं तो आई आहे ना ती तुला अन् मला जेवणच देणार नाही !मग उपाशी पोट झोपण्या पडेंगा । ... विनी तिच्या स्कुटिशी किक मारतांना बोलत होती ... नमू त्या दोघांना पाहून हसत होती .. 



"बसं करं विनी हसून हसून गाल दुखताय गं माझे तू इतकी शुद्ध  जबरदस्त हिंदी कुणीकडून शिकलीस ?



"वो मै हिंदी क्लास घेती हूँ ना ! , तुमको शिकवू क्या । उसके लिए फि लागती है। तुमको रोज एक समोसा आणना पडेगा l बोलो मंजूर है तो बोलो नही तो मेरे पास विद्यार्थीयोकी लांबलचक  रांग लागलेली है। ". … विनी नाटकीभाव करत नमूला म्हणाली 




"विने बास झाल ग  ! मी इथेच खाली पडेल  हसून हसून ..".नमू हसतचं हात जोडत म्हणाली हसून हसून तिच्या डोळ्यांत पाणी आलं.



"चल धन्नो" म्हणत ती पुन्हा किफ मारली आणि धन्नो चालू झाली .  स्कूटी चालू झाली  तशी विनीने धन्नोची पप्पी घेतली.



अजब गजबच आहे यांच प्रेम ..



पापडांची डिलिव्हरी करून त्या दोघी कॉलेजल्या गेल्या.



गाडी पार्क केली आणि विनी कॅन्टिनकडे जायला निघाली.



" ये ऽऽ  कुठे चाललीस? आपला क्लास इकडे आहे तिकडे नाही .." नमू विनीला क्लासकडे ओढत म्हणाली .



" माहिती आहे मला आपला क्लास कुणीकडे आहे . नमू  यार माझ्या पोटात कसतरीच होतयं अन्  गुळगुळ होतयं गं . ." .. नमू बिचारा चेहरा करत म्हणाली .


"मग वॉशरूमला जा ना गाढव !.. नुसतं काहीबाही चरत असते बघ पोट खराब झालं ना तुझं .. पण तू कॅन्टिनमध्ये का जातेय?" ..


"वेडे ते काही नाही पोटात म्हणून आवाज येतेय .. पोट खराबं झाल नाही ... काहितरी खायला द्या असं म्हणतय .एक समोसा एक कटिंग घेऊ …चल ना प्लिज .. ".. विनी तिला कॅन्टिन मध्ये जाण्यासाठी मनवत होती.


"प्लिज म्हणायची काय गरज नाही विनी असाही आपला पहिला लेक्चर मिस झाला आहे . नंतरचे लेक्चर तर होणारच नव्हते .
चल आता लवकर मग आपल्याला ग्रुप सोबत जायचे आहे …"


कॅन्टिनमधून समोसा चहा खाऊन पिऊन झाला आणि ते क्लासकडे निघाले. मुलं तिथे नव्हते तर मुलींनी गोंधळ घातला होता . बोलणं  हसणं,मस्ती गाणी म्हणणं चालू होती तर कोण काय कपडे घालणार उद्या काय काय धम्माल करू कोणकोणते गेम्स खेळायचे? असे या पर्यत चर्चा चालू होत्या …



"नमू उद्या गाणं म्हण गं.".. विनी 

 

"वेडी आहेस का? तुला माहितीय आहे बाबांना आवडत नाही ते गाणं म्हणणं.. नको नको मी नाही म्हणणार !".. नमू विनीला समजावत होती .


"ओके नको म्हणू . पण आता तर म्हणू शकते!"



"नाही. " … नमू



हो ऽ ऽ हो ऽ ऽहो ऽ ऽ .. म्हणत सर्वच एकत्र ओरडल्या ….



"कट्टी करते मी तुझ्यासोबत बोलूच नको." .. नाक तोंड हॅ ऽऽकरत तोंड फिरवत म्हणाली .

 

"लहान मुलांसारख काय कट्टी कट्टी करते गं!"


"मला आवडणारं भजन म्हणते मी फक्त चार ओळी …"


श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम
लोग करें मीरा को यूँ ही बदनाम 
साँवरे की बंसी को बजने से काम
राधा का भी श्याम वोतो मीरा का भी श्याम


जमुना की लहरें बंसीबट की छैयां
किसका नहीं है कहो कृष्ण कन्हैया
श्याम का दीवाना तो सारा बृज धाम
लोग करें मीरा को...

श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम...
  
 


राजीव त्याला काही काम असल्याने तो त्या क्लासरूम कडे आला होता पण जात असतांनांच गाण्याचे बोल कानी पडले आणि तो तिथेच थांबला .. बाहेरूनच तो ऐकू लागला मनाला एक आत्मिक ओढ जाणवत होती ... त्याने दरवाज्यातून वाकून आत पाहिलं तर एक मुलगी बसलेली होती आणि बाकीच्या मुलींनी तिच्या आजुबाजुला उभ्या होत्या म्हणजे पाहणाऱ्याला गाणारी मुलगी (नमू )दिसणारच नाही . त्याला त्या मुलीचा चेहरा पाहायची इच्छा झाली पण पाहता काही येत नव्हते .




कौन जाने बाँसुरिया किसको बुलाए
जिसके मन भाए वो उसी के गुण गाए
कौन नहीं बंसी की धुन का गुलाम
लोग करें मीरा को...

श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम...

श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम
लोग करें मीरा को यूँ ही बदनाम 



सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ...  इतकी ती  भजनात तल्लीन झाली होती टाळ्या वाजवल्या तेव्हा ती भानावर आली. 

विनीनी तिला मिठीच मारली .



"नमू ऽ ऽ यार काय सुंदर गायले आहेस .. किती गोड गळा आहे गं तुझा! मी तर मंत्रमुग्ध झाले …" सर्वांनीच तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला .




राजीवही हरवला होता त्या गाण्यांत  .. पण नमू ऽ नाव ऐकून लगेच जागा झाला.

 

"यातील नमू कोण ? .. चेहरा तर दिसतच नाहीये बसणाऱ्या मुलीचा ...  एकदा तरी नमूचा चेहरा दाखव रे  देवा." .. मनातच प्रार्थना करून देवाला हात जोडत होता .. तेवढ्यात एक क्लासमेट त्याला बोलायला आला ..



क्रमश ...


भेटूया पुढच्या भागात ....
Stay tune ... Happy reading ..

🎭 Series Post

View all