यातना

----

यातना  

     " भैरवी " नावाप्रमांणे कालभैरवी भासायची जेव्हा ती रागात असायची. तिला ओळखणाऱ्याला तिचा स्वभाव माहित होता.  गोड आणि सुस्वभावी भैरवी सर्वाना सांभाळून घेण्याची, जीव लावायची अगदी भोळी पण तिला कळलं की समोरचा खोटं बोलतोय किंवा फसवणूक करतेय तर मात्र भैरवी नावाला जगायची. कॉलेज मध्ये ही मुलं तिच्या या स्वभावामुळे लांबचं असतं. 

      आज कॉलेज संपून job चा पहिला दिवस होता. गुलाबी रंगाचा कुर्ता खुलत होता. हेडऑफिसला interview झाल्यानंतर जवळची ब्रँच तिला दिली गेली होती.  वेळेच्या 15 मिनिट आधीच ती हजर होती.  ऑफिस सुरु झाल्यावर ब्रँच मॅनेजरने तिची सर्वांशी ओळख करून दिली. सर्वांशी ओळख झाली आणि सर्व  कामाला लागले. पण पहिल्याच दिवशी तिच्या लक्षात आलं की अमन ( तिच्याच डिपार्टमेंट मध्ये कामाला  होता.) तो मात्र फारच शांत आणि कामाशी काम ठेवणारा आहे.  फार कोनात मिसळत नाही.  काही दिवस नोटीस केल्यावर तिने तिच्या ऑफिसच्या दुसऱ्या friends ना विचारलं तर उत्तर आलं की, तो ही नवीनच इथे ट्रान्सफर झाला आहे त्यामुळे कोणाला त्याविषयी फार माहिती नाही. तो उदास वाटायचा.  नक्की यांचा प्रॉब्लेम काय आहे?  असा प्रश्न भैरवीला पडे.  एक दिवस पाऊस खूप पडत होता. सर्व निघाले होते पण थोडंच काम राहील आहे करूनच निघू असं भैरवीने  ठरवलं. ऑफिस सुटल्यावर ऑटो शोधला पण पण पाणी भरल्यामुळे कोणीही यायला तयार होईना. अंधार पडू लागला होता आणि पाऊसही वाढतच होता. त्यामुळे भैरवीला tension आलं होतं. आणि तेवढ्यात मागून अमन छत्री घेऊन आला आणि भैरवीला आवाज दिला.
अमन : भैरवी, ...........
अमन गप्प राहणारा, कामाशी काम ठेवणारा आज तिला आवाज देत होता.  भैरवी पाहतच राहिली. अमन जवळ आला आणि बोलू लागला.
अमन : भैरवी एवढा पाऊस पडतोय तर लवकर निघायचं ना.  आता कशी जाणार घरी?? 
भैरवी : बघू कसं होतं तसं.
अमन : पाऊस वाढल्यामुळे दोघेही एका टपरीवर थांबले.  भैरवीने 2 कप चहा सांगितला आणि एक कप अमन समोर धरला, आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला. अमन ला आज बोलताना पाहून भैरवीला बरं वाटलं.  Basic माहित दोघांना एकमेकांना बद्दल कळली.  पाऊस ओसरल्यावर अमन ने तिला घरी सोडलं.

हळूहळू दोघांची मैत्री वाढू लागली आणि दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले. अमनचा शांत स्वभाव तिला आवडू लागला होता. भैरवी आता अमन सोबत लग्नाचे स्वप्न पाहू लागली. तिने याबद्दल घरी कल्पना दिली होती.

एकदा रविवारी बाहेर जाण्याचा plan भैरवीने केला, पण रविवारी मला जमणार नाही, काही महत्वाची कामे आहेत तेव्हा पुढील रविवारी नक्की plan करू असं अमन म्हणाला. भैरवीने सहज घेतलं आणि त्याच्या बोलण्यावर सहमत झाली.

रविवारी जरा उशिराच जाग आली भैरवीला. आज आराम करायचा असं ठरवलं तिने पण तिच्या एका कॉलेज मधल्या मैत्रिणीने Shopping ला ये म्हणून हट्टच धरला. आता घरीच आहोत तर जाऊयात म्हणून भैरवी तयार झाली. दोघींची खूप shopping केली, ice-cream खाल्ली, enjoy केलं. परत निघताना भैरवीला अमन एका हॉटेल मध्ये जाताना दिसला. महत्वाचं काम आहे म्हणाला होता आणि आता हा इथे?  म्हणून भैरवीने मैत्रिणीला त्या shop मध्ये कुर्ती बघ मी आलेच म्हणून अमन मागोमाग आत गेली. इथे त्याचे बरेच मित्र होतें. आणि टेबल दरवाजाला लागून होता.  भैरवी तिथे उभी होती. भैरवीला वाटलं आपण उगाच संशय घेतला आणि खात्री करायला तिथे आलो.  ती जायला निघणार तोच अमन चे शब्द कानावर पडले आणि भैरवी स्तब्ध झाली. ती जे काही ऐकत होती त्यावर विश्वास ठेवणं तिला कठीण जातं होतं. कोणीतरी पायाखालची जमीन काढून घेतल्यासारखं वाटत होतं तिला....... 

हॉटेल मध्ये दरवाजाबाहेर उभ्या भैरवीच्या डोळ्यात पाणी होतं. हॉटेल मध्ये टेबल वर अमन चं त्याच्या मित्रांसोबत बोलत होता.
अमन : म्हटलं होतं ना भैरवीला प्रेमात पडून दाखवेन. आज ती माझ्या प्रेमात आहे. So ठरल्याप्रमाणे माझ्या पैजेचे पैसे काढा.
अमनचे मित्र : हो, मित्रा खूप मोठा पराक्रम केला आहेस. त्या महामायेला पटवणं साधी गोष्ट नक्कीच नाही.

अमन : आणि तिचं गोष्ट मी करून दाखवली आहे. म्हणालो होतो मला अशक्य असं काहीच नाही.  पण..........
अमन त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच भैरवीने त्याच्या गालावर पाच बोटं उठवली होती.
भैरवीने रुद्र अवतार धारण केला होता. डोळ्यांमध्ये पाणी होतंच पण त्यात आगही होती. वातावरण गरम झालं होतं. अमन काही बोलणार तोच भैरवीने त्याला हातानेच गप्प बसण्याची खून केली. आणि बोलू लागली...

भैरवी : का अमन?  का? असं काय केलं होतं मी?  की माझ्यासोबत तू असं वागलास.  कोणाच्या कधी आधी ना मधी मी. तुझ्यावर प्रेम करणं मला आयुष्यातली चूक..... चूक  नाही घोडचूक वाटेल असं वाटलं नव्हतं. आता तर प्रेम शब्दही मला माझ्या आयुष्यात नको आणि तू पुन्हा कधी माझ्याशी बोलण्याचाही प्रयन्त करू नकोस. तुझ्या पैजेचे पैसे नक्की घे तुझ्या मैत्रांकडून. खूप मेहनत घेतलीस त्यासाठी तू.

अमन भैरवीशी बोलण्याचा आणि समजवण्याचा खूप प्रयन्त करतो पण भैरवी काहीही ऐकून न घेता दरवाजा त्याच्या तोंडावर बंद करून निघून जाते.

इकडे अमन खरंच भैरवीच्या प्रेमात असतो. तो मित्रांना भेटून दुसऱ्यादिवशी भैरवी ला सर्व सांगणार होता.

भैरवीच्या Interview च्या दिवशीचा प्रसंग..........

भैरवी चा interview होऊन गेली. आणि selection च्या list मध्ये तिचं नावही होतं. तिचं नाव पाहून टीम मध्ये एकाने ( रवीने )  विषय काढला. " अरे ही तर आमच्या कॉलेज मध्ये होती.  मी last year ला असताना हीच 1st year. आणि त्याचं वर्षी एकाला जो तिला छेडत होता त्याला दुर्गावतार दाखवला होता."
यावर तिथे बसलेला अमन बोलला:.
अरे तसाच प्रसंग असेल म्हणून ती अशी वागली असेल.

रवी : असेलही... पण सर्व जरा वचकूनच होते. तिला प्रेम वगैरे माहितच नाही. तिला जेवढं मी ओळखतो ती कोणाच्या प्रेमात नाही पडू शकत. आणि ती पडूच शकत नाही

अमन : आणि पडून दाखवलं तर.... भलेही मी नाही ओळखत तिला पण मला माझ्यावर विश्वास नक्की आहे.

रवी : लावतो का पैज मग....?

अमन : हो लागली पैज...  बाकी सर्व आहेत साक्षीला....
ठीक आहे आता तशीही माझी ट्रान्सफर झालीच आहे तिथे तिला पोस्टिंग द्यायची व्यवस्था करा.

आताच्या वेळेला.......
हॉटेलमध्ये भैरवी अमन ला मारून आणि ऐकवुन गेली. अमन मात्र खरोखरच तिच्या प्रेमात पडला होता. जवळ आला होता. तो पैज जिंकल्याचे सांगून पुढे हे मित्रांना सांगणारच होता की तो खरंच तिच्या प्रेमात आहे पण तो पर्यंत भैरवीने पाच बोटं उठली होती. त्याला आता असं वाटत होतं की आधीच तिला सर्व सांगायला हवं होतं.

इकडे भैरवी अमन च्या अश्या वागण्यामुळे खूप दुखावली गेली होती. आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केलं होतं आणि विश्वास केला होता तिने. तिच्या डोळ्यांमध्ये राग आणि दुःख आणि पाणी एकत्र आले होते. आता काहीही झालं तरी त्याच्याशी काही एक घेणं देणं ठेवायचं नाही असं ती ठरवते.

आणि दुसरीकडे अमन काहीही झालं तरी तिचा गैरसमज दूर करायचा असं ठरवतो.......

भैरवी घरी येते आणि स्वतःला बेडरूम मध्ये बंद करून खूप रडते. आयुष्यात कोणालातरी आपलं बनवल्याचा तिला त्रास होतं होता. बरंच वेळ रडल्यावर ती डोळे पुसते आणि ठरवते आता अमनला आयुष्यात परत स्थान द्यायचं नाही. रात्री तिला बाबा विचारतात तेव्हा ती सर्व खरं सांगते आणि आपला निर्णय ही सांगते.  भैरवी च्या घरचे समंजस असल्यामुळे तिचे बाबा विसरून जाण्याचा सल्ला देतात.

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये भैरवी येते तेव्हा बाहेरच अमन तिची वाट पाहत उभा असतो. तो तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयन्त करतो परंतु ती जणू तो तिच्या समोरच नाही, अदृश्य आहे असे वागत असते. ऑफिस सुटल्यावरही अमन तिच्याशी बोलण्याचा प्रयन्त करतो पण पुन्हा तसंच.  तिच्या मागे तो जातो. ती ऑटो मध्ये बसते आणि ऑटो निघतो.  अमन त्या ऑटो मागे बराच वेळ धावतो. पण ऑटो निघून जातो. अमन ला फार त्रास होतो आणि डोळ्यात पाणी घेऊन बराच वेळ तो त्याचं रस्त्याच्या बाजूला बसून राहतो. 

इकडे अमनला ऑटो मागे धावताना पाहून भैरवीच्या मनात कालवाकालव होते. कितीही राग असला तरी प्रेम होतं तिचं त्यांच्यावर.  पण क्षणात तिने स्वतःला सावरलं. एवढे दिवस प्रेमाचं नाटक करत होता, आता करत नसेल कशावरून??  आता त्याच्या वागण्याला भुलायचं नाही. ती रात्र दोघांनाही नकोशी होती. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं, अफाट होतं. त्यामुळे होणाऱ्या यातना ही फार त्रासदायक होत्या.

दुसऱ्या दिवशी भैरवी ऑफिसला आणि आणि तिने पाहिलं तिच्या Desk वर Sorry लिहिलेलं Card होतं. ती एक जळजळीत कटाक्ष अमन वर टाकते आणि उघडून न पाहता त्याच्यासमोर फाडून कचऱ्याच्या डब्ब्यात टाकते. अमन ला सर्व मार्ग बंद होताना दिसत होते. तरी भैरवीला काहीही करून आपलं तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही हे पटवून द्यायचं ठरवतो.

अमन रोज काही ना काही कारण काढून तिच्याशी बोलण्याचा प्रयन्त करत होता. भैरवीच्या मनावर त्याचे ते शब्द ( पैजेविषयी ) असे काही लागले होते की त्याचं आता काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ती नसते.

अमन ठरवतो की येत्या व्हेलेंटाईन डे ला तो तिला दुसऱ्या कोणाकडून बोलावून घेणार आणि मोठं surprise देणार आणि सर्व गैरसमज दूर करणार.

व्हेलेंटाईन डे च्या दिवशी........

अमन ऑफिसच्या एका मित्राला ती आली की तिला टेरेस वर पाठव म्हणून सांगतो. अमन ने टेरेस सफेद आणि लाल रंगाच्या फुग्यांनी सजवला होता. Cake आणला होता. लाल गुलाबांच्या पाकळ्या टेबल वर पसरवल्या होत्या. अत्तरने वातावरण सुगंधित केलं होतं. सुंदर माहोल होता आणि आता कमी होती ती भैरवीची.

बराच वेळ झाला तरी अजून भैरवी आली नाही आणि ऑफिसची वेळही होऊन गेली होती. म्हणून अमन नक्की काय झालं पाहायला खाली ऑफिसमध्ये आला. त्याने मित्रा विचारलं तर तो म्हणाला ती अजून आलीच नाहीये. अमनचं लक्ष कशातच लागत नव्हतं. दुपारी जेवणाची वेळ झाली तरी भैरवी आली नव्हती, तेव्हा त्याने न राहवून HR मध्ये चौकशी केली तेव्हा त्याला जे कळलं ते ऐकून त्याला सर्व संपलं असं वाटू लागला.

भैरवी कालच राजीनामा देऊन गेली होती.........

भैरवीने job सोडण्यासारखं मोठं पाऊल उचललं होतं.  इकडे अमन तिच्या विरहामध्ये दुःखी होता. निदान आपली बाजू सांगता आली पाहिजे होती असं त्याला सारखं वाटत होतं. अमन तिला संपर्क करण्याचा प्रयन्त करत होता पण तिला phone ही लागत नव्हता.  घरही माहित नव्हतं.  आता तिचा phone बंदच येतं होता.  अमन office वरून सुटल्यावर समुद्रकिनारी जाऊन बसला आणि तिच्या पहिल्या भेटी पासून आतापर्यंत झालेला प्रत्येक प्रसंग त्याच्या भोवती फेर धरू लागले. डोळ्यात अश्रू आणि मनात खेद, मावळणाऱ्या सूर्यासोबत आता उरलेल्या आशा ही मावळू लागल्या होत्या.

6 महिन्यांनंतर...........

​आजही अमन office मध्ये आल्यावर आधी भैरवीच्या desk कडे एक नजर नक्की पाहतो. भैरवी office मधून गेली खरी पण अजूनही अमनच्या मनामध्ये ठाण मांडून बसली होती. त्याने तिचा पत्ता काढण्याचा, संपर्क करण्याचा हर एक प्रयन्त केला, पण सर्व व्यर्थ ठरलं. आता फक्त तिच्या आठवणींमध्ये तो जगत होता. आपण आधीच तिला विश्वासात घेऊन सर्व सांगायला हवं होतं, असं त्याला सारखं वाटत होतं. पण तरीही कधी ना कधी ती भेटेल असा विश्वास त्याला वाटत होता.

काही दिवसांनी त्याच्या कॉलेज मधल्या मित्रानी पिकनिकला जाण्याचा plan बनवला आणि अमन ला सोबत चालण्याची जबरदस्ती केली. त्यांना घडलेला सर्व प्रकार माहित होता आणि त्यातून अमनला बाहेर काढण्यासाठी काही काळ त्याला बाहेर, मोकळ्या हवेत नेण्याची शक्कल त्यांनी लढवली होती. मित्रांचा आग्रह त्याला मोडवला नाही आणि पिकनिकला जायचं final झालं.

पन्हाळा गड सर करायचा अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि आजूबाजूला किमान 2 दिवस फेरफटका मारायचा असं ठरलं. मुंबईहून रात्री सर्वजण निघाले. लांबलचक आणि शांत रस्ता, दुतर्फा झाडे, टपूर चांदणं, रात्र आहे की मोहिनी?  हे ठरवणं कठीण होतं. मध्ये मध्ये थांबून टपरीवरचा चहा म्हणजे सुखाची पर्वणी. हळूहळू सर्वाना ताजतवानं वाटू लागलं होतं. गाडीत FM वर " ये राते, ये मौसम, नादिका किनारा, ये चंचल हवा........... " असे गीत रात्रीची रंगात वाढवत होते.

सकाळी सर्वजण book केलेल्या हॉटेल मध्ये उतरले. तयार होऊन सर्वजण सर्वांत आधी अंबाबाईच्या दर्शनाला गेले. अमन दर्शन घेताना अंबाबाई जवळ भैरवीची एकदा तरी भेट होऊ दे, माझं प्रेम मला मिळू दे म्हणून म्हणून इच्छा बोलून दाखवतो. नकळत त्याचा डोळ्यात पाणी येतं आणि त्याने केलेल्या चुकीची क्षमा ही तो मागतो. आज 6 महिन्यात पहिल्यांदा त्याचा मनाला शांतता लाभली होती. मन शांत झालं होतं. बराच वेळ फिरून सर्वजण पुन्हा हॉटेल वर परत जातात आणि दुसऱ्यादिवशी अगदी पहाटे पन्हाळा जवळ करायचा त्यांचा बेत ठरतो.

पहाटे सर्वजण पन्हाळा चढायला सुरुवात करतात. अगदी पहाटे आल्यामुळे तुरळक माणसं होती. आणि गर्द झाडींमुळे पन्हाळा एखाद्या भरगच्च आयाळ असलेल्या सिंहाप्रमाणे भासत होता. अमनही चढता चढता आजूबाजूचे फोटो click करत होता. निसर्ग सौंदर्य आपल्या कॅमेरा मध्ये साठवून ठेवत होता.  आणि अचानक अमन गडाच्या खालच्या दिशेला धावू लागतो. अमन च्या अश्या वागण्यामुळे सर्वजण चक्रवतात आणि त्याला थांबायला सांगत त्याच्या मागे पाळतात. धावत खाली येतं अमन एका ठिकाणी थांबला आणि आजूबाजूला वेड्यासारखं कोणाला तरी शोधू लागला. मित्रानी त्याला विचारल्यावर त्याने सांगितलं.

मी आता भैरवीला पाहिलं.............

पन्हळाच्या पायथ्याशी भैरवीला पहिल्यापासून अमनचं मन थाऱ्यावर नव्हतं. तो बराचवेळ आजूबाजूला तिला शोधात होता. सर्वांनी त्याला सांगितलं की कदाचित तूला भास झाला असेल. पण त्याला खात्री होती, त्याने भैरवीला पाहिलं म्हणून.

दुसऱ्या दिवशी तो सकाळीच पुन्हा तिथे आला आणि भैरवीला शोधू लागला. थोड्यावेळाने त्याला भैरवी येताना दिसली आणि तो तिच्या मागे गेला आणि आवाज दिला. भैरवीने मागे वळून पाहिलं आणि तिच्या डोक्यावर आठ्या पडल्या. अमन तिला बोलला.
अमन : please, भैरवी एकदा ऐकून घे माझं. तुला सर्व नीट सांगितल्याशिवाय मला सुखाची झोप येणार नाही.

भैरवी : आता अजून सांगण्यासारखं आणि ऐकण्यासारखं काही आहे का...??

अमन : हो आहे. खूप काही आहे सांगण्यासारखं. आणि सगळा खरं आज सांगायचं आहे मला. मला तुझी फक्त 15 मिनिट दे. Pleaseee....

भैरवी : काहीही ऐकायचं नाहीये मला रस्ता सोड.

अमन : तू माझ्यावर कधी खरं प्रेम केलं अशील तर माझं न ऐकता जाणार नाहीस. आणि आज तर तू माझं काहीही न ऐकता गेलीस तर तू कधी माझ्यावर प्रेम केलंच नाही असं समजेन आणि तूझ्यासाठी, तुझ्याशी वाईट वागलो यांचा त्रास ही नाही होणार मला.

भैरवी : प्रेम केलं तुझ्यावर. जीव लावला,  विश्वास ठेवला त्या बदल्यात विश्वासघात केलास, चूक माझी होती. विश्वास ठेवल्याची किंमत मोजली मी. तरीही आज बोल तू. मला पण कळू दे विश्वासघात करण्यामागे तुझ्याकडे काय explanation आहे.

अमन तिला एका बाजूला घेऊन जातो आणि बेंच वर बसवून बोलायला सुरुवात करतो.

अमन : भैरवी तू Interview देऊन गेल्यावर........

अमन सर्व सविस्तर सांगतो... आणि पुढे म्हणतो.
अमन : सुरुवातीला माझ्यासाठी फक्त एक पैज होती पण त्यांनंतर मी तुझ्या प्रेमात कसा पडलो कळलंच नाही. त्या दिवशी मित्रांना भेटून मी दुसऱ्यादिवशी तूला सर्व सांगणार होतो. अगदी पैज आणि त्यानंतरच  प्रेम सुद्धा पण त्या आधीच तूला सर्व कळलं आणि पुढे हे सर्व घडलं. I still love you भैरवी. Love you a lot...

भैरवी सर्व ऐकून घेते आणि तिला कुठेतरी त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागतं.तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदले होते.

भैरवी : अमन हे सर्व खरं असेलही... पण
अमन : असेल नाही, आहे.

भैरवी : बरं आहे. तरीही आता तुझा माझा संबंध संपला. कारण 4 महिन्यापूर्वी माझा साखरपुडा झाला आहे आणि 2 महिन्यानंतर लग्न आहे माझं.... सागर नाव आहे माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं. माझ्या मनावर तुझ्या वागण्याचा एवढा परिणाम झाला होता की, मी काहीही विचार न करता होकार दिला. मला फक्त तुझ्यातून बाहेर पडायचं होतं.

हे ऐकून अमन चं जग फिरत... प्रेमात यातना काय असतात त्या त्याला जाणवत होत्या. काळजावर घाव घातला गेला होता. त्याच्या एका चुकीची खूप मोठी शिक्षा त्याला मिळत होती. तो वेड्यासारखा तिला बोलू लागला : भैरवी हवं तर अजून मार मला... शिव्या घाल, अजून काही शिक्षा द्यायची असेल तर दे पण please मला असं सोडू नकोस गं. माहित आहे मरणार नाही मी पण माझ्या जगण्याला काहीच अर्थ नसेल.

अमनचं हे असं ऐकून भैरवीचे डोळे पाणावतात.
भैरवी : सर्व मान्य आहे पण साखरपुडा झालाय माझा आणि त्याला मी दगा नाही देऊ शकत. काहीही असलं तरी सर्व माहित असताना तो माझ्याशी लग्नाला तयार झाला. त्याच्यासोबत मी विश्वासघात मी नाही करू शकत.

असं बोलून पाणावलेल्या डोळ्यांनी भैरवी अमनचा हात सोडून निघून जाते. आणि अमन त्याचं बेंचवर स्वतःच्या नशिबाला आणि कर्माला दोष देत असतो. बराच वेळ तसाच गेल्यानंतर अमन उठून आपल्या हॉटेल कडे निघतो आणि तेवढयात त्याला सागर नाव या आधीही कुठेतरी ऐकल्यासारखं आठवतो,  पण नक्की कुठे.....???? 

प्रेम कधी थंड हवेची झुळूक असतं,
कधी दरवाळणारी रातराणी,
कधी अधीरता आणि उत्कंठा,
तर कधी जादूचं मोरपीस.
पण जेव्हा ती थंड हवेची झुळूक, दरवाळणारी रातराणी,
अधीरता, जादूचं मोरपीस आपल्यापासून दूर होतं असल्याची जाणीव होते ना ती यातना असते. अफाट यातना.
अशी यातना जी सर्वाना सांगू शकत नाही, डॉक्टरकडे जाऊन उपचार घेऊ शकत नाही आणि रात्री उशी आसवांनी भिजवण्यापलीकडे मार्गही राहतं नाही...

सागर..... कोण हा सागर....??  नाव ऐकलं कुठेतरी पण नक्की कुठे..?? अमन ला सारखं हे नाव सतावत होतं. तो हॉटेलवर आला आणि सर्व घटना त्याने मित्रांना सांगितली. त्यांनाही आश्चर्य वाटलं, कारण त्यांना वाटत होतं की भैरवीला  अमनने पाहिलं ते भास होते. अमन भैरवीच्या लग्नाच्या बातमीने आहत झाला होता. यातना, यातना आणि यातना या त्याला पिळवटून टाकत होत्या. रात्र डोळ्यात आसवं थांबवण्यात आणि भैरवीच्या प्रेमाच्या आठवणींच्या फेऱ्यात निघून गेली. दुसऱ्या दिवशी सर्व परत निघाले.

ऑफिस मध्ये ही अमनच्या मनात सागर नाव फेर धरून होतं.  2 -3 दिवस विचार केल्यावर त्याच्या लक्षात आलं, कदाचित जुन्या ऑफिस friend च्या तोंडून त्याने हे नाव ऐकलंय. त्याने जुन्या ऑफिस friends ना call करून सर्वांना भेटायला बोलावलं. सर्व sunday ला Coffee shop मध्ये भेटले. सर्व जरा सांभाळूनच बोलत होते. मागच्या वेळचा भैरवीचा प्रसंग सगळ्याच्या लक्षात होतं. अमनने नेहमीसारखं बोलत वातावरण नॉर्मल केलं. आणि हळूहळू इकडचं तिकडचं बोलणं करून अमनने विषय काढला.

अमन : अरे हा सागर कोण आहे? तुमच्यापैकी कोणाच्या ओळखीचा आहे का? 

प्रशांत : ( अमनचा ऑफिस friend ) का रे मध्येच काय सागर वगैरे?

अमन : तसं नाही रे, ऑफिस मधून shifting च्या वेळी मी काही जुन्या file घेऊन गेलो होतो. त्यात एकात सागर नावाने Document होतं. मी नीट नाही वाचलं घाईत आणि नंतर ते गहाळ झालं. मला वाटत Important असेल तर त्याला प्रॉब्लेम होईल. आणि सागर नाव मी आपल्या ऑफिस मध्ये कोणाच्यातरी तोंडून ऐकलं होतं, म्हणून म्हटलं तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर विचारवं.

हर्षद : अरे अमन माझ्या एका मित्रच नाव आहे सागर पण त्याचं कोणतंही Document आपल्या ऑफिस मध्ये आणलेलं नाही आठवत मला.

अमन : अजून कोणाचा friend आहे का सागर...???

सर्वांनी नकारर्थी मान हलवल्या. आता अमन हर्षद जवळ येऊन बसला आणि त्याने पन्हाळावर झालेला प्रसंग सर्वांना सांगितला. आणि पुढे म्हणाला.

अमन : आपण पैज लावली त्यानंतर हे नाव ऐकलं होतं मी मला चांगलं आठवतंय. म्हणून मी तूम्हाला सर्वांना इथे बोलावलं होतं कारण नक्की कोणाकडून हे मी ऐकलं होतं ते मला आठवत नव्हतं. आता हर्षद तू मला सांग ही पैजेची गोष्ट तू सागर जवळ बोलला होतास का....??

हर्षद : हो, त्याला सर्व बोललो होतो मी. माझा चांगला मित्र आहे तो कॉलेज मधला. पण तो असं का करेल. कदाचित तो ज्याबद्दल बोलतोयस तो आणि हा सागर वेगवेगळा असेल.

अमन : असू शकत... पण हा सर्व प्रकार घडला त्यावेळी चं हे नाव आलं म्हणून मला शंका वाटते. एकदा खात्री करून घेतली तर....???

हर्षद : म्हणजे नक्की कशी खात्री करायची...?? 

अमन : तुझं सागराशी आता मध्ये बोलणं की भेट झाली होती का...?

हर्षद : नाही 6-7 months झाले नाही contact.

अमन : आपण त्याच्यावर थोडं लक्ष ठेऊ, त्याच्या आयुष्यात नक्की काय चाललंय ते बघू त्यावरून अंदाज येईल. हा तोच सागर आहे की नाही.

ही गोष्ट सर्वांना पटली आणि सर्वजण आपापल्या परीने मदतीला तयार झाले. हर्षदने सागरला coffee shop मधूनच call केला. पण सागरने फोन उचलाच नाही.

आता सर्व मित्र अमनच्या बाजूने मदतीला, सागरची माहिती काढायला सज्ज झाले होते.

प्रेम प्रेम प्रेम....
प्रेम प्रेम प्रेम असतं,
पण तुमचं आमचं same असेल असं काही नसतं.
काहींसाठी सुखाची बरसात तर काहींसाठी अश्रू लपवण्यासाठी बरसात असते.
प्रेमाच्या सागरात तूम्ही दुसरं टोक गाठलच असंही काही नसतं.
प्रेम प्रेम प्रेम असतं,
पण तुमचं आमचं same असेल असं काही नसतं.

भैरवीच्या घरी आज हळदीचा कार्यक्रम होता. भैरवी च्या डोळ्यात पाणी होतं. अमन वर आजही तिचं प्रेम होतं. पण आता ती मागेही फिरू शकत नव्हती. सागर आणि भैरवीची हळद एकत्रच करायची ठरलं होतं त्यामुळे सागरही तिथेच होता.  आनंदी वातावरण होतं हळदीची गाणी वाजत होती.  सागरला एक एक करून सर्वजण हळद लावत होते.
आता सागरची उष्टी हळद भैरवीला लावायला सर्वजण आले सागर समोर होता आणि भैरवीला पाहून खुश होता.

भैरवीला हळद लावणार तोच अमनचा आवाज आला. "थांबा ".  अमन ला तिथे पाहून सर्वच जण गोंधळले. भैरवी त्याला काही बोलणार तोच अमन बोलतो.

अमन : एक मिनिट भैरवी. आज मला बोलू दे. मी इथे तुझं लग्न मोडायला नाही आलो.  पण एकदा मी काय बोलतो ते ऐकून घे.
अमनला पाहून सागर चिडतो आणि अमन वर धावून जातो. चांगल्या क्षणी विरजण टाकायला आलायस का.??

अमन : ( सागरचा हात कॉलर वरून बाजूला करत ) नाही,  विरजण टाकायला नाही खरं सांगायला आलोय.

सागर अजून चिढतो आणि त्याला तिथून जायला सांगतो. अमन भैरवीला बोलतो. 

अमन : भैरवी आज जर तू माझं नाही ऐकलंस तर नंतर स्वतःला दोष देशील त्यापेक्षा एकदा फक्त 5 मिनिट ऐकून घे.  भैरवीला अमन च्या डोळ्यात काहीतरी खरेपणा वाटत होता म्हणून ती म्हणाली बोल काय बोलायचं आहे ते.
हे ऐकून सागर बोलतो.  " ज्याने तूला फसवलं त्याला तू बोलायला सांगतेस? ते काही नाही आताच्या आता निघ इथून. "
भैरवीला ला त्याचं वागणं खटकत.
भैरवी : 5 मिनिट मागतोय तो तर problem काय आहे?  बोलू दे त्याला.
सागर : मी तुझ्याबद्दल सर्व माहीत असूनही लग्नाला मागणी घातली आणि तू त्याची बाजू घेतेस? 
सागरच्या अश्या बोलण्याचं भैरवीला नवल वाटत. आणि राग ही येतो. " सागर असं कसं बोलू शकतोस तू? "

अमन : मी सांगतो भैरवी. तो असं कसं बोलू शकतो ते मी सांगतो.
सागर रागाने बघत होता. अमन हर्षदला आवाज देऊन आत बोलवतो. हर्षदला पाहून सागर जरा घाबरतो.
भैरवी : हा कोण आहे अमन?  आणि काय बोलायचं होतं तूला?

अमन : तुझ्याकडून सागर नाव ऐकलं तेव्हापासूनच मला असं वाटत होतं की कुठेतरी ऐकलं आहे. मग मी माझ्या जुन्या office friend ला बोलावलं आणि या हर्षदचा सागर नावाचा friend आहे आणि हर्षदने पैजेची गोष्ट सांगितली होती. मग आम्ही सागरची माहिती काढली. तर कळलं की हा  तोच सागर ज्याचं लग्न तुझ्याशी ठरलं आहे. तेव्हा हे लक्षात आलं हे सर्व सागरने केलंय.

भैरवी : पण हे कश्यावरुन की हे सागरने केलंय?

अमन : सांगतो. ( अमन सागरच्या बहिणीला आवाज देऊन बोलावतो आणि विचारतो ) त्यादिवशी तू shopping ला भैरवीला घेऊनच शॉप्पिंगला का गेलीस नाही म्हणजे त्यादिवशी भैरवीचा plan छान आराम करायचा होता असं ती मला म्हणाली होती तरी तू तिला कसं घेऊन गेलीस...?  म्हणजे लगेच कशी तयार झाली भैरवी?

सागरची बहीण : त्यादिवशी सागर दादाने मला पैसे दिले होते आणि shopping ला जा म्हणाला होता आणि जाताना भैरवीला घेऊन जा म्हणाला.

अमन : आणि त्या coffee shop जवळच कसं आलात तुम्ही?  नाही म्हणजे त्यादिवशी काही special नव्हतं आणि उलट पडत असूनही तिकडे आलात तुम्ही?

सागरची बहीण : दादाने मध्ये मला phone करून सांगितलं होतं की तिकडे ऑफर्स चालू आहेत.

अमन : कळलं का भैरवी तू सहज shopping करत त्या coffee shop पर्यंत आली नव्हतीस. सागरला माहित होतं मी आणि माझे friends तिथे भेटणार आहोत. आणि दुसऱ्यादिवशी मी तूला सर्व खरं सांगणार आहे. म्हणून त्याने तू तिथे त्याचं वेळेस पोहचशील असा plan केला.आणि आता पुढचं सागर सांगेल. त्याने असं का केलं? 

सागरच्या डोळ्यात राग होताच.तो बोलू लागला. हो मी केलं हे सर्व. भैरवी आमच्या घरी यायची कधी कधी. आवडायची मला खूप पण सांगता नाही आलं मला. हर्षदकडून मला कळलं की भैरवी आणि अमन एकमेकांवर प्रेम करतात. पण पैज बद्दल ही तो म्हणाला होता. अमन सर्व तिला सांगणार होता हे पण मला माहित होतं. भैरवीला फसवणारी,  खोटं बोलणारी लोक नाही आवडत माहित होतं मला म्हणून मी त्यादिवशी बहिणीला भैरवीला मुद्दाम पाठवलं कारण mla माहित होतं जेव्हा तिला कळेल या पैजेबद्दल तेव्हा ती संबंध तोडून टाकेल. आणि तसंच झालं. त्यानंतर मी घरी बोलून भैरवीच्या घरी जाऊन तिला मागणी घातली. त्यांनतर मी तिला जॉब सोडायला सांगितला, कारण दिलं की तू तिथे राहशील तर तूला त्रास होईल म्हणून. मला वाटल नव्हतं की मला प्रत्येक्ष बघितलं नव्हतं तर हा माझ्यापर्यंत पोहचेल किंवा  हे कधी उघडकीस येईल.

भैरवीला हे सर्व ऐकून खूप राग येतो. आणि भर मांडवात ती सागरच्या कानाखाली मारते आणि म्हणते तूला माहित होतं ना की मला फसवणारी आणि खोटं बोलणारी लोक नाही आवडत आणि तू मला फसवलास आणि खोटं ही बोलास.

सागर आणि सागरमुळे त्याच्या घरचेही खाली मान घालून उभे होते. भैरवी आणि तिच्या घरच्यांनी ते लग्न मोडलं आणि त्याचं मुहूर्तावर अमन आणि भैरवीचं लग्न लावलं. एवढ्या यातना भोगून मिळालेलं प्रेम त्यांच्यासाठी सोन्यासारखं होतं आगीतून निघायलसारखं, 100 नंबरी....

समाप्त....