यात चूक कोणाची आहे भाग 5 अंतिम

पूजा आत येवून बसली, ती रितेशचा विचार करत होती, काय कमी आहे यांच्यात तर त्यांच लग्न जमत नाही, किती डॅशिंग हुशार आहे सर



यात चूक कोणाची आहे भाग 5 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.........

दुसर्‍या दिवशी पूजा रिटा रिसेप्शन मधे बसलेल्या होत्या, सर आले की सांगणार होते कोण कोणत्या डिपार्टमेंट आहे ते, बरोबर बाकीचे मुल मुली होते, सर आले सगळे उठुन उभे राहिले, त्यांनी दोन दोनचे ग्रुप केले, रिटा पूजा वेगवेगळया डिपार्टमेंटला गेले, पूजा आणि विशाल यांना इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मधे पाठवल, तिथे रितेश सरांना भेटा,

ठीक आहे,

रितेश त्याच्या केबिन मधे काम करत होता, पूजा विशाल आत आले,.. "गुड मॉर्निंग सर आम्हाला या डिपार्टमेंट मधे पाठवल आहे, आम्ही ट्रेनी आहोत" ,

रितेश पूजा कडे बघत होता, ती दुसरीकडे बघत होती, मला काय याच्या डिपार्टमेंट मधे काम मिळाव,

त्याने मॅनेजरला बोलवलं,.. "यांना त्यांच्या जागा द्या, काम सांगा काय आहे ते ",

ते दोघ जात होते.." मिस पूजा एक मिनिट तुम्ही थांबा", विशाल बाहेर गेला

"आय एम सॉरी पूजा, मी काल जे बोललो ते तुम्ही पर्सनली घेवू नका",.. रितेश.

" इट्स ओके सर नो प्रॉब्लेम",.. पूजा.

आॅल द बेस्ट

थॅंक्यु सर

कामाला सुरुवात झाली, पूजा खूप हुशार होती, दिलेल काम फटाफट करत असे, काहीही सांगितल लगेच लक्ष्यात रहात होत तिच्या, रितेश बघत होता स्ट्रेट फॉरवर्ड छान मुलगी होती ती, तिला अस समोर काम करतांना बघून त्याला खूप छान वाटत होत, अशी बायको हवी, विचारू का तिला, कोणी असेल का हिच्या आयुष्यात, कुठली आहे ही, घरी कोण आहे माहिती नाही, त्याला माहिती होत ती एकटी रहाते इथे,

"काय सुरू आहे मग पूजा, रितेश सर आजुबाजूला असतात, तुझ्या कडे बघत असतात, छान वाटत असेल ना",.. रिटा.

"काहीही काय, रितेश चांगला आहे त्याच्या कामाशी काम ठेवतो",.. पूजा.

"त्याच लग्न झाल नाही लक्ष्यात आहे ना तुझ्या, तुला विचारल होत ते, काही जमतय का तुमच",.. रिटा.

"नाही आम्ही लग्न करणार नाही, आम्ही कामाशी काम ठेवतो, अग ते अस मुद्दे खोडायला बोलले असतील, आता माझ्या कडे बघत ही नाहीत सर ",.. पूजा.

पूजा आत येवून बसली, ती रितेशचा विचार करत होती, काय कमी आहे यांच्यात तर त्यांच लग्न जमत नाही, किती डॅशिंग हुशार आहे सर,

रितेश नीलेश जेवत होते,.." काय म्हणते आमची वहिनी, चांगल काम करते का",

कोण?

" पूजा तुझ्या डिपार्टमेंटला आहे ना",.. निलेश.

" वहिनी काय? आता बोलला या पुढे अस करु नकोस, नौकरी जाईल माझी" ,.. रितेश.

" विचार कर, करून घे लग्न तिच्याशी, किती सुंदर आहे ती" ,.. निलेश.

" शक्य नाही, आहे ती सुंदर साधी छान , पण मी कामाशी काम ठेवतो",.. रितेश.

दुसर्‍या दिवशी ऑडिट होत, काम तस अकाऊंट डिपार्टमेंटच होत, पण इथे ही सगळ नीट आहे का ते आदल्या दिवशी ते बघत होते, कोणी घरी गेल नव्हत,

पूजा खूप मदत करत होती सगळ्यांना, बाहेरच काम झाल, रितेशच्या केबिन मधे बरेच फाईल कागदपत्र नीट ठेवायचे होते, रितेश अजून एक मुलगा काम करत होते, अकाऊंट डिपार्टमेंटची सीमा होती मदतीला, अजून बोलवा एक दोघांना, खूप उशीर झाला आहे, पटकन होईल काम,

पूजा आली मदतीला, फटाफट काम करत होती ती, एका तासात काम झाल, बरेच लोक गेले होते, पूजा निघाली, रितेश निघाला होता,.. "पूजा मी सोडून देवू का तुम्हाला इफ यू डोन्ट माइंड",

"मी जाईल सर",.. पूजा.

"चल ना प्लीज",.. रितेश.

त्याच्या आग्रहाने ती खुश होती, ती त्याच्या कार मधे बसली, रितेश तिच्या कडे बघत होता, तिला ते समजल, ती लाजली, तीच पीजी आल, बाय सर थॅंक्यु ,

" पूजा एक मिनिट थोड बोलायच होत",.. रितेश.

पूजाला कल्पना होती थोडी, ती गडबडली.

"माझी ऑफर अजून ओपन आहे, तुझ्या आयुष्यात कोणी नसेल तर तू माझ्याशी लग्न करशील का, आय एम सिरीयस",.. रितेश.

पूजा आश्चर्याने बघत होती, आता दोघे हसत होते,.. मी जाते सर.

"विचार कर यावर, मी वाट बघेन, पण रागावू नकोस, प्लीज माझी कंप्लेंट नको करू, तुझ्या सारखी हुशार छान मुलगी माझ्या आयुष्यात येत असेल तर माझ चांगल होईल" ,.. रितेश.

"नाही सर नाही करणार कंप्लेंट, गुड नाइट",.. ती आत निघून गेली.

रितेशला वाटत होत ती होकार देईल, दुसर्‍या दिवशी ऑडिट मुळे सगळे बिझी होते, रितेश अकाऊंट डिपार्टमेंटला होता अर्धा दिवस, पूजा त्याची वाट बघत होती, त्या दिवशी भेट झाली नाही.

रविवारी सुट्टी होती सकाळी सकाळी रितेशच्या फोन वर " हाय" आल,

" आज भेटणार का" ,.. पूजाचा मेसेज बघून रितेश खुश होता, दोघ दुपारी कॅफे मध्ये भेटले, खूप छान दिसत होती पूजा,

"काय घेणार",.. रितेश.

कॉफी.

त्याने दोन कॉफी सांगितली, दोघ गप्प होते,

"पूजा तू विचार केला का माझा" ,.. रितेश.

" हो सर",.. पूजा.

" रितेश म्हण आता आपण ऑफिस मधे आहोत का, बोल पटकन काय विचार केला",.. तो खूप अधीर झाला होता,

आज खूप बोलत होती पूजा, ती तिच्या घरच्या बद्दल सांगत होती, त्याला माहिती विचारत होती, रितेश नुसत तिच्या कडे बघत होता,

" रितेश.. रितेश.. काय बघता आहात तुम्ही" ,.. पूजा.

" तू खुश आहेस ना आज ",.. रितेश.

हो

" अशीच रहा छान",.. रितेश.

" रितेश मी लग्नाला तयार आहे, तुम्ही चांगले आहात",... पूजा.

रितेश खूप खुश होता. लाजला होता तो ही

दोघांनी घरी सांगायच ठरवल, घरचे खूप खुश झाले, मालती ताईंना काय करू काय नको अस झाल होत, पूनम ताई आली होती,

पूजाच्या घरचे भेटायला आले, खूप आवडला त्यांना रितेश, लग्न जमल, एका महिन्याने झाल ही,

रितेश पूजा फिरायला गेले, खूप छान जमत होत दोघांच,

तिथे एका ठिकाणी एका कपल भांडत होत, बरीच गर्दी जमली होती, बरीच रडारड सुरू होती, ते पूजाला बघवल गेल नाही, ती त्या लोकांशी बोलायला गेली, तिने त्यांचा प्रॉब्लेम बर्‍या पैकी सोडवला, मुलीला धीर दिला.

रितेश बघत होता बापरे चांगलीच बोल्ड आहे ही, दोघ हॉटेल वर वापस आले, रितेश मुद्दामून घाबरत होता,

"काय झाल रितेश असे की घाबरले तूम्ही मला, मी थोडी काही करणार आहे तुम्हाला" ,.. पूजा.

" छान आहे तुझा स्वभाव, अन्याय सहन होत नाही ना तुला",.. रितेश.

नाही.

"तुझ्या या स्वभावामुळे तू मला भेटली, अशी रहा छान",..रितेश.

"मी नंतर ही जनजागृतीच काम करणार आहे, समाजात काही लोकांच्या चुकां मुळे चांगल्या लोकांना त्रास होतो ते थांबवायच आहे मला ",.. पूजा

" हो नक्की कर, खूप छान काम आहे, आधी ज्यांच लग्न जमत नाही त्या साठी बघ काही तरी ",.. रितेश.

हो.

त्याने तिला जवळ घेतल. किती हुशार माझी बायको.. "लक्ष्यात आहे ना आपण का आलो इथे, ते काम करू या का आता ".

पूजा लाजली होती.

🎭 Series Post

View all