यशस्वी मात

Positivity, enjoy with yourself.

यशस्वी मात 

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथेतील नावे, स्थळे, प्रसंग पूर्णतः काल्पनिक असून कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी याचा संबंध नाही. अगदी नेहमीच्या आयुष्यात आलेली निराशा आणि त्यावर केलेली यशस्वी मात यातून पहायला मिळेल....)

           विणाच्या ऑफिस मध्ये आज जरा नेहमी पेक्षा जास्तच गडबड सुरु होती..... कारणही तसंच होतं म्हणा.... आज ऑफिस मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग बोलावली होती.... त्या तयारीतच सगळे व्यस्त होते.... त्यांच्या स्वागताची तयारी, त्यांना दाखवायचे रिपोर्ट्स, मागच्या काही महिन्यांचे परफॉर्मन्स रिपोर्ट्स आणि बरीच काही तयारी बाकी होती..... सगळे जण आपापल्या कामात व्यस्त होते.... ‛वी मेक युअर ब्रँड’ एक नावाजलेली Advertising कंपनी..... खूप कमी वेळात या कंपनीने स्वतःची ओळख मार्केट मध्ये निर्माण केली होती..... मोठ मोठे ब्रँड्स आता या कंपनीलाच प्रोडक्ट मार्केटिंग करायला कॉन्ट्रॅक्ट देत होते.... मुंबई मध्ये यांचं प्रशस्थ ऑफिस होतं.... हा आलेख मागच्या दीड वर्षांपासून चढता होता.... 
          वीणा! कंपनीची CEO..... वय ५२ च्या आसपास! आधी ती एक साधी एम्प्लॉयी म्हणून काम करत होती पण, तिच्या कामातला काटेकोर पणा, नवीन नवीन पद्धती यामुळे कंपनी ला फायदा होऊ लागला आणि तिची निवड तीन वर्षाआधी CEO पदी झाली! तिला पदोन्नोती मिळाल्यावर सुद्धा फार कमी वेळात तिने कंपनीचा विस्तार जगभर पसरवला.... आता फक्त भारतातील च नव्हे तर बाहेरच्या देशातले सुद्धा कॉन्ट्रॅक्ट यांना मिळायला लागले होते...... सलग दोन वर्ष बेस्ट advertising कंपनी ऑफ द इयर म्हणून त्यांच्या कंपनीला गौरवण्यात आलं होतं.... पण, मागच्या सहा महिन्यांचा कालावधी कंपनी साठी फार वाईट ठरला होता आणि म्हणूनच आज BOD ची मीटिंग बोलावली होती..... 
           सगळ्या डायरेक्टर्सच (अविनाश, सुशिला आणि प्रमोद) आगमन झालं! कॉन्फरन्स हॉल मध्ये मीटिंग ला सुरुवात झाली... सगळ्यात सिनिअर डायरेक्टर अविनाश ने बोलायला सुरुवात केली; "वीणा मॅडम आपल्या कंपनीचा हा चढता आलेख अचानक का घसरायला लागला आहे? मागच्या काही कालावधीत तुम्ही ज्या मीटिंग्स केल्या, प्रेझेन्टेशन्स केले त्याने आपले क्लायंट्स खुश नाहीयेत.... त्यांना काहीतरी मिसिंग वाटतंय.... काही नवीन कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आपल्या हातून निसटले आहेत.... असं का झालंय मॅडम?" विणाला काहीही सुचत नसतं..... पण, काहीतरी उत्तर द्यावं लागलेच म्हणून ती बदलेले मार्केट ट्रेंड, कॉम्पिटिशन अशी काहीबाही कारणं देते.... तिचं हे वागणं सुशिला ला खटकतं! सुशिला म्हणते; "नाही वीणा मॅडम! काहीतरी नक्कीच आहे... तुम्ही अश्या कारणं देऊन चुकांवर पांघरूण घालणाऱ्यातल्या नाही... काही प्रॉब्लेम असेल, काही मदत हवी असेल तर तुम्ही बोलू शकता..." विणा काहीही बोलत नाही.... प्रमोद म्हणतो; "मला असं वाटतंय आपण काऊन्सिलर ना बोलूया... त्यांच्या ऍक्टिव्हिटीईज आणि काऊन्सिलिंग मुळे सगळ्यांना फायदा होईल शिवाय एक रेफ्रेशमेंट मिळाल्यामुळे नवीन उत्साहात कंपनी सुद्धा उभारी घेईल...." सगळ्यांना प्रमोद च म्हणणं पटतं आणि दोन च दिवसात एक काऊन्सिलिंग सेशन घेण्याचं ठरतं! 
           झालं! ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी एक काऊन्सिलर टीम ऑफिस मध्ये दाखल होते.... सगळ्या स्टाफ ला एकत्र करून त्यांच्या सोबत बरेच माईंड गेम खेळले जातात.... काही स्पर्धा घेतल्या जातात आणि आता वेळ असते प्रत्येकाशी वैयक्तिक रित्या बोलण्याची! प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी बसवून टीम प्रत्येकाशी बोलायला सुरुवात करते..... काऊन्सिलर हेड; सानवी, विणाला घेऊन तिच्या केबिन मध्ये जाते..... केबिन मध्ये आल्यावर ती तिच्या पद्धतीने काही प्रश्न विचारते, गेम्स खेळते पण, विणाचा म्हणावा तसा प्रतिसाद येत नाही..
सानवी:- मॅडम! आम्ही इथे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलो आहोत तुम्ही अगदी मनमोकळे पणाने बोला... 
वीणा (उसनं हास्य आणत):- मला काहीही प्रॉब्लेम नाहीये.... मी एकदम मस्त आहे... कशाचीच कमी नाही, मी खूप सुखात आहे..
सानवी:- हो का! म्हणूनच तुमचे डोळे एवढे खोलवर गेलेत का? म्हणूनच मगापासून तुम्ही मनाने कुठेतरी दुसरीकडे आहात का? म्हणूनच तुम्हाला अगदी साधे साधे गेम खेळायला सुद्धा अवघड जातंय का? म्हणूनच तुम्ही फक्त हे उसनं हसू आणून खुश असल्यासारखं दाखवता का? 
        सानवी च बोलणं ऐकून खूप काळापासून दाबून ठेवलेलं दुःख आता तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या रुपात बाहेर पडू लागतं! सानवी सुद्धा काही न बोलता विणाला मनमोकळे पणाने रडून देते.... थोड्यावेळात ती सावरल्यावर सानवी तिला पाण्याचा ग्लास देते आणि ती स्वतःहून बोलायची वाट पाहते.... पाणी पिल्यावर शांत झालेली वीणा आता बोलू लागते; "सॉरी! एकदम कधी अश्रूंचा बांध फुटला कळलं नाही!"
सानवी:- अहो मॅडम त्यात सॉरी काही नाही.... आज बघा तुम्हाला एकदम हलकं हलकं वाटेल... 
वीणा:- हम्म! काय सांगू तुम्हाला! मी एका अनाथ आश्रमात वाढले..... कॉलेज ला गेल्यावर मी हेमंत नावाच्या मुलाच्या प्रेमात पडले.... वयाच्या २५ व्या वर्षी आम्ही लग्न सुद्धा केलं! तो सुद्धा अनाथ च होता! त्याच्या मामाने त्याचा सांभाळ केला होता.... आणि कळत्या वयाचा झाल्यावर आता तू तुझं बघून घे म्हणून त्याला बाहेर काढलं होतं! बरीच समानता होती आमच्या आयुष्यात! फरक एवढाच होता मी अनाथ आश्रमात वाढले आणि हेमंत मामाकडे असून सुद्धा त्याला प्रेम मिळालं नव्हतं! आमचा संसार छान सुरु होता..... पण, लग्नाला बरीच वर्ष होऊन सुद्धा मला मुलबाळ नाही झालं! तेव्हा हेमंत चा खरा चेहरा माझ्या समोर आला.... तो मला खूप मारझोड करायला लागला, रोज दारू पिऊन यायला लागला आणि या सगळ्याला वैतागून मी वाट दिसेल तिथे निघून जायचं ठरवलं.... मला ना माहेर ना कोणी आपली माणसं! मग आले तडक मुंबई ला निघून..... इथे येऊन या कंपनीत नोकरी मिळाली.... पोटापुरत मिळत होतं! हळूहळू प्रमोशन मिळत गेलं, स्वतःच घर घेतलं, माझ्या सारख्या अनेक मुलांना काही कमी पडू नये म्हणून डोनेशन करून झालं..... आणि आता असं वाटतंय बास झालं हे आयुष्य! नको जगायला.... 
            एवढं बोलून वीणा पुन्हा रडायला लागली..... पुन्हा स्वतःला सावरत पुढे बोलू लागली; "रोज रोज ऑफिस ला यायचं तेच काम करायचं आणि घरी जायचं! सगळं आयुष्य एखाद्या मशीन प्रमाणे झाल्यासारखं वाटतंय.... मी एवढ्या मोठ्या पोस्ट वर कामाला शिवाय नवरा नाही म्हणून जास्त कोणी मैत्री करायला सुद्धा बघत नाही... आजही त्या समाजाच्या नजरा माझ्याकडे असं बघतात कि, कधीतरी मलाच अपराधी वाटतं! जे काही नशिबाने कोणी दोन तीन मित्र मैत्रिणी आहेत त्यांना कायम मी आनंदात आहे असंच वाटतं! काही बोलायला गेलं की कोणी ऐकून सुद्धा घेत नाही.... मग आता तुम्हीच सांगा ना काय उपयोग अश्या आयुष्याचा ज्यात सगळ्या सोयी आहेत पण प्रेम, आपुलकी, जिव्हाळा नाहीये... कोणी आपलं म्हणणं ऐकणारं सुद्धा नाहीये... मनातून पार एकटं वाटतं हो...."
           सगळं ऐकून घेऊन सानवी थोडा विचार करते आणि म्हणते; "मला सांगा तुमचे छंद काय आहेत?"
वीणा (गोंधळून):- काय?
सानवी:- अहो मी विचारलं तुमचे छंद काय आहेत? 
वीणा स्वतःच्याच विचारात गढून जाते.... तिला कॉलेज मधले दिवस आठवतात.... तिला फुटबॉल खेळायला फार आवडायचं पण, हेमंत शी लग्न झालं आणि फुटबॉल कधीचाच मागे पडला.... 
वीणा:- कॉलेज मध्ये असताना मला फुटबॉल खेळायला आवडायचा.... मी नॅशनल लेव्हल पर्यंत खेळून आले आहे.... 
सानवी:- आवडायचा म्हणजे? आता जर तुम्हाला कोणी खेळायला सांगितलं तर आवडणार नाही का?
वीणा:- या वयात? 
सानवी:- छंद जोपासायला वय लागत नाही.... जे आपल्या मनाला वाटतं ना ते बिनधास्त पणे करायचं! तुम्ही पुन्हा फुटबॉल खेळायला सुरुवात करा बघा तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल....
वीणा:- तुम्ही म्हणताय ते फक्त ऐकायला बरं वाटतंय हो! पण, लोक काय म्हणतील या बाई ला आता म्हातारचळ लागलाय म्हणून.... 
सानवी:- इथेच तर अडत आपलं! लोकांचा विचार करून आज पर्यंत जगलात ना? आता या पुढे स्वतःच्या आनंदासाठी जगायचं..... लोकं दोन्ही बाजूंनी बोलतात.... तुम्हाला तुमच्या मनातल्या लहान मुलाला पुन्हा जागवण्याची गरज आहे.... लहान मुल कधी विचार करतात का? मी हे असं केलं तर काय होईल म्हणून? नाही ना.... अगदी तसंच आपल्याला जगता आलं पाहिजे..... 
             सानवी च बोलणं ऐकून वीणा पुरती गोंधळली...... 
वीणा:- म्हणजे? 
सानवी:- अहो! म्हणजे लहान मूल जसं अगदी निरागस पणे जे मनाला येईल ते सगळं करतं अगदी तसंच तुम्हाला जे वाटेल ते करायचं! फक्त आणि फक्त स्वार्थी भावना ठेवायची..... आपली आवड निवड, आपली काळजी आपणच घ्यायची यात लोकांचा विचार चुकूनही करायचा नाही.... प्रेम आणि आपुलकीचं म्हणाल तर तुमच्या सारखी अशी खूप लोकं आहेत ज्यांना अश्याच आधाराची गरज आहे, ज्यांना कोणीतरी समजून घ्यायची गरज आहे त्यांना भेटा... तुम्ही मगाशी म्हणालात तुम्ही अनाथ आश्रमात देणगी देता पण, कधीतरी त्यांच्या सोबत वेळ घालावा, वृध्दाश्रमातल्या आजी आजोबांशी जाऊन बोला.... हि सुद्धा पोकळी भरून निघेल.... आणि तुम्हाला ऑफिस च्या त्याच त्याच कामांचा कंटाळा आला आहे ना? यावर पण उपाय आहे...
वीणा:- काय? 
सानवी:- तुमच्या कामातला एक शून्य शोधा.... म्हणजे कुठूनतरी नवीन सुरुवात करा.... आता तुम्ही टॉप पोस्ट ला आलात तेव्हा तुम्हाला असं वाटायला लागलं की, आता बास सगळं मिळालं आयुष्यात! पण, आता नवीन काहीतरी लाईफ गोल सेट करा आणि त्यावर काम करा.... जे समाजासाठी सुद्धा फायदेशीर ठरेल.... नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा; कोणताही गोल अचिव करून झाला की पुन्हा नव्याने नव्या एखाद्या गोल पासून सुरु करा आणि तो मिळवा! कधीच आयुष्यात निराशा येणार नाही.... तुमचा बॅक रेकॉर्ड मी पाहिला आहे.... तुमच्यात तेवढी क्रिएटिव्हिटी आहे.... आत्ता तुम्ही जे काही सांगितलंत त्यावरून तुम्ही खूप कणखर आहात ते सुद्धा समजतंय... आता फक्त या छोट्या गोष्टीसाठी धीर सोडू नका.....
              सानवी च बोलणं ऐकून विणाच्या चेहऱ्यावर एक आशा दिसत होती..... तिच्या बोलण्याचा नेमका अर्थ कुठे आहे हे सुद्धा तिला समजतं.... आज सानवी मुळे ती खूप मोठ्या निराशेच्या समुद्रात बुडण्याआधी वाचलेली असते! काऊन्सिलिंग झाल्यावर खूप हलकं हलकं तिला वाटत असतं! इतके वर्ष कोणीही मन मोकळे करायला नाही, आपुलकीने विचारपूस करणारं नाही त्यामुळे अगदी लहान लहान गोष्टींनी मानत खूप मोठं वादळ निर्माण केलं होतं...... ते आता एका क्षणांत शांत झाल्यासारखं वाटत होतं..... एकदम निस्तेज झालेले डोळे आता काहीतरी नवीन पाहत होते.... 
दुसऱ्या दिवशी जेव्हा वीणा कामाला आली ती नवीन उत्साहातच! आता आपल्यामुळे झालेलं कंपनीच नुकसान कसं भरून निघेल हा विचार करूनच ती तिथे आली.... BOD सुद्धा काऊन्सिलिंग चा काय परिणाम झालाय हे पाहायला आलेच होते.... स्वतः विणाने त्यांचं स्वागत केलं..... आणि रातभर जागून जे प्रेझेन्टेशन केलं होतं ते सादर करायला सुरुवात केली....
वीणा:- सर, मॅडम .... माझ्यामुळे गेल्या सहा महिन्यात जे नुकसान झालं ते भरून निघेल अशी कल्पना आहे ही... एकदा पाहून घ्या.....
असं म्हणून सगळं एक्सप्लेन करायला सुरुवात करते....
             काही मार्केटिंग कॉलेज सोबत टाय अप करून अगदी माफक दरात मार्केटिंगच प्रॅक्टिकल शिक्षण विद्यार्थ्यांना कसं देता येईल, त्यांनाच Freelancing च्या माध्यमातून काम देऊन कशी कंपनीच्या इतर कॉस्ट मध्ये बचत होईल याचा सगळा व्यवस्थित आराखडा तिने आखलेला असतो! सगळ्यांना ते फार आवडतं आणि त्यावर अंमलबजावणी सुरू होते...... काही महिन्यातच पुन्हा कंपनीच्या आलेखात चढ होताना दिसते.... 
विणाच्या आयुष्यात सुद्धा आता पूर्णपणे सकारात्मकता आलेली असते! शनिवार आणि रविवार या दोन दिवशी आता ती अनाथ आश्रमात जाऊन सगळ्या मुलांबरोबर फुटबॉल खेळायला सुद्धा जायला लागलेली असते! वृद्धाश्रमात जाऊन सगळ्या आजी आजोबांशी गप्पा मारणं, त्यांच्या कडून गोष्टी रेकॉर्ड करून त्या लहान लहान मुलांना ऐकवण हे तिच्या अंग वळणी पडलं होतं! कधी मागच्या आठवणींनी डोकं वर काढलंच तर एका डायरीत ती सगळं लिहून ठेवत असत... कधीही पुन्हा न वाचण्यासाठी.... सानवी च्या म्हणण्या प्रमाणे आता प्रत्येक कामात ती नवीन काहीतरी शोधून पुन्हा शुन्यापासून सुरुवात सुद्धा करायला लागली होती..... आत्ता कुठे ती खऱ्या अर्थाने आयुष्यात आनंदी झाली होती..... जेव्हा फक्त आणि फक्त स्वतःच्या आनंदाचा विचार करून लोक काय बोलतील हे सोडून दिलं होतं! नैराशेच्या पूर्णपणे अधीन होण्याआधीच आज विणाने एक यशस्वी मात केलेली होती... 
******************************
           या धावपळीत आपण कधीतरी आयुष्य जगायलाच विसरतो! कधीतरी काहीतरी मनाला खटकतं पण ऐकून घेणारं कोणी नसतं तेव्हा आरश्या समोर बसा आणि स्वतःशीच बोला.... कधीतरी स्वतःशीच बोलून त्यावर सर्वोत्तम तोडगा मिळतो! अगदीच नाही तर भावना कागदावर मांडायला शिका..... तुम्ही कोणत्या लोकांसोबत राहता, सोशल मीडियावर कोणते अकाउंट follow करता, काय वाचता यावर सुद्धा मानसिक आरोग्य अवलंबून असतं! जेवढं पॉसिटीव्ह राहाल, जेवढं पॉसिटीव्ह वाचन कराल तेवढंच तुम्हाला सकारात्मक वाटेल.... तेवढंच तुम्ही कोणत्याही समस्येवर शांत राहून तोडगा काढाल.... जेवढा परिस्तिथीचा लवकर स्वीकार कराल तेवढ्या लवकर काहीतरी मार्ग मिळेल..... 
            आता सगळं काही आपल्या हातात आहे.... काय वाचायचं, काय पहायचं, किती वेळ कशाला द्यायचा... सगळं सगळं! नेहमी हसत रहा, पॉसिटीव्ह रहा आणि मन मोकळे पणाने बोलत चला.... आपल्या जवळच्या लोकांचं सुद्धा ऐकून घेत जा..... कधीतरी खूप हसणारी लोकं च डिप्रेशन मध्ये असतात..... नेहमी हसणारा चेहरा आनंदी असेलच असं नाही!
*****************************
कथा कशी वाटली आणि यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे नक्की कमेंट करून सांगा.... आणि खूप खूप शेअर करा.... कदाचित तुमचा एक शेअर कोणाची तरी न कळत मदत करेल.... कोणाच्या तरी आयुष्यात नवीन उमेद जागी करेल....