प्रेमळ वादविवाद - प्रत्येक घरातली गोष्ट...

Butter Milk


डाग कसला पडलाय एवढ्या महागड्या शर्ट  ला, .

यश ने दचकून इकडं-तिकडं पाहिलं. कुणीच दिसलं नाही. तेव्हढ्यात,

"अहो, मी विचारतीये, मी. जरा माझ्याकडे पहा."अस ममता म्हणाली 

"काय हा असा डाग पाडून घेतलाय? परवाच ड्राय-क्लीन करून आणला होता.  माझ्या आई ने दिलाय तो पाडव्याला ला, त्याची तरी आठवण ठेवा"

"अगं ममता  आज कामावर एकाचा वाढ-दिवस होता, त्यांनी सर्वांना जेवणाची पार्टी दिली तेव्हा चुकून खाताना सांडून डाग पडला अग.... मी काय मुद्दाम खराब करतो का कपडे?" आधीच यश ला फार थकायला झालं होतं आणि हि ममता काही खायला-प्यायला विचारायचं सोडून  शर्ट च धरून बसलीये.

"बरं, काय खायला काय आहे? सॉलिड भूक लागलीये मला.", यश  ने विषय बदलायचा प्रयत्न केला.

"मुगाची खिचडी आणि आणि कोशिंबीर ", ममता ने ही मग फार ताणल नाही.

"ओह, शिट. पुन्हा तेच? काहीतरी चमचमीत देत जा ना गं कधीतरी.  अशा पदार्थांचा कंटाळा आलाय मला यश  कडाडला, आजूबाजूला बघ जरा लोक कशी रोज  मस्त मटण - मासे खातात..

"त्यावर ममता च उत्तर - ते तसें खातात ना म्हूणन च फुगलेत, आपण बघा कसे स्लिम, ट्रिम..

"अतिशयोक्ती करू नकोस, त्यांची अंगकाठीच तशी आहे. त्यांनी तूप - भात खाल्ला तरी ते तसेच दिसणार" यश  म्हणाला..

"पण यश तुमची तब्येत तशी नाही ना. मागच्या 8 महिन्यात  2 वेळा डायबेटिस मूळे हॉस्पिटल ला दाखल करावं लागलं तुम्हाला लक्षात आहे ना?"

"वाटलंच मला तू खायला मागितलं की माझं आजारपण काढणार ते, यश च उत्तर 

"काढू नको तर काय करू?  दवाखान्यात तुमच्या जवळ -रात्र जागायची मी, तुमची सेवा करायची मी आणि तुम्ही पथ्य पण पाळायची नाहीत....

"अरे देवा, किती बोलशील आणि जरा हळू. ऐकतिल ना शेजारी. 

"ऐकू दे. माझ्याच घरात मीच का घाबरायचं कुणाला?" ममता च उत्तर.

"" हिचं म्युटचं बटण कुठे आहे हे - ते काहीच केल्या सापडत नाहीय, यश पुटपुटला,

पण कसं कोण जाणे, ममता अचानक गप्प बसली. तिनं पुढे केलेला ताकाचा ग्लास घेत त्यानं म्हंटल अरे वा ताक !

"मस्त पुदिना् घातलेलं ताक ही गोष्ट त्याला मनापासून आवडणारी आणि पथ्यातही बसणार पेय..आणि मग यश  आणि ममता आपण  कशावरून बोलणं कुठे नेलं ह्यावर ताक पिता - पिता बोलत बसले, जणू काही झालेच नाही असे )

"घरोघरी नवरा - बायको मधले रोजचेच होणारे गोड संवाद आणि  त्यातून होणारे वाद - विवाद )....

नमस्कार... सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख  - रत्नागिरी )