Login

यंदा कर्तव्य आहे भाग 1

Story About Marriage Fixing
यंदा कर्तव्य आहे
भाग १
नुकताच आषाढ लागला होता. आषाढ सरी बरसत होत्या. आड गावातल्या एका बालवाडी शाळेत बाई मोठं मोठ्याने लहान मुलांना शिकवत होत्या .
"एक अधिक एक दोन " असे त्यांनी बोलल्यावर सगळी लहान मुलं त्यांच्या मागोमाग एका सुरात म्हणत होती. पण धुवांधार पाऊसामुळे लहान मुलांचा आवाज कमी आणि कौलांवर पडणाऱ्या पावसाचा आवाजच जास्त येत होता.
बरोबर बारा वाजता शाळा सुटली . सर्व मुलं घरी गेल्यावर हाताखाली काम करणाऱ्या मावशींनी सगळा पसारा आवारला . शाळा बंद करून शाळेची चावी बाईंच्या हातात दिली.
हाताखालच्या बाई उद्या भेटू बोलून निघून गेल्या.
शाळेच्या बाई म्हणजेच लता.. लताने छत्री उघडली आणि साडीच्या निऱ्या एका हातात पकडत बाजाराची वाट धरली . दुपारच्या जेवणासाठी भाजी पाला घेतला आणि घराची वाट धरली. हळू हळू चालत चालत एका हातात भाजीची पिशवी, पर्स आणि साडीच्या निऱ्या सांभाळत चालत घरी आली.
घरी लताचा नवरा म्हणजे सुभाष जो कि रिटायर्ड आहे. घरी बायकोची वाट बघत होता.

सुभाष "आलीस का ? भिजलिस कि काय ?काल पासून पाऊस धो धो पडतोय .पाणी भरण्याची शक्यता आहे. “
बोलता बोलता त्यांनी तिच्या हातातली भाजीची पिशवी घेतली आणि बाजूला ठेवली .
लता थोडस बसून कपडे बदलून फ्रेश होऊन मग लगेच जेवणाला लागली.
गरम गरम जेवण झाल्यावर
सुभाष "पुण्याच्या आत्याची तब्बेत बिघडली आहे. तिला पुण्यात ऍडमिट केलय. आपल्याला एकदा भेटायला जावे लागेल.
लता " मग परवा रविवार आहे . सकाळी सहाच्या लोकल ने जाऊ . १० पर्यंत पोहचून जाऊ . ४ ला रिटर्न निघालो तर ८ वाजे पर्यंत घरी पोहचू "
सुभाष " लगेच परवा ?पाऊस जरा जास्तच आहे . मला वाटते पावसाचा जोर जरा जास्तच वाटतोय "
लता "अहो , आता आपल्याला हा पाऊस नवीन आहे का ? दरवर्षी असाच कोसळत असतो . "
सुभाष " मुलांचं काय ? ते दोघे येतील ना रविवारी ?"
लता " नाही .. ह्या आठवड्यात दोघेही येणार नाहीयेत “
सुभाष आणि लता ला दोन मुलं . एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा नोकरी करत होता आणि मुलगी शिकायला हॉस्टेलला राहत होती . मोठ्या मुलाला मुलगी बघायला सुरुवात झाली होती . चालून आलेली स्थळं बघणे सुरु झाले होते.
सुभाष " मी काय म्हणतो ? ते पुण्याचा माझा मित्र मंगेश त्याच्या कडे पण जाऊन येऊ ?"
लता " आता त्यांच्याकडे कशाला ?
सुभाष " तुला तर माहितेय तो आपला जात भाई आहे . त्याच्या दोन मुलांची लग्न झाली आहेत आणि दोघांची होयची आहेत . मुलगा आणि मुलगी दोघेही उपवर आहेत. लगे हात आपण त्याच्या फॅमिलीला भेटून घेऊ. त्याची मुलं चांगली वाटली तर साटंलोटं करता येईल "
लता ला पण आपल्या दोन्ही मुलांच्या लग्नाची काळजी होतीच .. थोडासा विचार करून हो म्हणाली.
सुभाष " मग एक काम करतो मंगेश ला फोन करतो आणि कळवतो की रविवार दुपारी जेवायला येतो . आत्याला भेटून लगेच त्याच्याकडे जाऊ. त्याच्याकडे जेऊ आणि ४ च्या लोकल ने रिटर्न "
लता " चालेल "
चला .. उद्याचा ह्या दोघांचा प्लॅन ठरला होता . आणि त्यांनी त्यावर अंलबजावली करायला सुरुवात केली . मुलांना कळवून टाकले कि ह्या रविवारी ते दोघे घरी नाहीयेत आणि पुण्यात जाणार आहेत. तसेच मंगेश ला फोन झाला.
----------

🎭 Series Post

View all