
याला जीवन ऐसे नाव...भाग 1
प्रदीप आणि नेहा सुखी जोडपं...कोणत्याही गोष्टीची काही कमी नाही...व्यवसाय..रग्गड पैसा...सगळं पायाशी लोळत होत...मन तरीही आयुष्यात एक खंत होती....लग्नाला दहा वर्षे होऊनही नेहा आई होऊ शकली नव्हती...याचीच सल तिच्या मनात कायम होती, तिला छळत होती..लग्नानंतर एक दोन वर्षे छान गेली त्यांनतर मात्र हळूहळू कुजबुज व्हायला लागली.… घरातले बाहेरचे बोलायला लागले...
“आमचं नशीबच फुटकं, आमच्या नशिबात काही नातवाच सुख नाही आहे....आम्हाला असच मरावं लागेल...नातवंडाच तोंडही बघता येणार नाही..” सासूचे टोमणे रोज सुरूच असायचे...
दिवस भराभर सरकत होते, दोघांचेही प्रयत्न सुरू होते..... सगळ्या टेस्ट करून झाल्या..रिपोर्ट नॉर्मल यायची...पण नेहाला काही दिवस गेले नाहीत.
नेहाचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, सगळ्यांच्या टोचून टोचून बोलण्याने नेहा दुःखी राहू लागली, हळूहळू तिच्या तब्बेतीवर परिणाम होऊ लागला...आई होण्याची आशा तिनी सोडली, पण प्रदीपच्या मनात विश्वास होता यातूनही काहीतरी मार्ग नक्की निघेल, प्रदीपने नेहाला कधीच एकट सोडलं नाही..सतत तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला, आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिला....
एका वर्षानंतर कळलं की , नेहाच्या गर्भाशयात समस्या असल्यामुळे तिला गर्भधारणा होत नाही आहे, आता मात्र नेहा पुरती हरली..पण प्रदीपच्या प्रेमामुळे तीनी स्वतःला सावरलं, ते डॉक्टरांकडे गेले..त्यांच्याशी चर्चा केली त्यांनतर डॉक्टरांनी तिला सरोगसी प्रक्रियेबद्दल सांगितलं...
नेहाला आणि प्रदीपला पटलं पण आता मोठा प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे घरी कस सांगायचं त्यांना कस पटवून द्यायचं... तेही काम प्रदीपने केलं त्यानी खूप समंजस पणे आई बाबांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगितलं...आधी त्यांना ते पटलं नाही पण प्रदीपच्या खूप प्रयत्नानंतर ते या गोष्टीला तयार झाले...
नेहानी इंटरनेट वर सरोगसी बद्दल संपूर्ण माहिती वाचली, त्यातून तिला कळले की मेडिकओव्हर फर्टिलिटी मध्ये सरोगसी दिली जाते..
दुसऱ्या दिवशी दोघेही डॉक्टरांकडे गेले...डॉक्टरांशी बोलल्यानंतर दोघांनाही विश्वास वाटला की आता सगळं ठीक होईल, परिस्थिती बदलेल...
डॉक्टरांशी बोलणं झालं, घरचेही तयार झाले पण....
“पण” काही आपल्या आयुष्यातून जात नाही...
आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला...तो म्हणजे एक अशी बाई जी ह्यांच्या बाळाला आपल्या उदरात वाढवेल... नऊ महिने तिच्या पोटात वाढवेल... मग शोधाशोध सुरू झाली...
क्रमशः