
याला जीवन ऐसे नाव... भाग 3 अंतिम
“काय झालं नेहा...
“प्रदीप निर्मला नाही आहे.. ती गेली...ती आपल्या बाळाला घेऊन गेली...नेहा जोरजोरात रडायला लागली..
“नेहा शांत हो, आपण शोधू तिला, जास्त दूर गेली नसणार ती...
“प्रदीप मला माझं बाळ हवंय..मला माझं बाळ हवंय...
“तू थांब मी बाहेर पडतो,बघतो दिसते का...
प्रदीप तिला शोधायला निघाला...त्यानी खूप शोधलं पण निर्मला नाही भेटली..
दुसऱ्या दिवशी नेहमीकडे कमलाबाई कामावर आली तिच्या ध्यानीमनी काहीच नव्हतं..
नेहा आली,
“कमलाबाई, कुठे आहे तुमची बहीण...?.कुठे आहे निर्मला?..
“नेहाताई तुम्ही काय बोलता?...
“निर्मला कुठे आहे?...ती घरातून पळून गेली आहे आणि माझ्या बाळाला पण घेऊन गेली..
“नेहाताई मला तर यातलं काहीच माहीत नाही...
नेहा हताश होऊन खाली बसली आणि ढसाढसा रडू लागली..
“नेहाताई मला माफ करा हो...मला नाही वाटलं निर्मला अस काही करेन म्हणून मी विश्वासाने तिला इकडे घेऊन आली होती..मला माफ करा नेहा ताई....
पुढेही काही दिवस प्रदीपने निर्मलाचा शोध घेतला, पोलीसात तक्रारही नोंदवली पण काहीच उपयोग झाला नाही..
काही दिवस, काही महिने उलटले...नेहाच्या मानसिक आरोग्य ढासळत होते, प्रदीपला सगळं कळत होत, नेहासाठी काहीतरी करावं म्हणून सतत धडपडायचा...
एक दिवस प्रदीप नेहाला अनाथाश्रमात घेऊन गेला...तिथल्या छोटया छोट्या मुलांकडे बघून नेहाच्या चेहऱयावर हास्य उमलल.... पहिल्याच दिवशी प्रदीपला जाणवलं की नेहाला तिथे जाऊन खूप बरं वाटलं...तो अधेमधे तिला घेऊन जायला लागला...नेहामध्ये बराच बदल व्हायला लागला...ती आधी पेक्षा आनंदी राहायला लागली...
प्रदीप आता वेळात वेळ काढून रोज न्यायला लागला...
एक दिवस बोलता बोलता प्रदीप बोलला....
“नेहा ती छोटीशी परी किती क्युट आहे ना, तिच्याशी खेळावसच वाटत...मला तर ती खूप आवडते... तुला कशी वाटते...
“मला पण खूप आवडते...
“नेहा माझ्या मनात एक गोष्ट आहे बोलू का?..
“विचारायचंय काय त्यात..बोल..
“आपण त्या क्युट परीला आपल्या घरी आणायचं..आपल्याकडेच ठेवूया तिला..??.
“प्रदीप माझ्या मनातल बोललास, पण आई बाबा?...
“आता आपण फक्त आपला विचार करायचा?...हम्म..आपण उद्याच आश्रमात बोलून बघूया…
“ठीक आहे...
नेहा आणि प्रदीप ने सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून त्या गोंडस परीला घरी आणलं...
प्रदीपचे आई वडील दुखावले..प्रदीप आणि नेहा वेगळे राहायला गेले ..
तिघेही खूप आनंदात राहू लागले
दोघेही परीचे खूप लाड करायचे, खूप प्रेम करायचे...नेहा तर खूप खुश होती....
परीच्या रुपात त्या दोघांना मुलगी मिळाली आणि परीला आई बाबा...
आता नेहाची फॅमिली पूर्ण झाली..आणि नेहाच मातृत्व पूर्णत्वास आलं..
“दुःख विसरुनी समोर जावे
लपवुनी चेहऱ्यावरचे भाव
समोरच्याला आनंद द्यावे
ह्याला जीवन ऐसे नाव”
समाप्त:
आपल्या समाजात अश्याच कित्येक नेहा आणि कित्येक प्रदीप असतील जे बाळासाठी तडफडत असतील...त्या दोघांचा निर्णय अगदी योग्य होता..
कधी कधी रडत बसण्यापेक्षा आणि आपलं आपलं करत बसण्यापेक्षा परक्यांना आपलं मानलं की त्यातूनही आनंद मिळतो..... आपल्यामुळे कुणाला तरी आनंद मिळतोय ही गोष्ट सुखावून जाते... दुसऱ्यांसाठी जगण्यातही आनंद मिळतो...आनंद देणे आणि आनंद मिळवणे ह्यालाच जीवन ऐसे नाव...
धन्यवाद