
याला जीवन ऐसे नाव... भाग 2
नेहाच्या घरी कामाला येण्याऱ्या कमलाबाईची गावची विधवा बहीण निर्मला हीच नाव कमलाबाईंनी सुचवलं, कमलाबाई घरच्यासारख्या असल्यामुळे त्यांना घरातल्या सगळ्या गोष्टी महिती असायच्या..
कमलाबाईंनी लगेच निर्मलाला फोन करून इकडे बोलावून घेतले, दुसऱ्या दिवशी सकाळीच निर्मला कमलाबाई सोबत नेहा कडे आली...नेहा आणि प्रदीपने तिला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं...आधी निर्मला नाही म्हणाली,पण कमलानी तिला समजावलं..
“हे बघ निर्मले, तसही तू गावी एकटीच असतेस, ना कोणी समोर ना मागे...लग्न झाल्यावर तुलाही कितीस सुख मिळालं बघ...
हिथ राहशील तर चांगलं राहायला मिळणार, खायला मिळणार आणि नेहाताई तुला महिन्याचे पैसेही देतील...
“पण ताये..
“आता पण नाही की बिन नाही, फटकन हो म्हणून टाक...
तिच्या हो म्हणायच्या आधीच कमला त्या दोघांकडे जाऊन...
“नेहा ताई निर्मली तयार आहे, माझी बहिण थोडी अल्लड आहे पण तुम्ही तिला समजून घ्या...काही चुकलं माकल तर मोठ्या मनाने माफ करा..
तिघेही दवाखान्यात गेले, डॉक्टरांशी सविस्तर चर्चा झाली आणि सरोगसीचा निर्णय ठरला, तारीख ठरवून समोरची संपूर्ण प्रक्रिया करायचं ठरलं...
ठरल्याप्रमाणे निर्मला च्या गर्भाशयाची क्रिया झाली...
समोरचे तीन महिने नेहा आणि प्रदीप नी निर्मलाची खूप काळजी घेतली, सकाळपासून रात्रीपर्यंत तिच्या मागे मागे तिला काय हवंय नको ते बघितलं...
हळूहळू दिवस सरकत होते, बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले..
डिलिव्हरी ची वेळ आली, निर्मलाच सिझेरियन झालं...आणि तिनी एका गोंडस बाळाला जन्म दिला...
ते गोंडस आणि निरागस बाळ बघून निर्मलाच्या आनंदाला उधाण आले...तिला आनंदाश्रू अनावर झाले..
पहिल्या दिवशी सगळ्यांनी दवाखाण्यात जाऊन बाळाला गोंजारल...
निर्मलाच्याही डोक्यावरून हात फिरवला... नऊ महिने ती जे आयुष्य जगली ते दिवस न विसारण्यासारखे होते...निर्मलाच्या आयुष्यात पहिल्यांदा...ती अस जीवन जगली..
नर्मदाच मन बदललं,ती मनातल्या मनात विचार करू लागली,
“आता यांना आपण आपलं बाळ सोपवलं तर हे लोक मला इथे राहण्याची परवानगी नाही देणार..मला हे घर सोडून जावं लागेल..मला माझ्या बाळापासून दूर राहावे लागेल..नाही..नाही...मी माझ्या बाळाशिवाय कशी काय राहू शकेल... मी जाते इथून, खूप दूर निघून जाते....
रात्री सगळे झोपले असताना निर्मला बाळाला घेऊन घरून निघाली, अर्ध्या रात्री नेहाला जाग आली, ती निर्मलाच्या खोलीत गेली, तिला तिथे न बघून नेहा जोरात किंचाळली,
प्रदीप...प्रदीप...लवकर ये...
प्रदीप उठून आला
क्रमशः