Jan 28, 2022
मनोरंजन

यारी थोडी फुडी थोडी मुडी

Read Later
यारी थोडी फुडी थोडी मुडी


ऐ दोस्ती हम नही तोडेंगे ?
तोडेंगे दम मगर
तेरा साथ ना छोडेंगे ??
      हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर उभं राहतं चित्र ते मित्र मैत्रिणी, कॉलेज डेजच... शाळेच्या शिस्तबद्ध वातावरणापेक्षा कुठल्याच बंधनाच्या भिंती नसलेलं... मस्ती मज्जा आणि निखळ आनंद असणारं एक वेगळं जग..  या जगात पाय टाकल्या नंतरचा प्रत्येक दिवस हा आठवणी बनवण्याचा...
      अकरावी-बारावी मधले कॉलेजचे दिवस वेगळे आणि सिनिअर कॉलेज मधले दिवस वेगळे. अकरावी बारावी मध्ये बाळसं धरत असलेलं पाखरू कॉलेजच्या या दिवसात मनसोक्त उडायला लागत. या सुरवातीच्या दिवसांत जणू काही आपल्यावर संस्कार होत असतात..
       कॉलेजमध्ये सिनिअर कॉलेज ला असताना गेटमधून आत गेल्यावर ती दोन मुलं आहेत त्यांना एकदा मारायला पाहिजे किंवा त्यांना ओरडायला पाहिजे अशी माझी आणि माझ्या मैत्रिणीमध्ये चर्चा व्हायची. आणि त्यांना मारण्यापेक्षा आमच्या Student IQAC ने आम्हाला मैत्रीच्या धाग्यात जोडलं. आणि मग चालू झाली आमची मैत्रीची फुडी यारी...
      कॉलेजचे लेक्चर्स अटेंड करून मधल्या सुट्टीत किंवा कॉलेज झाल्यावर सगळे मिळून कॅन्टीनमध्ये दंगा करायला कधी मिळतो याचीच वाट बघायचो..
      तुम्ही म्हणाल गॅंग म्हणजे कोण कोण आणि किती जण होती ? आणि कॉलेज च नाव कुठलं...?? कशी होती यांची मज्जा...???

कळेल पुढच्या भागात....


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Vrushali Walake

Tutor

I am vrushali and I like to read and write the blogs