तुझं माझं करत असेल तर तू ह्या घरात राहू नकोस
कधी ही न बोलणारी सासूबाई आज फटकन बोलून गेली
सून नवीन लग्न होऊन आली आणि काही दिवसात घरात तुझं माझं करायला सुरू झाली..
सासुबाईने सुनेची काचेची महागडी भांडी काही खास पाहुणे आले म्हणून काय काढले ते ही सुनेला न विचारता तर त्यावरून सुनेला त्यांचा राग आला
माझ्या बाबांनी हे दिले आहे हे माझे आहे ,हे कोणी ही वापरायचे नाही त्यावर फक्त माझा हक्क आहे..आणि ते मला।विचारल्याशिवाय कोणाला ही वापरण्याची परवानगी नाही...सुधा आपल्या नवऱ्याला त्यांच्या बेड रूम मध्ये जाऊन दटावत सांगत होती
असे हे पहिल्यांदा होत नव्हते ,याआधी ही झाले होते.. सगळ्यांना आता सुनेच्या अश्या वागण्याचा राग येत होता, तरी ते तिला सांभाळून घेतच होते..आज ना उद्या तिला हे घर आपले वाटेल आणि ती असे चुकीचे सोडून देईल,पण तिला सांभाळून घेणारे होते ,तिची चूक सावरणारे होते ,तिचे वागणे चुकीचे आहे हे ठीक नाही हे सांगायची कोणी हिम्मत केली नाही..म्हणून तिला तिच्या वागण्यात चुकीचे काही वाटत नव्हते.. आणि तिचे वागणे रोजच वाढत जात होते.
एकदा तर नवऱ्याने घरच्यांचे काही चादरी बेडशीट तिच्या माहेरवरून आणलेल्या वॉशिंग मशीन ला लावले आणि लोड आल्यामुळे ते बंद पडले..मग काय तिने घरच डोक्यावर घेतले..म्हणाली मी वारंवार बजावून ही तुम्ही माझे वॉशिंग मशीन का आणि कोणाला विचारून वापरले..ती सासूबाईला ओरडून बोलू लागली..
मग आता हीच वेळ होती सुनेला अद्दल घडवायची ,सासुबाईने पदर खोचला आणि आता मात्र ती सुनेचे नेहमीच झाले आहे आता काही ऐकून घ्यायाचे नाही.
सासूबाई लगेच म्हणाल्या, एक तर हे कपडे ,बेडशीट आमचे नाहीत ,एक तर मी तुझ्या वस्तुंना हात लावला नाही, पण आता तुला तुझ्या वस्तू आणि तुझी सोय दुसरी कडे कर म्हणायची वेळ आली आहे..
सासूबाई लगेच म्हणाल्या, एक तर हे कपडे ,बेडशीट आमचे नाहीत ,एक तर मी तुझ्या वस्तुंना हात लावला नाही, पण आता तुला तुझ्या वस्तू आणि तुझी सोय दुसरी कडे कर म्हणायची वेळ आली आहे..
सुनबाई लगेच म्हणाली, म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला ,मी आणि माझ्या वस्तू कुठे जायचे..हे घर काय माझें नाही आणि मी इथून निघून जायचे हे असे का ?
सासूबाई म्हणाल्या ,तुला जर माझे तुझे करायचे असेल तर तू सरळ माझ्या घरातून बाहेर पडायचे. हे माझे घर आहे तू इथे राहू शकत नाही..आणि सोबत तुझ्या नवऱ्याला ही घेऊन जा... माझ्या घरात माझे तुझे करणाऱ्याला जागा नाही..
सुनेला आता कळले मी तर वस्तू माझ्या तुझ्या करत होते हे घर तर त्या नियमानुसार आईचे आहे आणि त्यांना माझे तुझे करण्याचा हक्क आहे..त्या म्हनतात तसे मला ह्या माहेरच्या वस्तू घेऊन दुसरीकडे सोय करावी लागेल..
सून लगेच म्हणाली, हो मी जाईल ह्या तुमच्या घरातून निघून पण जोपर्यंत दुसरी सोय होत नाही तोपर्यंत मला इथेच राहू द्या आई
सासू लगेच म्हणाली ,तोपर्यंत तुझ्या सगळ्या वस्तू तू बाहेर जिन्यात ठेव आणि इथे आहेस तोपर्यंत माझे घर म्हणून रहा. .मग तुझ्या घरी हवे ते नियम पाळ पण माझ्या घरात तुझे माझे करून रहायचे नाही..
सासूचा असा कडक स्वभाव तिने आज पहिल्यांदाच पाहिला होता, तिला आता घर आणि घरातील नियम मानून रहाणे भाग होते.. नवरा ही तिच्या ह्या वागण्याला कंटाळला होता..
काही दिवस गेले तरी तिला घर सापडले नव्हते कारण त्याचे भाडे परवडत नव्हते..आणि काही लहान होते इतके की तिचे समान ही त्यात वसणार नव्हते..शेवटी असे करत करत वर्ष गेले पण तिला घर सापडले नव्हते.. आणि इकडे तिच्या सवयी हळूहळू बदलत चालल्या होत्या. आता माझे तुझे तोंडात येत नव्हते.. तसे तसे तिचे जिन्यात ठेवलेले समान घरात तिने आणले होते ,आणि सगळ्यांना तिच्या झालेल्या चुकीबद्दल माफ करावे आणि हे समान वापरावे असे म्हणत होती..पण तिला माफ करून ही कोणी समान वापरले नाही..जोपर्यंत आई म्हणत नाही तोपर्यंत कोणी ही तिच्या समानाला हात लावला नाही.
तिला आता सगळ्यांचे वागणे पटत नव्हते आणि त्यामुळे तिचे मन दुखावले गेले होते..तीने आता पुन्हा समान आईच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेतला...ज्यामुळे आपण आपल्या घरच्यांचे मन दुखावले ते प्रकरण आपल्या घरात नकोच ..
सासूबाई म्हणाला ,सुनबाई तू अगदी योग्य करत आहेस ,आम्हाला कधी ही तुझे समान नको होते ,आमचे त्याशिवाय ही भागत होतेच..आम्हाला तू हवी होती..पण तू येताच तुझे माझे करू लागली आणि तू स्वतः स्वतःला परके करून गेलीस.. मग ठरवले..तुझे माझे ला एकच उपाय तू तुझे मी माझे करायचे..तेव्हा कुठे जाऊन तुला चूक कळली..घर शोधत होतीस पण हेच आपले घर आहे हे तू विसरलीस..सामान काय ग माणसे महत्वाची.. सामानाचे नुकसान झाले ते दुरुस्त ही होईल ,ते ही आपण करू , पण मन बिघडली की दुरुस्त होत नसतात हे लक्षात ठेवायला शिक..
सुनेला तिच्या वागण्यातून शिक्षा मिळाली आणि शिक्षण ही मिळाले...सासू चांगली असेल तर दोन्ही देते आणि वाईट असेल तर फक्त शिक्षा देते....घर म्हणून जर घर सुनेला टिकवायचे नसेल तर सासूला ही गरज नसते असे नसते..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा