Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

या फुलाला सुगंध मातीचा भाग-11(अंतिम भाग)

Read Later
या फुलाला सुगंध मातीचा भाग-11(अंतिम भाग)

सौ.प्राजक्ता पाटील
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
विषय: कौटुंबिक
उपविषय: या फुलाला सुगंध मातीचा.
टीम सोलापूर..

भाग-11

रात्रभर दीप्तीला आणि तिच्या आईलाही डोळ्याला डोळा लागला नाही. कारण हे स्थळ जरी श्रीमंत असले आणि मुलगा शिकलेला असला तरी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. \"एवढ्याशा कारणावरून लग्न मोडणारी माणसं पुढे लग्न झाल्यावर तरी कशावरून दीप्तीला सुखी ठेवतील ?\" हाच विचार आईच्या मनात सतत घोळत होता. दीप्तीलाही कालचा प्रसंग फारच खटकला होता.
\"कसा का असेना पण सौरभ माफी मागायला गेला म्हटल्यावर त्यांनी त्याचं ऐकून घ्यायचं ना. पण तसं काहीच न करता उलट त्यालाच दारू प्यायला भाग पाडलं हे काय वागणं बरोबर आहे का त्यांचं ? मला तर हे बिलकुल आवडलं नाही पण आता आबांना काही म्हणायला गेलं तर त्यांना त्रास व्हायचा. त्यापेक्षा मी शांत राहते. बघू जे होईल ते होईल ते पुढे.\" हा मनात विचार करून दीप्ती शांत बसली.
सकाळ झाली. सरपंचांनी सगळी सोय आधीच केली होती. मंडप, आचारी सर्व काही तयार होते. दीप्तीनेही छान आवरले होते. थोड्याच वेळात पाहुणे येणार होते. सौरभही सामानाची ने-आण करत होता. पण दीप्तीकडे त्याचे बिल्कुल लक्ष नव्हते. दीप्तीची नजर मात्र सौरभवरुन हटत नव्हती.
\"किती गुणी आहेस तू? चूक झाली की लगेच मान्यही करतो. कधीच कोणाच्या बाबतीत वाईट विचार तुझ्या मनातही येत नाहीत.\" दीप्ती मनात विचार करत स्मितहास्य करत होती. आईला मात्र दीप्तीच्या मनात काहीतरी वेगळेच आहे असे वाटले. कारण दीप्ती सौरभकडे अगदी प्रेमाने पाहत होती.
\"राजबिंडा असणारा सौरभ खरोखरच किती समजूतदार आणि प्रेमळ आहे शिवाय दीप्तीच्या शब्दाखातर तो गेली कित्येक दिवस व्यसनापासून दूर राहिलाय आणि तो माझ्या दीप्तीचा बालपणीचा मित्रही आहे सौरभसोबत माझ्या दीप्तीची जोडी किती शोभून दिसेल पण सरपंच स्विकारतील का दीप्तीला त्यांच्या घरची सून म्हणून?\" हा विचार मनात आला आणि आईला वास्तवाचे भान झाले.
थोड्याच वेळात पाहुणे मंडळी आली. सतत सौरभला हे आण ते आण असे मुद्दाम दीप्तीचा होणारा नवरा सांगत होता. दीप्तीला कालचा प्रसंग ऐकल्यानंतर हे वागणे जरा विचित्र वाटत होते.
\"पण हे काय? ते सौरभला घेऊन कुठे निघालेत? कालसारखे सौरभला माझी शपथ घालून काही चुकीचे तर वागायला भाग पाडणार नाहीत ना? आता कुठे सौरभ सुधारतोय मी माझ्यामुळे पुन्हा त्याला त्याच मार्गावर जाऊ देणार नाही.\" हा विचार करून दीप्ती सौरभच्या दिशेने मागच्या दाराने निघून गेली.
सर्वजण दीप्तीला शोधत होते तितक्यात दीप्ती आणि सौरभ एकमेकांच्या गळ्यात हार घालून येताना सरपंचांना दिसले. त्यांना आनंद मानावा की दुःख हेच कळत नव्हते. आबाही घाबरून पहात होते. पण नेमके काय घडले ? हे कळायला मार्ग नव्हता. जवळ आल्यावर आबा दीप्तीला म्हणाले, "हे काय दीप्ती?"
दीप्ती काही बोलणार इतक्यात दीप्तीचा होणारा नवरा म्हणाला, "अहो आबा, मी काय सांगतोय ते आधी ऐकून घ्या. हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि अशी मुलगी मी बायको म्हणून स्विकारावी का ? शुद्ध फसवणूक करत होते हे दोघे माझी." तो हसून म्हणाला.
"नाही आबा." दीप्ती आबांसमोर हात जोडून उभी होती.
दीप्तीला जवळ घेत आबा म्हणाले," माझी मुलगी कशी आहे ? हे मला परक्याकडून ऐकण्याची काहीच गरज वाटत नाही."
" तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. दीप्ती आणि सौरभ दोघेही खूप स्वच्छ मनाचे आहेत. मी कानाने ऐकलेय ते खरे-खोटे केल्याशिवाय आणि माझ्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय मी कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवत नाही.आणि म्हणूनच मी जे पाहिलय ते खरंय अशी माझी खात्री झालीय.दीप्ती सौरभ मला माफ करा."
"म्हणजे ?" सौरभ म्हणाला.
"मगाशी मीच तुला दीप्ती बद्द्ल वाईट बोलून दीप्तीच्या गळ्यात हार घालायला भाग पाडलं आणि आता तुम्हा दोघांबद्दल चांगले कसे बोलतोय ? त्यामुळे हा प्रश्न तुम्हां दोघांना पडणे सहाजिक आहे. पण समाजात असे अनेक प्रेमी असतात माझ्यासारखे. जे आपले प्रेम व्यक्त करायला वेळ लावतात आणि मग पश्चातापाची वेळ येते.
"काय बोलताय तुम्ही हे सगळं?" सौरभ म्हणाला.
" हो.अगदी खरं आहे तेच बोलतोय. मी कॉलेजमधील एका मुलीवर नितांत प्रेम केलं पण ते सांगायला उशीर केला ही खंत मला सतत वाटते. म्हणूनच मी ही समाजाची पर्वा न करता तिच्याशी विवाह केला असता तर (डोळ्यातील अश्रू पुसत ) ज्याच्याशी दीप्तीचा विवाह होणार होता तो केदार विषय टाळत म्हणाला.
" पण मी सौरभवर प्रेम करते हे खोटं आहे मगाशी तुम्ही आपले लग्न मोडले असे म्हणालात म्हणून सौरभने आबांना धक्का बसू नये म्हणून हा हार माझ्या गळ्यात घातला. हो ना सौरभ?" दीप्ती म्हणाली.
"हो." सौरभ म्हणाला.
"नाही सौरभ तू दीप्तीवर जीवापाड प्रेम करतोस. अरे तिने सांगितल्यावर तू दारू सोडलीस इतकच नाही तर तू तिची शपथ घातल्यावर पुन्हा दारू पिलास आणि हे सगळं मी जाणूनबुजून करत होतो. हा साखरपुडा तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचा नसून सौरभ जास्त महत्त्वाचा होता म्हणून दीप्ती तू कोणाचाही कसलाही विचार न करता आमचा पाठलाग केलास. येतय ना तुमच्या लक्षात ? यू आर मेड फॉर इच ऑदर. नेहमी आनंदी रहा. मला जे मिळाले नाही ते तुम्हांला मिळाले आहे तुमचे पहिले प्रेम. अभिनंदन!आणि अजून उशीर करू नका नाहीतर माझ्यासारखी पश्चातापाची वेळ येईल. कोणाचीही पर्वा न करता व्यक्त व्हा. " केदार म्हणाला.
"हो, माझे खूप प्रेम आहे दीप्तीवर?" सौरभ म्हणाला.
"हो ना. मग तसं सांग तिला. तू पण मान्य करतोस ना, या फुलाला सुगंध मातीचा आहे ते." केदार हसून म्हणाला.
"हो.आय लव्ह यू दीप्ती. विल यू मॅरी मी?" सौरभ म्हणाला.
"यस, आय लव्ह यू सौरभ." म्हणून दीप्तीने तिचा हात सौरभच्या हातात दिला.
दीप्तीच्या आणि तिच्या आईआबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले.सरपंचांनाही खूप आनंद झाला.
"आज माझ्या या कोमेजलेल्या फुलाला दीप्तीचा सुगंध मिळाला." म्हणून त्यांनी आपल्या लेकाला आणि सुनेला मायेने जवळ घेतले.

सौ. प्राजक्ता पाटील

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//