राँग नंबर

जगण्यातली सहजता अजाणतेपणी कुणालाही आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवु शकते..होतं असं कधी कधी..
एक राँग नंबर त्याच्यासाठी असतो..
कदाचित बोलायच नसावं त्याला काहीच.. पण एक औपचारीकता म्हणून फोन ठेवत नाही तो..
तिच्या लक्षातच येत नाही की बोलण्याला कंटाळला असेल ही ..
तरीही कोणत्याही गोष्टींचं वावडं नसलेली ती बडबड बडबड
करत रहाते अखंड अविरत..
तीला थांबवायचा कोणताही प्रयत्न न करणारा तो..एखादा महत्वाचा फोन ही घेत नाही..
शेवटी निरोपाच्या वेळी सहज म्हणतो तुमच्या शी बोलुन बर वाटलं.. आपण एकमेकांना ओळखत असतो तर बर झालं असतं..
आणि तीच खळाळून हसणं..
नंबर सेव्ह झालेला असतो..
किती वर्षांनी हसलो आपण.. बिजनेस,मिटींग्स आणि जबाबदाऱ्या नको ईतका स्ट्रेस झेपेना झालाय.. पण जिद्द काहितरी मिळवायचंय..पण नेमकं काय अजून शोधतोच आहोत.. दोन तीन दा रींग वाजली.. घेतला ही फोन आवाज ओळखीचा वाटला नाही ..राँग नंबर आहे माहित होतं..काहीतरी चिडून बोलावं
मनांत होतं खरंतर पण लाघवीपणाची कमाल ईतका गोड आवाज.. मार्दव आवाजातलं ..नक्की आहे कोण बघायचं ठरवलं..
"साँरी हं ..तुमच्याकडेच लागतोय सारखा फोन.. हाच नंबर आहे नं..? "
" फक्त शेवटचा नंबर चुकताय.."
"अय्या ...हो की ..साँरी हं त्रास दिला तुम्हाला.. पुन्हा लागला तर घेऊ नका.."
" माणसंच आहोत .. चुकतो कधीतरी "
"हो माणसंच आहोत आपण ..निदान हे तरी कबुल आहे तुम्हाला म्हणायचं.."
"तीचं हसणं..पार खल्लास करणारं.."
" So funny..माणसंच आहोत.. मानलं तर.."
"काही काय.. मानायचं काय त्यात..? आपणच ठरवायचं.."
" काय ते..? " "काही नाही "
"तुम्ही चिडलाय का माझ्यावर सांगा लगेच मी ठेवते फोन. तुमचा आधीच वेळ घेतलाय खूप.."
" नाही बोला ..आहे वेळ थोडा.."
तूफान एस्प्रेस सारखी बडबड चाललीय ..मला कोणतेही संदर्भ माहित नाहीत पण फोन ठेवावासाच वाटत नाहीये.."
निरर्थक असलं तरी हवहवंस वाटतंय सगळंच हे..का ..?
शेवटी निरोप घेणं आलं जीवावर..
वेळ होतोय दूसरा call येतोय..
"नांव काय म्हणालांत..?"
" कुणाचं..? ओ sorry ..नेहा ..नेहा अद्वैत "
" छान आहे नांव.. बरं नंतर बोलु या का..माझा call येतोय दूसरा..
" केंव्हा फ्री असाल..? "
" कधीही ...माझी हरकत नाही काहीच.. वेळ देणं एखाद्याला आणि त्याचा होणं आवडतं मला.."
पुन्हा हसणं तसंच.. प्राजक्त मोहरावा तसा..
©लीना राजीव.