बोल अनुभवाचे ( भाग १ ) / Words On Experience ( Part 1 )

Words On Experience...


हे वाचल्या नंतर काहीतरी चुकीचं आहे अस वाटत कारण बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यात आलेल्या मोठ्या व्यक्तीकडून एक वाक्य ऐकायला मिळतं, "माझ्या अनुभवाचे बोल आहेत तुला मान्य करावं लागेल." मग का नाही आपण आधीच आपले अनुभव बोलून मार्ग काढत? हा एक मोठा प्रश्न माझ्या मनात घर करून होता. 
म्हणून ठरवलं की आपणच सुरुवात करावी त्यासाठी हा एक नवीन उपक्रम ब्लॉगिंग करायचा विचार केला.
त्याच वेगवेगळ्या अनुभवातून काय बरोबर आणि काय चुकीचं हे समजून घेण्यासाठी मी एक प्रयत्न करणार आहे.
एका सामान्य माणसाच्या आयुष्यात लहानपण मग शिक्षण घेत मोठे होणं नंतर लग्न नंतर मुले होतात आणि तोच वृध्द झाल्यावर मुलांचे लग्न करतो नात नातू यांच्याबरोबर लहानपणाच्या आनंदात रमून जातो. त्या माणसाला शेवटच्या दिवसात आयुष्यभर आलेले चांगले वाईट अनुभव आठवायला लागतात. ते अनुभव कधी आनंद देतात तर कधी खूप दुखः देतात. तेव्हा माणूस विचार करतो आपण जर हे केला असतं तर हे झाला असतं किंवा हे नसतं केला असतं तर जास्त बर झालं असतं आणि एक वेळ येते, तिचं व्यक्ती जग सोडून जाते त्याच्या प्रश्नाची उत्तर न शोधता.

अनुभव कुठले असं म्हटलं तर बरच काही सांगता येण्यासारखा आहे जसा की ....

लहानपण
शाळा
कॉलेज
नोकरी
लग्न
नोकरीसाठी बाहेर गावी राहणे
मुले
म्हातारपण
शेवचे राहिलेले आयुष्यातील दिवस

अश्यात आपल्याला खूप काही अनुभव येतात काही स्वतः अनुभवतो आणि काही अनुभव दुसऱ्याकडून ऐकायला मिळतात. असेच काही अनुभव जे माझ्या आई, वडील, आजी, आजोबा, मित्र, मैत्रीण, बायको, माझा मुलगा, शिक्षक, प्राध्यापक, कंपनी मधील वरिष्ठ आणि सहकारी वर्ग आणि ज्या ज्या भागात नोकरीच्या निमित्ताने जावे लागले त्या ठिकाणचे संपर्कात आलेल्या व्यक्तींकडून मिळाले आणि काही ऐकायला पण मिळाले.
म्हणूनच मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो तुम्ही माझा ब्लॉग फॉलो करा आणि माझ्या अनुभवांवर तुमचे विचार, भावना, सल्ला, तुम्हाला मिळालेल्या अनुभवातून तुम्ही घेतलेला निर्णय मला सांगा. तुमचे संदेश खूप मोलाचे ठरतील माझ्या पुढच्या वाटचाली साठी.??

तर चला या सर्व "बोलू अनुभवांवर काही..."

माझा पुढचा ब्लॉग पण तयार आहे. एक छान अनुभव जो मला माझ्या आई कडून ऐकायला मिळाला. ती गोष्ट ऐकल्यावर जुन्या काळातील समाज कसा होता आणि त्याच समाजात  आश्या काही व्यक्ती संपर्कात आल्या की त्यांनी त्या काळात एक उत्कृष्ट उदाहरण समोर ठेवलं. पण ते कधीच बोललं गेलं नाही आणि त्या काळाच्या आड हराऊन गेल्या.

 "एका आजीची गोष्ट" 

 स्वतंत्र पूर्व काळातील अती सामान्य आर्थिक परिस्तिथीतीत जगणाऱ्या मुलींनी आपलं आयुष्य कसं पुढे आणलं. तिला तिच्या आयुष्यात कोणी कशी मदत केली आणि तिला कसं समाजात उभा राहण्यासाठी काय काय सोसावं लागला, कुठे कुठे झगडावे लागलं ते तुमच्या समोर मांडणार आहे.