Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

स्त्री जन्म...

Read Later
स्त्री जन्म...

                     आणि ती हसली 


"राधा, उठ बरे. दूध आणतेस ना?" आई राधाला आवाज देत होती.

राधा, ऐक ना मला माझी बॅग नाही भेटत जरा इकडे येते का?" राधाचा नवरा पण सकाळपासून आवाज देत होता.

"राधा वहिनी, मला मस्त आज पराठे बनवून देणार?" मीरा. राधाची नणंद राधाला आजचा मेनू सांगत होती.
"राधा बेटा, एक कप चहा मिळेल का?" राधा चे सासरे सकाळी सकाळी चहा मागत होते.
"ए आई, ऐक ना मला आज शाळेत नाही जायचे खूप कंटाळा आला आहे. आज सुट्टी घेऊ ?" छोटा तन्मय सुट्टी साठी राधाला नादी लावत होता.
पण बराच वेळ झाला राधा काही रूम मधून बाहेर येईना.
म्हणून सर्व तिला पाहायला गेले.
पाहता तर काय, आज राधा पार अंथुरणाला खिळली होती, खूप अशक्त होती. अर्थात राधा आजारी होती.
जाऊदे बाळ तू कर आराम आज मी अवरून देते सगळ्यांचं. असं बोलून सासूबाई सर्वांना तिथून घेऊन निघून गेल्या.
थोडा वेळ आराम करावा म्हणून राधा उठली आणि बघते तर काय तिचा महिना पण आला होता. 
"शी! बाई आधीच अंगात जीव नाही आणि तुला पण आजच यायच होता ना! अवघड रे देवा; यापेक्षा तर पुरुषाचं जीवन चांगलं आहे. देवा! पुढचा जन्म पुरुषाचा दे हो!"
स्वतः सोबत पुटपुटच राधा वैतागून परत झोपली.
अंदाजे दोन तीन तासांनी ती उठली, आणि तिला का कुणास ठाऊक, खूप हलके हलके वाटत होते, डोके पण उतरले होते.
पण तिचा आवाज जड झाला होता आणि घाई घाई ती उभी राहिली.
"अरे देवा! बोलली म्हणून काय लगेच खरे करायचे का?"
असं जोरात ओरडत ती स्वतः ला आरशात निरखु लागली.
जणू देवाने लगेच तिचं ऐकलं होतं, कारण ती, ती नव्हती ती तो झाली होती. ती राधा नाही राधेय झाली होती.
पण एका अर्थे राधेय खूप आनंदी होता, की आता त्या असंख्य वेदना, ताण, राबणे त्याच्या नशिबी नाही.
फक्त ऑफिस करायचं, घरी येऊन आराम करायचा एवढं सुखी आयुष्य आहे आता.
नेहमप्रमाणेच ती स्वयंपाक घरात आली तर आई लगेच बोलल्या "अरे, तू काय करतोस इथे जा बघू आणते मी काहीतरी बनवून."

"अरे वाह! आता तर काम पण करावं नाही लागणार. आता फक्त आराम."
पुढे बाबांकडे गेली तर, "अरे, ते घराचं काय झालं. तू जाणार आहेस ना आज? आणि हे काय कामावर नाही जायचं का? आवर जा!" थोडे रोखूनच बोलले बाबा.
एवढ्यात तो बघतो त्याचा मोठा मुलगा दाढी करत होता.
पण त्याला प्रश्न पडला की एवढ्या लवकर हे उद्योग का करतो तो?
म्हणून तो मुलाकडे गेला आणि त्याला त्याने ठामपणे विचारले "काय चालवलं हे?"
"अहो, बाबा काही नाही. मला एका मित्राने सांगितलं की वस्तरा जर रोज चेहऱ्यावर फिरवला ना तर दाढी लवकर येते." यावर हसुन राधेय बोलला,
 "अरे काही पण का?"
त्याचा मुलगा एकदम गंभीर होऊन बोलला, 
"बाबा तुम्हाला काय माहीत? आम्ही कॉलेज, शाळेत कसं सगळं सामोरे जातो. मुलं चिडवतात, मजा घेतात. मुलगी, चिकणी, बायल्या म्हणून चिडवतात. जा बघू तुम्ही मी करतो बरोबर, जा बघू तुम्ही."
राधेय ला ऐकून थोडे विशेषच वाटले पण तिथून तो चालता झाला.
"चला निघायचं ना! शाळेची बस सुटली सोडवायला येतो ना बाबा." असं म्हणत छोटा तनु जवळ आला.
आणि घाईतच, "अरे मी कुठे येऊ, बाबा सोडवतील ना."
असं ती बोलून गेली.
"अरे तूच तर बाबा ना चल." असं म्हणत तनु खेचतच घेऊन गेला.
थोड्यावेळाने घरात येऊन फोन बघितला तर त्यावर २० मिसकॉल पडले होते आणि सर्व ऑफिसचे होते.
आणि घाईतच तो ऑफिसकडे चालता झाला.
आता जाता जाता त्याला घराखालच्या मिस्टर पाटील ने पेढे दिले. राधेय ने विचारले, 
"पेढे काही विशेष?"
"हो हो. आमच्या घरी आनंदाची बातमी आली!"
असा बोलत ते अगदी आनंदी होते.
आणि एवढ्यात राधेय बोलला. त्यांना म्हणावं काळजी घ्या आता खूप.
यावर पाटील साहेब विस्म्यित होऊन बोलले.
"हो ना आपल्याला काय कळत ते? ते सुख तर स्त्रीच अनुभवू शकते." 
आणि अचानक राधेय ला एकदम कसतरीच झालं.
"चला येतो, उशीर झाला." असं म्हणत तो निघाला.
पुढे गेला आणि रस्त्यावर काहीतरी भांडण चालू होते.
कदाचित कुणीतरी मुलीची छेड काढली होती आणि सर्व लोक मुलीला दोष देत होते.
यावर चिडूनच राधेय ने मुलीची बाजू घेतली तर सर्व त्यालाच बोलायला लागले.
"तुला काय करायचं आहे? तुला माहित पण आहे का घटना? रिकामा चरचर नको करू!" असं बोलत एका स्त्रीने जोरात धक्का दिला.
कसातरी एक एक घटना अनुभवत घाईतच राधेय ऑफिसला पोहचला. पण जणू पोहचला होताच बोलणे खाण्यासाठी.
कारण कामं अपूर्ण होती, बॉस ओरडत होता, मित्र पण चिडत होते,
आणि वैतागून बॉस ने आता पगार पण अर्धा केला होता.
आणि क्षणात राधेय वैतागून गेला.
पण निमूटपणे सर्व काम करून अखेरीस तो निघाला आणि इतक्यात, 
"ओ, मिस्टर राधेय कुठे? काम करा. एकतर उशिरा येतात वरतून वेळ झाली की मुकाट निघतात." 
असे रोखूनच बॉस बोलला.
अखेरीस सर्व काम करून दोन तासांनी राधेय निघाला.
राधेय एवढा थकला होता की घरी जाऊन एकदम पडून घेईल.
कसातरी थकून भागून राधेय घरी आला पण, बघतो तर काय घरात वीज पण नव्हती.
बाबा आणि बाकी घरातले ओरडत होते की,
"एक वीजबिल सुद्धा भरवलं जात नाही. कुणास ठाऊक एवढे काय काम असतो."
राधेय विसरून गेला होता.
एवढ्यात लहान तनु जवळ आला आणि हट्ट करू लागला, 
"बाबा चला ना मला खाऊ खायचा आहे."
"नाही बाळा मी खूप थकलो आहे; आपण उद्या जाऊ."
असे बोलून राधेय खोलीत गेला.
एवढ्यात आई आली आणि पगारासाठी विचारू लागली. तिला नवीन भांडे घ्याचे होते.
"अग आई, जरा वेळ बसू का मी. अरे काय चालवलं हे! जो तो तेच घेऊन बसला. आणि भांडे पुढच्या महिन्यात घे. पगार कमी झाला माझा."
आईला पण ऐकून वाईट वाटलं पण, काही न बोलता ती निमूटपणे निघून गेली.
"राधेय! अरे राधेय! अरे लवकर ये इकडे काय झालं बघ बाबांना! अरे बोलत नाही हे!" घाबरतच आई बोलली.
"अगं आई पडू दे ग जरा वेळ, थकलो मी."
वैतागून राधेय बोलला.
"अरे, हृदयविकराचा झटका आला त्यांना लवकर ये बघू इकडे. दवाखान्यात घेऊन जावं लागेल."
ऐकताच राधेय एकदम घाबरला आणि घाईतच सर्व दवाखान्यात पोहचले.
तिथे गेल्यावर बाबांची ही अवस्था बघून राधेय ला खूप रडावसं वाटत होतं.
पण घरच्यांना धीर देण्यामध्ये त्याने स्वतः च्या भावना अवरल्या.
थोड्याच वेळात डॉक्टर ने बातमी दिली.
"काळजी करू नका, उद्या तुम्ही घेऊन जाऊ शकता."
"आई, आलोच मी बिल करून." असं बोलत राधेय तिथून घाईतच गेला.
थोड्या वेळात घरी आल्यानंतर राधेय एकदम झोपी गेला.
"ए राधा. अगं आता कसा वाटतं तुला? राधा बाळ उठ अगं! 
थोडी जेवून घे चल!" आणि एकदम राधा झोपेतून जागी झाली.
विचलित होऊन ती स्वतःकडे बघू लागली.
आणि धीर देत स्वतःशीच बोलली,
"हे फक्त एक स्वप्न होते!" असे म्हणत अखेरीस ती नव्या जोमाने कामाला लागली.
(कदाचित पुरुषांचे आयुष्य सुद्धा साधे नाही त्यांना सुद्धा खूप गोष्टी सहन कराव्या लागत असतात. जसे की घरातल्या जबाबदाऱ्या, तरुण मुलाचे जगाशी द्वंद, लहान मुलाच्या गरजा, समजसमोर त्याला कठोर बनावं लागतं. यापेक्षा आमचं आयुष्य खरच सुंदर आहे. आम्ही प्रकट होऊ शकतो आणि आई होणं तर एक सुखद अनुभव असतो. असा विचार मनी आला आणि ती हसली.)
लेखिका: वर्षा गिते
लघुकथा/लेख
ईरा टीम: नाशिक 
 विषय: आणि ती हसली
स्पर्धा: ईरा राज्यस्तरीय करंडक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Varsha Gite

//