Jan 26, 2022
नारीवादी

स्त्री - तु दुर्गा, तु रणरागिणी, तु माता, तूच देवी...........

Read Later
स्त्री - तु दुर्गा, तु रणरागिणी, तु माता, तूच देवी...........
स्त्री - जन्माला आल्यापासून जीवनाच्या अंतापर्यंत जी स्वतःचे अस्तित्व विसरून सर्वांसाठी नेहमी झटत राहते ती म्हणजे स्त्री. .मुलगी म्हणून आई वडिल्यांच्या अपेक्षा, पत्नी म्हणून पती च्या अपेक्षा, आई म्हणून मुलांच्या अपेक्षा - हे सर्व करताना तिने स्वतःच्या अस्तित्वाचा विचार केला नाही, आज जगात अनेक स्त्रिया अशा आहेत कि ज्या केवळ नाईलाज म्हणून सर्व सहन करतात, इतकेच नव्हे तर स्त्री सहनशील आहे म्हणून आज अनेकांचे संसार शाबूत आहेत, समाजात स्त्री्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा तिला आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय सुचू नये, हीच खूप खेदाची बाब आहे, आज बऱ्यापैकी स्त्री सक्षम झाली आहे , तरी हीं स्त्री वर होणारे अत्याचार काही थांबत नाही आहेत, ऍसिड हल्ले, बलात्कार थांबत नाही आहेत, कुटुंब टिकवण्यासाठी तिला आजही तडजोड करावी लागतं आहे पण कितीही असले तरी एक मात्र नक्की एकविसाव्या शतकातली स्त्री कणखर आहे, परिस्थिती विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद तिच्यात आहे, ती रणरागिणी आहे, दुसऱ्या स्त्री वर एखादा अत्याचार होत असेल तर आवाज ती आज उठवू शकत आहे, समाजात आज प्रत्येक क्षेत्रात .स्वतःला पूर्णपणे झोकून देणाऱ्या स्त्री ची प्रगती आज गतिमान होऊन देशाच्या प्रमुख पदावर पण आज स्त्री विराजमान झाली आहे,.....अशी हीं स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी पान्हा नय नी पाणी......................... नमस्कार..... सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.... ( देवरुख - रत्नागिरी )......


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mrs. Sonal Gurunath Shinde

लेखिका

MA - Economics And Sociology