स्त्री जन्म

Women


*स्त्री*


स्त्री म्हंटले की डोळ्यासमोर काय येईल.. तर आधी आई आपली जन्मदात्री. निर्माण करणारी. मातृत्व, माया करणारी, संभाळ करणारी, दुध पाजणारी, चिऊ-काऊ घास भरवणारी,जिने चालायला, बोलायला शिकवले, आपली पहिली गुरू, आपल्याला पोटात असल्यापासून ओळखणारी, जिच्या मुळे आपण या जगात आलो, जिने आपल्या ला मोठे केले ती आई, जिच्या कुशीत शिरून रात्री झोप लागते. आईच्या आशिर्वादाने कधी काही कमी पडत नाही.


नंतर स्त्री म्हणजे आपली बहीण. लहान असो मोठी असो. माया करणारी, आपल्याला जपणारी, भावाला राखी मायेत बांधणारी, भावा ला ओवाळणी हक्काने मागणारी, औक्षण करून भावाचे आयुष्य वाढव म्हणून प्रार्थना करणारी..


स्त्री च तिसरे रूप आहे बायको, मैत्रीण, सखी.. जी आपले आई वडील, घरदार सोडून येते, नवऱ्याला सर्वस्व देते, नवऱ्याला आयुष्यभर साथ देते, संसार फुलवते- बहरवते, जी घरात लक्ष्मी म्हणून येते, घराची अब्रू..


स्त्री चौथ रूप आहे. मुलगी. आपल्या पोटी जन्माला आली. आपल्या घरात आलेली लक्ष्मी.. बाळ रूप बोबडे बोल, पायातल्या पैजणाने घरभर आवजाने चैतन्य आणणारी, बाबांची राजकन्या, वडीलांवर, घरावर माया करणारी,निखळ आनंद देणारी..


स्त्री अनेक रूपात मावशी, आत्या, मामी, वहिनी, काकू,... तुमच्या आयुष्यात असलेल्या.. कधी पाठीशी उभे राहिलेली, कधी माया लावणारी, कधी काही शिकवणारी..


स्त्री ला मान दिला पाहिजे. ज्या ठिकाणी त्यांचा अपमान केला जातो. तिथे लक्ष्मी नांदत नाही.. द्रौपदीच्या पासून आजपर्यंत अन्याय होत आलेली. बलात्कार, विनयभंग, एकतर्फी प्रेमातून अँसिड अँटॅक झालेली. आता तर लहान 4-5 वर्षांच्या मुली सुरक्षित नाही. एकटी स्त्री समाजात सुरक्षित नाही. त्या पुरूषाला जन्मच स्त्रीच देते. सिता पवित्र असून कायम अग्निपरीक्षा देत आलेली. मुली नको. मुलगाच हवा. मुलगा पाहिजे मग मुलीची संख्या वाढत जाते आणि त्यांच्या कडे साध लक्ष दिले जात नाही. मुलगा - मुलगी भेद करत वाढवलेली. मुली गर्भात असताना मारल्या गेलेल्या आहेत.आता मुलांना लग्न करायला मुलीच नाहीत. मुलीच प्रमाण कमी आहे. हुंड्याचा साठी कित्येक मारल्या गेलेल्या. नोकरी करणाऱ्या नोकरी च्या ठिकाणी एक स्त्री म्हणून अनंत अडचणीना तोंड देत नोकरी करत असतात. घर आणि नोकरी दोन्ही संभाळून तारेवरची कसरत करत असतात.
गृहिणी ना कमी लेखले जाते. चूल आणि मूल पाहणाऱ्या. तुम्ही एक दिवस करून पहाच ! गृहिणी ना किती काम असते स्वयंपाक, साफसफाई, मुल, सणवार, अतिथी.... लिस्ट कधीही न संपणारी.. तरी तिलाच विचारले जातेच तुला काय काम आहे ? स्त्रीयावर जास्त विनोद केले जातात.

अहो साधा दहावी चा निकाल पहा मुलीच बाजी मारतात. आज सगळ्या क्षेत्रात स्त्रीया आहेत. पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, राजकारण असो, समाजसेविका असो, डाॅक्टर असो, सिस्टर असो, कोविड योद्धा, लष्करात स्त्रीया, वकील, जज्ज, इंजिनिअर, आंतराळवीर, शिक्षिका, कवयित्री, लेखिका, गायिका, अभिनेत्री सगळ्या क्षेत्रात उत्तम काम करत आपले अस्तित्व ती निर्माण करते टिकवते.


स्त्री म्हणजे समाजाची किती बंधन असतात. कपडे काय घालायचे इथपासून ते काय करायचे काय नाही इथपर्यंत. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीलाच कमी लेखते, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीलाच जगू देत नाही किती वाईट गोष्ट आहे.


नैसर्गिक दृष्ट्या पाळी, , बाळंतपण, मोनोपॉज, किती शारीरिक गोष्टीना तोंड देत असते.
स्त्री जन्म अवघड आहे.


*सौ. भाग्यश्री चाटी सांबरे* ??3.9.2021. ©®