घरची लक्ष्मी...

Women

             नमस्कार... नवरात्रौस्तवाच्या सर्वांना शुभेच्छा...

        ..... मुलगी, आई, बहीण , सासू, सून.. ही सगळी तिची रूप.. ..ती म्हणजे चं देवीचं रूप... तीला घरातल्या प्रत्येकाने लक्ष्मी चा मान दिला तर ती कुठल्याही मोठ्या संकटात वेळ पडली तर  कुठलाच मागचा पुढचा विचार न करता तीच स्त्रीधन गहाण ठेवून पण गरजेला पैसे उभे करते...तुमच्या आजारपणात तुम्हाला धीर देते... ती आहे म्हणून घरं असत.. ती नसली तर ते घरं ही खायला उठत... अशी ही देवी म्हणजे घरची लक्ष्मी......

       आज जगात अनेक स्त्रिया अशा आहेत कि ज्या केवळ नाईलाज म्हणून सर्व सहन करतात, इतकेच नव्हे तर स्त्री सहनशील आहे म्हणून आज अनेकांचे संसार शाबूत आहेत. कितीतरी स्त्रिया नाईलाज म्हणून दारुड्या नवऱ्याचा त्रास सहन करतात.. मुलांकडे बघून संसार रेटत असतात. मुलांना शिकवण्यासाठी धडपड करत असतात... छोटया - मोठया नोकऱ्या करून संसाराचा गाडा एकटीने ओढत असतात.

         ह्या घरच्या लक्ष्मी ला कोणी घरातलं जेव्हा खूप त्रास देत असत तेव्हा तिला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग आज ही बहुतांशी दिसत नाही ह्याचेच वाईट वाटते...पण कधी कधी तिचा नाईलाज होतो आणि मग ती त्या रोज च्या कटकटीला कंटाळून एक दिवस स्वतः लाच संपवते..

     आज ही स्त्री वर होणारे अत्याचार काही थांबत नाही आहेत, , बलात्कार थांबत नाही आहेत.... अशा घटना ऐकल्या कि मन सुन्न होत... अरे मुलांनो असं करताना तुमच्या डोळयांपुढे तुमची आई - बहीण येत नाही कां रे... कां निष्पाप मुलींच्या जीवाशी  खेळता रे गिधाडांनो... अशांना भर चौकात नेवून मार मार मारावंसं वाटत...

       पण आजची बाई खंबीर आहे, ती समर्थ आहे...परिस्थिती विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद तिच्यात आहे, ती रणरागिणी आहे, दुसऱ्या स्त्री वर एखादा अत्याचार होत असेल तर आवाज ती आज उठवते..

.........अशा ह्या घरच्या सर्व लक्ष्मीनां माझा नमस्कार..

  ...अशी हीं स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी पान्हा नयनी पाणी...

लेखिका. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.... ( देवरुख - रत्नागिरी )......