तु माता, तु दुर्गा - आदिमाया तु....

Women

खरं तर रोजचाच दिवस आपला, प्रत्येक स्त्रीचा, तिच्या आत्मसन्मानाचा. 

महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..

जन्माला आल्यापासून जीवनाच्या अंतापर्यंत जी स्वतःचे अस्तित्व विसरून सर्वांसाठी नेहमी झटत राहते ती म्हणजे स्त्री. .मुलगी म्हणून आई वडिल्यांच्या अपेक्षा, पत्नी म्हणून पती च्या अपेक्षा, आई म्हणून मुलांच्या अपेक्षा - हे सर्व करताना तिने स्वतःच्या अस्तित्वाचा विचार केला नाही, आज जगात अनेक स्त्रिया अशा आहेत कि ज्या केवळ नाईलाज म्हणून सर्व सहन करतात. 

स्त्री सहनशील आहे म्हणून आज अनेकांचे संसार शाबूत आहेत, समाजात स्त्री्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा तिला आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय सुचू नये, हीच खूप खेदाची बाब आहे.

आज बऱ्यापैकी स्त्री सक्षम झाली आहे , तरी हीं स्त्री वर होणारे अत्याचार काही थांबत नाही आहेत, ऍसिड हल्ले, बलात्कार थांबत नाही आहेत, कुटुंब टिकवण्यासाठी तिला आजही तडजोड करावी लागतं आहे.

स्त्री कणखर आहे, परिस्थिती विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद तिच्यात आहे, ती रणरागिणी आहे, दुसऱ्या स्त्री वर एखादा अत्याचार होत असेल तर आवाज ती आज उठवू शकत आहे.

समाजात आज प्रत्येक क्षेत्रात .स्वतःला पूर्णपणे झोकून देणाऱ्या स्त्री ची प्रगती आज गतिमान होऊन देशाच्या प्रमुख पदावर पण आज स्त्री विराजमान झाली आहे.

आज २१व्या शतकात आपण महिलांनी बरीच मजल मारली आहे..आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पाय रोवुन उभी आहे. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्याचे दिसते..

कालची स्त्री समाजाच्या अत्याचाराला बळी पडणारी होती. परंतु अशा समाजाला वठणीवर आणण्याची समर्थता आजच्या स्त्रीमध्ये आहे. परंतु ममता व वात्सल्य मात्र आजही कालच्या - स्त्रियांप्रमाणेच आजच्या स्त्रिया ही सुंदर पद्धतीने सांभाळत आहेत. चूल आणि मूल या जबाबदारी सोबतच इतरही क्षेत्रात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.

 "  आजच्या या स्त्रीला माझे कोटी कोटी नमन  "

महिला दिनाच्या माझ्या सर्व वाचक मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा...

नमस्कार... सौ. सोनल गुरुनाथ शिंदे..... ( देवरुख - रत्नागिरी )