स्त्री -कालची आणि आजची...( मुलगी, पत्नी, बहीण, आई )

Women

स्त्री - जन्माला आल्यापासून जीवनाच्या अंतापर्यंत जी स्वतःचे अस्तित्व विसरून सर्वांसाठी नेहमी झटत राहते ती म्हणजे स्त्री.

मुलगी म्हणून आई वडिल्यांच्या अपेक्षा, पत्नी म्हणून पती च्या अपेक्षा, आई म्हणून मुलांच्या अपेक्षा - हे सर्व करताना तिने स्वतःच्या अस्तित्वाचा विचार केला नाही.

आज जगात अनेक स्त्रिया अशा आहेत कि ज्या केवळ नाईलाज म्हणून सर्व सहन करतात, इतकेच नव्हे तर स्त्री सहनशील आहे म्हणून आज अनेकांचे संसार शाबूत आहेत.

समाजात स्त्री्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा तिला आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय सुचू नये, हीच खूप खेदाची बाब आहे.

आज बऱ्यापैकी स्त्री सक्षम झाली आहे , तरी हीं स्त्री वर होणारे अत्याचार काही थांबत नाही आहेत, ऍसिड हल्ले, बलात्कार थांबत नाही आहेत.

कुटुंब टिकवण्यासाठी तिला आजही तडजोड करावी लागतं आहे. पण कितीही असले तरी एक मात्र नक्की एकविसाव्या शतकातली स्त्री कणखर आहे, परिस्थिती विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद तिच्यात आहे, ती रणरागिणी आहे, दुसऱ्या स्त्री वर एखादा अत्याचार होत असेल तर आवाज ती आज उठवू शकत आहे.

समाजात आज प्रत्येक क्षेत्रात .स्वतःला पूर्णपणे झोकून देणाऱ्या स्त्री ची प्रगती आज गतिमान होऊन देशाच्या प्रमुख पदावर पण आज स्त्री विराजमान झाली आहे.

आजची स्त्री - आजची स्त्री गृहिणी असली तरी बहुश्रुत झालेली आहे. जगात घडणाऱ्या घटनांचा,आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? याची तिला जाणीव झालेली आहे. ही सर्व जबाबदारी सांभाळून देखील ती , घरात मुलांचा अभ्यास घेते,त्यांच्या आरोग्याची काळजी घेते, घरातील सर्व सदस्यांचे लाड पुरवते ,तेही कोणतीही अपेक्षा मनात न ठेवता. 

     आजची स्त्री पी. टी.उषा बनून जिवाच्या आकांताने धावते. तर कधी मदर तेरेसा बनुन त्रास असलेल्यांना आपल्या कवेत घेऊन मायेची ऊब पण देऊ शकते. वेळ आलीच तर देश रक्षणासाठी झाशीची राणी म्हणून युद्धात लढण्यासाठीही ती तयार असते.

    आजची स्त्री शिक्षण घेते शिक्षण देते विविध प्रकारच्या नोकऱ्या ही करते आणि घराची जबाबदारी उचलते मुलांचा अभ्यास मुलांच्या भवितव्याची जडण-घडण याचा भार देखील स्त्री समर्थपणे पेलत आहे.एवढ्या सर्व जबाबदाऱ्या पेलण्याची प्रचंड क्षमता आजच्या स्त्रीने कमावलेली आहे. 

       आजच्या स्त्रीने तर तिच्या सर्व बंधनांवर मात करून प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे. एकविसाव्या शतकात स्त्री ही पुरुषांपेक्षा अर्थार्जनाच्या क्षेत्रातही समोर आहे. महिलांच्या संघटना तयार झाल्या, आर्थिक विकासाच्या अनुषंगाने विविध व्यवसायात स्त्रिया अग्रणी झाल्या. समाजकारण, राजकारण, खेळ, क्रीडा, शिक्षण, कला, साहित्य, वैद्यकशास्त्र, विधी व न्याय यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, देशाच्या शासनकर्त्या म्हणून आजची स्त्री प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहे.

        कालची स्त्री समाजाच्या अत्याचाराला बळी पडणारी होती. परंतु अशा समाजाला वठणीवर आणण्याची समर्थता आजच्या स्त्रीमध्ये आहे.

परंतु ममता व वात्सल्य मात्र आजही कालच्या - स्त्रियांप्रमाणेच आजच्या स्त्रिया ही सुंदर  पद्धतीने सांभाळत आहेत. चूल आणि मूल या जबाबदारी सोबतच इतरही क्षेत्रात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.

...अशी हीं स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी पान्हा नयनी पाणी....


नमस्कार....सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख - रत्नागिरी )...