स्त्री ने स्वतःच भक्कम बनावं..!

स्त्री ने परावलंबत्व झुगारून स्वतःच भक्कम बनाव ..


राज्यस्तरिय लघुकथा स्पर्धा -स्त्री व परावलंबित्व

टिम- इरा नाशिक...


रात्रीचे बारा वाजले होते ...सगळीकडे शुकशुकाट होता ...दुरवर भुंकणार्या कुत्र्यांच्या कर्कश आवाजाने अंगावर काटा उभा राहात होता ...सगळ्यांची दारेखिडक्या काय?, ...पण लाईटही बंद झाली होती...बाहेर गारवा होता तरीही त्या गारव्यातही बेलाच्या आगांला घाम फुटला होता ...काय करणार होती ती .आज तिच्या सहनशक्तीचा आंत झाला होता व तावातावाने तिने सासरचा उबरा ओलांडला होता .कधी पुन्हा त्या दलदलीत न गुंतण्यासाठी.रोजरोजचा जाच व तेच तेच आरोप प्रत्यारोप ,नवर्याचा अमानुष जाच व सोबत असलेल्या भाग्याने लाभलेल्या कन्या जियाचा तिरस्कार तिला असह्य झाला होता...

तीन दिवसापासूनचे घरातील वाद संपण्याच नावच घेत नव्हता...राघवचा तिच्यावर होणारा जाच तिने सहन केला असता पण आज तो रोष त्या छकुलीवर आला म्हणून काळजावर दगड ठेवून तीने दोन कपडे व जियाला सोबत घेत कायमच ते घर सोडण्याचा निर्णय घेतला व बाहेर पडली होती ...

आजवर सारच राघव म्हणेल तसच तर चालू होत...लग्न झाल सुशिक्षित व हुशार सर्वगुणसंपन्न बेला राघवसोबत ह्या घरात आली ...किती स्वप्न रंगवली होती तीने ...चंचल व मनमोकळी स्वच्छंदी मनाने जगणारी बेला ...हळुहळू कधी अबोल झाली कळलच नाही ...राघवच्या प्रेमात ओतप्रोत बुडालेली ती राघव म्हणेल तीच पुर्वदिशा असच होत गेलं...

राघव घरातला मोठा मुलगा पण आईवडिलांचा श्रावणबाळ ..बेलाला त्या गोष्टीचाही काही त्रास नव्हता ..तिलाही भरलेल घर आवडत होतच कि ...लग्नानंतर दोन महिन्यात तीे राघवला म्हणाली

,"राघव आरे आता बस झाला हा आराम तु जातोस आँफिसला निघून मी घरात एकटी पडते रे..!..मी नोकरी करण्याचा विचार करते ..तुला काय ?वाटत.."

बेलाच्या ह्या वाक्याने तो म्हणाला ,"बेला तु ह्या घरची मोठी सून ..तुला काय घरातील सगळ्यांनाच घरात सुख ,एश्वर्याची कमी नाही गं...आईबाबा घर सांभाळ...नको करूस नोकरी ...मी आहे ना ?,स्वतःला घरातील कामात गुंतवून घे..तु नोकरी केलल मला नाही आवडणार.."

बेला जरा नाराजच झाली उच्चशिक्षित मुलगी ती व घरात बसायचं ...मान्यच नव्हतं तीला पण काय?करणार नवर्याचाच नकार होता तर सांगेल कोणाला ..सासूसासर्यांकडे एकदा विषय घेऊन बघावा अस तिच्या डोक्यात आलं...

सायंकाळी चहा नाश्त्यानंतर बेला सासुसासर्यांना म्हणाली,"आईबाबा मी इतकी शिकले ..मला वाटत त्या शिक्षणाचा उपयोग व्हावा ,तुम्हाला काय?वाटत .."

सासरे म्हणाले ,"सुनबाई जरा स्पष्ट बोल काय?म्हणायचं तुला .."

"बाबा ,मी नोकरी केली तर ..?"

तीच हे वाक्य एकून सासूबाई चिडल्याच ,"बेला आम्ही नाही का?शिकलो ..अग मीही त्यावेळी ग्राँज्युऐट होते .पण तुझ्या सासर्यांच्या पगारात सार छान झालच ना ?मी  निट घर सांभाळल म्हणुन हे वैभव दिसत ..तुही तेच कर राघव आहे ना?कमवायला .."

बेलाला आता त्यांचाही आधार नव्हता शेवटी तीने तीच स्वप्न सोडलं..व घरसंसारात वाहुन घेतलं..आता तीच स्वतःच अस अस्तित्वच उरलं नव्हत .कोणताही निर्णय ती घेऊ शकत नव्हती ...घर असो कि बाहेर राघव म्हणेल तीच पुर्वदिशा ...घरातील साध्या साध्या गोष्टींसाठी व तीच्याही वैयक्तीक गरजांसाठी ती राघववर आवलंबून होती...

बघता बघता दिवस पुढे जात होते वर्ष दिडवर्षात ..घरातली परिस्थिती व परावलंबी आयुष्य ह्यामुळे तीच आस्तित्व स्वत्व ती गमवून बसली होती .बोलकी बोला अबोल झाली होती ...सासरची ही परिस्थिती माहेरी बोलावी तर बाबा म्हणायचे,"बेला कोणत्याही नवर्याला वाटत बायकोने घर सांभाळावं...राघवची इच्छा नाही ना ??मग का?अट्टहास तुझा नोकरीचा सांभाळ घर व घरातील माणसं...तुझी आईही तेच करणे ना ?..."

आईला होती बेलाची कळवळ पण वडिलांपुढे काही चालत नव्हत तीचं...दिड वर्षात बेला घरातल सारच सांभाळू लागली ..व त्यातच तीच्या त्या शांत आयुष्यात नव महेमान येण्याची चाहुल लागली ...सासर माहेर दोन्हीकडे आनंदाला उधाण आलं ...पण सासरी सतत ,"वारसाचीच मागणी होती .."

"बेला हे कर ..बाई ,बेला हे खा बाई ...म्हणजे मला नातुच होईल हं.."

असच सासूबाई बोलत .राघव सासरे सार्यांनाच मुलाची आस होती ...बेलाला ते पटत नव्हतच ...ती राघवला बोलतही असे ,"राघव आरे मुलगी झाली तर ...तशीच माणसिकता ठेवायला हवी जे होईल ते स्विकारू आनंदाने .."

तर तो म्हणतं असे ,"काय बेला तु जसा विचार करशील तसच होईल बघ ...मला तर मुलगाच आवडतो ...तुही तशीच मानसिकता ठेव सार ठिकच होईल.."

पण झाल उलटच ...छान सुंदर व देखण्या दियाचा जन्म झाला ..घरात आनंद कमी व नाराजीच जास्त दिसली ...राघवही त्या लेकराचा तिरस्कारच करू लागला ..,"मुलगी म्हणजे परक्याच धन तिचे काय?लाड पुरवायचे ...शेवटी ती जाणार दुसर्या घरिच ना ?"

सतत घरात असचं बोलल जायचं ..बेलाला हे मुळीच पटत नव्हतं..मुलीचा सन्मान करण तिला हव नको ते देण ..समाजात स्थान मिळवून देणं व जास्त महत्वाच म्हणजे तीला साथ देण आम्ही आहोत ना ?हि हिम्मत देण हे बेला करत होती ...तीला दियाला पराधीन बघायचं नव्हतच ...तीची धडपड होती कि राघवने मुलीचा आधार बनावा .. तीच तर आयुष्य जाऊ दे पण मुलीला तीच आस्तित्व घडविण्यात सपोर्ट करावा ...मात्र होत होत उलट ...सतत तीचा व जियाचा पानउतारा ..तीला ते सहनच होत नव्हतं. एकवेळ तीने स्वतःला परावलंबात ढाळल होत पण जियाला नवविचारी ,स्वतःच अस्तित्व सिध्द करत ,स्वतःच्या पायावर उभ करायच होत. त्यासाठीच आताच आपण काही भक्कम निर्णय नाही घेतला तर तीही दुसर्यावरच आवलंबून राहिल हे बेलाला माहित होत...राघव व संसारात स्वतःच अस्तित्व व स्वतःच स्वत्व एक वेगळी ओळख मिळवण्यासाठी तीलाच भक्कम बनावं लागणार होत व तिच हिम्मत तिने आज दाखवली होती ...राघवच घर सोडून...

आता ती स्वतंत्र होती व जियालाही स्वतंत्र विचारात घडवणार होती ...माहेरचा ,सासरचा व नवर्याचाही आधार न घेता ..


(स्त्रीनेच तीच परावलंबत्व झिडकारल तर ...क्रांती होईलच ...बालपणापासून वडिल मग सासरी नवरा व नंतर मुलांच्या छायेत असतांना त्याच्या विचारांसोबत व त्यांच्याच मतासोबत जगण हे पुर्वापार चालत आलयं ...आता ते थांबवण्यासाठी तीनेच स्वतः भक्कम व्हायला हवं..!,आपली मत ,नवविचाराचे बीज पेरायला हवेत...स्त्र-पुरूष समानता आणण्यासाठी स्त्रीला स्वतंत्र विचारांची ,तिच्या भावनांची,तीच्या कलेची ,तीच्या सर्वगुणांची चुनुक दाखवायला हवी ...किती दिवस कोणावर आवलंबून राहाव ...कधीतरी स्वतःचा निर्णयाचे स्वागतही करावं...हे माझ मत हं..!...तुम्हाला काय वाटत जरूर कळवा ...

कारण आजही बर्याच ठिकाणी स्त्री पुरूषांवरच आवलंबून आहे ...)


©® वैशाली देवरे

नाशिक जिल्हा...