Mar 01, 2024
वैचारिक

वूमेन रिअल लाईफ स्टोरी.

Read Later
वूमेन रिअल लाईफ स्टोरी.


Women स्त्रियांवर होनारे अत्याचार आणि सामाजिक 
परिस्थिती…..

मि आपल्या समोर असा एक विषय मांडू इच्छीते आहे. ज्याला किती ही थांबवण्या चा प्रयत्न केला, तरी ते थांबत नाहिये.

एक असा विषय जो आपल्या ह्या जगातील , समाजात राहत असलेल्या स्त्रियांच्या , मुलींच्या समोर येउन ठेपला आहे. ज्या वर स्त्री , नारी शक्ती दिवसा दिवसाला तोंड देतेय . ते म्हणजे स्त्रीवर होणारे सामाजिक अत्याचार , बलात्कार , छेडखाणी.

हे स्त्री वर ह्या समाजात रोज रोज होत असतात. मग ति वयाने मोठी असो कींवा वयाने लहान, हे ही आपण बोलू शकतो. की ति किशोर वया मधिल का असेना , रोज होणाऱ्या बलात्कारला अपंग किवा मुकी मुलगी ही बळी पड्ते.

मग तिने जगाला कितिही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ति बोलू शकत नाही . जस एखाद फुल नुकतच वेलीवर फुल्तय, नी कोणी एका नराधमाने. येऊन ते तोडुन चुरगळून टाकाव.

अस त्या स्त्री शक्तीच झालय, वयात याव आणि पुरुष जातीने येऊन तिच्या शरीराचे लचके तोडावे. तिला कायमसाठी नासवून टाकावे.

बाईच्या पोठी फक्त मुलगा जन्माला यावा ,असे विचार करणारा पुरुष…हा नामर्द असतो हे मात्र सिध्द होते….

हे खरय मात्र अजुनही घराण्यात मुलगी जन्माला आली तर तिला , रस्त्यावर टाकण्यात येत . कींवा मग जन्माला येताच मारुन टाकण्यात येत,हत्या केली जाते ! जस कळत घरची बाई ही आई होणार आहे , तर तिला पहिल्या पासुनच तु मुलाला जन्म दे ! हे बोलण्यात येत .आणि मुलाला जर तिने जन्म दिला तर , मात्र पुरुष हा सगळ्यात मोठा मर्द आहे हे त्या समाजात सिध्द होते . अरे पण कधि त्या बाईला विचारलय का ? की बाई ग तुला काय वाटत? काही त्रास तर होत नाही ना ? बाळंतीण सुख रुप आहे की नाही हे मात्र कधीच विचारल जात नाही . पण मात्र हे विचारतात की मुलगा झालय की मुलगी ? आणि जर मुलगी झाली तर कायम त्या स्त्रिला कोसन्यात येत! मग मात्र त्या ओल्या बाळंतिणीवर तिचा नवरा मर्दपणा गाजवायला लगतो.

मुलगा व्हावा म्हणुन स्वतची इच्छा पुर्ण करतो , शेवटी हा ही एक बलात्कारच आहे ना . कुठे आहे ह्यात स्त्रिला सुख! बाई काही मुल काढणारी मशीन तर नाही ना , की दिवस रात्र कधिही चालवली. तिच्या ही काही इच्छा, आकांक्षा आहेत ना .

आज ही महाराष्ट्रा बाहेर सरोगेट मदर (आई) ची प्रथा चालते. गाव गावात ठिक ठिकानी बाईच्या पाळिच्या दिवशी , तिला बाहेर उघड्यावर कींवा एका बाजुला बसवण्यात येत. शिवाशिव कींवा कावळ्याने शिवलय, अस सांगुन तिला बाजुला बसवण्यात येत . तिच अन्न पानी, कपडे ,भांडी, साध आंघोळीच पानी ही बाजुला ठेवण्यात येत . त्या 5 दिवसात साधं तिच्या बाजुने जात ही नाही अणि स्पर्श ही करत नाही . तिचा साधा स्पर्श जरी झाला तर , गोमुत्र शिंपडुन स्वताला शुद्ध करण्यात येत. तिला साध बोलण्याची ही मुभा नसते! त्या दिवसात . त्या दिवसात जर तिला बसायला खोली नसेल तर , तिला बाहेर उंबरठ्यावर बसवण्यात येत . हातात एक काठी देऊन! मग पुर्ण समाजाला कळत की तिला मासिक पाळी आहे करुन, ति बाहेरची झाली करुन . मग समाजाच्या तिच्याकडे पाहण्याच्या नजरा , अंधश्रध्दा म्हणुन बघण्यात येत .

आपल्या भारतात रोज मिनटा मिनटाला बलात्कार , विनयभंग , छेड्खाणी होत असतात. कितीही काहीही झाल तरी कायदा अजुनही हे थांबवु शकला नाहिये . बघायला गेल तर भारतात मुंबई हे एक अस शहर आहे की , जिथे रात्रीच्या वेळी स्त्री व्यवस्थीत रित्या प्रवास करू शकते . काही ठिकानी स्त्रिया निट रित्या प्रवास ही करू शकत नाहिये ! रोज मिनटा मिनटाला बलात्कार होतात कधि ,स्वतच्या घरात मग तोह सासरा असो , बाप असो कींवा भाऊ नाहितर स्वतचा काका असो. शेजारी पजारी, शाळेत असो कींवा कॉलेज मध्ये असो , सासरी असो कींवा माहेरी , ऑफ़िस असो किवा हॉस्पिटल, गल्लिची सडक असो किवा रस्त्यावर जाणारी एखादी बस. शेतावर न्हेऊन बलात्कार करायचा , अणि मग तिचा गळा चिरून मारुन टाकायच .रात बाई कडून मुल होत नाही! वारस मिळत नाही , म्हणुन तिची इच्छा नसताना तिच्या वर बळजबरी करायची !शेवटी हा बलात्कारच ना ? हॉस्पिटल मध्ये काम करणारी सिस्टर (सेविका ) जेव्हा तिची ड्यूटी संपवून येते , तेव्हा ही तिच्यावर बलात्कार केला जातो . मग तिला कुठे लागो किवा काय ! ह्यात जात कोनाच कहीच नाही . पुरुष हा स्वतची वासना पुर्ण करतो, आणि कमी वयात जी स्त्री स्वतला गमवुन बसते ति, कायम मरे पर्यंत स्वताला अंथरुणावर खिळवून बसते. पण जात कोणाच काहीच नाही , मित्रा सोबत फिरुन येत असणाऱ्या त्या मुलीचा काय दोष ? प्रवासी म्हणुन्ंच ति त्या बस मध्ये बसते ना ? मग तिच्यावर चार — पाच नराधमांनी मिळुन तिचा बलात्कार करुन , तिच्या शरीराचे लचके तोडुन तिचा जिव घेतला . त्या मुलीचा काय दोष ? ह्या सगळ्यात त्या स्त्री शक्तीचा काय दोष ? पण जात कोणाच कहीच नाही .

आजही एकट्या मुंबई मध्ये स्त्री प्रवास करू शकते. कारण फक्त इथली पोलिसप्रशासन ! त्या मुळेच आज स्त्री निट आहे . लोकांचा दृष्टीकोन इतका बदलला आहे की , मुलगा आणि मुलगी एकत्र फिरत असेल म्हणजे त्यांच काही आहे. पण समाज हा का नाही विचार करत की ते चांगले मित्र मैत्रीन ही असु शकतात, किती ही काहीही झाल तरी त्या स्त्रीलाच दोष देण्यात येतो . जर एखादी स्त्री रात्रीच्या वेळी प्रवास करुण घरी येत असेल तर , तिला गृहित धरतात की ति काही वाईट काम करूनच येतेय . अर्थात स्वतच शरीर कुठे विकायला जातेय कींवा विकुन येतेय! हा का नाही विचार करत की ति एखाद्या चांगल्या हुद्यावर कामाला असेल . ते हॉस्पिटल किंवा ऑफ़िस ही असु शकेल , का नेहमी स्त्री बद्दल असा विचार केला जातो.NCRB — NATIONAL CRIME RECORDS BUREO……

च्या आता पर्यंत च्या सरासरी एकुण 1 जानेवारी 2019 ते 30 जुन 2019 च्या मध्ये भारतात स्त्रियांवर म्हणजे , लहान मुलीं पासुन ते स्त्रियां पर्यंत ! बलात्कार संख्या 2412 इतके केस नमुद केले आहेत . 1 महिन्यात 4000 म्हणजे 1 दिवसात 130 आणि प्रत्येक 5 मीनटाला 1 बलात्कार ची घटना आपल्याला मिळते. भारतात बलात्कार चे 3 मुख्य राज्य आहेत ! 1) उत्तर प्रदेश 2) मध्य प्रदेश 3) महाराष्ट्र
NCRB च्या तुलनेत दिल्ली ही महिलांसाठी असुरक्षीत शहर मानले जाते . 3 ते 8 दिवसांमध्ये जेल मध्ये सुध्दा महिलांवर बलात्कार केल जातय. त्यात 4 गँग रेप असतात , प्रत्येकी 4 तासात गँग रेप ची केस नमुद केली जातेय. समाजात स्त्रिया आहेत कुठे सुरक्षित ? अजुनही आपल्या ह्या समाजात दहेज अधिनियम , दहेज हत्या , नारी हत्या , बलात्कार , डायन हत्या , ह्या सगळ्या अघोरी कांड आपल्या कडे होत आहेत . आणि ह्या सगळ्याला समाज आणि त्यांची मानसिकता जबाबदार आहे . अजुनही मुलीच्या बापा कडुन हुंडा घेतला जातोय , पण हे समाज हे का नाही समजत! त्या बापा कडे हुंडा देन्या इतपत पैसा आहे की नाही . तोह बाप गरिब आहे की श्रीमंत निदान हे तरी पहा . फक्त हुंड्या साठी मुलींशी लग्न केल जातेय! अणि हुंडा घेऊन ही त्या मुलीचा आयुष्यभर छळ केला जातो. नाही तर तिला जाळून मारण्यात येत , तेव्हा कुठे असतो हा समाज? अरे त्या मुलीचा तरी विचार करा ! केलाय का कधि नाही ना ? ह्या सगळ्यात स्त्री च्या हालातीला एक स्त्रीच कुठे ना कुठे जबाबदार असते .


मासिक पाळिचे महत्व जर जगाला कळले असते…तर कदाचित स्त्रीच्या , आई पणाला अजुन शोभा आली असती….

मासिक पाळी म्हणजे खुप मोठ पाप , जे तिला त्या वेळेत तुच्छ लेखण्यात येत . तिचा त्रास कोणालाच दिसुन येत नाही , जे तिला त्या वेळेस वेगळ काढण्यात येत . अरे पण तुम्ही हा का नाही विचार करत! त्याच स्त्री च्या योनितुन जाणार रक्त , तिची ति मासिक पाळी त्यातूनच तुमच्या घराण्याला वारस मिळ्तो.. अणि समाजाला एक नविन जिव …मानव जातीचा..घरात लक्ष्मी , लग्न करायला मुलगी , जन्म द्यायला एक आई , रक्षाबंधन च्या दिवशी हातात राखी बांधायला एक बहिण , हव्याच ना तुम्हाला….

ही एक परिस्थिती आहे जी कधीच बदलू शकत नाही …..

समाप्त.

लेख लिहण्याचा एक लहान सा प्रयत्न केला आहे. ह्यात कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतु नव्हता.

लिहन्यात चुक झाली असेल तर माफ करावे ??.MANISHA PARAB.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Manisha Narendra Parab

Job

मि लॅब टेकनिशन आहे. लिहायला वाचायला खुप आवडत.

//