Jan 26, 2022
नारीवादी

स्त्री आणि सोशल मिडीया

Read Later
स्त्री आणि सोशल मिडीया


स्त्री आणि social media
Hi , hello, good morning, good night आणि finally जेवली का हे असे messages जर तुम्हाला येत असतील तर आपण अजूनही तरूण आणि सुंदर दिसतो असे समजायला हरकत नाही..
Joke apart.. पण आजकाल बहुतेक जणांना येणारा हा अनुभव असेल.. म्हणजे college, school चे एखादे get-together झाले असेल किंवा सध्या फेसबुकवर असलेल्या अनेक ग्रुपपैकी एखाद्या ग्रुपवर एखादी पोस्ट टाकली कि अचानक येणाऱ्या friend request वाढतात. (हा अनुभव घरगुती कार्यक्रमानंतर बहुधा येत नाही कारण बरेचजण already list मध्ये असतात.. आणि उरलेल्यांना आपले वाढलेले वय दिसत असेल???). त्यातील बर्‍याच जणांना आपण ओळखतही नसतो.. आता याच्या पुढचा प्रश्न म्हणजे त्या accept करायच्या कि नाही...आता मी एक स्त्री असल्यामुळे हे सगळे माझ्या दृष्टीकोनातून लिहिणार आहे..(नंतर स्त्री पुरुष तुलना नको म्हणून आधीच सांगीतले)..
मध्यंतरी याच संदर्भात एक कमेंट वाचनात आली कि एखाद्याने केलेली पोस्ट आवडली कि त्यांना friend request पाठवली जाते.. माझ्यासाठी थोडेसे अनाकलनीय आहे.. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीची एखाद्या ग्रुपवरील पोस्ट आवडली असेल तर त्या ग्रुपवर जाऊन तुम्ही त्यांच्या बाकीच्या पोस्ट पण वाचू शकता ना. जे काही आवडले न आवडले ते तर कमेंट्स मध्ये पण सांगू शकता ना? खरेतर सोशल मीडियाच्या वापराचे पण काही अलिखित नियम असतात ते तर पाळायला हवेच ना? कारण माझ्यासारख्या काही जणांसाठी फेसबुक हे दुरावलेल्या मित्र, नातेवाईक यांच्या संपर्कात राहण्याचे एक साधन आहे.. त्यामुळे काही समारंभ, घटना यांचे फोटो त्यावर टाकले जातात.. पण जर आपल्यालाच अनोळखी कोणी असेल तर हे फोटो टाकताना विचार तर करावा लागेलच ना? कारण आमच्याच एका ग्रुपवर घडलेली घटना.. एका गृहस्थांच्या घरातील काही सदस्यांच्या फोटोचा वापर करून पोस्ट टाकली जे अत्यंत चुकीचे होते.. पोस्ट चांगली असो वा वाईट त्या दुसर्‍या व्यक्तीला मनस्ताप मात्र खूप झाला..
So.... असेच एक उदाहरण..
जुनी ओळख म्हणून एक request accept केली.. तर त्याने ओळखीच्या अनेक जणींना ही पाठवली.. common friend म्हणून त्यांनी स्वीकारली.. तर सगळ्यांनाच एकच message दररोज न चुकता..you are the most beautiful woman... बहिणीशी, मैत्रीणीशी बोलून मग शेवटी त्याला block केले..
असाच एकजण direct जेवली का?? तुम्ही जेव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलता तेव्हा direct अरेतुरे? बरे कोण जेवले नसेल तर तुम्ही नेऊन देणार का? रोज विचारण्यात काय अर्थ? तुम्ही जर शिवाजीमहाराजांचे भक्त म्हणून मिरवता, मग हे संस्कार? काही जणांची कल्पनाशक्ती तर कमेंट्स मध्ये उफाळून येते.. तिरकसपणाचे मस्त नमुने पाहायला मिळतात... I agree सगळेच तसे नसतात, पण समोरच्या बाईला कोण कसे आहे , हे कसे कळणार?
पाठवणाऱ्या emojis चे एक वेगळेच.. खरे तर ❤ म्हणजे प्रेम असे तिथे दर्शवत असताना तुम्ही ते पाठवत असताना काय साध्य होते खरेच माहित नाही... अनेक ग्रुपवर कुटुंबातील इतर सदस्यही असतात.. ते हे सर्व बघून काहिच हरकत घेणार नाही असे वाटते का? आजकाल online school च्या काळात अनेक आयांचे मोबाईल मुलांकडे असतात.. हे असे messages जर त्यांनी पाहिले तर त्यांना काय वाटेल? मध्यंतरी माझ्या एका मैत्रीणीचा फोन चुकून तिच्या नवर्‍याने पाहिला.. आणि त्यात हे असे इमोजीज होते.. जे बघून नवरा बायकोंचे मोठे भांडण..
कोणाशीही मैत्री अशी पटकन होत नाही.. ती हळूहळू वाढावी लागते.. आणि या आभासी मैत्रीने कोणाला काय मिळते हे मला तरी माहित नाही.. पण आपल्या या हव्यासापोटी दुसऱ्यांना त्रास होत असेल का हा विचारही करायला हवाच ना? हे वाचून काही जणांना माझा रागही आला असेल.. मान्य मी काही कोणी मोठी नाही. आपण लिहिलेले कोणी तरी वाचते त्याला आवडते हे बघून मलाही आनंद होतो पण त्यासाठी आपला खाजगीपणा घालवायचा का , हा ही एक प्रश्न आहेच ना?
सामान्यतः फेसबुकवर टाकण्यात येणारे सर्वच फोटो मस्त मेकअप करून टाकलेले असतात, त्यामुळे ते सुंदर आहेत याची खात्री करून नंतरच ते टाकलेले असतात.. मग तुम्ही खरेच खूप सुंदर आहात हे अनोळखी लोकांकडून ऐकताना नाही म्हटले तरी थोडे okward वाटतेच.. आणि कसे आहे कोण खरे बोलतो, कोणत्या उद्देशाने बोलतो हे कळण्याची उपजत बुद्धी बायकांना असतेच.. त्यामुळे असो....
So कोणाशीही मैत्री करताना मूलभूत नियम पाळले तर नुकसान कोणाचेच नाही पण मिळाली तर मानसिक शांती नक्कीच मिळेल..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

Photo credit goes to vaishanavi Deval.. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now