बाळ की करिअर ! - भाग २

WOMAN EMPOWEREMENT MARATHI MARATHI KATHA MARATHI STORY MARATHI CINEMA MARATHI FEMINIST FEMINISM MARATHI STORY FEMINISM STORY FEMINISM EXAMPLE FEMINIST WOMAN EMPOWERMENT WOMAN EMPOWERMENT STORIES WE RISE BY LIFTING OTHERS

आपल्या करिअर ची राख होतांना निकिता आपल्या डोळ्या समोर बघत होती. पोटात जीवाचा एक गोळा वाढवायचा आणि आणि आपली स्वप्न मात्र त्या जबाबदारीच्या मागे चिरडून टाकायची.

मुलाला जन्म देण्याइतपतच स्त्री च अस्तित्व नसू शकतं.

आणि पोटात असलेल्या जीवाला ह्या जगात नाही येउ  दिलं तर ४ लोकं काय म्हणतील? 

पण  त्या लहान जीवाला वाढवताना पुढे काय उत्तर देणार? जी आई स्वतःच्या हक्का  साठी लढू शकली नाही ती आई आपल्या मुलाला काय धडा शिकवणार? आई होणं म्हणजे फक्त जन्म देण्याइतकच नाही तर त्या मुलात  चांगल्या गोष्टींची मूळं रुजवणं आणि त्याहूनही पुढे त्या मुलाला "स्वाभिमानी" बनवणं हे सुद्धा आई च कर्तव्य  आहे..

निकिता ने ठरवलं होतं कि...... घरात कोणालाही न कळू देता, कुशल ला विश्वासात घेऊनआपण अबॉर्शन करायचं. पण कुशल दरवाज्यापर्यंत पोहोचला होता ती धावत्या पावलांनी कुशल च्या पाठीमागे गेली . आत जाऊन बघते तर काय शांताबाई अगदी आनंदित दिसत होत्या. कुशल त्यांना पेढा खाऊ घालत होता. घरातले सगळे जण आले आणि कुशल च अभिनंदन करायला लागले. 

निकिताने आपली शेवटची संधी गमावली होती. 

शांताबाई ने निकिता ला जवळ बोलावलं आणि कुरवाळत म्हणाल्या "

" बघ देवाची कृपा...... आता घरात बाळ आलं कि मी देवाघरी जायला तयार"

निकिता ने स्मितहास्य केलं पण मनात मात्र तिच्या करिअर चा अंत होतांना तिला दिसत होता. समोर ९ महिने पोटात बाळ, नंतर १ वर्ष बाळाची काळजी. तिला सुचत नव्हता कि काय करावं .. तिला माहेरची खूप आठवण झाली..

आणि आवंढा गिळत ती तिच्या सासू ला म्हणाली 
" आई, माझ्या माहेरी कळवते "

निकिता फोन घेऊन तिच्या रूम मधे  गेली दरवाजाची कडी लावली आणि बेड वर पडून ढसाढसा रडायला लागली.. लहानपणापासून तिने जे स्वप्न पहिले होते.. प्रत्येक दिवशी सकाळी उठून ती फक्त त्या स्वप्नातच विचार करायची. ती स्वप्न आता उरली नव्हती.. तिच्या डोळ्यासमोर तिची सगळी मेहनत दिसत होती..आणि ती मेहनत आता फक्त कागदावरच राहणार ह्याची जाणीव तिला झाली होती.

रडून रडून डोळे लाल झाले होते.. तिने स्वतःला सावरलं . आणि डोळे पुसून पुन्हा शांताबाईंकडे गेली.

तोपर्यंत घरात अगदी सणासुदीचा वातावरण झालं होतं. सगळे जण अगदी खुश आणि कुशल तर नाचत होता.

निकिता आल्यावर तिच्या सासूबाईंनी तिच्याकडे बघितलं... त्यांना समजलं कि निकिता रडून .. डोळे पुसून आपल्या रूम मधून आलीये...

" निकिता, पुढे काय करायचंय ठरवलं आहेस मग "? - निकिता च्या  सासूबाई म्हणाल्या 

" पुढे काय म्हणजे.. आता बाळंपणात जास्त काळजी घेतली पाहिजे बरं का" - शांताबाई म्हणाल्या 

" हो , पण निकिता तुझं काय मत आहे"?

"तूला हवं आहे की नको बाळ"- सासूबाई म्हणाल्या.

खाली असलेली निकिता ची नजर सासूबाईकडे गेली आणि निकिता ला जाणीव झाली कि घरात कोणीतरी आहे जे मला समजू शकतंय.

सासूबाईंचं हे ऐकून शांताबाई जाम चिडल्या " हे काय अभद्र बोलतेयस तू "

निकिताचं आणि कुशलचं मूल आहे शेवटी. त्यांना नको विचारायला का"? सासूबाई अगदी ठामपणे म्हणाल्या 

" काही नाही.. हे आपल्या घरातलं मूल आहे , मी सांगितलं म्हणजे मूल  होऊ द्यायचं .. ह्यात काही प्रश्न नाही"

शांताबाई जरा मोठ्या आवाजात म्हणाल्या 

"अहो पण त्यांना त्याच्या मुलाबद्दल काही निर्णय घ्यायचा अधिकार आहे कि नाही, कुशल आणि निकिता दोघेही जबाबदार आहेत.. ते आता लहान मूळ नाहीत कि आपण त्यांना प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे "

- निकिताच्या सासूबाईंना पहिल्यांदा सर्व जण इतक्या मोठ्या आवाजात बोलतांना बघत होते. 

घातला वातावरण अगदी २ मिनिटात बदलून गेलं. शांताबाई च्या समोर आजपर्यंत त्याचा मुलगा सुद्धा मोठ्या आवाजात बोलला नव्हता,, आज त्यांची सून चक्क बोलली म्हणून त्यांच्या  संतापाला आता अंत  नव्हता.

आणि सासूबाई सुद्धा इतक्या शांत आणि आज चक्क शांताबाईसमोर बोलताय म्हणून घरातले सर्व जण अचंबित झाली होते.

" ह्या घरात माझ्या शब्दाला काही मान  आहे कि नाही" आज संपूर्ण घर जे टिकून आहे ते माझ्यामुळे"

" आणि हि निकिता हिच्या कोवळ्या वयात तिला काय समजतंय मी तिच्या एवढी होते तेंव्हा मला २ मुलं होती "

आणि निकिता हे मूल  घरात आणणारच ह्यात अजिबात वाद नाही "

सासूबाई काही  बोलणार तेवढ्यात शांताबाईंनी सासूबाईंच्या समोर हात केला. ह्या पुढे एक शब्द जरी बोललीस तर याद राख "

" आणि निकिता.. हे मूळ घरात आणलाच पाहिजे .आणि मुलगा असेल तर अतिउत्तम आपल्या घराण्याला वारस मिळेल,, आणि मुलगी असेल तर पुढच्या २ वर्षात पुन्हा प्रयत्न करायचा..

हे ऐकून सासूबाईंचा राग मात्र अनावर झाला - " अक्का आजपर्यंत तुमचा एक शब्द सुद्धा पडू दिला नाही, तुम्ही  जे म्हणाल तेच करत आलो आहोत "

पण आता प्रश्न घरातल्या लक्ष्मी चा आहे.. एखाद्या स्त्री च्या इच्छेविरुद्ध तिला काहीही करायला सांगण हे मला अजिबात पटत नाही "  निकिता तिला जे हवं तेच करेल"

आणि हे मान्य नसेल तर निकिता आणि मी, आम्हीही दोघी घर सोडून निघून जाऊ.

हे ऐकून मात्र शांताबाई शाअजून संतापल्या.. माझी सून.. तुझी हिम्मत च कशी झाली सासूशी असं बोलायची.

" अक्का, आजपर्यंत आम्ही सगळं ऐकत आलो ते फक्त तुमचा आदर करतो म्हणून, पण आज जेंव्हा स्वतःसाठी लढायची वेळ आली तेंव्हा मी मागे हटणार नाही -  तुमचा निर्णय कळवा आम्हाला.

सासूबाईंनी निकिता चा हात पकडला आणि तिच्या रूम मध्ये घेऊन गेल्या..

दरवाजा लावला आणि निकिता सासूबाईंच्या गळ्यात पडून पुन्हा धस-धस रडायला लागली..

सासूबाईंनी तिचे डोळे पुसले. आणि म्हणाल्या तुझ्या इच्छेविरुद्ध तुला कोणीही काही करायला भाग पडणार नाही मी असतांना ..

 ३१ वर्षांपूर्वीची गोष्ट. माझं लग्न तुझ्या सासरऱ्यांशी ठरलं आणि त्याच दिवशी माझी एअर होस्टेस च्या परीक्षेचा निकाल आला. मी चांगल्या मार्कांनी पास झाली होती आणि लग्नाच्या दिवसापासून माझ ट्रेनिंग सुरु होणार होतं. तो काळ वेगळा होता. माझ्या आई-वडिलांनी मजबुरी खातर मला जाऊ दिलं नाही आणि सासरी तर घराबाहेर जाणं सुद्धा मोठी गोष्ट.. आणि  नंतर कुशल झाला.

विमान उडवायची माझी स्वप्न मात्र कधीच उडू शकली नाही. आणि आज ३१ वर्षांपूर्वी असलेली माझी प्रतिमा मला तुझ्यात दिसली. कदाचित तेंव्हा मी हिम्मत करून स्वतःसाठी लढायला शिकली असती तर तुझ्यावर सुद्धा हि परिस्थिती आली नसती.

म्हणून तुला काय करायचं ते मी सांगणार नाही तुला पूर्ण अधिकार आहे तुझा आयुष्यामध्ये तुला काय निर्णय घ्यायचा ते. निकिता हे शब्द ऐकून खूप रडू आलं. 

पण आई - शांताबाई काय म्हणतील ?

त्यांचं टेन्शन तू नको घेऊस.. मुळात एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री ला उभं करण्यात मदत केली पाहिजे .. पण आपल्या समाजात सुनेला कसं कमी ठरवायचं ह्यातच आयुष्य निघून जात.

वेळ बदलत चाललाय, आधी कठोर , खडूस असणारी सासू आता बदलत चाललीये. मुळात मॉडर्न सून घरात आणणं म्हणजे अवघड काम आहे बघ.. कारण मी जेंव्हा शांताबाईकडे बघते तेंव्हा त्यांनी  मला जशी वागणूक दिली तेच मनात ठेवत मी सासू झाले.... पण मी हे मात्र विसरले कि माझी सून तर माझ्यापेक्षा २० वर्षाने लहान मग एवढा फरक पडणार च ना.. मुळात सासू म्हणजे आपली आई असा समजलं तर सगळे राग-रुसवा निघून जातो. पण समाजात आजपर्यंत ऐकलेल्या सासू-सुनेचं भांडण आणि प्रेत्येक व्यक्ती मध्ये असलेली अहंकार ह्या २ गोष्टी सासू- सुनेचं नातं खराब करतात.

मॉडर्न सून आणायची म्हणजे सासू ने सुद्धा समजून घ्यायला हवं आणि तेवढच सुनेने सुद्धा. फक्त आपल्या सासूने आपल्यलाला कशी वागणूक दिली तशी वागणूक सुनेला दिलीत तर आजकालच्या सुना १ दिवस सुद्धा घरात राहणार नाहीत. 

 वेळेनुसार बदललं पाहिजे. पण आपल्या मर्यादा लक्षात ठेऊनच. शेवटी एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री ला मदत केली तरच ते तुम्ही म्हणतात ना " woman एम्पॉवरमेंट" ते होणार.. 

आता जा आणि शांताबाईंना ठामपणे सांग. "अक्का, मी आज तुमच्या धाकाखाली मुलाला जन्म दिला तर त्याला पुढे जाऊन एक उत्कृष्ट व्यक्ती कसा बनवणार? स्वाभिमानी कस बनवणार?

शिवाजी महाराज शिवाजी राजे बनले कारण जिजाऊंच्या कुशीत ते वाढले होते. जिजाऊ घाबरून राहिल्या असत्या तर शिवजी इतके पराक्रमी झालेच नसते..

निकिता च्या चेहऱ्यावर आता विशेष चमक आली होती, तिच्या स्वप्नांनी तिचे डोळे पुन्हा भरारी घेत होते.

आणि मनातल्या मनात तिने आपल्या पहिल्या हॉटेल ला आपल्या सासूबाईंचं नाव द्यायचं  अस ठरवलं .

कदाचित सगळ्यांना निकिता सारखी सासू मिळाली तर स्त्रियांना स्वाभिमान आणि कर्तृत्व हे जपण्यापासून कोणी रोकु शकणार नाही..

आज हा लेख वाचणाऱ्या सर्व स्त्रियांना एकच सांगते - तुमच्या आयुष्यात  अश्या अनेक स्त्रिया आहेत ज्या तुम्हाला  प्रेरणा देतात आणि अश्याही आहेत कि ज्यांना तुमच्या प्रेरणेची गरज आहे. 

🎭 Series Post

View all