तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
गगन ही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे वसावे
मी - मी एक स्त्री म्हणून जगावे की एक माणूस म्हणून हे फक्त मी
आणि मीच ठरवावे. कारण स्त्री सुद्धा एक माणूस असते व तिला
सुद्धा जगण्याची कला अवगत असते हे कदाचित कधीकधी आपण
विसरलेले असतो व नकळत कुुठून शब्द कानी पडतात स्त्रीयांचे
सबलीकरण,सक्षमीकरण....ती कधी अबला होती की तिला
सबलीकरणाची गरज निर्माण व्हावी. ती केव्हा सक्षम नव्हती की
तिला सक्षमीकरणाची गरज निर्माण व्हावी. आपला इतिहास
आपल्याला साक्षीदार आहे स्त्री कालही सक्षम होती,आजही सक्षम
आहे आणि उद्याही किंबहूना येणाऱ्या काळात स्त्रीप्रधान संस्कृतीतून
अधिकाधिक सक्षम होणार......हो ती होणारच.
मी म्हणून मला माझा काल, आज आणि उद्या जर मांडायचा
तर मी तो मातृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्व असा एका स्त्रीचा प्रवास
असेल.तिच्या मातृत्वाचा, तिच्या कर्तुत्वाचा व तिच्या नेतृत्वाचा हा
प्रवास कालही कठीण होता आजही कठीण आहे आणि येणाऱ्या
काळात तो अधिकच कठीण होत जाईल पण आपला इतिहास
आपल्याला साक्ष देतो ती स्वराज्य विचार संकल्पक,कर्तव्यदक्ष
प्रशासक, थोर मुत्सद्दीराजकारण धुरंधर राष्ट्रमाता राजमाता
जिजाऊ,अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांतीज्योत
सावित्रीआई,बहाद्दूर योद्धा व कुशल प्रशासक विरांगणा अहिल्याआई
यांच्या पराक्रमाची.
जगात कठीण असे काहीच नाही आपण येणाऱ्या अडचणींचा
कशाप्रकारे सामना करतो व त्यातून अचूक मार्ग काढतो हे
महत्वाचे.येणारा काळ अनेक आव्हाने घेऊन येणार आहे पण आपण
भूतकाळात व वर्तमानातील पेललेल्या आव्हानांपेक्शा नक्कीच
कठीण नसेल. उद्याच्या नवीन अविष्कारांसाठी मला आजच तयार व्हावी लागणार आहे.
आपल्यातील कलागुणांना विज्ञानाची जोड दिली. संगणक युगाशी
सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन मैत्री केली तर आणि तरच भविष्यातील
येणारी आव्हाने आपण समर्थपणे पेलू शकूू हा आजच्या मी ला
आत्मविश्वास असायला हवा. हा आत्मविश्वास मी एक स्त्री म्हणून
ज्यादिवशी मिळवेल तो प्रत्येक दिवस माझ्याकरीता महिला दिन
असेल असे प्रत्येक स्त्रीने ठरविले तर येणारा काळ हा स्त्रीप्रधान
संस्कृतीचा असेल व या मी ला कुठलाही दिवस तिच्याकरीता साजरा
करावा लागणार नाही रोजचा दिवस तिचा असेल.
संकटासही ठणकावून सांगावे
आता ये बेहत्तर
नजररोखूनी नजरे मध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तू खचू नकोस
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा