तुझ्यातली ती आणि तो

The Peom Describes About The Girl Who Is Not Clear With Things Happening In Her Life. Wherein Her Expectations Leading Her Towards Negativity. Expecting A Lot In Return There Is No Efforts May Lead To Worst Situation. How Not To Take Granted Partner.

तुझ्यातली ती आणि तो

@पूजा आडेप

जर तुम्ही दुःखी असाल तर कोणी सर्वस्व का त्यागेल? 

आणि 

जर त्याला वेदना होत असतील तर तुम्ही काय कराल? 


मला खूप प्रेम देणारी आणि काळजी घेणारी व्यक्ति पाहिजे म्हणताना,

तुम्ही त्या व्यक्तिसाठी काय करायची तयारी ठेवलीय? 


मी वाट पाहून थकले,मी नाही शोधणार म्हणताना,

त्यालाही असेच वाटत असेल का? असा विचार करून बघ. 


बघितल्या बरोबर नाती जुळतीलच असे नाही. देऊन थोडा वेळ,

घेऊनी पहिला पुढाकार तू, त्याचा अनपेक्षित आनंद टिपून बघ! 


नको करूस अपेक्षा दुसर्‍यांकडे बघून की, 

मलाही हेच त्याने करावे. 

तो जे काही करेल त्यात आनंद मानून बघ!


थोडा विचार करून, थोडेसे आत्मचिंतन करून बग,

तुझ्या मधल्या ती सोबतच कदाचित तो सुद्धा सापडेल. 


झाले गेले विसरून जावे, पुढच्या क्षणाचे आनंद घ्यावे. 

बाकी? 

आयुष्य सुंदर आहे आणि आणखी सुंदर जगावे!


@पूजा आडेप.