Login

पंख प्रगतीचे

प्रगतीचे पंख!
"पंख प्रगतीचे"

पंख प्रगतीचे मिळे
फक्त त्यात बळ हवे
पराभव आल्यावर
करू परिश्रम नवे

नकारात्मकता सोडू
धरू निर्धाराची कास
पुढे जाण्यास तयार
लागे जिंकण्याची आस

उडण्यास आकाशात
सर्व कष्ट घेवू पुन्हा
अहंकार बाळगून
करणार नाही गुन्हा

सातत्याची पारायणे
नित्यपणे आम्ही करू
पूर्ण आत्मविश्वासाने
विजयाचे पाणी भरू

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all