Feb 24, 2024
माहितीपूर्ण

विल्यम शेक्सपियर माहिती

Read Later
विल्यम शेक्सपियर माहिती
विल्यम शेक्सपिअर

इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी व नाटककार

विल्यम शेक्सपिअर (इंग्लिश: William Shakespeare) (२३ एप्रिल, इ.स.१५६४ ) - २३ एप्रिल, इ.स. १६१६) हा इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी, नाटककार आहे. याने लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. शेक्सपिअरच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत. आणि त्यांचे प्रभाव मराठी साहित्यिकांवर असलेले आपल्याला पाहायला मिळतो.


जन्म नाव विल्यम शेक्सपिअर

जन्म 23 एप्रिल, इ.स.१५६४ (जन्मदिनांक बहुधा 23 एप्रिल १५६४)

मृत्यू २३ एप्रिल, इ.स.१६१६

कार्यकाळ
इ.स.१५९० ते इ.स.१६१२


जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते.आणि त्यांना "फादर ऑफ ड्रामा" असेही म्हटले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.


*जीवन

विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म इंग्लंड देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अ‍ॅव्हन या गावात इ.स. १५६४साली झाला. त्यांचे वडील जॉन हे स्ट्रॅटफोर्ड गावातील एक व्यापारी होते तर रॉबर्ट आर्डेन नामक एका जमीनदाराची कन्या मेरी ही विल्यमची आई.

वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात लॅटिन भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, फ्रेंच आणि इटालियन भाषाशिक्षणासह चर्चमधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई. मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.

इ.स. १५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे मोठ्या असलेल्या अ‍ॅन हॅथवे नावाच्या मुलीशी लग्न केले. इ.स. १५८५ साली त्याने आपले गाव सोडून लंडन गाठले. तेथे लॉर्ड चेंबरलेन यांच्या 'किंग्ज मेन' या नाटक कंपनीत एका कलाकाराच्या जागेवर विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले. हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकांत बदल करायला सुरुवात केली, आणि नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली.


*नाटकीय कारकीर्द

१५८५ पासून शेक्सपिअरची नाट्यकारकीर्द सुरू झाली असे म्हणता येते. त्याने पहिले नाटक केव्हा लिहिले याबद्दल अभ्यासकांत एकमत नाही. काही काळ नाटकात नट, लेखक अशी उमेदवारी केल्यावर १५९४ साली शेक्सपिअरने आपल्या काही मित्रांसमवेत Lord Chamberlain’s Men या नावाची एक नाट्यसंस्था निर्माण केली. या संस्थेतर्फेच त्याची नाटके प्रथम रंगमंचावर आली. शेक्सपियरची सुरुवातीची नाटके विनोदी किंवा ऐतिहासिक होती. त्या नाटकांतून तो स्वतःदेखील अभिनय करायचा. लवकरच तो अतिशय लोकप्रिय नाटककार म्हणून ओळखला जाऊ लागला. तसेच त्याला "बार्ड ऑफ एव्हन किंवा अ‍ॅव्हन" ('बार्ड' कविता लिहिणारा) या नावानेही ओळखले जाते. या काळात तो अधूनमधून नाटकात भूमिकाही करीत असे. नाटकाने त्याला केवळ कीर्ती व लोकप्रियताच मिळवून दिली असे नव्हे, तर भरपूर पैसाही मिळवून दिला. त्याने एकंदरीत अडतीस नाटके लिहिली. याशिवाय १५४ सुनीते, दोन दीर्घ कविता आणि काही स्फुट कविता अशी त्याची साहित्यसंपदा आहे.

त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवात केली.

हळूहळू नाटकांची प्रसिद्धी वाढत गेली, विल्यम शेक्सपिअर यांचे उत्पन्न वाढत गेले. ग्लोब थिएटर नावाच्या नाट्यगृहाचे ते भागीदार झाले. नाटकांना व्यवसायाचे साधन मानणारे विल्यम शेक्सपिअर स्वतःची नाटके या नाट्यगृहात करू लागले. आता मिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढले. इ.स. १६०५ पर्यंत तो स्टॅटफोर्डमधील अत्यंत श्रीमंत व्यक्तींपकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला होता.

इ.स. १६१० साली शेक्सपिअर पुन्हा आपल्या स्ट्रॅटफोर्ड गावात येऊन राहू लागले, ते कामापुरतेच लंडनला जात येत असत. इ.स. १६१६ साली स्ट्रॅटफोर्ड या गावातच विल्यम शेक्सपिअर यांनी शेवटचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला.

*शेक्सपियरची लेखनशैली

शेक्सपियरची प्रारंभिक नाटके त्या दिवसाच्या प्रमाणित शैलीत लिहिली जात होती. त्याने त्यांना अत्यंत कृत्रिम भाषेत लिहिले जे पात्रांच्या किंवा नाटकाच्या आवश्यकतेनुसार नैसर्गिकरित्या कायमस्वरुपी होत नाही.

कविता विस्तारित, सामान्यत: विस्तृत रूपक आणि कल्पनांवर अवलंबून असते आणि भाषा सामान्यत: वक्तृत्वहीन असते – कलाकार बोलण्याऐवजी घोषित करण्यासाठी लिहिल्या जातात. टायटस अँड्रॉनिकसमधील काही भाषणे, काही टीकाकारांच्या वाचनात, सामान्यत: कारवाई पुढे ढकलली जाते, उदाहरणार्थ; वेरोना मधील 2 जेंटलमॅनमधील श्लोक अनैसर्गिक म्हणून दर्शविले गेले आहे

तथापि, विल्यम शेक्सपियरने फार पूर्वी त्याच्या स्वतःच्या कार्यात सामान्य डिझाइन रूपांतर करण्यास सुरुवात केली. रिचर्ड तिसराच्या प्रारंभिक बोलण्याचा मूळ मध्ययुगीन नाटकातील उप-घोषणेच्या आत आहे.

एकसारख्या वेळी, रिचर्डची स्पष्ट ज्ञान शेक्सपियरच्या परिपक्व नाटकांच्या बोलण्याकडे दिसते. एकाही नाटकात सामान्य व फ्रीर व्हॉगमध्ये बदल करण्याची चिन्हे नाही. विल्यम शेक्सपियरने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 2ची जोड दिली, रोमिओ आणि ज्युलियट हे डिझाइन एकत्रित करण्याचे सर्वात प्रभावी उदाहरण असू शकतात. रोमियो आणि ज्युलियट, रिचर्ड दुसरा आणि 15 जूनच्या मध्यभागी 21 जूनच्या रात्रीचे स्वप्न झाल्यावर विल्यम शेक्सपियरने अतिरिक्त नैसर्गिक कविता लिहिण्यास सुरुवात केली होती. त्याने अधिकाधिक अधिकाधिक नाटकांच्या आवडीनुसार आपली रूपके आणि चित्रे गाठली.
*शेक्सपिअरचे वाङ्‌मय

विल्यम शेक्सपियरच्या काळात त्याच्या काळात नीट प्रकाशित झाले नव्हते. त्यामुळे त्याच्याबाबत बरेच तर्कवितर्क होत असत. शेक्सपियरबरोबर 'किंग्ज मेन' कंपनीत काम करणाऱ्या जॅन हेमिंग्ज आणि हेन्‍री काँडेल या त्याच्या दोन मित्रांनी शेक्सपियर वारल्यनंतर तीन वर्षांनी त्याचे लिखाण एकत्र करून प्रकाशित केले. लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीकडे त्या दोघांनी प्रकाशित केलेल्या लिखाणाची एक प्रत आहे. रसिकांसाठी ही प्रत मुंबईच्या म्युझियममध्ये काही काळासाठी एका खास दालनात ठेवली होती.

शेक्सपियरच्या लिखाणांत काव्ये आणि नाटके येतात. मराठीमध्ये, परशुराम देशपांडे यांनी ’राजहंस एव्हनचा-शेक्सपिअर’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या दोन पुस्तकांच्या संचात शेक्सपिअरच्या जीवनाचा कादंबरी स्वरूपात वेध घेतला आहे. हे कॉन्टिनेन्टलचे प्रकाशन आहे.

*काव्ये

शेक्सपिअरने अनेक (१२+२=चौदा ओळी कविता) सुनीते (sonnets) लिहिली आणि त्यांशिवाय अनेक दीर्घकाव्ये. त्यांतील काही दीर्घकाव्ये ही अशी :-

अ लहर्स कंप्लेन्ट

द पॅशनेट पिल्ग्रिम

द रेप ऑफ ल्यूक्रेसी

व्हीनस अँड अ‍ॅडॉनिस
*नाटकांचे वर्गीकरण

त्याच्या ३८ नाटकांपकी १० ऐतिहासिक नाटके आहेत, १६ सुखात्मिका आहेत तर १२ शोकात्म नाटके आहेत. त्याची अगदी प्रारंभीची नाटके म्हणून ‘रिचर्ड तिसरा’ व ‘हेन्‍री सहावा’ ही ऐतिहासिक नाटके ओळखली जातात. त्याच्या अनेक नाटकांच्या नेमक्या लेखनवर्षांबद्दल मतभेद असले तरी सर्वसाधारणपणे ‘टायटस अ‍ॅड्रोनिकस’, ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ व ‘टेमिंग ऑफ द श्ऱ्यू’ ही नाटके त्याच्या उमेदवारीच्या काळातील मानली जातात. या सुरुवातीच्या नाटकावर थॉमस किड आणि ख्रिस्तोफर मार्लो या त्या काळी अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या नाटककारांचा प्रभाव दिसून येतो. मात्र लवकरच शेक्सपिअर या प्रभावातून मुक्त झाला.

*शोकांतिका(शोकात्मिका)

शेक्सपिअरच्या ‘रोमिओ ॲन्ड ज्युलिएट’ या शोकांतिकेपासूनच त्याला नवीन वाट सापडली असे म्हणता येते. कोवळ्या प्रेमाचे हृदयाला हात घालणारे, अत्यंत प्रभावी व उत्कट दर्शन, काव्यसौंदर्य आणि चटका लावणारा दैवदुर्विलास वर्णन करणारी कथा यामुळे हे नाटक अत्यंत लोकप्रिय ठरले. या नाटकाचा प्रभाव एवढा होता, की काही काळानंतर लोक रोमिओ व ज्युलिएट या खऱ्या व्यक्ती आहेत असेच समजू लागले, आणि आजही समजतात.
१५९९ च्या सुमारास शेक्सपिअरने लिहिलेली आणखी एक श्रेष्ठ शोकांतिका ‘ज्युलियस सीझर’ ही आहे. नायकाच्या मनातील आंतरिक संघर्षांतच शोकात्मिकेचे बीजारोपण होते हे तत्त्व शेक्सपिअरने याच नाटकात प्रथम मांडले व नंतर त्याचा विस्तार अनेक नाटकांतून केला. ब्रूट्सच्या मनात मित्रप्रेम मोठे की स्वातंत्र्यप्रेम हा संघर्ष निकराला आला होता. यातूनच नाटकामधील पुढील शोकांतिका घडली.
‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लिअर’, ‘मॅकबेथ’ आणि ‘अ‍ॅन्टनी ॲन्ड क्लिओपाट्रा’ या नाटकांतून शेक्सपिअरच्या प्रतिभेचे अत्युच्च दर्शन घडते. १६०१ ते १६०८ या दरम्यान लिहिलेल्या या शोकांतिका एकाहून एक अधिक भीषण व यातनांचे वर्णन करणाऱ्या आहेत. विश्वासघात, कपटकारस्थाने, सूड, मत्सर, व्यभिचार, राक्षसी महत्त्वाकांक्षा यांचे विकराळ दर्शन त्याने या नाटकांतून घडविले आहे. पण त्याबरोबर श्रेष्ठ मानवी मूल्ये, नियती, ईश्वरी न्याय व मृत्युचिंतन यांचाही नाटककाराने येथे सूक्ष्म विचार केला आहे असे जाणवते.*नाटके


शेक्सपिअर यांनी ३६ नाटके स्वतंत्रपणे आणि पेरिक्लिस नावाचे एक नाटक संयुक्तपणे लिहिले. त्यांच्या नाटकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते :

निव्वळ कल्पनारम्य नाटके

अ मिडसमर नाइट्स ड्रीम

अ‍ॅज यू लाइक इट

ट्वेल्फ्थ नाइट

द टू जेन्टलमेन ऑफ व्हेरोना

लव्ह्‌ज लेबर्स लॉस्ट

गंभीर नाटके

ऑलिज्‌ वेल दॅट एन्ड्‌ज वेल

मच अ डू अबाउट नथिंग

मेझर फॉर मेझर

*वस्तुस्थितीवर आधारलेली नाटके किंवा प्रहसने

द टेमिंग ऑफ द श्ऱ्यू

द मेरी वाइव्ह्‌ज ऑफ विंडसर

*शोकांतिका

ऑथेल्लो

किंग लियर

कोरिओलेनस

मॅकबेथ

रोमियो अँड ज्यूलिएट

हॅम्लेट

*प्रणयरम्य नाटके
द टेंप्टेस्ट

द विंटर्स टेल

सिंबेलाईन

ऐतिहासिक

दुसरा रिचर्ड

तिसरा रिचर्ड

चौथा हेन्‍री

पाचवा हेन्‍री

आठवा हेन्‍री

*रोमन ऐतिहासिक नाटके :

अ‍ॅन्टनी अँड क्लिओपाट्रा

कोरिओलेनस

ज्यूलियस सीझर

शेक्सपिअरच्या नाटकांवर बेतलेल्या आणि जागतिक साहित्यात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या (१ल्या) दहा कादंबऱ्या आणि त्यांचे लेखक

अ थाऊजंड एकर (जेन स्मायली)

केक्स अँड अले (सॉमरसेट मॉम)

द टॅलेंटेड मिस्टर रिप्ले (पॅट्रेशिया हायस्मिथ)

द डॉग्ज ऑफ वॉर (फ्रेडरिक फोर्सिथ)

द डॉटर ऑफ टाइम (जोसेफाइन टे)

द ब्लॅक प्रिन्स (आयरिश मर्डोक)

ब्रेव न्यू वर्ल्ड (आल्डस हक्सले)

मोबी डिक (हर्मन मेल्व्हिल)

लव्ह इन वाइल्डनेस (अमांडा क्रेग)

वाईज चिल्ड्रन (अँजेला कार्टर)

*शेक्सपिअरच्या नाटकांवरून बनलेले चित्रपट

लॉरेन्स ऑलिव्हिए यांचा ’हॅम्लेट’ (१९४८)

अंगूर (संजीवकुमार याची मुख्य भूमिका असलेला गुलझार दिग्दर्शित हिंदी चित्रपट)

मक्बूल (हिंदी चित्रपट)

ओमकारा (हिंदी चित्रपट)

*शेक्सपिअरच्या नाटकांची मराठी रूपांतरे आणि त्यांचे लेखक

अ‍ॅज यू लाइक इट :
१. अगदी मनासारखं (इ.स. १९५७) द.के. भट
२. संगीत प्रेमगुंफा (इ.स. १९०८) दामोदर नेवाळकर
३. (नांव?)(सन?) अजय आरोसकर
४. प्रेमगुंफा ([[प्रा. वा.शि. आपटे)

अ‍ॅन्टनी अँड क्लिओपात्रा :
१. वीरमणी आणि शृंगारसुंदरी (इ.स. १९८२) वासुदेव बा. केळकर
२. प्रतापराव आणि मंजुळा (इ.स. १८८२) ए.वि. मुसळे
३. संगीत शालिनी(?) (इ.स. १९०१) के.वि. करमरकर
४. संगीत ताराविलास(?) (इ.स. १९०४) द.अ. केसकर
५. मोहनतारा(?) (इ.स. १९०८) के.रा. छापखाने
६. ॲन्टनी व क्लिओपात्रा ([[प्रा. वा.शि. आपटे)

ऑथेल्लो:
१. ऑथेल्लो (इ.स. १८६७) महादेवशास्त्री कोल्हटकर
२. झुंझारराव (इ.स. १८९०) गोविंद बल्लाळ देवल
३. ऑथेल्लो (इ.स. १९४७) इंदुमती जगताप
४. ऑथेल्लो (सन?)अजय आरोसकर
५. ऑथेल्लो (इ.स. १९६५) विष्णू वामन शिरवाडकर
६. ओमकारा (हिंदी चित्रपट)


ऑल इज वेल दॅट एन्ड्ज वेल :
१. वल्लभानुनय (इ.स. १८८७) विष्णू मोरेश्वर महाजनी
२. संगीत प्रियराधन (इ.स. १९१३) वा.स.पटवर्धन
३. शेवटी गोड ते सर्वच गोड ([[प्रा. वा.शि. आपटे)

ए कॉमेडी ऑफ एरर्स
१. भुरळ अथवा ईश्वरीकृत लपंडाव (इ.स. १८७६) आ.वि. पाटकर
२. भ्रांतिकृत चमत्कार (इ.स. १८७८) ब.रा.प्रधान आणि श्री.भि. जठार
३. गड्या अपुला गाव बरा (इ.स. १९५९) शामराव नीळकंठ ओक
४. अंगूर (इ.स. १९८२) गुलझार-दिग्दर्शित हिंदी चित्रपट
५. काॅमेडी ऑफ एरर्स ([[प्रा. वा.शि. आपटे)

किंग जॉन :
१. कपिध्वज (इ.स. १९०४) ल.ना. जोशी
२. किंग जाॅन ([[प्रा. वा.शि. आपटे)

किंग रिचर्ड द सेकंड :
१. किंग रिचर्ड द सेकंड ([[प्रा. वा.शि. आपटे)

किंग लियर :
१. अतिपीडचरित (इ.स. १८८१) शंकर मो. रानडे
२. कन्यापरीक्षण (इ.स. १८८१) गो.स. मोरे
३. विकारविहार (इ.स. १८८१) ल.ना. जोशी
४. सम्राट सिंह (इ.स. १९७३) प्र.के. अत्रे
५. राजा लिअर (इ.स. १९७४) विंदा करंदीकर : २३ एप्रिल २०१६ रोजी कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात येथे 'राजा लिअर' नाटकाचा प्रारंभाचा प्रयोग झाला. पुढेही प्रयोग होत राहिले.
६. नटसम्राट (इ.स. १९०७) विष्णू वामन शिरवाडकर
७. किंग लियर (सन?) द.म. खेर
८. शेक्सपियरचा म्हातारा (इ.स. २०१६) (मकरंद देशपांडे)
९. किंग लियर ([[प्रा. वा.शि. आपटे)

किंग हेन्‍री द सिक्स्थ भाग १,२, ३ :
१. राजा रघुनाथराव (इ.स. १९०४) हणमंत बा. अत्रे
२. किंग हेन्‍री द सिक्स्थ ([[प्रा. वा.शि. आपटे)

किंग हेन्‍री द फिफ्थ :
१. पंचम हेनरी चरित (इ.स. १९११) खंडेराव भिकाजी बेलसरे
२. किंग हेन्‍री द फिफ्थ ([[प्रा. वा.शि. आपटे)

किंग हेन्‍री द फोर्थ भाग १, २, ३, 4 :
१. बंडाचे प्रायश्चित्त (इ.स. १९१५) नारायण ग. लिमये
२. किंग हेन्‍री द फोर्थ ([[प्रा. वा.शि. आपटे)

कोरिओलेनस :
१. कोरिओलेनस (गोविंद वासुदेव कानिटकर)
२. कोरोओलियनस ([[प्रा. वा.शि. आपटे)

ज्युलियस सीझर :
१. विजयसिंह (इ.स. १८७२) काशीनाथ गो. नातू
२. ज्युलियस सीझर (इ.स. १८८३) रामकृष्ण ता.पावसकर
३. ज्युलियस सीझर (इ.स. १९१३) खंडेराव भिकाजी बेलसरे
४. ज्युलियस सीझर (इ.स. १९५९) मा.ना. कुलकर्णी
५. ज्युलियस सीझर (इ.स. १९७४) अनंत अंबादास कुलकर्णी
६. ज्युलियस सीझर (सन?) भा.द. खेर
७. ज्युलियस सीझर (२००२) मंगेश पाडगावकर
८. ज्युलियस सिझर ([[प्रा. वा.शि. आपटे)

टायमन ऑफ अ‍ॅथेन्स :
१. टायमन ऑफ अ‍ॅथेन्स (इ.स. १८९६) चिं.अ. लिमये
२. विश्वमित्र (सन?) रा.सा. कानिटकर
३. टायमन ऑफ अ‍ॅथेन्स (गोविंद वासुदेव कानिटकर)
४. अथेन्सचा टिमाॅन ([[प्रा. वा.शि. आपटे)

टू जंटलमेन ऑफ व्हेरोना :
१. स्त्रियांचे नेत्रकटाक्ष (इ.स. १८८५) द.वि. मराठे
२. कालिंदी कांतिपूरचे दोन गृहस्थ (इ.स. १८९८) दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ अनंततनय
३. व्हेराॅनचे दोन सद्गृहस्थ (प्रा. वा.शि. आपटे)

टेंपेस्ट :
१. टेंपेस्ट (इ.स. १८७५) रावबहादुर नीलकंठ जनार्दन कीर्तने
२. तुफान (इ.स. १९०४) खंडेराव भिकाजी बेलसरे
३. तुफान (?) रामराव बाळकृष्ण कीर्तिकर
४. मुक्त मरुता (सन?) भा.वि. वरेरकर, शशिकला वझे
५. शेक्सपियरचे द टेम्पेस्ट (परशुराम देशपांडे)
६. वादळ मंगेश पाडगावकर

टेमिंग ऑफ द श्ऱ्यू :
१. ? (इ.स. १९०१) स.प. पंडित
२. संगीत चौदावे रत्‍न ऊर्फ त्राटिका (इ.स. १९२४) वा.बा. केळकर
३. कर्कशादमन (इ.स. १९५७) ज.त्रि. जोगळेकर
४. टेमिंग ऑफ द श्ऱ्यू ([[प्रा. वा.शि. आपटे)

ट्रॅजेडी ऑफ किंग रिचर्ड द थर्ड :
१. जयाजीराव (इ.स. १८९१) भा.रा. नानल
२. दैवदुर्विलास (इ.स. १९०४) वासुदेव पु.साठे
३. राजा राक्षस (सन?) कृ.ह. दीक्षित

टायटस ॲड्रानिकस :
१. टायटस ॲड्रानिकस ([[प्रा. वा.शि. आपटे)
ट्रोलिस व क्रिसिडा (Troilus and Cressida) :
१, ट्रोलिस व क्रिसिडा ([[प्रा. वा.शि. आपटे)
ट्वेल्फ्थ नाइट :
१. वेषविभ्रम नाटक (इ.स. १८९१) कृ.प. गाडगीळ
२. भ्रमविलास (इ.स. १९१३) बळवंत ह.पंडित
३. प्रेमविनोद (इ.स. १९१९) अनंत वि. आपटे आणि ता.ने. पांगळ
४. वाग्विलास (इ.स. १९२८) विष्णू ग.जोशी
५. ट्वेल्थ नाइट (सन?) शशिकला बेहेरे
६. संगीत मदनाची मंजिरी (इ.स. १९६५) विद्याधर गोखले
७. पिया बेहेरूपिया-भारतीय लोककलेच्या अंगाने केलेले स्वैर हिंदी रूपांतर (इ.स. २०१२) : अमितोष नागपाल
८. बारावी रात्र ([[प्रा. वा.शि. आपटे)

पेरिक्लीज :
१. सुधन्वा (इ.स. १८८३) कृ.वा. फडके
२. प्रतापमुकुट (सन?) ब.रा. पाटील
३. पेरिक्लिस ([[प्रा. वा.शि. आपटे)

मॅकबेथ :
१. डाकिनी विलास (इ.स. १९१९) ल.ना. जोशी
२. मानाजीराव (इ.स. १९१८) शिवराम महादेव परांजपे
३. राजमुकुट (इ.स. १९५४) वि.वा.शिरवाडकर
४. मॅकबेथ (सन?) अजय आरोसकर
५. मक्बूल (हिंदी चित्रपट)

मच अ डू अबाउट नथिंग :
१. रजाचा गज (इ.स. १९०६) पांडुरंग गं. लिमये
२. विरोधाभास (सन?) पां.वा.सहस्रबुद्धे आणि भा.द.खेर
३. नसत्याचा नगारा ([[प्रा. वा.शि. आपटे)

मर्चंट ऑफ व्हेनिस :
१.मोहनाची अंगठी (इ.स. १८९९) द.गो. लिमये
२. संगीत प्रणयमुद्रा (इ.स. १९०५) विठ्ठल सीताराम गुर्जर
३. व्हेनिस नगरचा व्यापारी (इ.स. १९१०) खंडेराव भिकाजी बेलसरे
४. व्हेनिस नगरचा व्यापारी (सन?) दा.न. शिखरे
५. संगीत सौदागर (सन?) मोहन आगाशे
६. स्त्री न्यायचातुर्य (सन?) आत्माराम वि.पाटकर
७. मर्चंट ऑफ व्हेनिस (गोविंद वासुदेव कानिटकर)
८. व्हेनिसनगरचा व्यापारी ([[प्रा. वा.शि. आपटे)

अ मिडसमर नाइट्स ड्रीम :
१. मधुयामिनी स्वप्नदर्शन (इ.स. १८८७) कृष्णाजी नारायण आठल्ये
२. थोडक्यात चुकलं (इ.स. १८८९) ग.गो. तळवलकर
३. संगीत प्रेममकरंद (इ.स. १९०४) अनंत ना. उकिडवे
४. मधुयामिनी स्वप्नदर्शन (इ.स. १९१३) खंडेराव भिकाजी बेलसरे
५. ऐन वसंतात अर्ध्या रात्री (सन?) राजीव नाईक
६. मधुयामिनी स्वप्नदर्शन ([[प्रा. वा.शि. आपटे)
७. जादू तेरी नजर (सुयोगनिर्मित मराठी नाटक)

द मेरी वाइव्ह्ज ऑफ विंडसर :
१. चतुरगडच्या विनोदी स्त्रिया - एक पाच अंकी प्रहसन (इ.स. १९०५) पांडुरंग गंगाधर लिमये
२. चतुरगडच्या विनोदी स्त्रिया ([[प्रा. वा.शि. आपटे)

मेझर फॉर मेझर :
१. संगीत सुमती (इ.स. १९०४) श.वि. कुलकर्णी
२. समान शासन (इ.स. १९१०) दामोदर वि .नेवाळकर
३. सुमतिविजय (इ.स. १९११) ह.ना. आपटे
४. संगीत झोटिंगशाही (?) वीर वामनराव जोशी
५. मेझर फाॅर मेझर ([[प्रा. वा.शि. आपटे)

रोमियो अँड ज्युलियेट:
१. संगीत ताराविलास (इ.स. १९०४) दत्तात्रय केसकर
२. प्रतापराव आणि मंजुळा (सन?) एकनाथ मुसळे
३. प्रेमाचा कळस/रोमिओ ज्युलिएट (इ.स. १९०८) खंडेराव भिकाजी बेलसरे
४. शशिकला आणि रत्‍नपाल (सन?) नारायण कानिटकर
५. संगीत शालिनी (इ.स. १९०१) तुकाराम जावजी (?)
६. रोमियो आणि ज्यु्लिएट (२००३) मंगेश पाडगावकर
७. रोमिओ व ज्युलिएट ([[प्रा. वा.शि. आपटे)
८. गोलिओंकी लीला रासलीला (संजय लीला भन्सालीनिर्मित हिंदी चित्रपट)

लव्ह्ज लेबर्स लाॅस्ट :
१. लव्ह्ज लेबर्स लाॅस्ट ([[प्रा. वा.शि. आपटे)

द विंटर्स टेल :
१. संगीत मोहविलसित (इ.स. १९८१-८२) विष्णू मोरेश्वर महाजनी
२. संगीत संशयसंभ्रम (इ.स. १८९५) गजानन चिं. देव
३. संगीत विकल्पविमोचन (इ.स. १९०८) दामोदर वि. नेवाळकर
४. मोहविलसित ([[प्रा. वा.शि. आपटे)

सिंबेलाईन :
१. तारा नाटक (इ.स.१८८८) विष्णू मोरेश्वर महाजनी
२.? (?) ल.ग.देव
३. तारा ([[प्रा. वा.शि. आपटे)

हॅम्लेट :
१. विकारविलसित (इ.स. १८८३) गोपाळ गणेश आगरकर (प्रमुख भूमिका - गणपतराव जोशी)
२. वीरसेन (इ.स. १८८३) गोविंद वासुदेव कानिटकर
३. हिंमत बहाद्दूर (इ.स. १८८३) आनंद स. बर्वे
४. हॅम्लेट (इ.स. १९५६) नाना जोग (प्रमुख भूमिका - दामू केंकरे)
५. हॅम्लेट (इ.स. १९६२) भा.द.खेर
६. हॅम्लेट (डेन्मार्कचा युवराज) (इ.स. २०१३) परशुराम देशपांडे (प्रमुख भूमिका - मंदार कुलकर्णी)
७. हॅम्लेट (?) नानासाहेब फाटक (प्रमुख भूमिका - नानासाहेब फाटक)
८. संक्षिप्त हॅम्लेट (इ.स. २०१३) (निर्माते ’नाट्यद्वयी’चे सई परांजपे आणि अरुण जोगळेकर)
९. ’जागर’ प्रस्तुत दोन अंकी हॅम्लेट (११ मार्च, इ.स. २०१३) परशुराम देशपांडे
९. विल्यम शेक्सपिअरकृत हॅम्लेट (प्रभाकर देशपांडे)
१०. शेक्सपियरचे हॅम्लेट (शेक्सपिअरच्या नाटकाची दोन अंंकी मराठी संक्षिप्त रंगावृत्ती)
११. झी मराठी प्रस्तुत हँम्लेट (रूपांतरकार-नाना जोग) (सन २०१८)
१२. हॅम्लेट (गोविंद वासुदेव कानिटकर)
ऑथेल्लो+किंग लियर+मॅकबेथ+हॅम्लेट :
१. गगनभेदी (सन?) विष्णू वामन शिरवाडकर


गोविंद वासुदेव कानिटकर यांनी शेक्सपिअरच्या ’हॅम्लेट’व्यतिरिक्त ’टायमन ऑफ अथेन्स’, ’कोरिओलेनस’, व ’मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचेही मराठी अनुवाद केले आहेत.
शेक्सपिअरच्या वाङ्मयाचे अभ्यासक प्रभाकर देशपांडे

शेक्सपिअरची ३७ नाटके, पण त्यात ओळी किती? ७३ वर्षांच्या प्रभाकरराव देशपांडे ( १९४२) यांच्याकडे यांसह अशा सर्व बाबींची नोंद आहे. हा जगविख्यात नाटककार तिकडे लिहीत होता, तेव्हा मराठी मुलखात काय चालले होते? देशपांडे सांगतात, एकनाथमहाराज ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करीत होते.
शेक्सपिअरच्या अशा अनेक गोष्टींसह त्यांच्या नाटकाचा कथानुवाद सोप्या पद्धतीने केलेल्या या शेक्सपिअरवेड्या माणसाचे साडेबाराशे पानांचे पाच खंड जागतिक ग्रंथदिनी (२३ एप्रिल २०१५ रोजी) प्रकाशित झाले.

शेक्सपिअरने झपाटलेल्या परभणीच्या देशपांडे यांना नाटकातील म्हणींपासून ते पात्रांचे गाजलेले संवादही तोंडपाठ आहेत.

देशपांडे यांची अख्खी कारकीर्द पशुसंवर्धन विभागात गेली. मात्र, इंग्रजीतून कला विषयाची पदवी घेताना त्यांनी अभ्यासलेली दोन नाटके त्यांना अस्वस्थ करीत होती. मर्चंट ऑफ व्हेनिस आणि मॅकबेथ. त्यानंतर त्यांनी अन्य चार नाटके अभ्यासली. पुढे एक कथा लिहिली व नंतर जनशक्ती वाचक चळवळीच्या श्रीकांत उमरीकर यांनी शेक्सपिअरचा पूर्ण अभ्यासच करा, असा आग्रह धरला. देशपांडे एकएक नाटक वाचू लागले. शेजारी डिक्शनरी असे. प्रत्येक शब्दाचा अर्थ नव्याने तपासायचा, बाजूला टिपणे काढायची आणि त्यावर लिहायचे. लेखन सुरू केल्यावर पहिला खंड ७ शोकांतिकांचा झाला. शेक्सपिअरचे एकूण ५ खंडही तसेच लिहून झाले.

प्रभाकर देशपांडे साखरेकर यांची शेक्सपिअरच्या नाट्यानुवादांची मराठी पुस्तके
संपादन करा
खंड १
सात शोकांतिका -
रोमिओ ॲन्ड ज्युलिएट, हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लिअर, मॅकबेथ, ज्यूलियस सीझर, अ‍ॅन्टनी अँड क्लिओपात्रा.
खंड २
सात सुखान्तिका -
अ‍ॅज यू लाईक इट, ट्वेल्फ्थ नाईट, मच अ डू अबाऊट नथिंग, अ मिडसमर नाइट्स ड्रीम, द कॉमेडी ऑफ एरर्स, टेमिंग ऑफ द श्ऱ्यू, द मर्चंट ऑफ व्हेनिस.
खंड ३
सात नाटके -
ऑल इज वेल दॅट एन्ड्ज वेल, मेझर फॉर मेझर, ट्रॉयलस अँड क्रेसिडा, द मेरी वाईव्ह्ज ऑफ विंडसर, लव्ह्ज लेबर्स लॉस्ट, द टू जंटलमेन ऑफ व्हेरोना, टायटस अँड्रॉनिकस
खंड ४
आठ नाटके -
टायमन ऑफ अथेन्स, कोरिओलेनस, सिंबेलाईन, पेरिक्लीज (द प्रिन्स ऑफ टायर), द विंटर्स टेल, द टेम्पेस्ट, किंग जॉन, किंग हेन्‍री द एड्थ.
खंड ५
आठ ऐतिहासिक नाटके-
किंग हेन्‍री द सिक्स्थ भाग १, किंग हेन्‍री द सिक्स्थ भाग २, किंग हेन्‍री द सिक्स्थ भाग ३, ट्रॅजेडी ऑफ किंग रिचर्ड द थर्ड, रिचर्ड दि सेकंड, किंग हेन्‍री द फोर्थ भाग १, किंग हेन्‍री द फोर्थ भाग २, किंग हेन्‍री द फिफ्थ.

*शेक्सपिअरच्या नाटकांची कथानके

गणेश ढवळीकर (निधन : सन १९६५) यांनी १९५५ च्या सुमारास अनुवादित केलेल्या शेक्सपिअरच्या नाटकांच्या कथा अनेक वर्षे बासनात राहिल्या होत्या. पुढे या कथा भारद्वाज प्रकाशनने 'शेक्सपिअरच्या नाट्यकथा' या पुस्तकाद्वारे २०१५ साली प्रकाशित केल्या. वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये ढवळीकर इंग्रजीचे अध्यापन करायचे. त्यांनी शेक्सपिअरची नाटके कथारूपात आणतानाच स्वतःचेही वेगळे लेखन केले होते. १९६५मध्ये त्यांचे निधन झाले. ते हयात असताना त्यांचे साहित्य पुस्तकरूपाने प्रकाशित होऊ शकले नाही. पुढे ते काळाच्या ओघात नष्ट झाले. शेक्सपिअरच्या नाटकांच्या या अनुवादित कथा त्यांची नात मीरा आपटे ढवळीकर यांच्याकडे होत्या. भारद्वाज प्रकाशनचे ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांनी जीर्ण झालेल्या कागदांवर लिहिलेल्या त्या कथा नव्या स्वरूपात प्रकाशित केल्या आहेत.

या कथा पुढे भारद्वाज प्रकाशनने ‘शेक्सपिअरच्या नाट्यकथा’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणल्या. ‘इंग्रजीचे अध्यापन करताना ढवळीकर यांनी शेक्सपिअरची नाटके कथारूपात आणताना स्वतंत्र लेखनही केले होते. ढवळीकर यांनी केलेला कथारूप अनुवाद मराठी साहित्याला वेगळा आयाम देणारा ठरला आहे. या अनुवादामध्ये ६० वर्षांपूर्वीच्या भाषाशैलीचा प्रत्यंतर येतो. या कथांचे पुस्तक करताना मूळ लेखनामध्ये कोणताही बदल केलेला नाही. केवळ मराठी शुद्धलेखनाच्या नव्या नियमांनुसार बदल करून घेण्यात आला आहे. नव्या पिढीपर्यंत शेक्सपिअर पोहोचविण्यासाठी या कथा महत्त्वाच्या ठरल्या आहेत..

'शेक्सपिअरच्या नाट्यकथा' या पुस्तकात मर्चंट ऑफ व्हेनिस, सिंबेलाईन, ऑगस्टस सीझर, मॅकबेथ, तुफान, हॅम्लेट, लिअर राजा, रोमिओ आणि ज्युलिएट या कथारूप नाट्यकृती, ढवळीकर यांचाच स्वप्नातील जग हा लेख, वि.वा. शिरवाडकर, प्रा. ग.प्र. प्रधान अशा मराठीतील श्रेष्ठ लेखकांचे शेक्सपिअरविषयीचे लेखही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.

*शेक्सपिअरसंबंधी मराठीतली अन्य पुस्तके/साहित्य

कथारूप शेक्सपिअर_अनेक खंड (प्रभाकर देशपांडे साखरेकर)

राजहंस एव्हनचा शेक्सपिअर (लेखक - परशुराम देशपांडे; दोन भाग) : या संचात शेक्सपिअरच्या जीवनाचा कादंबरी स्वरूपात वेध घेतला आहे. हे कॉन्टिनेन्टलचे प्रकाशन आहे.

विल्यम शेक्सपियरच्या कुमारांसाठी २२ बहुविख्यात कथा (मंजूषा आमडेकर) - मेहता प्रकाशन

शेक्सपिअर आणि मराठी नाटक (लेखिका - डाॅ. लता मोहरीर). या पुस्तकाबद्दल लेखिकेला मसापचे २०१६ सालचे पारितोषिक मिळाले.

शेक्सपिअर आणि मराठी नाटक : तौलनिक साहित्याभ्यास (डॉ. वा.पु. गिंडे)

शेक्सपिअर आणि सिनेमा (लेखक - जागतिक सिनेमाचे अभ्यासक विजय पाडळकर, मौज प्रकाशन-२३ एप्रिल २०१६)

शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य (के.रं. शिरवाडकर)

शेक्सपियर व तत्कालीन इंग्रजी रंगभूमि (गणेश हरि केळकर, १९३१)

शेक्सपिअर - वेगळा अभ्यास (लेख, ललित मासिक, जानेवारी २०१५, लेखक - गोविंद तळवलकर)

शेक्सपिअरची शोकनाट्ये : शेक्सपिअरच्या ९ नाटकांची कथानके आणि इतर माहिती) (परशुराम देशपांडे)

शेक्सपिअरचे विचारधन (संकलन, भाषांतर. परशुराम देशपांडे)

शेक्सपिअरची सुनीते (परशुराम देशपांडे)

शेक्सपीअरच्या कथा (जयको पब्लिशिंग हाऊसचे ३०० पानी पुस्तक, २०१८)

शेक्सपिअरच्या देशातील कवी (राजेश हेंद्रे)

शेक्सपिअरच्या कथा (चार्ल्स आणि मेरी लँब)

शेक्सपिअरच्या नाटकांतील सौंदर्यस्थळे (हवालदार)

संपूर्ण शेक्सपियर + प्रस्तावना खंड (संपादक व प्रमुख भाषांतरकार - प्रा. वा.शि. आपटे)

समग्र शेक्सपीअर : तुलनात्मक सांस्कृतिक समीक्षा (डॉ. आनंद पाटील - (गोवा विद्यापीठ)
मराठीतला अर्धा शेक्सपिअर - राम गणेश गडकरी


गडकरी यांनी मी मराठीतला अर्धा शेक्सपिअर होईन असा पण केला होता. पण पाच पूर्ण नाटके न लिहिताही ते मराठीतले शेक्सपिअर म्हणून ओळखले जातात. भरजरी, लफ्फेबाज भाषा, अलंकारयुक्त भाषा आणि कल्पनांची उत्तुंग झेप यामुळे ते परिचित झाले. समकालीन सामाजिक प्रश्न, दारूचे दुष्परिणाम, राजघरण्यातील भावनिक गुंता हे त्यांच्या नाटकांचे विषय राहिले आहेत. एकच प्याला हे त्यांचे रंगभूमीवर गाजलेले प्रमुख नाटक आहे.©® राखी भावसार भांडेकर.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//