
विल यू बी माय बॉडीगार्ड
"आई बाबा मला हे लग्न करायचं नाहीये, किती वेळ सांगितलं मी तुम्हाला. संसराच्या गाड्यात अडकवून तुम्ही का माझे स्वप्न धुळीत मिळवत आहात. बाबंसारखाच मीही देशसेवा करावी यासाठी किती आटापिटा केला तुम्ही. आज आपण यशस्वी झालो तर तुम्ही अडथळा आणत आहा."
मानस भारताच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (NSA) चा एक एजन्ट होता. देशभरात, देशाबाहेरही त्याचे दौरे असत. त्याचे वडील श्रीकांत रिटायर्ड पोलीस ऑफिसर होते व आई त्यांचं पारंपरिक कपड्यांचं दुकान सांभाळत. रिटायरमेंट नंतर श्रीकांत घर सांभाळू लागत व गावातील मुलांना फिजिकल ट्रेनिंग देत. उदगिरकरांच छोट्याशा गावात राहणारं एक समाधानी कुटुंब होतं. मानसला खूप कष्ट घेऊन त्यांनी शिकवलं होत, २ दिवसांच्या सुट्टी साठी तो घरी आला होता, खूप मागे लागूनही मानस लग्नासाठी तयार होत नव्हता त्यामुळे आई वडिलांनी त्यांच्या ओळखीतील एका मुलीशी परस्पर त्याचं लग्न ठरवलं. युगंधरा राणे, ही अनिताची बालमैत्रिन वृंदा यांची मुलगी. राणे कुटुंब हे गावातील प्रतिष्ठित व श्रीमंत कुटुंब होते पण तेवढेच विनम्र, पैशांचा थोडाही गर्व नसणारे. त्यांचं गाव मानसच्या गावाजवळच होत. युगंधराचे आई वडील वृंदा व धनंजय मानसच्या हुशारी बद्दल खूप ऐकुन होते व त्याचे त्यांना कौतुकही होते.
श्रीकांत - अरे तू ऐकुन तर घे, खूप छान मुलगी आहे ती, तुला साजेल अशीच आहे ती. खूप वेगळा संसार होईल तुमचा.
मानस - हो बाबा ती असेलच चांगली पण मी कमी पडणार घराला वेळ द्यायला, तिच्या नवऱ्या कडून असणाऱ्या सर्वसाधारण अपेक्षा मी नाही पूर्ण करू शकणार, त्यात सतत माझ्या जिवाला धोका. कसं सांगू तुम्हाला.
श्रीकांत - बेटा मला सगळं कळतं, मी ही याच परिस्थीतीतून गेलोय पोलीस म्हणून काम करताना मलाही खुप आव्हाने समोर आली पण तुझी आई आणि मी मिळून त्यांना एकत्र सामोरे गेलो. युगा पण तुझी तशीच साथ देईल बघ. तुला किती तरी वेळ तिचा बायोडेटा पाठवला होता.
मानस - बाबा पण माझ काम खूप कॉम्प्लेक्स आहे.
अनिता - बस झाल आता समजावणं खूप वर्ष झाले तेच करत अहो. हे कपडे घे तयार हो १ तासात निघायचं आहे.
अहो लवकर आवरा याच्या मागे नका लागू. याला तयार करा आणि लक्ष ठेवा पळून नको जायला बर का.
श्रीकांत - बर सरकार.
मानस - नक्की पोलीस कोण होत कळतच नाही.
यावेळेस मानसच आई समोर काही एक चाललं नाही, वडील फिरती वर असल्याने आई ने थोड शिस्तीत त्याला वाढवलेलं, त्यामुळे आईला आता गुंडाळणे शक्य नव्हते. गावातील ५० लोकांची वरात घेऊन सर्व जन अर्ध्या तासात पोचतात.
सकाळी ९ पासून सर्व कार्यक्रम चालू होतात, राणेंना ३ मुलं व युगा म्हणजे त्यांच्या पाठीवर झालेलं लाडकं शेंडेफळ. राणेंच्या राजकुमारीच लग्न खरोखर राजकुमारी प्रमाणेच झालं, दिवसभर कार्यक्रम व हजार दोन हजार लोक. तसं बडेजाव पण करण्याची इच्छा कोणाला नव्हती पण लोकांशी संबंध जपण्यासाठी त्यांना सगळ्यांना आमंत्रण देणं भाग होतं. उदगीरकर कुटुंबाचा स्वाभिमानी व पुढारलेला स्वभाव त्यांना आवडल्याने डोळे मिटून त्यांनी युगाची पाठवणी करायचं ठरवलं. संध्यााळपर्यंत सर्व विधी पार पडले युगंधरा वाजत गाजत उदगीरकरांच्या घरी आली.
मानस तोंड देखला सर्वाशी हसून बोलत होता पण एकदाही त्याने युगा कडे नीट बघितले नव्हते.
रात्री लक्षमीपुजा व जेवण आटपून सर्व थकून झोपले.
मानसला सुट्ट्या नसल्याने दुसऱ्याच दिवशी सर्व पूजा आटोपून सगळे राणेंच्या घरी गेले, एक दिवस तिथे मुक्काम करून मानस व युगंधरा मुंबईला निघाले. ६ तासाच्या प्रवासात मानस एकही शब्द बोलला नाही. युगंधरा अधून मधून त्याच्या कडे आशेने बघत होती हे त्याला कळत होत पण त्याने सपशेल दुर्लक्ष केलं. दुपारी दोघे मानसच्या फ्लॅटवर पोचले, घरून डबा दिला असल्याने युगा ने जेवणासाठी विचारले, मानस काहीही उत्तर न देता बाहेर निघून गेला.
युगंधराने जेवण आटोपून थोडा आराम केला. रात्री मानस जेवणाच पार्सल घेऊन घरी येतो काही न बोलता टेबल वर जेवण वाढतो, व जेवून स्वतः ची प्लेट भांडे विसळून ठेऊन रूम मध्ये जातो, युगंधरा आपले ताट विसळून रूम मध्ये येते. ३ दिवसांपासून अबोल असलेला मानस बोलायला लागतो.
मानस - हे बघा मला माहिती आहे माझं वागणं तुम्हाला विचित्र वाटत असेल पण त्याला करणं आहेत. मला तुमच्या बद्दल कुठला राग नाही. मला खरंतर कुणाशीच लग्न करायचं नव्हतं, आई बाबांना किती वेळ हेच सांगितलं पण माझं त्यांनी ऐकलं नाही. मला माझ्या कामात संसाराचा अडथळा नकोय. तुम्हालाही आधी भेटून हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण कोणी मला सांगूच दिलं नाही. २ दिवसाच्या रजेवर गावी आलो तर लग्न उरकून टाकला ह्यांनी. मला आधी कुठलीच कल्पना दिली नाही.
चूक तुमची नाही पण माझ्या कामामुळे फक्त मलाच नाही तुमच्याही जीवाला धोका होऊ शकतो, एका नवऱ्या कडून तुम्हाला अर्थात योग्य अपेक्षा असतील मी त्या पूर्णही करू शकणार नाही, मला कधी कुठे किती दिवस जाव लागेल याचा काही नेम नसतो.
जास्त न बोलता एवढंच सांगेल काही दिवस तुम्ही राहून बघा माझाकडून तुम्हाला कुठले बंधन किंवा त्रास होणार नाही, आणि बायको सारख माझ काही करायची ही गरज नाही, मी आधी जी माझी काम करत होतो ती पुढेही मीच करेन, तुम्हाला जर पटल नाही तर वेगळे होऊ मी घरी बोलेन. उद्या सकाळी कामाला मावशी येतील तुम्हाला हवं तसं त्यांना बोलून घ्या, शक्य असल्यास एकमेकांवर अवलंबून राहू नये.
लग्नाच्या पहिल्याच रात्री मानस ने एक मोठा निबंध ऐकवला, युगंधराचा आवाजही न ऐकता दुसऱ्या रूम मध्ये निघून गेला. ती फक्त ऐकत होती, त्याची एकंदर मनःस्थिती तिच्या लक्षात आली.
युगंधरा - एवढाही वाईट नाही, थोडा पागल आहे, होईल शहाणा, असं म्हणत झोपून गेली.
युगंधराचा गोरा निरागस असा गोंडस चेहरा, नाजूक बांधा नात्यात अडकण्याच्या भीतीने मानस ने एकदाही नीट बघितला नव्हता, युगंधरा ने मात्र त्याचा गव्हाळ रंग, उसणा खऊट पणा आणलेला चेहरा व मजबूत बांधा बरेचदा निहाळला होता. लग्नाच्या गडबडी मुळे युगा थकून गेली होती सकाळी उशिरा उठली.
मानस केव्हाच ऑफिसला निघून गेला होता. फ्रीज वर नोट लिहिली होती.
"मावशी कडून तुमचं जेवण बनवून घ्या, काही सामान लागलं तर त्या आणून देतील, माझ जेवण चहा मी बघेन, खाली आपली गाडी व ड्रायव्हर आहे तुम्हाला हवं तिथे तो नेईल."
युगंधराला गालातच हसू येतं, तू तुझ कर म्हटलंय तर एवढी काळजी कशाला. सविता मावशी खूप आपुलकीने युगंधराशी बोलतात, तिच्या आवडीचे चविष्ट जेवण बनवतात व घरची सर्व कामं आटोपून निघतात.
संध्याकाळी मानस नेहमी पेक्षा लवकर घरी येतो, आपण एवढं तुटक वागतोय तिची काही चूक नसताना यामुळे कुठेतरी त्याच मन खात असत. घरी आल्यावर मोगऱ्याची फुलं व धूपाचा सुगंध दरवळत असतो. युगंधरा वाफाळलेला चहा घेऊन मानस जवळ येते.
मानस चिडणार याचा अंदाज तिला येतो..
युगंधरा - माहिती आहे तुम्हाला तुमच्या सवयी बिघडवायच्या नाही, मी स्वतः साठी ठेवत होते तेवढ्यात तुम्ही आला म्हणून देत आहे. तुम्ही ही कधी तुमच्या साठी केल्यावर मला द्या.
बायको नाही मैत्रीण किंवा रूम पार्टनर समजा हवं तर.
मानस - लिसन अम् सॉरी खूप वाईट वागलो मी तुमच्याशी.
युगंधरा - इट्स ओके, तुमचं म्हणणं मला कळलं आणि त्याची मला काही तक्रारही नाही. पण जमल तर थोड चांगल्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करू शकता.
मानस हसून चालला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी मानस जिम मध्ये व्यायाम करतो, आवाजाने युगंधरा उठते व मानस कडे टक लवुन बघत राहते, तो ओशाळून शर्ट घालतो. तिच्यासाठी ज्यूस ठेऊन अवरतो.
हळू हळू मानस थोडा निवळतो पण बोलणं तसं जुजबीच असतं, तिच्यात गुंताण्याच्या भीतीने तो लांबच असतो.
फ्रीज वर चिठ्ठ्या लिहून निरोप सांगण्याच एक सांकेतिक नातं त्यांच्यात बनतं. मानसच्या येण्या जाण्याच्या वेळा नक्की नसल्याने प्रत्यक्ष भेटी कमी होत.
एकदा युगा ३-४ दिवस भेटत नाही, मानसला खूप काळजी वाटते. तिने फ्रीज वर एवढंच लिहिलं असतं ६ दिवसांनी येणार. मानसला नकळत तीची सवय झाली असते, तिने न अडकवता तो स्वतःच अडकला असतो. कशे बशे ६ दिवस जातात व त्यांचं रूटीन सुरू होत.
महिना असाच जातो. एक दिवस युगंधरा रात्री खूप उशिरा येते डोक्याला थोडी जखम असते व हाताला बँडेज. मानस तिला बघुन खूप घाबरतो, तिला असं बघून त्याला काय करावं सुचत नाही. ती बसताच प्रश्नांचा भडीमार चालू करतो.
मानस - असं कसं लगल तुम्हाला, मला फोन का नाही केला तुम्ही.
युगंधरा - मी ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. आपण एकमेकांवर अवलंबून राहायच नाही असं ठरलं ना आपलं. जास्त काही असतं तर बोलावलं असतं तुम्हाला, झोपा आता तुम्ही मी पण आराम करते.
पुढचे २-३ दिवस मानस न कळत तीची खूप काळजी घेतो, न बोलता तीची सर्व सोय करतो, औषध, फळे, दिवसभर मावशींना थांबायला लावतो.
युगंधरा - काय साहेब गुंतायला लागले की काय.
मानस - (हसून) बहुतेक.
युगंधरा - बघा बर अडकवेल मी तुम्हाला, १० वेळ फोन, घरी लवकर येणे, बाहेरगावी जावू न देणे. असं होईल तुमचं
मानस - नाही होणार यू आर एक्सेप्शन, समथिंग इज डीफरंट इन यु. सॉरी खूप त्रास दिला तुम्हाला. पण माझ्यामुळे तुमचा जीव धोक्यात न येणं मी कसं टाळू. त्यापेक्षा जवळ येनच टाळलेलं बर.
युगंधरा फक्त गोड हसते.
युगा आता पूर्ण बरी होते, सकाळी लवकर उठून तयार होते, कडक इस्त्री केलेली कॉटनची साडी व हलकासा मेकअप करून बाहेर जायला निघते, मानस टक लाऊन तिच्याकडे बघत राहतो, ती त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवून लाजत बाहेर पडते.
मानसच्या टीमला आज एका कार्यक्रमाच्या झेड सिकयुरिटी साठी स्पेशल बोलावलं असते, कारण जे वक्ते येणार होते त्यांचावर मागील आठवड्यात हल्ला झाला होता.
मानस NSA चीफ सिक्युरिटी होता, स्टेज समोरच उभा राहून त्याने सर्व ठीक असल्याचा फायनल अलर्ट दिला, व चीफ गेस्टला बोलावण्यात आलं.
"चला तर मग स्वागत करू आपल्या लाडक्या मिस सॉरी मिसेस युगंधरा राणे उदगीरकर यांचं.
मानस अवाक होऊन बघत असतो. युगंधरा चेहऱ्यावर मिष्खील हास्य करत त्याच्याकडे बघते.
"युगंधरा यांना आपण एक प्रखर समाज सेविका म्हणून ओळखतो, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम याखेरीज सेक्स वर्कर स्त्रियांना शिक्षण देणे, त्यांचे हेल्थ चेकप कॅंप घेणे, ही आणि इतर बरीच समाजसेवी कामे त्यांची संस्था करते. एका गर्भ श्रीमंत घरातून असून आरामात आयुष्य व्यतीत न करता समाजासाठी स्वतः चा जीव धोक्यात घालून झटत आहेत.नुकतंच त्यांच्यावर एक हल्ला ही झाला, तरीही त्या आपल्यासाठी आज इथे आल्या आहेत."
युगंधरा एक सुंदर भाषण सादर करते, तिच्या काम बद्दल लोकांनीही साथ द्यावी अशी कळकळीची विनंती करते.
टाळ्यांच्या कडकडाटाने मानस भानावर येतो, तोवर तो तिच्यात हरखून गेला असतो.
कार्यक्रम आटोपून युगा सिक्युरिटीला धन्यवाद देते. व मानस जवळ येते.
युगंधरा - थँक यू, मी. मानस तुमच्या सुरक्षे मुळे आम्ही आज निश्चिंत होतो. पण आम्हाला वाचवण्यासाठी तुमचा जीव धोक्यात आला, याच थोड बरडण झालं. हरकत नसेल तर विल यू बी माय बॉडीगार्ड टील आय रीच होम, काय आहे माझा नवरा जरा माझा जीवाची फार काळजी करतो तुम्ही अलात तर निश्चिंत होऊ.
मानस - (हसून) नक्कीच
दोघेही गाडीत बसतात
युगंधरा - आता तरी काही बोलणार का..?
मानस - तुम्ही बोलण्या सारखं ठेवलच नाही मला, पूर्ण हँग झालोय मी. आधी का नाही सांगितलं की माझ्यापेक्षा जास्त रिस्क मध्ये वावरता तुम्ही. किती मजा घेतली माझी.
युगंधरा - एक तर बाबांनी माझा बायोडेटा बरेचदा तुम्हाला पाठवला, तुम्ही वाचला नाही. तुमच्या डोक्यात या गोष्टी एवढ्या पक्क्या बसून होत्या की प्रत्यक्ष डेमो शिवाय निघणं शक्य नव्हत, तसं या आठवड्यात मी प्रत्यक्ष आमचं काम दाखवून सांगणार होते, पण आजच्या कार्यक्रमाच्या सिक्युरिटी हेड मध्ये तुमचं नाव दिसलं, म्हटलं थोडी मजा घ्यावी. उद्या मरण्याच्या भीतीने आज जगणं सोडण म्हणजे दुसरं मरणचं ना. सो आता तर तुम्हाला कळलय माझ काम, त्यामुळे तुम्हाला ही जीवाचा धोका असू शकतो, त्यासाठी सोडू शकता बर तुम्ही मला.
मानस - अजुन किती लाजवणार आहे तुम्ही मला.
मानस हळूच तिच्या गालावर किस करतो आणि हातात हात घेऊन तिच्या खांद्यावर विसावतो.
युगंधरा - सो मी. मानस विल यू बी माय बॉडीगार्ड फॉर लाइफ्टाईम.
मानस - यास मॅम.
दोघेही आपल्या आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात.
--------------++------------------------++---------------
समाप्त.. ..
- रेवपुर्वा
कमेंट करून प्रामाणिक प्रतिक्रिया जरूर कळवा. लेख नावासह शेअर करावा.