Login

बायकोचा खबरी

बायकोचा खबरी कोण होईल सांगताच येत नाही.

"अरे बायकोचा फोन येतोय" समीर

"मला पण येतोय, नको लक्ष देऊ, नाचो" रमेश

"एवढा कॉन्फिडन्स??" समीर

"हो, तिला बोललोय निघालो म्हणून, रस्त्यात गाडी पंक्चर झाली म्हणून उशीर झाला सांगता येईल??" रमेश ने समीर ला डोळा मारत बोलला. "असही आपल्या बायकांची इथे कोणाशीही ओळख नाहीये, त्यामुळे त्यांना नाही कळणार" 

दोघही नाचायला लागले. ते दोघ त्याच्या मित्राच्या हळदीचा गेलेले असतात. हळद म्हटली का उशीर होणारच न?? सगळे वाचायच्या धुंदीत. तेवढ्यात रमेशची चुलत बहीण येते नाचायला, ती ह्या दोघांना घेऊन अजुन नाचायला लागते. व्हीडीओ रेकॉर्ड करते. 

तेवढ्यात परत रमेशच्या बायकोचा रमेश ला कॉल येतो. तो परत तिला बोलतो निघाल्या म्हणून. त्याची बायको टीक आहे म्हणत फोन ठेवते. रमेश फोन काळात ठेवणार तेवढ्यात त्याला व्हॉट्सअँप वर त्याच्या बायकोचा मेसेज येतो. 

"तुम्ही जर निघाले आहात, तर ह्यात कोण वाचतोय?" रमेश व्हिडिओ बघतो आणि समीर ला दाखवतो. दोघांना कळत नाही हा व्हिडिओ तुकडे कसा गेला. कॅमेराचा अँगल बघितल्यावर कळल हे त्या चुलत बहीण काम आहे जी नाचायला घेऊन येत व्हिडिओ काढुन कदाचित पसार झाली होती. 

दोघांच्या मोबाईल वर एकच मेसेज एकदाच आला. "या घरी, गाडी कुठ पंक्चर झाली ते ऐकायच आहे"......