Jan 26, 2022
नारीवादी

अर्धांगिनी

Read Later
अर्धांगिनी
नवऱ्याची तु असते अर्धांगिनी
आनंद घेऊनी येते त्याच्या जीवनी


आयुष्यात अनेक नाती जन्मासोबतचं मिळतात.
जसे-आईवडील,भाऊबहिण,आजी-आजोबा .
पण नवरा बायको चं नातं हे जन्माने मिळत नसल तरी ते लग्नानंतर आयुष्यभरासाठी असतं आणि हे नातं इतकं घट्ट बनतं की दोघेही एकमेकांसाठी जन्माला येतात असे वाटते.

Made For Each Other.

जे कधी एकमेकांना ओळखत नसतात,कधी पाहिलेले नसते आणि लग्नाच्या अतूट बंधनानंतर एकत्र येतात,जन्मोन्मी एकत्र राहू अशी वचने घेतात.

प्रथेप्रमाणे बायकोला माहेर सोडून सासरी जावे लागते.जन्मदात्या आईवडिलांना, जीवलग भावाबहिणींना सोडून नवऱ्याच्या घरी यावे लागते.आई वडिलांनाही मुलीची काळजी असते.ती सासरी गेल्याचे त्यांना ही वाईट वाटते पण प्रथा,रीतीरिवाज यानुसार जे सुरू आहे तसेच करावे लागते.
मुलगी हळूहळू सासरी रूळायला लागते तरी माहेराची ओढ तिला कायम असते.आपल्या हक्काचं माणूस,आपल्या सुखदुःखाचा सोबती,आपला नवरा आपल्या पाठीशी आहे या विश्वासाने ती सासरी नांदत असते.
लग्नानंतर तिला अनेक नात्यांची जबाबदारी पार पाडायची असते.सासूसासऱ्यांची आदर्श सून,दीर-नणंद यांची लाडकी वहिनी आणि नवऱ्याची प्रेमळ,समजुतदार, गुणी, कर्तव्य दक्ष अर्धांगिनी!
मुलीला सासर चांगले मिळाले तर मुलगी नशिबवान आहे असे समजतात आणि सासरी त्रास असेल तर कमनशिबी ,नशिबाचे भोग म्हणून समजाविले जाते.
समाजात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने नवऱ्याचा बायकोवर सर्वच बाबतीत हक्क...
तिचे विचार, तिचे मन,तिच्या भावना यांना काही ग्राह्य चं धरले जात नाही. तिच्या अस्तित्वाला अर्थचं नसतो.बायको हक्काची दासी,गुलाम...
तिने फक्त सर्वांची सेवा करावी,आज्ञेत रहावे,मुलांना जन्म द्यावा,त्यांना सांभाळणे हे चं तिचे आयुष्य ,हाचं स्त्रीजन्म...
वर्षानुवर्षे असेचं सुरू आहे.बायकोने घरातील सर्व कामे करावी ,नवऱ्याने घरातील कामे केली तर त्याला कमीपणा वाटतो.बायकोने नोकरी करायची असेल तर घरसंसार सांभाळून तिने नोकरी करावी.
जशा बायकोकडून नवऱ्याच्या चांगल्याचं अपेक्षा असतात तशा तिलाही त्याच्या कडून अपेक्षा असणारचं ना...
बायको ही कधी स्वतः साठी जगतचं नसते.नवऱ्याच्या सुखातचं आपले सुख शोधत असते.तिला समजून घेणारा,खरं प्रेम करणारा नवरा भेटला तर तिचं खरचं भाग्यं! नाही तर मगं आयुष्य भर दुःखाचा वणवा....
व्यसनी, संशयी,व्यभिचारी ,दुवर्तनी नवऱ्यांच्या बायकांना जिंवतपणी चं नरकयातना...
\"प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो.\"
असे म्हणतात.
बायकोचे आपल्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम असते,ती शिकलेली असो किंवा नसो पण आपला संसार ती व्यवस्थित सांभाळीत असते.प्रत्येक परिस्थिती त नवऱ्याला साथ देत असते.त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याला सर्वोतोपरी मदत करीत असते.आजारपणात त्याची सेवा सुश्रुषा करत असते,संकटात धीर देते,मुलांच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी करत असते.

प्रत्येक नवऱ्याच्या आयुष्यात त्याच्या बायकोचे ,अर्धांगिनी चे खुप महत्वाचे स्थान असते.पण दोघांपैकी कोणीही व्यभिचारी, संशयी असेल तर संसार उध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. यासाठी दोघांचे एकमेकांवर प्रेम,विश्वास असणे गरजेचे ...
गैरसमज नसावा.
नवरा कसा ही वागला तरी समाज बायकोला चं दोष देतो .\"तुला नवऱ्याला सांभाळता येत नाही\" अशी दूषणे देतात.
पुरुष व्यसन, व्यभिचार करू शकतो हे समाजाला मान्य.पण फक्त बायकोने चं संस्कार जपावेत आणि संसाराची जबाबदारी पेलत रहावी.म्हणजेचं स्त्रीजन्माचे सार्थक झाले....

बायको ही नवऱ्या ची मैत्रीण असेल, सुखदुःखाची सोबती असेल,यशापयशाची भागीदार असेल,तरचं खऱ्या अर्थाने ती अर्धांगिनी ठरेल....


नवऱ्याची अर्धांगिनी
बनून येते सासरी
नात्यांवर विश्वास ठेवुनी
आनंदी राहते आपल्या सासरी
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now