Wife On Rent !! पार्ट 2

एक समलैंगिक प्रेमकथा
कार्तिक आर्यनच्या मानेवर चुंबनाचा वर्षाव करत होता. आर्यनही कार्तिकसोबतच्या प्रेमाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत होता. शेवटी आर्यनने कार्तिकच्या छातीवर डोके टेकवले.

"अरे जेवण तर करू द्यायचे ना. घरी येताच सुरू!" आर्यन

"माझ्या प्रेमाने पोट नाही भरले का तुझे ?" कार्तिक

जवळ खेचून कपाळावर किस करत म्हणला.

"भरले ना राजा. पण भूक पण लागलीय. अरे बापरे नऊ वाजले!" आर्यन उठतो.

"अरे यार..झोप ना पिल्लू !" कार्तिक परत आर्यनला खेचतो.

"पोटात कावळे ओरडताय यार. चल ना तुझ्या बुलेटवर बसून पावभाजी खायला जाऊ. मला खूप आवडते तुझ्या बुलेटवर बसायला!" आर्यन

"आपल्या बुलेटवर!" कार्तिक

दोघे शर्ट घालतात आणि तयार होतात. "कैलाश पावभाजी" म्हणून दोघांचे आवडते ठिकाण असते. तिथे जातात.

"भैया. मला तिखट करा आणि आर्यनला एक्सट्रा बटर!" कार्तिक

"हो सर!" वेटर म्हणतो.

"यार. आज भेटणार होता ना खन्नाला ?" आर्यन

"अरे . तोपण तसला निघाला. मी गेलो होतो भेटायला त्याला. वाटले मॉडेलिंगची ऑफर भेटेल पण त्याने आधी "सोबत झोपण्याची" ऑफर केली. " कार्तिक

"समजले. जाऊदे रे. सगळेच तसे नसतात. आज ना उद्या तुला काम भेटेल!" आर्यन हातात हात घेऊन म्हणला.

"फ्लॅटचे रेंट तू भरतोय. बुलेटची इन्स्टॉलमेंट तू भरतोय. मला गिल्ट फिल येतेय रे. आयतोबा बनून खातोय असे वाटतेय. मान्य मी तुझा बॉयफ्रेंड आहे पण म्हणून काय मी तुला अस युज नाही करू शकत!" कार्तिक

"ओय. मी प्रेम करतो तुझ्यावर. आणि आपल्या नात्यात पैसे कधीपासून यायला लागले रे. तू मला जे प्रेम देतो ते लाखमोलाचे आहे!" आर्यन

"भोळा आहेस रे तू. म्हणूनच मी तुझ्या प्रेमात पडलो!" कार्तिक

मग दोघे पावभाजी खातात. कार्तिक बिल पे करतो. बुलेटवर बसण्याआधी कार्तिक आर्यनचा हात पकडतो.

"वॉलेटमध्ये पैसे तू टाकले ना!" कार्तिक हातावर हात घासत म्हणतो.

"हम्म. पण रात्री वसूल करेल! " आर्यन डोळा मारत म्हणतो.

कार्तिक हसतो. त्याच्या गालावर गोड डिंपल पडतात.

दुसऱ्या दिवशी आर्यन लवकर उठून ऑफिसला जातो. कार्तिक जिम करत असतो. त्याला फोन येतो.

"हॅलो !" कार्तिक

"मी बोलतोय. !" समोरून एका प्रौढ व्यक्तीचा आवाज येतो.

"मिस्टर जिंदल. प्लिज मला फोन नका करू. आपले नाते संपले आहे!" कार्तिक

"फोन कट करण्याआधी इतकं ऐकून घे. मी तुझ्यासाठी मुलगी पसंद केलीय. तुला तिच्यासोबत लग्न करावे लागेल आणि जर तू असे केले नाही तर मी तुझ्या आईला डिओर्स देईल!" मिस्टर जिंदल

"भारतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे मिस्टर जिंदल. माझे लग्न झालेय. सो सॉरी. आणि पुन्हा आईचा पडद्याआड मला धमकी नका देऊ. महागात पडेल. दुर्दैवाने तुमचाच मुलगा आहे मी. " कार्तिक असे म्हणून फोन कट करतो.

क्रमश..

🎭 Series Post

View all