Wife On Rent !! पार्ट 8 ( अंतिम भाग )

समलैंगिक प्रेम कथा
आर्यन आणि दिव्या दोघे खाली जातात. टॅक्सी बुक केलेली असते पण तिला यायला अजून वेळ असतो. दिव्या आणि आर्यन गार्डनच्या बेंचवर बसतात. आर्यन एक फोटो काढतो. त्यात कार्तिक-आर्यनच्या सर्व फोटोंचा सुंदर कोलाज असतो. आर्यन त्या फोटोवरून हात फिरवतो. नकळत त्या अश्रू येतात आणि ते फोटो फेमवर पडतात. दिव्या आर्यनच्या खांद्यावर हात ठेवते.

"तू इतके प्रेम करतो मग का दूर करतोय त्याला ?" दिव्या

"प्रेम करण्यासाठी योग्य जेंडर पण पाहिजे ना. मुलगी असतो तर मी सोडले नसते त्याला. पण कदाचित स्त्री पुरुषानेच केलेले प्रेम दिसायला छान दिसते. समलैंगिकाना प्रेमाचा अधिकारच नसतो कदाचित. तो ऋचासोबत खूश आहे हे समाधान राहील. आयेशाच्या रूपात त्याला लेकीचे सुख भेटत आहे. ह्या सर्व गोष्टी मी कधीच देऊ शकलो नसतो. शायरी कविता करून संसार चालत नसतो. त्यासाठी स्त्रीच हवी. " आर्यन

भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी आर्यन नकळतपणे मोबाईलवर कविता टाईप करू लागतो..

अंधारातले प्रेम अंधारातच राहिले
संवाद न होता स्पर्शच बोलू लागले
सर्वांसमोर मिठी मारता आली नाही
व्यक्त कराया मुखवटा फेकला नाही

अंधारातले प्रेम अंधारातच राहिले
डायरीच्या पानात ते कैद जाहिले
दोघांची कहाणी दोघातच राहिली
प्रेमास गुन्ह्याची का उपमा भेटली ?

अंधारातले प्रेम अंधारातच राहिले
समाजासमोर गुडघे त्याने टेकविले
वासनेच्या दलदलीत ते कुठे हरवले
माझे प्रेम मलाच का नाही गवसले ?

अंधारातले प्रेम अंधारातच राहिले
तुला अन मला लक्षातही न आले
का पारंब्यापरी जीवन नशिबी आले
शरीरे वेगळे होताना हृदय का रडले ?

अंधारातले प्रेम अंधारातच राहिले
एका रात्रीत ते मातीमोल जाहिले
समाजांच्या नजरेला इतके घाबरले
शापित माझे प्रेम तडफडतच मेले..

~ आर्यन ✍️

◆◆◆

"ए कार्तिक. मला पाणी आणून दे!" ऋचा कार्तिकला हलवत म्हणते.

"मी काही तुझा नोकर नाही रात्रीच्या दोनला तुला पाणी आणून द्यायला!" कार्तिक डोळे चोळत म्हणतो.

"आणून दे नाहीतर उद्या सगळं खरखर सांगेल.मला भीती वाटते!" ऋचा

कार्तिक अंगावरील आयशाचा नाजूक हात काढतो. मग बाहेर किचनकडे जात असतो. हॉलची लाईट चालूच दिसते आणि टेबलावर आर्यनची डायरी उघडलेली असते. कार्तिक त्या डायरीकडे जातो. डायरी वाचून कार्तिकचे डोळे पाणावतात. त्याची नजर घड्याळाकडे जाते. तो धावतच खाली जातो.

एव्हाना टॅक्सी आली होती. दिव्या आणि आर्यन टॅक्सीत बसले. कार्तिक धावत पार्किंगमध्ये पोहोचतो. तिथून "आर्यन" असा आवाज देत गेटपर्यंत पोहोचतो. कार्तिकला टॅक्सी जाताना दिसते. तो टॅक्सीमागे धावतो. दिव्याला आवाज येतो. ती टॅक्सी थांबवते. आर्यन आणि दिव्या दोघे टॅक्सीतून उतरतात. कार्तिक तिथपर्यंत पोहोचतो आणि दमल्यामुळे मोठमोठे श्वास घ्यायला लागतो.

"कुठे चालला होता ?" कार्तिक

"हे बघ मला जावे लागेल. अर्जेंट आहे. " आर्यन

"चूप!" कार्तिक मोठ्याने ओरडतो.

आर्यन दचकतो.

"तू पण चूप!" कार्तिक दिव्याला ओरडतो.

"पण मी काही बोललेच नाही!" दिव्या घाबरत म्हणली.

"तू सामान काढून ठेव. आर्यन तू चलच माझ्यासोबत!" कार्तिक आर्यनचा हात पकडून सोसायटीच्या गार्डनकडे खेचतो. मग आर्यनला बेंचवर बसवतो.

"स्वतःला "कुछ कुछ होता है" चा काजोल समजतो का ? एकदा पण विचार नाही केला की माझे काय होईल. मला रोज सकाळी शायरी कविता कोण ऐकवणार. " कार्तिक

"ऋचा आहे ना. ती ऐकवेल. मला कवाब में हड्डी नाही बनायचे!" आर्यन

"अरे यार ते मी असच म्हणलो होतो ते!" कार्तिक

"ऋचा मला हसत होती. आयशाने मला माझ्याच बेडरूममधून बाहेर काढले. तुला एकदा तर समजलं की मला किती त्रास होतोय या सर्वांचा. तुझे आईवडील तुझी बायको तुझी मुलगी. माझे काय ? मी काय करतोय इथे ?" आर्यन

"यार आईला संशय येत होता म्हणून खोटखोट रोमान्स केला." कार्तिक

"ठिके. उद्या जर डीएनए टेस्टमध्ये आयशा तुझी मुलगी निघाली तर काय करायचे मी ? तुमचा संसार बघत बसायचा का ?" आर्यन

"मी प्रेम नाही करत ऋचावर. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. हे बघ आर्यन. प्रेमकहाणी पूर्ण होण्यासाठी नेहमी एकत्र येणे किंवा लग्न करणे गरजेचे नसते. राधा-कृष्ण यांचे पण लग्न नाही झाले. तरी त्यांच्या प्रेमाचे दाखले आजही देतो ना आपण. प्रेम पवित्र भावना असते आणि त्याची पवित्रता सिद्ध करण्यासाठी कसलेच मापदंड नसतात. जर आयशा खरच माझी मुलगी असेल तर मी तिला मुलगी म्हणून स्वीकारेल. " कार्तिक

"आणि ऋचा ? तिचे काय करशील ? असेही कधी न कधी वेगळे व्हायचेच आहे ना आपल्याला. मी पण लग्न करेल. तुला पण कधी न कधी करावे लागेल. मग आताच वेगळे होऊ. म्हणजे पुन्हा त्रास होणार नाही." आर्यन

"यार अस तुटलेले हृदय घेऊन वेगळे नाही होणार आपण. सोबत इतके सुंदर क्षण जगलोय तर मग शेवट पण सुंदर करू ना. मला एकदा तुझ्यासोबत मनभरून गप्पा तर मारू दे. एक शेवटची सुंदर रात्र तर सोबत घालवू. मनसोक्त तुझ्या कविता तर ऐकू दे. तू मला प्रेम करायला शिकवले आहे मग प्रेमाचे शेवटचे क्षण अस घाईत नाही जगायचे मला." कार्तिक

"लेखक मी आहे पण पुस्तकी तू बोलतोय!" आर्यन

"तुझ्याकडूनच शिकलोय. सॉरी यार दिलसे. तुला खूप काही बोललो. तुझ्या प्रेमाला समजूनच नाही घेतले. तुला दुखावत राहिलो. भांडण होऊनही तू आईवडिलांशी खोट बोलताना मला साथ दिली. मला तुझे म्हणणे पटतंय. दोघांनाही लग्न करावेच लागेल. आईवडिलांसाठी नाहीतर समाजासाठी. पण म्हणून आपण आपले प्रेम कधीच संपू नाही द्यायचे. प्रत्येक यश आणि पार्थच्या नशिबी आशियाना नसतो जितके क्षण सोबत राहू त्यालाच आशियाना बनवू!" कार्तिक

मग आर्यन कार्तिकला घट्ट मिठी मारतो. दुरून हे दृश्य पाहत असलेल्या दिव्याचे पण डोळे पाणावतात. तिने टॅक्सी थांबवलेलीच होती. ती कार्तिक आणि आर्यनकडे येते.

"मला तुमच्या दोघांच्या डोळ्यात प्रेम स्पष्टपणे दिसत होते. खूप छान वाटले तुमचे गैरसमज दूर झाले ते बघून. पण मला आता जावे लागेल. फ्लाईट आहे. जगासाठी तुम्ही कितीही खोटी नाते उभा करत असाल तरी या सर्वात एक नाते खरे आहे ते म्हणजे तुमच्या प्रेमाचे नाते. कीप इट अप!" दिव्या

"तू पण रहा ना!" आर्यन

"डॅडला मला भेटण्याची इच्छा झालीय. म्हणून जातेय. जमलं तर येईन भेटायला." दिव्या

"थँक्स!" कार्तिक दिव्याला मिठी मारतो.

दिव्या जाते. कार्तिकला शिंक येते. आर्यन त्याला मारतो.

"तुला थंडी सहन होत नाही मग बान्यानवर धावत येण्याची गरज होती का ?" आर्यन

"स्वेटर घालेपर्यंत तू गेला असता म्हणजे ?" कार्तिक

"चल आता!" आर्यन

घरी गेल्यावर आर्यनने कार्तिकला हळदीचे दूध करून दिले. दिव्या आणि आर्यन ज्या खोलीत रहायचे त्या खोलीत कार्तिक आणि आर्यन गेले. मग कार्तिकने बेडरूमचे दार लावले. गार वारा सुटला होता. कार्तिकने आर्यनला उचलून बेडवर टेकवले. कार्तिकने स्वतःचा उबदार हात आर्यनच्या पायावर फिरवला. मग आर्यनच्या दोन्ही हातावर स्वतःचे हात टेकवून आर्यनच्या कपाळावर किस केले. मग हळूच आर्यनच्या मिटलेल्या डोळ्यावर स्वतःचे ओठ टेकवले. आर्यनचे ओठ ओठात घेतले. आर्यन पण कार्तिकला घट्ट बिलगला. ती सुंदर रात्र दोघानी एकमेकांच्या गुलाबी मिठीत काढली.

सकाळी आर्यन सवयीप्रमाणे लवकर उठला. त्याच्या अंगावर कार्तिकचा हात होता. किती चुकीचा विचार केला आपण. माझी इकडची स्वारी अजूनही तशीच आहे. ती बदलली नाही. माझे प्रेम कसोटीत खरे उतरले. आर्यन स्वतःशीच म्हणला. मग काय डायरी घेतली आणि झोपलेल्या कार्तिकच्या निरागस चेहऱ्याकडे बघत म्हणला.

कुछ इंसान फ़रिश्ते होते है
खुदा के नायाब तोफे होते है
प्यार का मतलब वो समझाते है
जमीन पे रहके जन्नत से रूबरू करवाते है...!!

~आर्यन✍️

ऋचा उठलेली असते. आर्यन आणि ऋचा घर साफ करतात. हळूहळू सर्वजण उठतात. मिस्टर जिंदलची कुरबुरी अधून मधून चालुच असतात. सर्वजण नाश्ता करत असतात. ऋचाने खमंग पोहे बनवले असतात.

"दिव्या कुठेय ?" मिसेस जिंदल

"काल तिच्या वडिलांचा अचानक फोन आला. सो रात्रीच जावे लागले!" आर्यन

"तू नाही गेला सोबत ?" मिस्टर जिंदल

"नाही. माझी महत्वाची मिटिंग होती!" आर्यन

"आमचा मुलगा तर काय काम करतो कुणास ठाऊक!" मिस्टर जिंदल टोमणा मारतात.

तेवढ्यात बेल वाजते. कार्तिकच्या मनात परत धडकी भरते. तो मनातल्या मनात गाणे गातो.

बेल वाजली बेल वाजली
संकटांची चाहूल लागली
कोण आलं असेल दारात
धडकी भरते सतत मनात

बेल वाजली बेल वाजली
नाटक करायची वेळ झाली
खोटे बोलू लोकांना फसवू
नवीनच नाते नव्याने बनवू

बेल वाजली बेल वाजली
आता कुणाची वेळ आली
नवीन नवरा नवीन बायको
मान्य करा सर्व प्रश्न कायको

बेल वाजली बेल वाजली
पाहुणा की पाहुणी आली
बँड आता वाजणार आहे
हाऊसफुल शो ठरत आहे

बेल वाजली बेल वाजली
उत्तरे शोधा आता प्रश्नांची
खोटे लपवायला खोटे बोलतोय
नात्याचा गुंता अजूनच वाढतोय

बेल वाजली बेल वाजली
नौका काढा सुनामी आली
शेवट काय मज ठाऊक नाही
मनी आपोआपच सुचत राही

आर्यन दार काढतो आणि समोरची व्यक्ती पाहून त्याला शॉकच बसतो..

"राम राम मंडळी" समोरून आवाज आला.

आवाजात गावठी ढंग होता. प्रौढ व्यक्तीचा आवाज होता. आर्यनसमोर एक बाज होती. बाजमागे गुलाबी फेटा , पांढरी धोती , पांढरा कुर्ता आणि त्यावर काळे जॅकेट असा गावातील पोशाख घातलेला , पिळदार मिशी असलेला व्यक्ती उभा होता.

"बाबा तुम्ही ?" आर्यन

"म्या बी हाय!" एक हिरवी नववारी साडी नेसलेली स्त्री समोर येते.

"आई तू पण ?" आर्यन

"आणि मी पण.." हरीश भाऊ समोर येतो.

आता आर्यन बेशुद्धच होणार असतो. आर्यन सर्वाना आत बोलावतो. क्षणभरात हॉलमध्ये खूप पसारा होतो. आर्यनचे बाबा म्हणजे गणपतराव पाटील हॉलमध्ये बाज टाकतात. आणि त्यावर बसतात.

"रामराम!" गणपतराव मिस्टर जिंदलला म्हणतात.

"हॅलो!" मिस्टर जिंदल

"कार्तिक कोण आहेत हे ?" मिसेस जिंदल दबक्या आवाजात म्हणतात.

"आर्यनचे आईवडील बहुतेक!" कार्तिक

मग गणपतराव मागून हवा सोडतात. सगळीकडे दुर्गंध पसरतो.

"ह्या आजोबांनी हवा सोडली!" आयशा हसते.

"ए चूप..अस म्हणतात का मोठ्याबद्दल!" कार्तिक आयशाला हलकेसे मारतो.

मिस्टर आणि मिसेस जिंदलला वास असहनिय होतो आणि ते आत बेडरूममध्ये पळतात. बाकीचे मास्क घालतात. कार्तिक स्प्रे मारतो.

"माफ करा. यांच्या भट्टीची जरा प्रॉब्लेमच आहे!" आर्यनची आई लक्ष्मीबाई म्हणते.

"काही हरकत नाही काकू. प्रवास ठीक झाला ना ?" कार्तिक

"त्ये जाऊ द्या. आधी मला सांगा तुम्ही लग्न का केलं ? आणि वर एक पोरगी पण हाय!" गणपतराव आर्यनकडे रागाने बघत म्हणतो.

"बाबा मी कुठे लग्न केलं ?" आर्यन आश्चर्यचकित होऊन म्हणतो.

"खोट नको बोलू. काका मी स्वतः आर्यनच्या बायकोला पाहिले आणि मुलीला पण. ही जी मुलगी आहे ना तीच आर्यनची मुलगी आहे!" हरीश म्हणला.

"ही आर्यनची मुलगी आहे का ? ये ना आपल्या आजीच्या मांडीवर बस!" लक्ष्मीबाई आयशाला बोलावते.

आयशा पण मांडीवर जाऊन बसते. लक्ष्मीबाई आयशाचे लाड करते.

"अहो तुमच्या मुलाने न सांगता लग्न केलं. पोरगी झाली तरी सांगितले पण नाही. आणि तुम्हाला काहीच कस वाटत नाही ?" गणपतराव चिडतात.

आर्यन कार्तिककडे बघतो आणि कार्तिक भिंतीकडे बघतो.

"बोल की गाढवा. तुला लहानाचे मोठे केलं आणि इतका बी हक्क नाही व्हय आमचा ?" गणपतराव

"हरीशने गावी जाऊन त्याच्या घरी सांगितले आणि हळूहळू पूर्ण गावात बोभाटा झाला की तू लग्न केलंय आणि तुझी पोरगी बी हाय म्हणून!" लक्ष्मीबाई

"मी सांगते!" ऋचा

खोलीतून एक मराठी नारंगी पैठणी , नाकात नथ , कपाळाला चंद्रकोर घातलेली ऋचा बाहेर येते. तिचे सौंदर्य पाहून गणपतराव आणि लक्ष्मीबाई थक्क होतात.

"सासरेबुवा पाया पडते!" ऋचा

"सुखी रहा पोरी.!" गणपतराव

"सासूबाई पाया पडते!" ऋचा

"अगदी नक्षत्रावाणी हायस बघ. गावात एवढी सुंदर सुन कोणाची बी नसलं. " लक्ष्मीबाई बोटे मोडत म्हणतात.

"सुनबाई मला तुम्ही भोळ्या वाटतात. आमच्या गावात सुनेला शब्द बी बोलत नाहीत. तिला लक्ष्मी मानत्यात. पण ह्या गाढवाला लई मारणारे मी आज!" गणपतराव

"आयशा तू आत जा!" ऋचा

मग आयशा आत जाते.

"आव नातीसमोर काय बोलताय!" लक्ष्मीबाई

"सासरेबुवा. माझे लग्न आर्यनच्या मित्रासोबत ठरले होते. पण साखरपुडा झाल्यावर त्यांनी हुंडा मागितला. माझ्या वडिलांना हुंडा द्यायला जमेना. भर मांडवात कार पाहिजे म्हणून अडून बसले. माझे वडील रडू लागले. गयावया करू लागले. मी ज्या समाजातून आले तिथं एकदा मुलीचे लग्न मोडले की दुसऱ्यांदा कुणीच सोयरीक जमवत नाहीत. त्यांनी भर मांडवात हुंड्यासाठी माझी सोयरीक मोडली. माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला. आर्यनने खूप मदत केली. बाबांनी मरताना आर्यनला माझ्या मुलीशी आजच लग्न कर असे वचन मागितले. मग आम्ही लग्न केलं. ही मुलगी आयशा माझी लहान बहिण आहे. आई लहानपणी वारली म्हणून मलाच मम्मी म्हणते आणि आर्यनने हिला बापाचे प्रेम भेटावे म्हणून "बाबा" म्हणायला सांगितले!" ऋचा

"काका ही तर "मन उधाण वाऱ्याचे" सिरियलची स्टोरी आहे. मला खोटे वाटत आहे सर्व. पण तुम्ही आम्हाला सांगितले का नाही ? घरात फोटो का नाहीत लग्नाचे ?" हरीश

"इतक्या घाईत फोटो काढायचे सुचले नाही. खऱ्या आठवणी फोटोत कैद पण होत नाहीत!" ऋचा

"ए हऱ्या. तुझे लफडे सांगू का ? त्या गंगूसोबत उसाच्या शेतात जायचा त्ये. मला विश्वास हाय आर्यनवर. पोराने बापावानी मुलीच आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवले. मला गर्व हाय पोरावर!" लक्ष्मीबाई

"खर असेल हे तर मला पण मान्य आहे. आज बी शहरात हुंडा घेत्यात लोक. मी तर गावातपण हुंडाबंदी आणली. पोरी लक्ष्मी असत्यात आणि तिच्यापासून हुंडा का घ्यायचा!" गणपतराव

"मी जातो काका. माझी मिटिंग आहे!" हरीश भाऊ

हरीश निघून जातो. आर्यन त्याच्याकडे रागाने बघत असतो. मग आर्यन बेडरूममध्ये जातो. हरीशचा सर्व गैरसमज मिस्टर आणि मिसेस जिंदल यांना सांगतो.

"काका काकू. माझे आईवडील थोडे रागीट आहेत. म्हणून आम्हाला नाटक करावे लागणार आहे. जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत ऋचा माझी बायको असेल!" आर्यन

"अरे पण खरखर सांगायचे ना दिव्या बायको आहे म्हणून!" मिस्टर जिंदल

"गावात सगळीकडे बोभाटा झालाय. आईवडीलांना कापण्याची खूप सवय आहे. राग आला की सरळ काहीपण कापतात. तुम्हीपण थोडे दूरच रहा. " आर्यन

इकडे कार्तिक गणपतराव आणि लक्ष्मीबाईला बोलतो.

"काका काकू काय सांगू आता. माझा मोठा भाऊ होता. माझ्यासारखा दिसायचा. माझी मोठी वहिनी सॉरी वहिनी होती. ऋचासारखीच होती. माझी मोठी पुतणी म्हणजे पुतणी. आयशासारखीच होती. पण नियतीने असा डाव साधला की एका अपघातात सर्वांचा मृत्यू झाला. माझे आईवडीलांना खूप मोठा धक्का बसला. ते मलाच माझा मोठा भाऊ समजू लागले. आणि ऋचाला माझी बायको. तर त्यांच्यासाठी मी त्यांचा मोठा मुलगा , ऋचा माझी बायको आणि आयशा माझी मुलगी आहे. म्हणून मी आणि ऋचा नवरा बायको असल्याचे नाटक करतोय जोपर्यंत आईवडील घरी आहेत तोपर्यंत!" कार्तिक रडू लागला.

"काही कळलं का हो ?" लक्ष्मीबाई

"पूर्ण नाही. पण पोराचे आईवडील मानसिक धक्क्यात दिसताय. त्यांना वाटतय की ऋचा त्यांचीच सून आहे आणि आयशा त्यांचीच नात आहे!" गणपतराव

"बाळा तू रडू नको. आम्ही तुझ्या आईवडीलांना कायबी बोलणार नाही!" लक्ष्मीबाई पदराने कार्तिकचे अश्रू पुसतात.

मिस्टर-मिसेस जिंदल आणि गणपतराव-लक्ष्मीबाई एकमेकांना काहीच बोलत नाहीत आणि दूरदूरच पळतात. गणपतराव वास सोडत असतात त्यामुळे कार्तिक मार्केटमधून नवीन स्प्रे आणि मास्क आणतो. रात्री एका खोलीत मिस्टर आणि मिसेस जिंदल , एका खोलीत ऋचा आयशा आणि एका खोलीत गणपतराव आणि लक्ष्मीबाई झोपते.

@रात्रीच्या दोन वाजता

स्थळ : गच्ची

"हे बघा. पॅनिक होऊ नका. मी लॅपटॉपवर पिपिटी बनवली आहे!" आर्यन

"काही दिवसापूर्वी लाईफ काय होती आणि आता काय होती." कार्तिक

"ऋचा तुला काय गरज होती ग माझी बायको बनण्याची. दिव्याला दिले होते ना पैसे भूमिकेचे!" आर्यन

"अरे माझी लहानपणीपासूनची फॅन्टसी होती की कार्तिक आणि आर्यनची बायको बनण्याची. वेड्या हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. मला त्याच दिवशी त्या हरीशच्या चेहऱ्यावरून संशय आला. काहीतरी रायता पसरला आहे म्हणून. आणि दिव्याला कुठून आणणारे ? अस पण गावात पसरले मीच बायको आहे म्हणून!" ऋचा

"आणि ती मराठमोळी साडी कुठून आली ?" कार्तिक

"ड्रेसवर चटणी सांडली होती म्हणून. ती साडी सापडली. आणि नवीन सासऱ्यांना इम्प्रेस पण करायचं होतं!" ऋचा

"वाह. तुला जमतंय बर हे सर्व. असो. आता ऐका.
माझे आईवडील गणपतराव-लक्ष्मीबाई यांच्यासाठी माझी बायको ऋचा आणि मुलगी आयशा. मिस्टर आणि मिसेस जिंदल साठी कार्तिक-ऋचा-आयशा असा परिवार आहे. तर माझे आईवडील दिसले की मी आणि ऋचा "चोरीचा मामला मामाही थांबला" करणार. आणि जिंदल कपल दिसले की कार्तिक-ऋचा "चोरीचा मामला मामाही थांबला" करणार. आयशा मला आणि कार्तिक दोघांना बाबा म्हणेल. कुणाला काही शंका ?" आर्यन

"दिव्या ?" कार्तिक-ऋचा एकसुरात म्हणतात.

"ती काय येत नाही. आउट ऑफ सिलाबस प्रश्न नका विचारू." आर्यन

मग सर्वजण खाली झोपायला जातात. तीन दिवस असेच मस्त नाटक चालते. तिसऱ्या दिवशी पुन्हा बेल वाजते. हृदयात धडकी भरते. आर्यन दार काढतो.

"नवरोबा" दिव्या आर्यनला मिठी मारते..

गणपतराव लक्ष्मीबाईकडे , लक्ष्मीबाई मिस्टर जिंदलकडे , मिस्टर जिंदल मिसेस जिंदलकडे , मिसेस जिंदल कार्तिककडे , कार्तिक आर्यनकडे आणि आर्यन भिंतीकडे बघून रडायला लागतो.

"नवरोबा" असे बोलून दिव्या आर्यनला मिठी मारते.

पण सर्वजण एकमेकांकडे बघू लागतात.

"काय झाले ? मी माझा रोल बरोबर करत आहेत ना ?" दिव्या दबक्या आवाजात आर्यनला म्हणते.

"हो ग. पण आम्हीच रोल बदलले आहेत!" आर्यन

"म्हणजे ?" दिव्या

"आता तू माझी नाही कार्तिकची बायको आहेस!" आर्यन

"तुम्ही सतत माझा नवरा का बदलता ? एक काय तो फिक्स करा ना!" दिव्या

दिव्या लगेच दूर होते.

"तिरकी. बायकोबा मी इथे आहे. ते काय आहे माझ्या बायकोची नजर थोडी तिरकी आहे आणि म्हणून कधी कधी आर्यनलाच नवरा समजते!" कार्तिक हसत म्हणतो.

"लक्ष्मी. मी पागल झालो तर माझी प्रॉपर्टी आयशाच्या नावावर कर!" गणपतराव

"आणि माझी पण!" मिस्टर जिंदल

"काय ग बाई ? आपला नवरा कोण हे पण धड कळत नाही आजकालच्या पोरींना. " लक्ष्मीबाई

"सेम पिंच. मी पण हाच डायलॉग मारला होता!" मिसेस जिंदल

"जाऊबाई आत चला ना स्वयंपाक करू!" दिव्या ऋचाला म्हणते.

"हो चला ना! लोक वाढलेत त्यामुळे खूप स्वयंपाक करायचा आहे!" ऋचा

दिव्या लगेच किचनमध्ये पळते. स्वयंपाकघरात दिव्या विचारात पडते.

"तू कार्तिकची बायको होतीस ना मग आर्यनची कशी झाली ?" दिव्या

ऋचा सर्व हकीकत सांगते.

"अरे देवा. इतका रायता पसरला आहे. त्यात अजून एक रायता पसरणारे!" दिव्या

ऋचाला घाम फुटतो.

"म्हणजे ? प्लिज आम्ही अजून वादळांना तोंड देण्याच्या मनस्थितीत नाही!" ऋचा

"माझा मामा येणारे उद्या रात्री!" दिव्या

ऋचा रडायला लागते.

"मी आर्यनला माझा बॉयफ्रेंड बनवला आहे!" दिव्या

"अग पण काय गरज होती!आधीच कमी रायता पसरला आहे का ?" ऋचा

" माझा मामा आणि माझे डॅड माझे लग्न लावून देताय. म्हणून मी खोटेखोटे बॉयफ्रेंड आहे म्हणून सांगितले!" दिव्या

"अरे यार. जाऊद्या. आज रात्री गच्चीवर मिटिंग करू आणि डिस्कस करू!" ऋचा

तो दिवस असाच जातो. रात्री दिव्या , ऋचा आणि आयशा एकेठिकाणी झोपतात. झोपलेल्या आयशाच्या केसांवरून ऋचा हात फिरवत असते.

तिचे डोळे पाणावतात. तिच्या मनात भावना उफाळून येतात.

आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार
सहन करून सारे तुझे भविष्य घडवणार
सोनेदागिने नाही मजपाशी तुला द्यायला
ताकद अन हिंमत देईल जगाशी लढायला

मला ही वाटते ग तुला परीसारखे जपावे
नशीबच माझे फुटके त्याला काय करावे
जे माझे झाले ते तुजसंग न होऊ देणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार

लोक जरी मजसंगे खेळले वारंवार
तरी मी तुला खेळणी आणून देणार
हट्ट मी विसरले तरी तुझे हट्ट पुरवणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार

तुझ्यासाठी मी बघ राजकुमार शोधणार
तुला तुझ्या आईची आठवणही न येणार
आई विसरशील इतके सुख तुज देणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार

दुर्दैवी आईची सावलीही तुझ्यावर न पडो
तुझ्या सुखाला कुणाचीही नजर न लागो
तुझ्या आनंदासाठी तुझी आई जगणार
आई आहे ग मी लेकीचेच सुख बघणार

"एक विचारू ? आयशा कार्तिकचीच मुलगी आहे का ?" दिव्या

"कळेल लवकरच. तुला एक विचारू का ?" ऋचा

"उद्या मला काही झाले तर आयशाला बघशील का ग ? म्हणजे तिला आईचे प्रेम दे अस नाही पण किमान तिची मैत्रीण बनून तरी संपर्कात राहशील ना ?" ऋचा

"अग अस का बोलत आहेस तू ? तू कुठे जाणारे ?" दिव्या

"जीवनाचा काय भरोसा आज आहे उद्या नाही!" ऋचा

"ए वेडी. अस काही नाही बोलू प्लिज. आणि मावशी म्हणून मी आयशाचा नेहमी लाड करेल. आर्यनचा मेसेज आलाय चल गच्चीवर!" दिव्या

दोघी गच्चीवर जातात.

गच्चीवर कार्तिक-आर्यन आधीच असतात.

ऋचा-दिव्या आल्यावर मिटिंग सुरू होते. आर्यन लॅपटॉप उघडतो.

"गड्यांनो. काही काळजी करू नका. पॅनिक होऊ नका. मी पीपीटी बनवली!" आर्यन

"ऑफिसमध्ये हेच करतोस का ? पीपीटी बनवत बसतोस का ?!" कार्तिक आर्यनला टपलीवर मारत म्हणतो.

"गप रे. प्रॉपर प्लॅनिंग असावी लागते!" आर्यन

"काही फायदा नाही. उद्या रात्रीपर्यंत माझे मामा येणारेत. माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला!" दिव्या

"अग मी घराबाहेर भेटव ना तुझ्या बॉयफ्रेंडला!" आर्यन

"अरे येड्या तू आहेस माझा बॉयफ्रेंड!" दिव्या

"मी कधी झालो तुझा बॉयफ्रेंड ? मी तर नवरा होतो ना. यार मला न विचारता बॉयफ्रेंड नका बनवू!" आर्यन

"आणि तुम्ही न विचारता माझा नवरा बदलता ते ? प्लिज माझी मदत करा. नाहीतर माझे लग्न लावतील ते लोक!" दिव्या

"यार परत पीपीटी बनवावी लागेल!" आर्यन

"काय चाललंय आयुष्यात. लहानपणी जितकं घरघर खेळलो नसतील तितकं खेळावे लागत आहे." कार्तिक

"झोपा आता. मामा आल्यावर बघू काय करायचे ते." आर्यन

सर्वजण झोपायला जातात.

सकाळी कार्तिक जिम करत असतो. आर्यन फ्रेश होऊन ऑफीसला जाण्यासाठी तयार होतो.

गणपतराव तिथे येतात.

"वाह कार्तिकराव. मस्त बॉडी हाय तुमची. मला पण व्यायामाचा लई नाद आहे!" गणपतराव

"अच्छा. छान!" कार्तिक

"मला तर पहिलवान पोरग हवं होतं पण कुठून आर्यनसारख लाजाळूच झाड निपजले कुणास ठाऊक. विहीरीत पोह म्हणलं तर शर्ट बी काढत नव्हतं. नुसतं पोरींवाणी हातवारे करायच. बायल्या होत. लग्न बी करेल की नाही धास्ती वाटायची. " गणपतराव हसत म्हणले.

आर्यन हे ऐकतो. त्याला मनोमन वाईट वाटते. बेडरूममध्ये जाऊन एकटा बसतो. किचनमध्ये लक्ष्मीबाईला ऐकू जाते. त्यांनाही मनोमन वाईट वाटते. ऋचा आणि दिव्या पण तिथेच असतात.

"माझा आर्यन पहिलवान नसलं. चारचौघात बोलत बी नसेल जास्त. पण माणूस म्हणून लई चांगला हाय. एकटा बसला असेल आता खोलीत. " लक्ष्मीबाई पदराने डोळे पुसतात.

आर्यन खोलीत एकटाच बसला असतो. बालपण डोळ्यासमोर तरळून जाते. लहानपणीपासून आर्यनला एकही मित्र असतो. एकदा तर नीट पुरुषांप्रमाणे चालत नाही म्हणून बाबानी पायाला चटके पण दिले असतात. आपण का असे आहोत हे प्रश्न नेहमी सतावत असे ? का आपण चारचौघाप्रमाणे मुलांमध्ये मिसळू शकत नाही ? का असे मुलींसारखे हावभाव आहेत ? खूपदा तो स्वतःला चापट मारून घेत. खूपदा तर आत्महत्या करण्याचा विचारही आला. हे सर्व आठवताना नकळतपणे डोळ्यात कधी पाणी आले आर्यनला कळले देखील नाही. तेव्हा कुणीतरी खांद्यावर हात ठेवला आणि आर्यन भानावर आला.

"आयशा. तू इथे काय करत आहेस बच्चा ?" आर्यन आयशाला मांडीवर बसवतो.

आयशा आर्यनचे अश्रू पुसते.

"तू कसाही असलास तरी माझा बेस्ट फ्रेंड आहेस!! मी तुला बाबा म्हणू आजपासून ?" आयशा आर्यनला मिठी मारत म्हणते.

"हो ना. मी माझ्या परीसाठी आज चॉकलेट केक आणेल!" आर्यन

आर्यनच्या चेहऱ्यावर हसू येते आणि तो आयशाला किस करतो.

आर्यन बाहेर येतो आणि ऑफीसकडे जातो. कार्तिक गणपतरावाना डायरी दाखवत असतो.

"कोण आहे इतका मोठा कवी ? किती सुंदर कविता केल्या आहेत!" गणपतराव

"काका. आर्यनची डायरी आहे ही. तो खूप भारी कवी आहे!" कार्तिक

आर्यनच्या चेहऱ्यावर हास्य येते. कार्तिक आर्यनला पाहून लगेच डोळा मारतो.

"हम्म. छंद पकडून पकडून मुलींचाच !" गणपतराव डायरी फेकत म्हणतात.

आर्यनला वाईट वाटते.

लक्ष्मीबाई बाहेर येतात.

"बाळा तुझ्या आवडीची भेंडीची भाजी आहे. " लक्ष्मीबाई मायेने आर्यनच्या गालावर हात फिरवते.

"थँक्स आई. खूप दिवसांनी तुझ्या हातचे खायला भेटेल!" आर्यन

असे बोलून आर्यन निघून जातो. थोड्यावेळाने कार्तिक , मिस्टर जिंदल पण बाहेर पडतात.

ऑफिसच्या ब्रेकमध्ये कार्तिक आर्यनला व्हिडीओ कॉल करतो.

"बोला इकडची स्वारी..!!" आर्यन

"वाईट वाटले ना तुला!" कार्तिक

"नाही रे. बाबा तसेच आहेत. मी कधी त्यांच्या नजरेत कौतुकास्पद झालो नाही. त्यांच्या नजरेत आधीही नालायकच होतो आणि कदाचित पुढेही राहणार. " आर्यन

"सोड रे. हे बापलोक असेच असतात. सलीम-अकबर , अजातशत्रू-बिंबिसार अगदी प्राचीन इतिहासापासून पिता पुत्राचे कधीच पटले नाही!" कार्तिक

"सही है!" आर्यन हसतो.

"असच हसत रहा. बाय! पटकन किस दे!" कार्तिक

आर्यन आजूबाजूला बघून चोरून फ्लाईनग किस देतो.

इकडे गणपतराव पोटभर जेवण करून दुपारी झोपी जातात.

ऋचा सर्व स्त्रियांना हॉलमध्ये एकत्र करते.

"आता आपण प्राणायम करू!" ऋचा

"त्यापेक्षा टीव्हीवर एखादा चित्रपट लाव ना!" लक्ष्मीबाई

"त्यापेक्षा शॉपिंगला जाऊ!" दिव्या

"बेटा आता या वयात कस करु प्राणायाम?" मिसेस जिंदल

"आपण स्त्रिया कुटुंबातील सगळ्यांची काळजी करतो. मग थोड्या वेळ स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर ? शॉपिंग मुव्ही याने तर करमणूक होईल पण प्राणायामने मन आणि शरीर दोघांना फायदा होईल!" ऋचा

मग ऋचा प्राणायम शिकवते. चिमुरडी आयशा पण प्राणायाम करु लागते. प्राणायाम करून सर्वजण फ्रेश होतात.

चारला थोड ऊन उतरल्यावर सर्वजण गच्चीवर जातात. गच्चीवर सर्वाना समलैंगिक लोकांची प्राईड मार्च जाताना दिसतो.

"काय आहे बाई हे ?" लक्ष्मीबाई

"आजकालचे मुले हो. जी गोष्ट लपवायला हवी ती उघडपणे सांगताय. " मिसेस जिंदल

"आंटी त्यात लपवण्यासारखे काय आहे ? समलैंगिक असणे नैसर्गिक आहे. कुणी ठरवून किंवा चॉईस म्हणून समलैंगिक बनत नाही." दिव्या

"यात काहीजण तृतीयपंथी पण दिसताय. पण काही चांगल्या घरची मुले आणि मुली पण दिसताय. " लक्ष्मीबाई

"ही एलजीबीटी कम्युनिटीची प्राईड आहे. लेस्बियन म्हणजे अश्या स्त्रिया ज्या स्त्रियांवर प्रेम करतात. गे म्हणजे असे पुरुष जे पुरुषांवर प्रेम करतात. बायसेक्सउल म्हणजे दोन्ही लिंगाविषयी आकर्षण असलेले आणि ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी. " ऋचा

लक्ष्मीबाईच्या डोळ्यात पाणी आले.

"काय झाले ?" दिव्या खांद्यावर हात ठेवून म्हणली.

"काही नाही. माझ्या मामाचा मुलगा असाच होता. थोडा बायकी. साड्या नेसवून द्यायचा. माझ्या लग्नाला त्यानेच नेसवून दिली. म्हणला ताई सुखाने रहा. बाप लई झोडायचा त्याला. लग्नानंतर समजल त्याने विष पिऊन आत्महत्या केली. चिठ्ठीत लिहिले मी बायल्या आहे आणि कधीच मर्द बनू शकणार नाही. माझा मावसभाऊ जिता रहायला पाहिजे होता. तो इथं असता तर त्यालाबी आधार भेटला असता! " लक्ष्मीबाईला रडू कोसळले.

पण दिव्या आणि ऋचाने सावरले.

"मिसेस जिंदल तुम्हाला काय वाटते ?" ऋचा

"माझा कार्तिक नॉर्मल आहे सो मी विचारच का करू ? आणि माझे मत आहे की ठिके असेल हे सर्व नैसर्गिक पण मग जे करायचे ते बेडरूममध्ये करा. लोकांना ओरडून का सांगताय ?" मिसेस जिंदल

"कारण लोकांनी स्वीकारावे म्हणून. भारतात आजही समलैंगिकांना लहानपणीपासून मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागते. भावनिक कोंडमारा इतका असतो की तुम्ही कधी विचार पण करू शकत नाही. " ऋचा

"हम्म. असू दे ना. आपल्याला काय ?" मिसेस जिंदल.

मग सर्व स्त्रिया खाली जातात. संध्याकाळी हॉलमध्ये सर्वजण जमलेले असतात. आर्यनने आयशासाठी चॉकलेटचा केक आणला असतो. बेल वाजते. कार्तिक आणि आर्यनच्या हृदयात धडकी भरते.

आर्यन दार उघडतो. एक प्रौढ व्यक्ती उभा असतो. कपड्यावरून तर मोठा बिजनेसमॅन मीटिंग सोडून आलाय अस वाटत असते.

"आर्यन राईट ?" मामा

"या मामा!!" आर्यन चक्क मामाचे पायाच पडतो.

"पप्पूराव आलाय की काय ?" गणपतराव लक्ष्मीबाईकडे म्हणतात.

पप्पूराव म्हणजे लक्ष्मीबाईचा सखा भाऊ आणि आर्यनचा मामा.

"नाही हो. त्याची म्हैस पोटूशी हाय. तो न्हाय यायचा!" लक्ष्मीबाई

इकडे मामा खूश होतो. दिव्या पण दरवाज्यापाशी जाते.

"मामा..मीट माय बॉयफ्रेंड आर्यन!" दिव्या आनंदाने
म्हणते.

"खूप शांत आणि संस्कारी वाटतोय!" मामा

"आत या ना मामा!" दिव्या

मग मामा आत येतो.

"अरे बापरे इतकेजण एकाच घरात ?" मामा हसतो.

"आम्ही "हम साथ साथ है" खेळतोय. " कार्तिक दबक्या आवाजात म्हणतो.

"मला इन्ट्रो करून दे कोण कोणाचे कोण लागतात?" मामा

"मी करून देते. हा आर्यन. हे आर्यनचे आईवडील. हा कार्तिक आर्यनचा रुममेट. ह्या जाउबाई म्हणजे कार्तिकची बायको आणि ही क्युट आयशा त्यांची मुलगी. हे मिस्टर अँड मिसेस जिंदल कार्तिकचे आईवडील." दिव्या

"हे आर्यनचे आईवडील बापरे. नमस्कार पाहुणे. " मामा

"रामराम. " गणपतराव

"मी चार दिवस आर्यनला बघेल. पारखेल. मग इथेच सुपारी फोडू. तुम्ही पण दिव्याला पारखा." मामा

गणपतराव लक्ष्मीबाईकडे बघतात आणि लक्ष्मीबाई आर्यनकडे , आर्यन कार्तिककडे , कार्तिक दिव्याकडे आणि दिव्या भिंतीकडे बघते.

"तुम्ही आर्यनला का पारखताय ?" गणपतराव

"त्यांचे आधीच लग्न झालेय !" मिस्टर जिंदल

"काय ? दिव्या हे काय म्हणताय ?" मामा

"मामा तू आधी हातपाय धू. मी सगळे सांगते!" दिव्या

मग मामा फ्रेश व्हायला जातात.

"तुम्ही आत चला दोन मिनिटे!" ऋचा मिस्टर आणि मिसेस जिंदलला म्हणते.

मग मिस्टर आणि मिसेस जिंदल आत येतात.

बाहेर फक्त आर्यनचे आईवडील आणि कार्तिक-आर्यन ,दिव्या असतात.

"बोला..!" गणपतराव

"आई दिव्या माझी एक्सगर्लफ्रेंड होती. पण ऋचाचे "मन उधाण वाऱ्याचे" सिरीयलसारखे झाले. म्हणून मला लग्न करावे लागले. " आर्यन

"तुझी एक्स गर्लफ्रेंड ? कायबी ? गावात तर मुलीशी बोलत बी नव्हतास. " गणपतराव

"तुमच्यावर गेलंय. तुम्ही नाही का मी विहिरीत पाणी भरताना शिट्टी मारायचे. " लक्ष्मीबाई लाजत म्हणतात.

"ते तुझ्या मैत्रिणीला मारत होतो. पण तुझी मैत्रीण बहिरी होती नंतर समजलं. " गणपतराव पश्चातापसारखा चेहरा करतात.

"गप बसा. लेकरांसमोर कायबी बोलताय. " लक्ष्मीबाई गणपतरावच्या पायाला लाथ मारतात.

"माझी संगत काका. मी पटवून दिली होती दिव्या याला. पण मला काय माहीत हा मन उधाण वाऱ्याचेमधला निखिल बनेल आणि नीरजाला सोडून गौरीशी लग्न करेल. पण मग दिव्याशी मी लग्न केले. म्हणजे ती म्हणाली ह्याने लग्न केले मग मी पण लग्न करणार. मी फ्री होतो तेव्हा म्हणले करून टाकावे लग्न. एक काम होऊन जाते ना काका. " कार्तिक

"फ्री होतास ? बर मग आता खरखर सांगा ना मामाला. " गणपतराव

"मजा नाही येत ना. सॉरी म्हणजे मामाला हार्टचा प्रॉब्लेम आहे. जर त्यांना सत्य कळले तर हार्ट अटॅक येईन. " कार्तिक

दिव्या जोरजोरात रडायला लागते.

"तुम्हाला वाटते का मामा वरती जावा म्हणून!" दिव्या

"रडू नको पोरी. बाईजन्माचे असेच असते." लक्ष्मीबाई स्वतः पण रडू लागतात आणि दिव्याचे सांत्वन करतात.

शेवटी गणपतराव-लक्ष्मीबाई तयार होतात.

@बेडरूममध्ये

"बोल. आता काय नवीन कारण. ऐक माझे हे सर्वजण आपल्याला मामा बनवताय. " मिस्टर जिंदल मिसेस जिंदलला म्हणतात.

"ज्यांची घरे काचेची असतात त्यांनी इतरांच्या घरावर दगडे फेकू नये. हे बघा काहीच अवघड नाही. आर्यन दिव्याने चोरून लग्न केले आणि मामाला हे माहीत नाही. म्हणून मामा आर्यनला दिव्याचा बॉयफ्रेंड मानतो!" ऋचा

"जाऊद्या आपल्याला काय. कार्तिक ऋचा सुखात आहेत ना. चला बाहेर" मिसेस जिंदल बाहेर जातात.

"माझी बायको जरी भोळी असेल तरी मी लवकरच तुमचे नाटक उघड करेल सुनबाई!" मिस्टर जिंदल

"सासरेबुवा. नाटक आपण सर्वच करतो. कुणी सभ्यतेचे तर कुणी कशाचे. बघूच कोण कुणाचे नाटक उघडकीस लावतोय!" ऋचा नजरेला नजर भिडवून आत्मविश्वासाने म्हणते.

मामा फ्रेश होऊन हॉलमध्ये येतो.

"तर आता मी मुलाखत घेणारे!" मामा

"आधी जेवून तर घ्या." ऋचा

"नाही. आर्यन जा फॉर्मल ड्रेस घालून ये!" मामा

बिचारा आर्यन फॉर्मल ड्रेस घालून येतो. कार्तिक गालातल्या गालात हसतो.

"कार्तिक..याची वजन , उंची मोज!" मामा

"70 किलो , 5 फूट आठ इंच." कार्तिक

"ओके. पुशप्स मार. 50. " मामा

"मामा मी दिव्यासाठी 50 शायरी लिहू शकतो. कलम तलवारीपेक्षा श्रेष्ठ असते. " आर्यन

"मग पेन घेऊनच लढले असते ना. मार पुशप्स. दिव्या हवीय का नको ?" कार्तिक

"हो..मार ना..आम्ही मोजू किती मारल्या ते.." आयशा

"अरे लहानपणी बापासाठी कधी व्यायाम केला नाही आता निदान बायकोसाठी तरी कर व्यायाम. " गणपतराव उठून म्हणतात आणि लगेच वास सोडतात.

"आजोबा पादले!" आयशा

"ए चूप. मी स्प्रे आणतो." कार्तिक नाकावर हात ठेवून म्हणतो.

"सॉरी बर का. भट्टीची प्रॉब्लेम आहे पण आर्यन तसा नाही बर का. " लक्ष्मीबाई

"तू मार की पुशप्स!" मामा

बिचारा आर्यन पुशप्स मारायला लागतो.

सर्वजण मोठ्याने काऊंट करतात. तेवढ्यात बेल वाजते. पुन्हा सर्वांच्या मनात धडकी भरते. आर्यन दार काढायला जातो. चक्क घरमालक जानकीबाई उभी असते.

"आत या ना!" आर्यन घाबरुन म्हणतो.

जानकीबाई तोऱ्यात आत येतात. जानकीबाईला बघून मामाच्या चेहऱ्यावर चमक येते.

"कोण आहेत हे सर्वजण ? हा फ्लॅट काही धर्मशाळा नाही. मी काही दिवस बाहेरगावी गेले काय तुम्ही तुमच्या गावालाच इथेच वसवले!" जानकीबाई

"जानकी. तुझा मानलेला भाऊ आता इतक ओझं झालेय का ग ?" मामा..

सर्वजण एकमेकांकडे बघायला लागतात.

मग जानकीबाई आणि मामा एकमेकांना मिठी मारतात.

"हा माझा मानलेला भाऊ!" जानकीबाई

"ही माझी मानलेली बहीण!" मामा

"काय योगायोग आहे. " जानकीबाई

"अग ही दिव्या माझी भाची आहे. तिच्या बॉयफ्रेंडची पारख करायला आलोय. " मामा

"कोण ?" जानकीबाई

"आर्यन. " मामा

"ओह. आर्यन खूप गुणी मुलगा आहे. थोड शारीरिक दृष्ट्या कमजोरच आहे म्हणा. दिव्या इकडे ये बाळा." जानकीबाई

मग दिव्या जाते आणि जानकीबाईच्या पाया पडते.

"हे तुझ्या आत्याचेच घर आहे बर का!" जानकीबाई मायेने गालावर हात फिरवत म्हणतात.

"वाह. मी उगाच या घरात पाहुण्यासारखेच राहायची. मला माहितीच नव्हते हे माझ्या आत्याचे घर आहे ते!" दिव्या स्वतःच जोरात हसते.

"ही चिमुरडी कोण ?" जानकीबाई गणपतरावांकडे बघत म्हणतात.

"माझ्याकडे नका बघू. त्यांनाच विचारा. आपण भानगडीत पडतच न्हाय!" गणपतराव

"काकू मी लग्न केले आणि ही माझी बायको आणि ही माझी मुलगी आयशा. बेटा काकूंचे पाया पड!" कार्तिक

मग आयशा जानकीबाईच्या पाया पडते. जानकीबाई आशीर्वाद देते तरी लग्नाबद्दल जाणून रागात आलेली असते.

"तुम्ही कुणाची परवानगी घेऊन लग्न केले ?" जानकीबाई मोठा आवाज करून बोलतात.

"आम्ही आईवडील असून आम्हाला सांगितले नाही तुम्ही तर घरमालक. " मिस्टर जिंदल दबक्या आवाजात हसतात.

"निषेध. बॅचलरलाच फ्लॅटमध्ये राहता येते. तुम्ही तर बायको लेकरे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. " जानकीबाई

मग कार्तिक-ऋचा , आर्यन-दिव्या एकत्रितपणे जानकीबाईचे आशीर्वाद घेतात.

"तुम्ही आम्हाला जर मुलगा मानले असते तर सुनेला आणि नातीला पाहून रूम सोडण्याची भाषा केली नसती! या चिमुरडीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणा की जा फ्लॅट सोडून !!" कार्तिक रडत म्हणतो.

"बापाची एवढी इस्टेट असून मुलगा फ्लॅटसाठी रडतो. " मिस्टर जिंदल

"ओ साहेब. पंचक्रोशीत आमच्या एवढी जमिन सापडली तर नाव गणपतराव लावणार नाही. " गणपतराव मिशीला ताव देत म्हणतात.

"मी पागल होईल या घरात. भाऊराया आर्यन चांगला आहे पण बॉडी बघ. येते मी!" जानकीबाई

जानकीबाई निघून जातात.

"शारीरिकदृष्ट्या कमजोर जावई चालणार नाही. कार्तिक चल माझ्यासोबत खाली. आज आर्यनची जॉगिंग करवून घेऊ." मामा

"अरे यार. कुठे अडकलोय!" आर्यन रडकुंडीला येतो.

"हो मामा. चल रे आर्यन!" कार्तिक पाठीवर थाप मारत म्हणतो.

"दिव्या माझा अससिस्टंट येईल आणि फाईल, बॅग्स ठेवून जाईल!" मामा

"ओके मामा. " दिव्या

मामा आणि कार्तिक आर्यनकडून जॉगिंग करवून घेतात. थोड्या वेळाने मामाचा अससिस्टंट अमित येतो. मामा त्याला वर पाठवतात. तो बेल वाजवतो. ऋचा दार काढते. अमितला पाहून ऋचाचा चेहरा उतरतो. तिचे डोळे पाणावतात आणि ती लगेच बेडरूममध्ये जाते. दिव्या हॉलमध्ये येते.

"अससिस्टंट ना. आत या ना!" दिव्या

अमित पण घाबरलेला असतो. अमितचे लक्ष आयशाकडे जाते. आयशाचे डोळे त्याला ऋचासारखेच भासतात. तो एकटक आयशाकडे पाहतच बसतो.

"पाणी..!" दिव्या

"अरे काका तर हिप्नोटाईज झाले!" आयशा हसते.
"चूप. आगाऊ!" दिव्या

"मी वॉशरूमला जाऊ शकतो का प्लिज ?" अमित
"हा. इकडे आहे!" दिव्या

मग अमित तिकडे जातो. दिव्या किचनमध्ये जाते. अमित वॉशरूममध्ये न जाता बेडरूममध्ये घुसतो. आणि लगेच दार लावतो. ऋचा घाबरते. अमित कुत्सितपणे हसतो.

"तू जा इथून ?" ऋचा

"कार्तिक कोणे ? तू इथे कसकाय ? आयशा तुझी मुलगी आहे का ?" अमित

"आयशाचे नाव पण तुझ्या तोंडून आणायचे नाही. एक आई कधीच कमजोर नसते लक्षात ठेव. " ऋचा

"ओह. गोरी आहे ग तुझी मुलगी. खूप चिखनी. " अमित ओठ चोळत म्हणतो.

ऋचा त्याला थोबाडीत हाणते. मग अमित पण तिचे केस पकडतो तर ऋचा गुडघ्याने अमितच्या लिंगावर हाणते. अमित जोरात किंचाळतो.

"एक आई तिच्या लेकरांसाठी जगाशी भांडू शकते. आता चालता हो नाहीतर दिव्याला तू माझ्यासोबत काय केले आहे ते सर्व सांगेल. मग मामा तुला नोकरीतून काढतील. " ऋचा

"सांग. हसीना बेगमचा नंबर अजुनही आहे माझ्याकडे!" अमित

"काय हवे तुला तोंड गप्प ठेवण्यासाठी ?" ऋचा

"त्या मामाने दिव्यासाठी दागिने आणलेत. खरतर मलाच चोरायचे होते पण संशय आला असता. तू मला ते दागिने आणि काही रक्कम देशील तर मी गप्प बसेल. पर्वा कॅनॉट प्लेसला मोठी दुर्गापूजा आहे. तिथे भेट. आणि मला दे. " अमित

"ठिके !!" ऋचा

मग अमित निघून जातो. रात्री सर्वजण पोटभर जेवण करतात. जानकीबाई मामाला फोन करतात.

"भाऊराया. अरे मी चौकशी केली हे चौघे दररात्री गच्चीवर भेटतात. काहीतरी चोरीचा मामला असला पाहिजे. आज आपण गच्चीवर जाऊन सगळा सोक्षमोक्ष करू !" जानकीबाई

"बर. जानकी विवाह यशस्वी होण्यासाठी जरुरी आहे रोमान्स. बघूच आर्यन किती रोमँटिक आहे ते. माझ्या बहिणीचा घटस्फोट झाला पण असे दिव्यासोबत होऊ नये असे वाटते !!" मामा

"नाही होणार. बघूच गच्चीवर काय खिचडी पकते ते. तू लक्ष ठेव आणि हे गच्चीवर गेले की मला फोन कर !" जानकीबाई

हा संवाद चोरून मिस्टर जिंदल ऐकतात. रात्री एका खोलीत जेन्ट्स आणि एका खोलीत लेडीज झोपतात. नेहमीप्रमाणे गच्चीवर मिटिंग असते. म्हणून सर्वजण झोपी गेल्यावर कार्तिक-आर्यन हळूच उठून गच्चीवर जातात. अर्थात दिव्या आणि ऋचाला मेसेज गेलेला असतो.

@गच्चीवर

"काय झाले पिल्लू ? उदास दिसतोय आज ?" कार्तिक

"इकडची स्वारी. आज फेसबुकवर मी एक पोस्ट पाहिली. माझ्या एका वाचकाने सुसाईड केली. म्हणला तो दिसायला थोडा काळा हेलथी होता म्हणून त्याला कुणी भेटत पण नव्हते. प्रेमासाठी खूप तरसला होता. एकटेपणा डिप्रेशन यात इतका बुडाला की पुन्हा वर येऊच शकला नाही. त्याला पक्का कळले की त्याला या जन्मात कधीच प्रेम भेटणार नाही. मग काय फेसबुकवर सुसाईड नोटची पोस्ट टाकून त्याने जीवनयात्रा संपवली. त्याची ही कविता.

पारंब्यापरी जीवन माझे
ना वृक्षाचे नाही भूमीचे
होतोय मनात कोंडमारा
भावनांचा किती पसारा..

पारंब्यापरी जीवन माझे
घुसमटीत असे संपू पाहे
व्यक्त कुठे करू भावना
प्रेमासाठी किती यातना..

पारंब्यापरी जीवन माझे
लोकांसाठी मुखवटे घाले
माझी व्यथा कुणा न कळे
मिठीसाठीच हे हृदय तरसे..

वासनाचिखली कमळ शोधे
स्वतःपासून का मी असे पळे
नजरे चोरता देह माझे थकले
पुन्हा जन्म नको प्रार्थना निघे

मला मनात सहज कल्पना आली की काय झंड करतोय मी लाईफ मध्ये. तुझ्यावर इतके प्रेम करतो पण प्रेम सर्वांसमोर कबूल करण्याची हिंमत नाही माझ्यात. खूप लूजर फिलिंग येते यार. वाटते हे सर्व मुखवटे फेकावे. समाजासमोर आहे तस यावे. कुणाला कितीही आकवर्ड वाटले तरी. " आर्यन

"साल्या जेव्हा हीच गोष्ट मी बोलत होतो तेव्हा काय झाले होते ? तुला ओपन व्हायचे तर हो मी पूर्ण सपोर्ट करेल !!" कार्तिक

"आणि आम्ही पण!" दिव्या-ऋचा एकसुरात म्हणतात.

"ओय तू तर आयशाची मम्मी. आणि तुला कस कळले आम्ही प्रेम करतो ते ?" कार्तिक ऋचाला विचारतो.

"आम्हा स्त्रियांना सिक्सथ सेन्स असतो. डोळ्यात काय दडलंय लगेच कळते. आयशा तुमच्याप्रेमाच्या मध्ये येणार नाही. तू मला आर्थिक मदत केली तरी चालेल. पण महत्वाचे आहे की तुम्ही दोघे घरी ओपन व्हा. तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. प्रेम खूप नशीबवान लोकांना भेटते. तुम्ही प्रेम करतात मग समाजाच्या भीतीने का वेगळे होताय ?" ऋचा

"हो. एकदा मामा गेले ना तर मी पण समजवेल तुमच्या आईवडीलाना !!" दिव्या

तेवढ्यात गच्चीवर कुणी येत असल्याचा आवाज येतो.

"मामा तर आले नसतील ना बघायला! त्यांना खूप आवड आहे शरलॉक होम्स बनण्याची!!" दिव्या रडकुंडीला येते.

"पॅनिक होऊ नका. चोरीचा मामला करू. जोडीदार पकडा आणि लपा!" आर्यन

मग ऋचा चुकून आर्यनला पकडते.

"अग बाई. मामाच्या नजरेत तू माझी गर्लफ्रेंड नाहीस. कार्तिककडे जा!" आर्यन

ऋचा कार्तिककडे जाते. दिव्या आर्यनकडे येते. मामा गच्चीवर येतात.

कार्तिक गायला सुरुवात करतो.

चोरीचा मामला , मामाही थांबला
नवराबायकोचे खरेखोटे करायला
दूर नको जाऊ , मिठीत ये तू पाहू
रात्रभर दोघे प्रेमाचे रंग सखे उडवू

ऋचा पण सुरात सूर मिळवते..

चोरीचा मामला , मामाही थांबला
उगाचच आपल्यात टांग मारायला
मीच तुझी बायको तूच माझा पती
मामा का रे बनतोय प्रदूमन एसिपी

खाली मिस्टर जिंदलला जाग येते आणि ते गणपतरावला पण उठवतात.

"ओह गणपतराव उठा. बघा मामा , कार्तिक आणि आर्यन गायब आहेत!" मिस्टर जिंदल

गणपतराव वास सोडतात.

"काय तुम्ही ? रात्रीपण !" मिस्टर जिंदल

"मेरी भट्टी , हर किसींसे उसकी कट्टी " गणपतराव हसतात.

"चला लवकर गच्चीवरती!" मिस्टर जिंदल

मग दोघे गच्चीवर जातात.

आर्यनला लगेच गणपतरावचा वास येतो.

चोरीचा मामला , बाबाही बघ आला
त्या वासावरूनच मला संशय झाला
जोडीदार बदला , पॅनिक होऊ नका
नाहीतर बाबाना येईल मित्रानो शंका

कार्तिकला त्याचे डॅड दिसतात.

चोरीचा मामला , डॅडही बघ आला
आपल्या नाटकावर घालाया घाला
जोडीदार बदला , स्टेप्स त्याच ठेवा
रात्रभर खाऊ घालूया लोकांना मेवा..

सर्वजण समोर जो येईल त्यानुसार जोड्या बदलत असतात. भरीस भर म्हणून काय मामा जानकीबाईला पण बोलावते.

जानकीबाई येताच दिव्या गाते..असाच खेळ रात्रभर चालत राहतो..

चोरीचा मामला , जानकीबाई आल्या
सत्य काय ते रात्री गच्चीवर शोधायला
डोळ्यात धूळ फेकू घरघर चल खेळू
अंधाराचा सखी आपण फायदा घेऊ

चोरीचा मामला , मामाही थांबला
प्रेम तुझे माझे नीटपणे परखायला
आग जवानीची वेळ ही मिलनाची
भूक हृदयाला तुझ्या एक चुंबनाची

गार गार वारा मला जणू ओरडतोय
प्रणयाचे गीत तो किती गोड गातोय
भाव नको खाऊ भाव ओळख पाहू
प्रेम करून रात्रीची रंगत सखे वाढवू

सर्वजण चिडुन निघून जातात. आर्यन तेव्हा दोन कडवे गातो. कार्तिक त्याच्या टपलीवर मारून त्याला घट्ट मिठीत घेतो..

खोटे माझे आयुष्य खोटे सारे मुखवटे
थकलोय मी आता देऊनी सारे उत्तरे
जगू द्या मला माझ्याच अंधाऱ्या जीवनी
उजेड नका किमान दुःख नका देऊ मनी..

विचित्र त्या नजरा हृदयी जखमा करतात
का कुणास ठाऊक अस्तित्वच नाकारतात
अश्रू माझे गळणारे ईश्वराला प्रश्न विचारता
का असे मज बनवले पारंब्यापरी लटकता..!!

दोन दिवसानंतर कार्तिक हॉस्पिटलमध्ये गेला. आज रिपोर्ट येणार होते. इतके दिवस छळलेले कोडे आज सुटणार होते.

"तुमचे रिपोर्ट!" डॉक्टर म्हणतात.

कार्तिक उत्सुकतेने रिपोर्ट उघडतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू पडून कागद ओली होतात. मग तो तसाच घरी येतो. घरी येताच आयशा नेहमीप्रमाणे त्याला बिलगते. कार्तिक तिला काघेत घेऊन किस करतो.

दिव्या , ऋचा आणि बाकी सर्व बायका बंगाली साड्या घालून तयार झालेल्या असतात.

"तुम्ही सर्वजण कुठे चालले ?" कार्तिक

"आज कॅनॉट प्लेसमध्ये मोठी दुर्गापूजा आहे. तिथे जातोय आम्ही सर्व!" दिव्या म्हणते.

आर्यनला मात्र कार्तिकचा चेहरा पडलेला दिसतो. तो इशारा करून कार्तिकला आत बोलावतो. बेडरूमचे दार लावून घेतो.

"इकडची स्वारी काय झाले ?" आर्यन

कार्तिक आर्यनला घट्ट मिठी मारतो.

"आयशा माझी मुलगी नाही रे. पण का मग इतकी अटॅचमेन्ट वाटत होती मला त्या मुलीसोबत. आता आनंद होतोय की आपण फ्रिली ओपन होऊ शकणार पण आयशा दूर जाईल याचे दुःख होतेय!" कार्तिक

"इकडची स्वारी. आज प्राईड मार्च जाणारे. आज दुपारी मामा जाईल अस दिव्या म्हणत होती. मग आपण घरच्यांसमोर ओपन होऊ. फेकून टाकू सारे मुखवटे. आयशा आणि ऋचा इथेच राहतील. आपण त्यांना विनंती करू. ऋचा कधीच नकार देणार नाही. आज प्राईडला मला तुझा हात हातात घेऊन चालायचे आहे. जगासमोर स्वतःला आणि स्वतःच्या प्रेमाला स्वीकारायचे आहे. तू येशील ना ?" कार्तिक

"मी माझ्या पिल्लुला कधी नकार दिलाय का ?" कार्तिक आर्यनच्या कपाळावर किस करून म्हणतो.

सर्व बायका तयार होऊन जातात. आयशा पण सोबत जाते. पांढरी बंगाली साडी , लाल टिकली यात ऋचा आणि दिव्या खूप सुंदर दिसत असतात.

"दिव्याचा हात सोडू नको!" ऋचा आयशाला म्हणते.

सर्व बायका गेल्यावर आर्यन आणि कार्तिकपण निघतात. मिस्टर जिंदल यांच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन असतो. ते दारूच्या बाटल्या उघडतात आणि प्रोग्रॅम बनवतात.

"तुम्ही तर दुखऱ्या नस वर हात ठेवलात जिंदल राव!" गणपतराव म्हणतात.

"अहो ही बाटली तर प्रत्येक पुरुषाची दुखरी नस असते. फक्त तुम्ही वास सोडू नका मागून!" मामा

सर्वजण हसतात. मिस्टर जिंदल स्वतः पीत नाहीत पण मामा आणि गणपतरावला खूप पिऊ घालतात.

मग हळूच मोबाईलचा व्हिडीओ रेकॉर्डर चालू करतात. गणपतरावला जसजशी धुंदी चढते तसतशी ते सर्व सत्य बोलु लागतात.

"मिस्टर जिंदल. तुम्ही मनोरुग्ण. तुमचा मुलगा मेला म्हणून काय ऋचाला तुमची सून आणि आयशाला मुलगी मानतात का हो तुम्ही ?" गणपतराव

"हे कोण म्हणले ?" मिस्टर जिंदल

"कार्तिक म्हणला ना. माझ्या सुनेला तुम्ही तुमची सून म्हणता..का हो ?" गणपतराव नशेत म्हणतात.

"अहो पण आर्यन दिव्याचा बॉयफ्रेंड आहे!" मामा नशेत म्हणतात.

गणपतराव जोरजोरात हसतात.

"हे एक मामा अजून एक मनोरुग्ण. मला कळत नाही की लोक इथे पागल बनून येतात की येऊन पागल बनतात!" गणपतराव मोठमोठ्याने हसायला लागतात.

मिस्टर जिंदल सर्व रेकॉर्ड करतात.

"ऋचा कार्तिकची बायको आहे!" मामा

थोड्या वेळाने मिस्टर जिंदल दोघांना लिंबू सरबत देऊन नशा उतरवतो. मग सर्व सत्य सांगतो.

"मुलांनी मामा बनवला सर्वाना. " मिस्टर जिंदल

गणपतराव आणि मामाला राग येतो. तिघे तडक दुर्गापूजा असलेल्या ठिकाणी जातात.

तिथे बायका पूजेत व्यग्र असतात. देवीची ती भव्यमूर्ती स्त्रीशक्तीची जाणीव करवून देत असते.

"आई तुझ्या लेकीला आज शक्ती दे!" ऋचा मनोमन देवीला प्रार्थना करते.

"दिव्या. आयशाला सांभाळ मी येतेच!" ऋचा

"हो!" दिव्या

मग ऋचा निघून जाते. ऋचाला दुरूनच अमित दिसला असतो. अमित ऋचाचा हात पकडून गर्दीतून थोडे दूर नेतो. ऋचाच्या हातात पर्स असते.

"कुठे आहे दागिने आणि पैसे ?" अमित

"नाही आणले!" ऋचा

"तुझी इतकी हिंमत. विसरु नको तू रंडी आहेस एक. तुला मी बाजारात बसवले होते आणि आता मी हसीना बेगमला पण फोन केलाय. ते पण तुला खूप दिवसापासून शोधताय. हिरे पळवले म्हणे तू. तू रंडी आहेस. तुझी औकात नको विसरू. तुला या समाजात कधीच स्थान भेटणार नाही. आणि तुझी मुलगी आयशा पण रंडीच बनेल समजले का ?" अमित दात खात म्हणतो.

ऋचा झटकन पर्समधून सूरी काढते आणि अमितच्या गळ्यावरून फिरवते. ते रक्त ऋचाच्या तोंडावर पडते.  ती ओरडते. पुन्हा पुन्हा अमितच्या शरीरात ती सूरी खुपसते. आजूबाजूच्या बायका किंचाळतात. अमित प्राण सोडतो. लगेचच ऋचाला पाठीवर कसला तरी स्पर्श होतो. काळा पंजाबी ड्रेस घातलेली, काजळ लावलेले मोठे भयावह डोळे असलेली हसीना बेगम बंदुक घेऊन उभी असते.

"एकदा धंद्यात घुसले की बाहेर पडता येत नाही. खूप पळवले तू. हिरे दे आमचे." हसीना बेगम रागाने म्हणते.

तोच बंदुकीचा आवाज येतो. हसीना बेगमला पाठीमागून कुणीतरी गोळी मारतो. तो व्यक्ती आयपीएस गश्मीर असतो. गश्मीर हसीनाच्या बाकीच्या साथीदारांना पकडतो. पण हसीना मरता मरता एक गोळी ऋचाला मारते.

इकडे ऋचा नसल्यामुळे आयशा घाबरते. दिव्या , लक्ष्मीबाई , आयशा ऋचाला शोधणार तोच तिथे मिस्टर जिंदल , गणपतराव आणि मामा पोहोचतात. मिस्टर जिंदल सर्व सत्य सांगतात.

"दिव्या. तू खोटे बोललीस माझ्याशी ?" मामा

"मामा मला खरच त्या मुलाशी लग्न नाही करायचं. मला करीयर बनवायचे होते. आणि आईवडीलांपेक्षा तुम्ही मला जास्त सांभाळले म्हणून तुम्हाला दुखवायचे नव्हते!" दिव्या

"तुमचे जाऊदे. कार्तिक आणि आर्यनला भेटायचे आहे!" मिसेस जिंदल म्हणते.

दिव्या मोबाईलवरून त्यांचे लोकेशन ट्रेस करते. मग सर्वजण प्राईडच्या ठिकाणी पोहोचतात. दिव्या आणि आयशा ऋचाला शोधत बसतात.

कार्तिक आणि आर्यन इंद्रधनुषी झेंडा खांद्यावर घेऊन प्राईडमध्ये चालतात. कार्तिक गुडघ्यावर टेकून आर्यनला प्रोपोज करतो.

"लग्न करशील माझ्याशी ?" कार्तिक डिंपल वाली स्माईल देत म्हणतो.

आर्यन पण "येस" म्हणून रिंग स्वीकारतो. दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि सर्वजण टाळ्या वाजवतात.

तोच मिसेस जिंदल कार्तिकच्या खांद्यावर हात ठेवतात. कार्तिक वळताच मिसेस जिंदल कार्तिकच्या थोबाडीत मारतात. मिस्टर जिंदल गालातल्या गालात हसतात. गणपतरावचे डोळे रागाने लाल झाले असतात. ते आर्यनला दोन चार थोबाडीत मारतात. लक्ष्मीबाई रडत असतात.

"आईच्या बांगड्या घे. साडी नेस आणि टाळ्या वाजवत फिर!तुला जन्म देण्यापेक्षा वांझ का नाही राहिलो आम्ही. गावात तोंड दाखवायला ठेवलं नाही." गणपतराव ओरडतात.

"बॅकग्राऊंड स्टेटसचा तरी विचार करायचा ना रे कार्तिक!" मिसेस जिंदल रडायला लागतात.

"बाबा. तुम्ही कितीही मारलात तरी वागणूक बदलेल पण भावना बदलणार नाही. मी प्रेम करतो कार्तिक वर. मी काही गुन्हा करत नाही. हे सर्व नैसर्गिक आहे. मी कुणाचा बलात्कार चोरी तर करत नाही ना! समलैंगिकता सोडून मुलगा म्हणून मी कुठे कमी पडलोय ? " आर्यन

"आई कसलं स्टेटस ग ? मिस्टर जिंदल रोज नवीन बाईसोबत बेड गरम करायचे. मी गे आहे पण मिस्टर जिंदल स्ट्रेट असून हरामी निघाले. मी किमान आर्यनशी प्रामाणिक राहीन." कार्तिक

मिसेस जिंदल मिस्टर जिंदलकडे बघते आणि त्यांच्या थोबाडीत हाणते आणि जोरजोरात रडायला लागते.

"का तोडलात माझा विश्वास ?" मिसेस जिंदल

कार्तिकला तेवढ्यात दिव्याचा फोन येतो. सर्वजण हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. रडत असलेली आयशा कार्तिक येताच त्याला बिलगते.

"बाबा. मम्मीने ही चिठ्ठी दिलीय. म्हणली पूजा संपल्यावर बाबांना दे!" आयशा

कार्तिक ती चिठ्ठी उघडतो.

"प्रिय कार्तिक ,

आतापर्यंत तुला समजले असेल की आयशा तुझी मुलगी नाही. मी एक वेश्या आहे. मी लहानपणीपासून अनाथ आहे. कॉलेजमध्ये कुणाशीही काहीच बोलत नव्हते. अमितने मला हेरले. त्याला माझ्यात असलेली प्रेमाची गरज कळली. खूप मागे लागला. मी पण त्याच्या प्रेमात पडले. सुहागरातला तर मी स्वतःला जगाची सर्वात नशीबवान बाई समजू लागले. पण नंतर काळाची चक्रे फिरली. अमित हरामी निघाला. गरोदरपणातच त्याने मला विकले. आयशा त्याचीच मुलगी. मर्दात लपलेली नामर्दगी मला दिसली. हसीना बेगमच्या कोठ्यात आयशासोडून आपले असे कुणीच नव्हते. एक दिवस असाच एक ग्राहक आला. रमेश. तुझ्या सोसायटीचा वॉचमेन. तो पण अनाथाश्रममधला आणि माझा मानलेला भाऊ. त्याला माझी दया आली. हसीना बेगम कडे तस्करीचे हिरे आले होते. जर मी आयशा सोबत पळाले असते तर हसीनाने मला पकडले असते. पण जर हिरे घेऊन पळाले तर पोलिसांना हिरे देऊन मी स्वतःची सुटका करवून घेऊ शकले असते. मला पोलिसांकडून सुरक्षा हवी होती. हिऱ्यातला काही हिस्सा मला हवा होता आयशाच्या भविष्यासाठी. शेवटी मी पळाले. गश्मीरने मला काही काळ लपायला सांगितले. या काळात तो हसीना बेगम विरोधात पुरावे जमा करणार होता. कारण भविष्यात कुणी स्त्री बाजारात बसू नये. म्हणूनच गश्मीरने आर्यनला परत पाठवले. मी सुरुवातीला रमेशच्या घरी लपले. रमेशला गच्चीवर तू आणि आर्यन गप्पा मारताना दिसला. त्याला सर्व समजले. आम्ही प्लॅन बनवला. मला विश्वास होता की जिथे मर्द तसे वागले तिथे तुम्ही समलैंगिक मला आणि आयशाला काहीच होऊ देणार नाही. तुला मी कॉलेजपासून ओळखत होते. स्टोरी सुचली. कार्तिक आणि आर्यन तुम्ही दोघे खरे मर्द आहात. दिव्या तुझ्या रूपात लहान बहीण भेटली. आज मला काही झालं तर प्लिज आयशाला सांभाळा. तिला त्या काळ्या दुनियेपासून लांब ठेवा. खूप खूप शिकवा आणि स्वतःच्या पायावर उभी करा. त्या टेडी बिअरमध्ये हिरे आहेत ते गश्मीरला द्या. जो हिस्सा भेटेल तो तुम्ही दोघे ठेवा. मला पहिल्या दिवसापासून तुमचे प्रेम कळले. आर्यन दोन वाजता जाणारे मी ऐकले म्हणून मुद्दाम तुला दोनला उठवले. मिसेस जिंदलला मुद्दाम प्राणायम शिकवले कारण सत्य कळल्यावर त्रास होऊ नये. कार्तिक आणि आर्यन घरी सर्व सत्य सांगा. दिव्या सांभाळ ग माझ्या मुलीला. माय मरावे मावशी जगावे म्हणतात ते तुझ्यासारख्या बहिणींना बघूनच. चला. माझ्या आयशाला द्यायला काहीच नाही फक्त स्वावलंबी बन म्हणावं. येते.
तुमचीच वाईफ ऑन रेंट!"

चिठ्ठी वाचून कार्तिकला रडू येते. तेवढ्यात डॉक्टर येतात.

"सॉरी शी इज नो मोर!" डॉक्टर

आयशाच्या हाताने ऋचाच्या देहाला अग्नी दिला जातो. मिस्टर जिंदल यांना पश्चाताप होतो. मिसेस जिंदल त्यांना माफ करतात. दोघे आयशाला दत्तक घेतात. पण सांभाळण्याची जबाबदारी कार्तिक-आर्यनला देतात. कार्तिक आर्यनचा आशियाना सजतो आणि त्यात "आयशा" नावाची राजकन्या येते. दिव्या जमेल तितके आयशाला आईचे प्रेम देते. गणपतराव आणि लक्ष्मीबाई पण आर्यनची समलैंगिकता स्वीकारतात. मामा सध्या दिव्यासाठी पती शोधतोय. दिव्या करियरवर फोकस करत आहे तरी दर रविवारी आयशाला भेटते. कार्तिक वडिलांचा बिजनेस सांभाळतोय. आर्यन मोठा लेखक झालाय आणि कार्तिकला बिजनेसमध्ये मदत करतोय. मिस्टर जिंदल मात्र गावी गणपतरावसोबत मजा करत आहेत. गणपतराव यांची भट्टीची प्रॉब्लेम अजूनही तशीच आहे. लक्ष्मीबाई आणि मिसेस जिंदल सोबत दिल्लीत राहतात आणि आता लक्ष्मीबाई पण मिसेस जिंदलसोबत ब्युटीपार्लरला जात आहेत बर. जानकीबाई त्या गच्चीवरच्या रात्रीपासून हिमालयावर आहेत..

अस म्हणतात नवरात्रीचे नऊ दिवस देवी पृथ्वीवर वास करते आणि सर्व असुरांचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करून दहाव्या दिवशी परत जाते. तसच ऋचा पण देवीचा अंशच होती. नऊ दिवस ती घरी राहिली. दहाव्या दिवशी बाहेर पडली ते असुरांचा नाश करण्यासाठी. बायकोला विकणारा अमित आणि स्त्रियांना देहविक्री करायला लावणाऱ्या हसीना बेगम यांचा नाश करून , समलैंगिकांबद्दलची किळस दूर करून ऋचा परत गेली.

अयि गिरि नन्दिनी नन्दिती मेदिनि, विश्व विनोदिनी नन्दिनुते।

गिरिवर विन्ध्यशिरोधिनिवासिनी, विष्णु विलासिनीजिष्णुनुते।।

भगवति हे शितिकण्ठ कुटुम्बिनी, भूरि कुटुम्बिनी भूत कृते।

जय जय हे महिषासुर मर्दिनी, रम्य कपर्दिनी शैलसुते।।

ऋचा आर्यन-कार्तिकच्या ओंजळीत आयशा टाकून गेली.

आज आयशा शाळेच्या सहलीला गेली होती. कार्तिकचा रोमँटिक मूड होता. आर्यनच्या खांद्यावर हात ठेवून त्याने आर्यनला जवळ खेचले.

"इकडची स्वारी आज रोमँटिक मूड दिसतोय तुमचा!" आर्यन

"हो. आज किती दिवसाने बाहेर पाऊस पडतोय. इतके रोमँटिक वातावरण आहे त्याचा उपयोग करून घ्यायला नको. " कार्तिक आर्यनला किस करायला जातो तेवढ्यात बेल वाजते. दोघांच्या हृदयात धडकी भरते. दोघे दार उघडतात. दार एक बाळ असते आणि एक चिठ्ठी असते.

"कार्तिक सांभाळ तुझ्या मुलाला. "

पिला दे दीवानी मैं हूँ जिसकी
आई एम अ बैड गर्ल
आई लाइक व्हिस्की
जब मुझको चढ़ जाती तो
नशे में हो जाती मैं रिस्की
पिला दे दीवानी...

ओह चल कुड़िये नि चल हो तैयार
देसी दारु, इंग्लिश बार
छोटे छोटे पेग मार
बेबी छोटे छोटे पेग मार
छोटे छोटे पेग...

पी गयी बोतल खड़े खड़े
सीन तेरा मेरे सर से परे
पता है मुझे तुझे होगा हैंगओवर
तभी पहले से ही नींबू मेरी जेब में पड़े

एक पेग में तुझे पटाया
तुझे पटाने का जोखिम उठाया
पर कड़वी लगेगी तुझे सच है ये बात
तुझे घर होना चाहिए बार्बी डॉल के साथ

ये गाना हो गया है ए रेटेड वर्ज़न
बोतलें पी ली है तूने आधा दर्जन
क्या करना है अब सोबर जी के
दारु पीना कोई तुझसे सीखे
पैराडाइस में जाने का एक ही रूट है
पेट भर के पी लो, क्योंकि पाँच रूपए की छूट है
पिला दे दीवानी...

सबसे ज्यादा चमक रही है
तू चमक रही है इस पार्टी में
मैं तेरे नैनो में डूब रहा
तू डूब रही है बकार्डी में
अकेले पीने वाली रात नहीं है
मैंने देख लिया कोई तेरे साथ नहीं है
और भी लड़कियाँ हैं यहाँ मगर
लेकिन तेरे जैसी किसी में भी बात नहीं हैं
इतनी देर से बैठा
बस माइंड मैं तेरा पढ़ रहा हूँ
तुझे चाहिए दारु देसी
तभी तो कन्विंस में कर रहा हूँ क्या
चल चल कुड़िये नि...

Respect every woman and LGBT community people. Don\"t only accept difference but also enjoy difference.

कमेंट आणि स्टिकरसाठी मनापासूनआभार????

माझा "प्यार का नगमा" काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. नक्की विकत घ्या. ऍमेझॉनवर "प्यार का नगमा" टाईप केलं की रोहित सराफ पोस्टर वाला काव्यसंग्रह माझा आहे.?

इमेल : parthdhavan4@gmail.com

#Story dedicated to Kartik Aryan. ?

समाप्त

🎭 Series Post

View all