Wife On Rent !! पार्ट 7

समलैंगिक प्रेम कथा
मग आयशा दार उघडते. एक सुंदर स्त्री उभी असते.

"कोण हवे ?" आयशा

दिव्या घाबरते. कार्तिक-आर्यन बाहेर येतात.

"आत ये!" आर्यन

दिव्या आत येते.

"वेलकम टू होम. पाया पडते!" दिव्या घाबरतच मिस्टर आणि मिसेस जिंदलचे आशीर्वाद घेते.

"सुखी रहा बेटा पण तू आहेस कोण ?" मिसेस जिंदल

"आम्हाला वेलकम करत आहे पण तूच नवीन आहेस घरात अस वाटत आहे!" मिस्टर जिंदल

"मी तुमची सून. काय रे नवरोबा. सांगायचे ना आईवडील येताय. " दिव्या कार्तिकच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते.

मिस्टर आणि मिसेस जिंदल एकमेकांकडे बघतात.

कार्तिक बोटानेच इशारा करून "मी नाही आर्यन आहे तुझा नवरा" अस सांगतो.

"मजाक. दिव्या लहानपणीपासूनच अशी आहे मजाकी. तिची नजर तिरकी आहे. आर्यन आणि कार्तिक सारखेच दिसतात ना सो कन्फ्यूज झाली असेल बिचारी!" ऋचा

मिसेस जिंदल एकमेकांकडे बघतात. दिव्या दूर सरकते.

"वहिनी. आर्यन तिथे आहे. तुम्हाला चुकून दिसला नसेल!!" कार्तिक बोट दाखवतो.

"वहिनी ? हा वहिनी!" घामाघूम दिव्या आर्यनकडे जाते.

"नवरोबा!" दिव्या आर्यनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते.

"आलात बायकोबा!" आर्यन हसत म्हणतो.

"थांबा. तू तर सिंगल होतास ना एका आठवड्यापूर्वी. मग अचानक बायको कुठून आली ?" मिसेस जिंदल

"संगतीचा परिणाम. माझे बघून याला पण वाटले आटपून घ्यावे!" कार्तिक हसत म्हणतो.

"अच्छा. बापरे नवरा ओळखण्यातही इतके कन्फ्यूजन!" मिसेस जिंदल

"होत असते सासूबाई. नवीनच लग्न झालेय ना!" ऋचा

"पण ती आम्हाला का सासू सासरे म्हणली ?" मिस्टर जिंदल

"काका तुम्ही कार्तिकचे आईवडील म्हणजे माझे पण आईवडील ना!" आर्यन

"पण हिला कस कळले की आम्ही कार्तिकचे आईवडील आहोत ते!" मिस्टर जिंदल

"मी फोन करून सांगितले होते. तुम्ही प्लिज आता सीआयडी नका बनू!" कार्तिक

"आपण जेवण करून घ्यायचे का ? मी अर्धा तासात बनवते जेवण !" ऋचा

"मी मदत करते जाऊबाईला!" दिव्या किचनमध्ये पळते.

"जाउबाई ? मी या घरात राहिलो तर पागल होईल. जर मी पागल झालो तर माझी प्रॉपर्टी आयशाच्या नावावर कर बर. कार्तिकच्या नको!" मिस्टर जिंदल

"काय म्हणताय तुम्ही ?" मिसेस जिंदल

"आजोबा. तुम्ही प्लिज जाऊ नका. माझ्यासोबत खेळा!" आयशा केविलवाणा चेहरा करून म्हणते.

पाषाणहृदयी मिस्टर जिंदलच्या मनात आयशाला पाहून पाझर फुटतो.

"ओके बेटा मी खेळतो!" मिस्टर जिंदल

कार्तिक आर्यन बेडरूममध्ये जातात. हळूच ऋचा आणि दिव्या हळूच बेडरूममध्ये जातात. मिस्टर आणि मिसेस जिंदल आयशासोबत खेळायला लागतात. मिस्टर जिंदल तर चक्क घोडाच बनतात. मिसेस जिंदल हसायला लागते.

"इतक्या मोठ्या प्रॉपर्टीचे मालक आज घोडा बनलाय ?" मिसेस जिंदल

"काय करू आयशामॅडमचा हुकूम आहे!" मिस्टर जिंदल पण हसतात.

मिस्टर जिंदलला आयशाचा लळा लागतो.

"ही मुलगी खरच खूप गोड आहे. तुला आठवते का ग जेव्हा कार्तिक पोटात होता तेव्हा मला मुलगीच हवी होती. आमच्या तीन पिढ्यात एक पण मुलगी झाली नाही. नशिबानेच ही मुलगी आपल्या घरात आली!" मिस्टर जिंदल

"तुमच्यातले हे रूप पहिल्यांदाच बघतेय!" मिसेस जिंदल

"पण तुला वाटतेय ऋचा आणि दिव्या खरच कार्तिक-आर्यनच्या बायका आहेत. माझे आयुष्य बिजनेसमध्ये गेले आहे. डोळे पाहून खरेखोटे समजते मला. पण मी योग्य पुरावे भेटेल की खर उघडकीस आणेल नक्की!" मिस्टर जिंदल

"माझा कार्तिकवर पूर्ण विश्वास आहे तो त्याच्या आईला खोटे बोलणार नाही. आईवडील म्हणून कुठे न कुठे आपणच कमी पडलो की आपला मुलगा आयुष्याच्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगत नाही!आता आपण फक्त सून आणि नातीच्या प्रेमाचा आनंद घेऊ!झाले गेले विसरून जाऊ!!" मिसेस जिंदल

"हो..!" मिस्टर जिंदल

थोड्या वेळाने जेवण तयार होते. सर्वजण मस्तपैकी जेवतात. बेल वाजते.

"मी बघतो!" आर्यन

"हल्ली बेल वाजली की मनात धडकीच भरते. अस वाटते नवीन संकट बेल वाजवत आहे!" कार्तिक मनातल्या मनात म्हणतो.

आर्यन दार उघडतो. आर्यनचा चुलत भाऊ हरीश असतो.

"हरीश भाऊ तू इथे अचानक कसा ?" आर्यन घाबरून म्हणतो.

"अरे घाबरतोय कशाला इतके ? आत नाही बोलावणार का?" हरीश आत घुसण्याचा प्रयत्न करतो पण आर्यन अडवतो.

"भाऊ सॉरी यार. आत खूप पाहुणे आहेत. कार्तिकचे नातेवाईक. प्लिज आपण पुन्हा भेटू!" आर्यन म्हणतो.

मग तेवढ्यात तिथे ऋचा येते.

"सिलिंडर संपले आहे.रात्री जेवण बनवायला लागेल!" ऋचा

"हो. आणतो!" आर्यन

तेवढ्यात आयशा धावत येते आणि ऋचाच्या काघेत चढते.

"मम्मी..मला खायला दे ना!" आयशा

"हो बेटा. बाबांचे झाले तर देते!" ऋचा

"चलो बाय!" आर्यन असे म्हणून दरवाजा बंद करतो.

हरीशला राग येतो. तो तिथून निघून जातो. घरी दिवसभर नाटक चालते. संध्याकाळी मिस्टर जिंदल कार्तिकला एकांतात भेटतात.

"आजपर्यंत तू सिंगल होतास. पण आता एक नवरा आणि बाप आहेस. किमान आयशासाठी तर बिजनेस जॉईन कर. जिंदलचे आडनाव आहे तिच्यानावामागे. मला माझ्या नातीला राजकुमारीसारखे वाढवायचे आहे. दत्तक असली तरी गोड आहे!" मिस्टर जिंदल

"मिस्टर जिंदल. आयशा माझी मुलगी आहे. मी तिला सांभाळू शकतो. त्यासाठी तुमचा बिजनेस जॉईन करण्याची गरज नाही. मी फक्त आईला चांगले वाटावे म्हणून तुमच्याशी आदराने वागतोय. तुम्ही बाप म्हणून केव्हाच मेले माझ्यासाठी. मी तुमच्याइतकं श्रीमंत नाही पण चांगला बाप नक्कीच बनवून दाखवीन." कार्तिक

"ऑल द बेस्ट माय सन!" मिस्टर जिंदल

रात्री आर्यन कार्तिकच्या खोलीत झोपायला जातो.

पण तिथे आयशा कार्तिक आणि ऋचा आधीच असतात.

"मला मम्मी पप्पा सोबत झोपायचे आहे." आयशा

"ठिके बेटा!" आर्यन

आर्यन कार्तिककडे बघतो पण कार्तिक अजूनही नाराज असतो. एका खोलीत मिस्टर आणि मिसेस जिंदल झोपलेले असतात. नाईलाजाने दिव्या आणि आर्यन एका खोलीत झोपतात. आर्यन खाली पांघरूण अथरतो आणि दिव्या कॉटवर झोपते.

"सॉरी दिव्या. तुझा रोल बदलला. कार्तिक सोडून माझी वाईफ बनावे लागत आहे." आर्यन

"कोई नि. मला आज माहित्ये खूप छान फिलिंग आले. म्हणजे खरच माझी फॅमिली आहे असं वाटले. माझ्या आईवडिलांचा लहानपणीच डिओर्स झाला. सो फॅमिली काय असते माहीत नव्हते कधी. आज पहिल्यांदा फील घेतला. आयशा तर खूप क्युट आहे!" दिव्या

"हो. चल गुडनाईट!" आर्यन

दोघेही झोपतात.

सकाळी मिस्टर आणि मिसेस जिंदल लवकर उठतात.

"कार्तिक आणि ऋचाचे लग्न खरे असेल तर प्लिज त्याला समजव. आपला राजवाडा असताना झोपडीत का राहायचा ?" मिस्टर जिंदल

"त्याला तुमचा राजवाडा झोपडी वाटत असेल आणि त्याची झोपडी राजवाडा. जिथे प्रेम विश्वास समर्पण ते घर म्हणजे राजवाडाच. पण मला ऋचा आणि कार्तिकमध्ये नवराबायकोचे प्रेम दिसत नाहीये!" मिसेस जिंदल

ही गोष्ट चहा घेऊन येत असलेली ऋचा ऐकते.

कार्तिक गाढ झोपलेला असतो. ऋचा बकेटभर पाणी टाकते. कार्तिक चिरकून उठतो.

"ए ऋचा..ही कोणती अमानवीय पद्धत उठवण्याची?" कार्तिक

"चोरीचा मामला , मामाही थांबला!" ऋचा

"काय ?" कार्तिक

"अरे रोमान्सचे नाटक करावे लागेल. तुझ्या आईवडिलांना संशय आलाय!" ऋचा दबक्या आवाजात म्हणते.

कार्तिकच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मिसेस जिंदल तिथे येतात. कार्तिकला त्या दिसतात आणि मग तो लगेच ऋचाचा हात पकडून जवळ खेचतो.
आर्यन पण तेवढ्यात येतो. ऋचाकार्तिकला जवळ येताना बघून आर्यन नजर दुसरीकडे करतो. मिसेस जिंदल पण हसून निघून जातात. मग ऋचा पीठ मळताना पण कार्तिक हाच रोमान्स करतो. मिसेस जिंदल हे पाहून खुश होतात. आर्यन तेवढ्यात येतो.

"नुसते डिस्टर्ब करायला येतात बिनकामाचे लोक.कबाब में हड्डी!" कार्तिक आर्यनकडे बघत म्हणतो.

ऋचा हसते. आर्यनला खूप वाईट वाटते. रात्री आर्यन बॅग पॅक करतो.

"कुठे?" दिव्या

"आज रात्री दोन वाजता आपण दोघेही पळून जाऊ. मी टॅक्सी करून देईल तुला." आर्यन

"अरे पण का अचानक?" दिव्या

"काय करायचे इथे? कार्तिक-ऋचाचा संसार बघत बसायचा का?मी तर जातोय. तुला मजा वाटत असेल तर रहा!" आर्यन

"नाही मग मी पण फ्लाईट पकडेल. डॅडकडे जाईल माझ्या. तुझं आणि कार्तिकचे काही बिनसले तर नाही ना?" दिव्या

"नाही ग. चल आता झोपू. दोनला उठून पळून जाऊ.कार्तिक हँडल करेल!" आर्यन

"पण पळून जाणे गरजेचे आहे का?" दिव्या

"मनाला जखमा होऊ नये म्हणून शरिराला पळावे लागते कधी कधी!" आर्यन

रात्री दोन वाजता आर्यन डायरीत कविता लिहितो.

"कार्तिक. सॉरी तुला न सांगता रात्री दोनला निघून जातोय. पण अर्जेंट आहे. नशिबात असेल तर भेटू. टेन्शन नको घेऊ. सुखी रहा. तुझ्यासोबतच्या आठवणी कायम सोबत राहतील. माझी शेवटची कविता तुझ्यासाठी. मी जिथे असेल तुला खूप मिस करेल. चल बाय.?

खूप काही बोलायचे होते
पण तुला ऐकायचे नव्हते
तुला समजून सांगायचे होते
तुलाच का समजायचे नव्हते

संवादाचा मार्ग अडवून ठेवला
अश्रूंचा बांध आपसूक फुटला
प्रेमावरचा तो विश्वास उडाला
नियतीने कसला सूड उगवला

नाते तोडण्यापूर्वी एकदा बोलायचे तर होते
मी किती हळवा आहे तुला ठाऊक नव्हते ?
नाते तुटले तरी आठवणी मात्र त्रास देतात
हृदयाच्या जखमा अचानक वर का येतात

कधीतरी आपल्यामधला हा अबोला संपेलही
तोपर्यंत भावना उरतील का प्रश्न मन विचारी
तू समोर आल्यावर शब्दच फुटले नाही तर
नाते पुन्हा जोडण्याची इच्छाच मरून गेली तर ?

~ आर्यन✍️

क्रमश..


🎭 Series Post

View all