Wife On Rent !! पार्ट 6

समलैंगिक प्रेम कथा
आर्यन सकाळी लवकरच उठला. डोळे रात्रभर रडल्यामुळे जड आणि लाल झाले होते. उशीवर अश्रुंचे दाग स्पष्टपणे जाणवत होते. भावनांचा पूर आल्यावर लेखणीशिवाय पर्याय नसतो. आर्यन डायरीत कविता लिहू लागला. कार्तिक त्याचा श्वास होता. म्हणून पहिली ओळ सुचली , "श्वासानेच हृदयाला तोडल्यावर..?" पुढे लिहीत गेला आणि दहा मिनिटात कविता लिहून पूर्ण झाली.


श्वासानेच जर हृदयाला तोडले
जखमी मनाने कुणाकडे पहावे
प्रेमानेच द्वेषाचा नजराणा दिला
पाणावलेल्या नेत्रांनी कुठे पहावे

ज्याच्यावर मनापासून प्रेम केले
त्यालाच का आपण नाही कळले
ज्याच्यावर सारी प्रेमफुले उधळली
तया आर्त वेदना का नाही कळली

पहिल्यांदा कुणावर मनापासून प्रेम केले
अबोला धरून तू का मला परके बनवले
तुला आनंद देण्याचा नादात दुःखी झालो
प्रेम मिळवताना प्रेमालाच गमावून बसलो

वीज चमकावी तशी तुझी आठवण येऊन जाते
मेघांनी वर्षाव करावा तसे अश्रूंच्या सरी पाडते
सुखाचा स्रोत असलेला व्यक्तीने दुःखे द्यावी
मग दुसऱ्याकडून कशाची अपेक्षा ठेवावी ?

~ आर्यन ✍️


थोड्यावेळाने कार्तिक आणि आयशा पण उठले. कार्तिक आंघोळ करत होता. नेहमीप्रमाणे टॉवेल विसरला. आर्यन तो द्यायला बेडरूममध्ये गेला. किमान या बहाण्याने अबोला तुटेल.

"आयशा माझे टॉवेल दे!" कार्तिक ओरडला.

आर्यनला मनोमन वाईट वाटले. कदाचित आपण कार्तिकला गमावले असे वाटले. दोघांमध्ये अजूनही अबोला कायम होता. ब्रेकफास्ट करताना आयशाला हे जाणवले.

"बाबा तुम्ही काकांसोबत कट्टी केलीय का ? प्लिज अस नका करू. माझी एक मैत्रीण होती प्रिया. मी तिच्यासोबत भांडण केले आणि कट्टी केली. पण एक दिवस ती मला सोडून गेली. मम्मी म्हणते कधीच कट्टी करायची नाही. कारण लोक कधी पण सोडून जाऊ शकतात. " आयशा

"बच्चा तू नाश्ता कर. नाश्ता करताना बोलायचे नसते!" कार्तिक आयशाच्या गालावर हात ठेवून म्हणला.

"माझा बाबा रागावतो पण आतून खूप चांगला आहे बर!" आयशा आर्यनकडे बघत म्हणते.

"हो बेटा ठाऊक आहे!" आर्यन म्हणतो.

सर्वांचा नाश्ता संपतो. बेल वाजते. आयशा आनंदी होते.

"मम्मा आली.." म्हणत धावत जाते आणि दार काढते.

पण कार्तिकचे आईवडील आलेले असतात.

"आई. आत ये ना!" कार्तिक त्याच्या आईला मिठी मारतो.

"बाबाला नाही भेटणार का ?" मिस्टर जिंदल बळजबरीने कार्तिकला मिठी मारतात.

"ही क्युट मुलगी कोण आहे बेटा ?" कार्तिकची आई म्हणते.

"मी बाबांची मुलगी आहे!" आयशा कार्तिकला बिलगून म्हणते.

आर्यन डोक्याला हात मारून घेतो.

"हे असं कस बेटा ?" कार्तिकची आई प्रश्नार्थक नजरेने बघते.

मिस्टर जिंदल मिसेस जिंदलकडे बघतात. मिसेस जिंदल कार्तिककडे बघतात. कार्तिक आर्यनकडे बघतो आणि आर्यन भिंतीकडे बघतो.

"लग्न तर काही दिवसांपूर्वीच झाले होते ना ?" मिस्टर जिंदल

"आई ते अचानक झाले!" कार्तिक

"बेटा हे काय अँप आहे का अचानक डाउनलोड झाले म्हणायला" कार्तिकची आई म्हणते.

"आयशा तू आत जा!" आर्यन

"मी नाही जाणार. मी आजीआजोबासोबत खेळणार!" आयशा

"आजी ?" मिसेस जिंदल

"आजोबा?" मिस्टर जिंदल

दोघे एकमेकांकडे बघतात आणि मग कार्तिककडे. कार्तिक आर्यनकडे बघतो. आर्यन भिंतीकडे बघतो.

"पॅनिक होऊ नका. काका-काकू तुम्ही जरा आत या. मी आणि कार्तिक समजवतो!" आर्यन

मग आयशाला हॉलमध्ये सोडून सर्वजण बेडरूममध्ये जातात.

"बोल कार्तिक!" मिसेस जिंदल म्हणल्या.

"आर्यन बोलेल!त्याला सुचलय वाटते. आय मिन तो लेखक आहे सो बेटर एक्सप्लेंन करू शकेल!!" कार्तिक

"काकू. आयशा दत्तक घेतलेली आहे. तिच्या आईने आणि कार्तिकने तिला दत्तक घेतले आहे!" आर्यन

"अरे पण एका आठवड्यातच ? आणि आई कुठे आहे ? नाव तर सांगा तिचे!" मिसेस जिंदल

"दत्तक घेतल्याचे पेपर दाखवा!" मिस्टर जिंदल

"तुम्हाला इतका पण विश्वास नाही तर राहू द्या. आज येईलच माझी बायको. तिलाच सर्व विचारा!" कार्तिक

तेवढ्यात बेल वाजते. आयशा दार उघडते.

"मम्मी आली..!" आयशा ओरडते.

मिस्टर आणि मिसेस जिंदल बाहेर जातात.

"मम्मी नाही मौत आलीय माझी..!!" कार्तिक रडायला लागतो.

दोघे पळत बाहेर जातात. एक सुंदर स्त्री बाहेर उभी असते. दिसायला गोरीपान , लांब काळेभोर केस , मोहक हास्य. जणू निरागसता.

"खूप सुंदर आहे माझी सून!" मिसेस जिंदल त्या स्त्रीला मिठी मारते.

"नाव काय तुझे ? तुझा नवरा तुझे नाव सांगत नाही!" मिस्टर जिंदल कुत्सितपणे म्हणतात.

"ऋचा कार्तिक जिंदल!" ऋचा नजरेला नजर भिडवून आत्मविश्वासाने म्हणते.

कार्तिक ऋचाला बघून क्षणभर भूतकाळात जातो.
घामाघूम होतो आणि चक्कर येऊन पडतो..

कार्तिकला थोड्या वेळाने जाग येते. बाजूला आर्यन आणि ऋचा असतात. कार्तिक झटकन उठतो.

"तू माझ्या कॉलेजमध्ये होती ना. तू आयशाची मम्मी कशी ? सॉरी मी आयशाचा बाबा कसा ?" कार्तिक

"प्रॅनक आहे का ?" आर्यन

"नाही. मी असा मजाक का करू ? विसरला का कार्तिक. फेसरवेल पार्टी होती. सर्वाना जबरदस्ती दारू पाजवली गेली. आपण सर्व फार्महाउसमध्ये होतो. आपण दोघेही दारूच्या नशेत होतो. मी पण पिअर प्रेशरमध्ये येऊन खूप दारू पिली. तू नशेतच माझा हात पकडला आणि वर घेऊन गेला. खोलीत अंधार होता. आणि..!" ऋचा

"यार ही फिल्मी स्टोरी ना दुसऱ्यांना सांग. मान्य मी नशेत होतो. तुझ्यासोबत डान्स केला होता. पण पुढचे मला काही आठवत नाही. तू पण कधीच भेटली नाही. इतके दिवस कुठे होती ?" कार्तिक

"तुला काय घेणे देणे ? त्या दिवशी मी सकाळी लवकर उठले. आपल्या दोघांच्या अंगावर एक पण कपडा नव्हता. मला रात्री घडलेल्या चुकीची जाणीव झाली. मी तुला कपडे घातले आणि मी पण कपडे घातले. कुणाला कळू नये म्हणून पळून गेले. मला तुला उगाच एमबारास करायचं नव्हते. नंतर समजले की मी आई बनणारे. मला माहित होते तुला सांगितले असते तर तू ठरला श्रीमंत मुलगा मला गर्भपात करायला सांगितला असता. मी अनाथ आहे. आणि माझ्या पोटात बाळ वाढत होते. मला किंमत होती त्या प्राणाची. मला पण वाटले गर्भपात करावा पण जमल नाही. हे बघ तुला विश्वास नसेल तर डीएनए टेस्ट करवून घे. पण आयशा तुझीच मुलगी आहे. अजूनही विश्वास नसेल तर मी तुझ्या आईवडिलांना सर्व खर खर सांगते!" ऋचा

"ए बाई प्लिज. थांब..मला विचार करू दे!" कार्तिक

"काकू आणि काका आहेत तोपर्यंत बायको असल्याचे नाटक कर. डीएनए टेस्ट तर आम्ही करूच. मग पुढचे पुन्हा बघू!" आर्यन

तेव्हा बेल वाजते.

"कार्तिक. दिव्या तर नसेल ना ?" आर्यन

"ती बाई तर मस्त रोलची तयारी करून आली असेल. मेलो. "कार्तिक रडत नखे चावू लागला.

क्रमश...

🎭 Series Post

View all