Wif On Rent !! पार्ट 5

समलैंगिक प्रेम कथा
ती मुलगी खूपच गोड होती. अगदी सुंदर बाहुली भासावी अशी. कुणीतरी तिची सुंदर वेणी बांधली होती. हातात एक टेडीबीअर होते. पाठीवर छोटीशी स्कुल बॅग होती. चेहऱ्यावर निरागसता होती. कार्तिकला पाहून सुंदर कळी खुलावी तशी ती गालातल्या गालात हसली.

"बच्चा कोण आहेस तू ? मजाक करत आहेस का ?" कार्तिक

"नाही. मी आयशा. तुमची मुलगी. बाबा मला भूक लागलीय. प्लिज काहीतरी खायला द्या!" आयशा

"सॉरी. पण मी तुझा बाबा नाहीये बाबा!" कार्तिक

"तुझी आई कुठेय ?" आर्यन

"तुम्ही मध्ये बोलू नका." आयशा जोरात ओरडते.

आर्यन दचकून चार पावले मागे जातो.

"मला बाबा म्हणू नकोस. तुला समजत नाही का. तू माझी मुलगी नाहीस. मम्मी कुठेय तुझी. आजकालचे मुले पण ना नुसते मजाक करतात. प्लिज गो." कार्तिक तिला घराबाहेर ढकलतो आणि दार लावून घेतो.

"चिल्ल. लहान मुले मस्ती करत असतात अश्याप्रकारे!" कार्तिक आर्यनकडे बघत म्हणतो.

"हम्म. " आर्यन

दहा मिनिटाने आर्यन पराठे टेबलावर सर्व्ह करतो.

"ती मुलगी गेली असेल का ?" आर्यन

मग दोघे दार उघडतात आणि त्यांना आयशा रडताना दिसते. इतक्या गोड चिमुरडीच्या डोळ्यातून अश्रू पाहून दोघेजण हळहळतात. कार्तिक लगेच आयशाला उचलतो आणि तिचे अश्रू पुसून किस करतो.

"बाबा. भूक लागलीय." आयशा

"हो बच्चा. पराठे खाऊ!" कार्तिक

मग आयशा गपागप तीन पराठे फस्त करते. आर्यन आणि कार्तिक तिला बघतच बसतात.

"ह्या काकांनी मस्त पराठे बनवले!" आयशा

"थँक्स. तुला कस समजले मी बनवले ते?" आर्यन

"हाताला लागलेल्या पिठावरून!" आयशा

"बच्चे. तुझी मम्मी कुठेय ? आणि तू कुठे राहते ?" कार्तिक

"बाबा.टेन्शन नका घेऊ. मम्मी येईन.मग आपली फॅमिली पूर्ण होणार. बाबा तुम्ही मला आता सोडून तर जाणार ना!" आयशा पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणते.

कार्तिक आर्यनकडे बघतो.

"तू कुठे राहते बेटा ? मोबाईल नंबर आहे का मम्मीचा ?" आर्यन

"नाही. मला माहिती नाही काही. पण मम्मी म्हणली ती रविवारी येईन. बाबा मला तुझी खूप आठवण यायची. तू आता माझ्यासोबत खेळशील का. तू घोडा बन. तू माझा प्रिन्स बनून माझ्याशी लग्न कर. मला खेळणी आणून देशील ना." आयशा अलगद कार्तिकच्या मांडीवर बसते.

"हो बेटा." कार्तिक

"मी मजाक करत होते. मला खेळणी नको. मला फक्त तू हवा. माझा बाबा." आयशा कार्तिकला मिठी मारते.

आयशाला टीव्ही लावून देऊन आर्यन आणि कार्तिक बेडरूममध्ये येतात.

"पिल्लू. प्लिज विश्वास ठेव. मी तुला सोडून कधी कुणाला स्पर्शही नाही केला. " कार्तिक

"आहे विश्वास. तुझे वडील तर नसतील या मागे!" आर्यन

"असू शकतात. पण ते अचानक मुलगी कुठून आणणार. अँड हे करून काय भेटणार त्यांना." कार्तिक

"सरळ पोलिसांकडे जाऊ." आर्यन

"बेस्ट." कार्तिक

मागे आयशा हे सर्व ऐकत असते.

"पोलिसांकडे घेऊन गेले तर बघा. मी पोलिसांना तुमचीच तक्रार करेल." आयशा

"अरे यार. पोरगी नाही बॉम्ब आहे ही. हीच अशी तर हिची आई कशी असणार!" आर्यन

"नाही बेटा. कुणी नाही जाणार पोलिसात." कार्तिक

कार्तिक आयशासोबत खेळत बसतो आणि आर्यन पोलीसस्टेशनमध्ये जातो.

"आयपीएस गश्मीर. प्लिज आमची मदत करा." आर्यन कळवळीने सर्व मॅटर सांगतो.

"मित्र का नाही आला ? ती मुलगी का नाही आली?" गश्मीर

"अहो ती मुलगी भलतीच आगाऊ आहे. येणार नाही इकडे! मित्र तिलाच सांभाळतोय" आर्यन

गश्मीर जोरजोरात हसायला लागतो.

"सर. तुम्ही सिरीयल नाही बघत का एकता कपूरचे ? कॉलेजमध्ये असे खुपदा होते. ट्रिपवर जातात.दारू पितात. रात्र असते. पाऊस एकांत जवानी नशा मग होऊन जाते मॅटर. तुम्ही पर्सनल मॅटर स्वतःच सोलव्ह करा. एक आठवड्यानंतर मुलीची आई आली नाही मग या!" गश्मीर

आर्यन निराश होऊन घरी येतो.

कार्तिक आणि आर्यन एक आठवडा वाट बघतात. पण नकळत त्यांना एका आठवड्यात आयशाचा लळा लागतो. आयशा दोघांसोबत खेळते. वेगवेगळे पदार्थ करायला लावते. दोघे तिच्यासाठी नवीन खेळणी आणतात. बाहुलीचे लग्न लावतात. रात्री कार्तिकला बिलगून गोष्ट ऐकूनच आयशा दोघांच्या मधे झोपत असते.

"उद्या रविवार. उद्या आयशाची मम्मी येणार." कार्तिक

"आणि तुझी पण मम्मी येणारे. कुठून आणणारे बायको ?" आर्यन

"दिव्या म्हणून एक मैत्रीण आहे. कॉलेजची ज्युनिअर होती. ती तयार आहे तात्पुरता रोल करायला!" कार्तिक

"अरे पण आता बनवशील तिला बायको. जीवनभर कस करशील ?" आर्यन

"बघू यार. मम्मी ठीक झाली की सर्व सत्य सांगेल." कार्तिक

"तू नोटीस केलंय का कधी ? आयशा तिच्या हाताचा टेडी बिअर कधीच सोडत नाही. आणि आपल्यासोबत कधीच बाहेर फिरायला येत नाही!" आर्यन

"घाबरत असेल रे बिचारी. आर्यन तुला माहिती आहे का मला नेहमी वाटायचे की माझे एखादी क्युट मुलगी असावी. मी तिचे केस विंचरणार. दोन छोटयाशा जुट्टू बांधणार. डॉल असेल ती माझी. आयशा मला माझीच मुलगी वाटते." कार्तिक

"खूप छान. मला पण लळा लागलाय तिचा. बघू उद्या काय घडतंय. नक्कीच तुझ्या कॉलेजची कुणीतरी मैत्रिण अस मजाक करत असेल. " आर्यन

"एक विचारु का ?" कार्तिक

"हो." आर्यन

" आपण दोघे असच फेक बायका आणू. आणि सोबत राहायचे का आयुष्यभर. किती सुंदर होईल ना. आपला संसार असेल. आपला पण आशियाना असेल. " कार्तिक

"सॉरी. पण लग्न माझ्यासाठी मजाक नाही. मी आईवडिलांना तुझ्यासारखे अस खोटे बोलू शकत नाही. " आर्यन

"वेट. मी मनापासून खोटे बोलतोय का. आईची तब्येत नाजूक आहे म्हणूनच खोटे बोलतोय ना. आणि सत्यवादी हरिश्चंद्र का बनतोय ? इतका सत्यवादी आहे तर सांग गे आहेस म्हणून. " कार्तिक

"तेवढी हिंमत असती तर विषयच नव्हता काही. मी गावाकडचा आहे रे. थोडे हातवारे इकडे तिकडे झाले की बायल्या म्हणून चिडवतात. बाबांना नेहमी मुलगा म्हणून पहिलवान गडी हवा होता. पण मी छुईमुई. कधी त्यांच्या नजरेत वर होऊ शकलो नाही. आहे मी गे पण नाही सांगू शकत जगाला. कारण जगात लांडगे असतात जे घास घ्यायला टिपलेले असतात. नाहीये माझ्यात हिंमत सर्वाना फेस करण्याची. मला लग्न करावेच लागेल. मला आईवडीलांना दुखवता नाही येणार. " आर्यन

"वाह. आता कळले तुझे खरे प्रेम. माझे लग्न झालेय कळताच इतके रडत का होतास. नाटके होती ना ती. ढोंग होते. मला वाटायचे तू माझ्यावर प्रेम करतो. पण जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तू फक्त माझा युज करून घेतोय. बिस्तर गरम करण्यासाठी. " कार्तिक

"तुला जे वाटतय ते वाटू दे. मला तुझा लाईफ पार्टनर नाही बनता येणार पण तुझा सोलमेट बनायचा आहे. माझे पहिले आणि शेवटचे प्रेम तूच असशील. मी रडलो कारण तू न विचारता लग्न केले असे वाटले. तुझ्या लग्नात तर मी आनंदी असेल. मी लग्न करतोय तर तुला लग्न करण्यापासून अडवण्याचा मला काय अधिकार ? " आर्यन

"तू जर खर प्रेम करत असता तर मला कधी लग्न करू दिले नसते!" कार्तिक

पाणावलेल्या डोळ्यांनी आर्यन उठतो.

कार्तिक पण थोड्या वेळाने उठतो. दोघेजण आयशाच्या दोन्ही बाजूने विरुद्ध दिशेला तोंड करून झोपलेले असतात.

क्रमश..

🎭 Series Post

View all