Wife On Rent ! पार्ट 3

समलैंगिक प्रेम कथा
आज हाल्फ डे होता. म्हणून आर्यन लवकरच घरी आला. पण कार्तिक घरी नव्हता. घरात पसारा करून गेला होता. त्याचा फोनही लागत नव्हता. आर्यनला भुक लागली होती. म्हणून पोपकॉर्न घेऊन टीव्हीवर मॅच बघू लागला. आर्यनची आवडती टिम "मुंबई इंडियन्स" हरत होती. त्यामुळे आर्यन चिडला होता. सोफ्यावर उडी मारून टीमला चिअर करत होता. त्यात काही पोपोकॉर्न सांडले गेले. तेवढ्यात बेल वाजली.

"आली वाटते इकडची स्वारी !" आर्यन आनंदाने म्हणला.

पण दार काढताच समोर कार्तिक नव्हताच. एक प्रौढ स्त्री असते. दिसायला अगदी श्रीमंत घरातली वाटत होती. प्रौढ असली तरी चेहऱ्यावर तेज होते. निरागस हास्य जाणवत होते.

"कोण हवे मॅडम ?" आर्यन

"मी कार्तिकची आई मिसेस जिंदल !" ती स्त्री म्हणली.

"ओह. आत या ना. सॉरी मी ओळखले नाही!" आर्यन

ती स्त्री आत येते. आर्यन लगेच बसायला जागा निर्माण करतो. सोफा साफ करतो. मिसेस जिंदलसाठी पाणी वगैरे आणतो.

"कार्तिक घरी नाहीये आंटी. फोन ट्राय करतोय पण लागत नाही!" आर्यन

"काही हरकत नाही. घर तस बऱ्यापैकी स्वच्छ ठेवले आहे! हा पसारा किट्टूनेच केला असेल! " मिसेस जिंदल

"हा . कार्तिक तसाच वागतो. थँक्स. मला जरा आवड आहे स्वच्छतेची!" आर्यन

कार्तिकचा फोन लागतो.

"कार्तिक. पटकन घरी ये. तुझी आई आली आहे !" आर्यन आनंदाने म्हणतो.

कार्तिकला आनंद होतो. इकडे मिसेस जिंदलचा ड्रायव्हर सारे गिफ्ट आणून ठेवतो.

"माझी सून कुठे आहे ?" मिसेस जिंदल विचारतात.

"सून ?" आर्यनला शॉक बसतो.

"मला समजले आहे की कार्तिकने लग्न केले आहे. सांग बर माझी सून कुठे राहते!" मिसेस जिंदल

आर्यनला धक्का बसतो.

"तो आला की त्यालाच विचारा. मला काहीच आयडिया नाही. " आर्यन

"इथे किती दिवसापासून आहेस ?" मिसेस जिंदल

"दोन वर्षे झाली!" आर्यन

"किट्टू कधी कधी अति करतो. तुला साधे सांगितले पण नाही!" मिसेस जिंदल

मग थोड्या वेळाने कार्तिक लगेच घरी येतो. येताच धावत येऊन त्याच्या आईला मिठी मारतो. त्याचे डोळे पाणावतात.

"लग्न केले आणि आईला सांगूही नाही वाटले!" मिसेस जिंदल

कार्तिक आर्यनकडे बघतो. आर्यन रागाने बघतो.

"आई ते अचानक ठरले सो करावे लागले!" कार्तिक घाबरून म्हणतो.

"पण सून कुठे आहे ?" मिसेस जिंदल

"आई ती माहेरी गेलीय!" कार्तिक

"हम्म. तुझ्या मित्राला कस नाही माहीत लग्न झालेय ते ?" मिसेस जिंदल

"आई. जस्ट लग्न झाले. मी सर्वात आधी तुला सांगणार होतो. पण बाबांनी नेहमीसारखे रायता पसरवला. ती अस पण दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायची!!" कार्तिक

"पण आई म्हणून एकदा पण विचारावे नाही वाटले का रे ? लग्न म्हणजे काय कॉल आहे का अचानक लागला म्हणायला. " मिसेस जिंदल

"आई तुझी हार्ट सर्जरी सुरू होती ग. प्लिज किट्टूला माफ कर!" कार्तिक उदास चेहरा करत म्हणाला.

"तुला माहिती आहे की तू रडतो की मी लगेच रुसवा सोडते!" मिसेस जिंदल कार्तिकचे कान ओढत म्हणल्या.

हे सर्व बघताना आर्यनचे हृदय तुटत होते. कितीतरी प्रश्नांनी मनात काहूर माजवले होते.

"तुला दोन वर्षाने बघून बर वाटले. आजारपणात कधी तुला भेटता पण आले नाही नीट. तू चल की चेन्नईला!" मिसेस जिंदल कपाळावर किस करत प्रेमाने कुरवाळत म्हणतात.

"आई ग. सेंटी नको होऊ. पुष्पा आई हेट टीअर्स!!" कार्तिक म्हणतो.

"मला फोटो तर दाखव ना सुनेचा!" मिसेस जिंदल

"आई मोबाईल डेड आहे. पुन्हा सेंड करतो!" कार्तिक

मिसेस जिंदल खूप गप्पा मारतात. पण त्यांना एक फोन येतो. त्यांच्या एका मैत्रिणीची डेथ झाली असते. म्हणून अंतिम दर्शनासाठी काळजावर दगड ठेवून जावे लागते.

"पण सुनेला बघायचे आहे बर. मी एक आठवड्यात येईल. तोपर्यंत सून हजर पाहिजे!" मिसेस जिंदल जाताना म्हणतात.

त्या जाताच आर्यनच्या अश्रूंचा बांध फुटतो. तो खोलीत जाऊन स्वतःला कोंडवतो आणि रडायला लागतो. कार्तिक दार आपटतो. आर्यन थोड्या वेळाने दार उघडतो.

"तू फसवले मला कार्तिक. तुझे लग्न झाले तरी माझ्यासोबत बेड शेअर केले. " आर्यन रडत म्हणतो.

रडून रडून त्याचे डोळे लाल झालेले असतात.

कार्तिक त्याच्या खांद्यावर हात ठेवतो पण आर्यन झटकतो.

"चूप. रडू नको. इतकाच भरोसा का माझ्यावर ?" कार्तिक ओरडतो.

मग आर्यन शांत होतो. कार्तिक त्याला पाणी पाजवतो. आर्यन कार्तिकला घट्ट मिठी देतो.

"मी सर्व सहन करेल. पण तू माझा विश्वास तोडलेले मला चालणार नाही. मी सर्वात जास्त प्रेम तुझ्यावर केले आहे.

खुदा से भी ज्यादा आपको मानते है
दुनिया बुराई करे आपको ही चाहते है
हर कोई धोखा दे हमे हसके सेह लेंगे
पर आप बेवफा तो जीते जी मर जाएंगे..!!

~ आर्यन✍️

" आर्यन

कार्तिक आर्यनचे अश्रू पुसतो आणि ओठांवर ओठ टेकवतो.

क्रमश..


🎭 Series Post

View all